फ्रीलान्सर म्हणजे काय? 1 लाख/महिना 2022 Full Details| What Is Freelancer Meaning In Marathi?

Photo of author

By admin

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वाना माहीतच आहे की जग किती वेगाने डिजिटल होत आहे. या डिजिटल युगात freelancing ला चांगलीच डिमांड येत आहे. तर नक्की हे freelancing काय आहे? फ्रीलान्सर म्हणजे काय? What is freelancer meaning in Marathi? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

माझ्या मतानुसार freelancing हा शब्द तुम्ही पण या lockdown नंतर च ऐकला असेल. कारण मला पण freelancing बद्दल lockdown मधेच कळलं होत. काही जण असतील पण त्यांना याबद्दल माहित असेल. पण जास्तकरून आपल्या देशात freelancing ला lockdown नंतर च डिमांड आली आहे.

मित्रांनो, आपल्या देशात ऑनलाईन काम करणे जास्त प्रचलित नव्हतं. पण या lockdown नंतर सर्वाना च कळलं की जर आपल्या बिजनेस ला वाढवायचं असेल तर आपला बिजनेस ऑनलाईन घेऊन जाणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या देशात पण digitalization वाढलं.

जास्तीत जास्त लोक त्यांचे व्यवसाय डिजिटल पद्धतीने करू लागले आहेत. कारण सर्वाना च डिजिटल मार्केटिंग चे महत्व कळले आहे. डिजिटल मार्केटिंग आता सर्वात जास्त grow करणारी इंडस्ट्री बनली आहे.

Freelancing हा एक digitalization च भाग आहे. बाकीच्या देशांमध्ये freelancing खूप अगोदर पासून करत आहेत. पण आता आपल्या देशात पण freelancing चे प्रमाण वाढत आहे.

USA मध्ये 59 million फ्रीलान्सर आहेत आणि आपल्या देशात फक्त 15 million. आपल्या देशाची लोकसंख्या खूप जास्त असून तरीपण फक्त 15 miilion च freelancer आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

मित्रानो, मी पण एक freelancer आहे. मी lockdown मध्ये freelancing कशी करतात हे शिकलो आणि आता मागच्या एक वर्षांपासून फ्रीलान्सर म्हणून काम करत आहे. आणि त्यामधून चांगल्या प्रकारे earning सुध्दा करत आहे.

मला freelancing बद्दल काहीच माहित नव्हतं आणि प्रॉपर असं guidance पण भेटलं नाही. म्हणून मला शिकायला time लागला. पण आता मी चांगल्या प्रकारे freelancing करून घरी बसून ऑनलाईन पैसे कमवत आहे. आणि हाच माझा अनुभव पण तुमच्यासोबत share करणार आहे.

हो मित्रांनो हे खर आहे. घरी बसून सुध्दा पैसे कमवले जाऊ शकतात. आताच्या काळात ते सहजरित्या शक्य झालं आहे. घरी बसून पैसे कमवण्यासाठी सर्वात चांगलं काम म्हणजे freelancing.

तर चला नक्की freelancing म्हणजे काय? आणि तुम्ही फ्रीलान्सर बनून कसे ऑनलाईन पैसे कमवू शकता ते बघूया.

Table of Contents

फ्रीलांसींग म्हणजे काय?

What Is Freelancing Meaning In Marathi?

Freelancer meaning in marathi

मित्रांनो, बॉस ची चीक-चीक कोणाला आवडते? आपण जिथे काम करतो तिथे या गोष्टी येतातच. माझा बॉस असं माझा बॉस तसा, खूप workload आहे, payment कमी आहे. अशा गोष्टी आपण आतापर्यंत बघत आलो. कोणी जॉब सेक्टर मध्ये असेल तर त्यांनी या गोष्टी नक्कीच अनुभवल्या असतील.

मी पण जॉब केला आहे. म्हणून मला या गोष्टी जास्त च close आहेत. मी या गोष्टी अनुभवल्या आहेत. आपण आजूबाजू च्या जॉब करणाऱ्या लोकांची पण same condition आहे. यावर पर्याय एकच स्वतःचा बिजनेस किंवा फ्रीलांसींग.

फ्रिलांसींग पण बिजनेस मधेच मोडते. पण फ्रीलांसींग करण्यासाठी कोणत्याही भांडवलाची गरज लागत नाही.

हे इंटरनेट च युग आहे आणि जवळ जवळ सर्व क्षेत्रात इंटरनेट पोहचलं आहे. टेक्नॉलॉजी advance झाल्यामुळे खूप इंडस्ट्री मधले वर्क घरी बसून करणे सुध्दा शक्य झालं आहे. या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मुळे जगामध्ये कुठलंही काम घरी बसून करता येते.

पहिले लोक ऑफिस मध्ये जाऊन काम करत होते पण आता ऑफिस चे काम घरी बसून सुध्दा करणे शक्य झालं आहे.

जर तुम्हाला बॉस च टेन्शन नकोय. ऑफिस मध्ये जायायला नको वाटत असेल. तर तुम्ही फ्रीलांसींग करू शकता.

फ्रीलांसींग मध्ये तुम्ही तुमच्या कलेनुसार, तुमच्या आवडीनुसार काम करू शकता. तुमच्या आवडत काम करून त्यामधून पैसे कमवू शकता.

Freelancing मध्ये free चा अर्थ होतो – मुक्त असणे. आणि lancing चा अर्थ होतो- एक विशिष्ट व्यक्ती.

फ्रीलन्सिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही ऑफिस मध्ये न जाता, घरी बसून स्वतःसाठी काम शोधणे आणि त्या client चे काम पैसे घेऊन करून देणे होय. 

म्हणजेच एखाद्या व्यक्तीला एखाद काम करून पाहिजे आहे, आणि त्या व्यक्तीला तुम्ही ते काम पैशाच्या बदल्यात पूर्ण करून देणे.

फ्रीलांसींग म्हणजे एक बिजनेस. त्याचे तुम्ही स्वतः मालक असता. तुमचा कोणताही बॉस नसतो. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही काम करू शकता. जर तुमचा मूड असेल तर काम करू शकता नाहीतर मग नाही.

पण यामध्ये तुम्हाला फिक्स सॅलरी नसते. तुम्ही जेवढं काम करता तेवढे पैसे तुम्हाला मिळतात. पण फ्रीलांसींग चा benefit असा आहे की तुम्ही तुमचा महिन्याचा पगार एका दिवसात पण कमवू शकता.

मित्रांनो, आपल्या भारत देशात लोक freelancer बनून महिन्याला लाखों रुपये कमवत आहेत.

फ्रीलान्सर म्हणजे काय?

What Is Freelancer Meaning In Marathi?

Freelancer meaning in marathi

सरळ भाषेत सांगायचं झालं तर फ्रीलान्सर म्हणजे फ्रिलांसींग चे काम करणारा व्यक्ती.

फ्रीलान्सर म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःचे स्किल वापरून स्वतंत्रपणे क्लायंट चे ऑनलाईन किंवा ऑफलाईन काम करून देणारा व्यक्ती होय. फ्रीलान्सर त्याच्या वेळेनुसार, त्याच्या मर्जीनुसार  काम करतो. तो पूर्णपणे स्वतंत्र असतो. 

फ्रिलान्सर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काम शोधतो आणि client ला जस काम पाहिजे असते तस काम करून देतो. त्या कामाबद्ल्यात फ्रिलान्सर client कडून त्या कामाचे पैसे charge करतो. म्हणजेच ते काम किती वेळेमध्ये झालं? ते काम किती अवघड होत? यानुसार client कडून पैसे घेतो.

फ्रिलान्सर चे सर्व कामे त्याच्या स्किल वर डिपेंड असतात. जर तुमच्याकडे कोणतंही स्किल असेल तर तुम्ही फ्रीलान्सर बनून पैसे कमवू शकता. फ्रीलान्सर बनण्यासाठी एखाद स्किल असणे आवश्यक असते.

उदा. जर तुम्हाला चांगले sketch काढता येत असतील तर एखादा व्यक्ती तुम्हाला sketch काढायचं काम देऊ शकतो. तो तुम्हाला ऑनलाईन फोटो पाठवून sketch काढायला सांगू शकतो. नंतर तुम्ही त्या व्यक्तीच sketch काढून त्याला ऑनलाईन पाठव शकता. त्याबदल्यात तो तुम्हाला पैसे देतो.

उदा. जर तुम्हाला data entry चे काम जमत असतील तर तुम्ही ऑनलाईन असे क्लायंट शोधू शकता ज्यांना data entry चे वर्क करून पाहिजे आहे. त्यांना ते काम करून देऊन पैसे कमवू शकता.

म्हणजेच जे स्किल तुम्हाला येत असेल ते काम करून तुम्ही फ्रीलान्सर बनून लाखो मध्ये पैसे कमाऊ शकता.

हो मित्रांनो, हे खर आहे, फ्रिलान्सर बनून तुम्ही महिन्याला लाखों रुपये कमवू शकता.

आपल्या देशामध्ये फ्रेलान्सर ची average income 20 लाख रुपये आहे. खालील इमेज बघा किंवा तुम्ही स्वतः Google वर सर्च करून बघा.

freelancer meaning in marathi

आता तर आपला भारत देश पण डिजिटल होत आहे. त्यामुळे freelancer चे काम वाढत आहे आणि त्यांची इनकम सुध्दा वाढत आहे.

तर मित्रांनो, फ्रीलान्सर कसे बनायचे ते बघूया.

फ्रीलान्सर कसे बनायचे? How To Become A Freelancer In Marathi?

Freelancer meaning in marathi

फ्रीलान्सर हा स्वतःचा च बॉस असतो. सर्व काही त्याला एकट्याला च करावं लागते. त्यामुळे त्याच्याकडे एखाद स्किल असणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे एखाद स्किल असेल तरच तुम्ही फ्रिलान्सर बनू शकता. आणि त्या स्किल मध्ये तुमची चांगली पकड असायला हवी.

ज्या स्किल ची बाहेरील मार्केट मध्ये डिमांड आहे ते स्किल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर असे कोणतेही स्किल तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रीलान्सर बनू शकता.

आता मार्केट मध्ये जास्त गरज आहे असे स्किल खालीलप्रमाणे:

टॉप फ्रीलांसींग स्किल (Top Freelancing Skill In Marathi)

 1) कंटेन्ट रायटिंग (Content Writing)

2) डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

3) विडिओ एडिटिंग (Video Editing)

4) सोशल मीडिया मार्केटर (Social Media Marketer)

5) वेब डिज़ाइनिंग (Web Designing and Web Development )

6) अकाउंटिंग (Accounting)

7) ग्राफिक डिजाइनिंग (Graphic Designing)

8) डाटा एंट्री (Data Entry)

9) कन्सल्टन्सी (Consultancy)

10) ऐप डेवलपमेंट (App Development)

11) सोशल मीडिया हँडलिंग (Social Media Handling)

वरील सर्व high paying स्किल आहेत. जर तुम्हाला यापैंकी कोणतेही स्किल येत असेल तर तुम्ही फ्रीलान्सर बनून खूप पैसे कमवू शकता.

टीप - तुमचा एक चांगला मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, की असे खूप जण असतील त्यांच्याकडे कोणते स्किल नसेल किंवा यापैकी कोणतंही स्किल येत नसेल. आणि ते म्हणत असतील माझ्याकडे तर कोणतेच स्किल नाही मग मी कसा फ्रीलान्सर बनू किंवा कशी फ्रीलान्सर बनू?
तर मित्रांनो आताच्या काळात एखाद स्किल शिकणे काहीच अवघड नाही. तुम्ही फ्री मध्ये पण स्किल शिकू शकता. YouTube वर खूप videos आहेत. Google वर सर्व माहिती मिळते. 
मी पण पहिले स्किल शिकलो आणि नंतर च फ्रीलान्सर बनलो. तर मित्रांनो थोडा वेळ द्या आणि एक चांगलं स्किल शिका नंतर तुम्हाला जॉब करायची पण गरज पडणार नाही. कारण हे मी करतोय तर असं मला वाटते तुमही पण करू शकता. 
आता आपल्या मराठी मुला-मुलींनी असे स्किल शिकून स्वतःचे startup open केले पाहिजे.

फ्रीलांसींग तुम्ही एकट्यामध्ये करू शकता किंवा तुमच्या फ्रिलान्सर मित्रांसोबत team बनवून काम करू शकता. म्हणजेच तुम्ही तुमची स्वतःची agency काढू शकता.

फ्रीलांसींग काम कस करायचं? (How To Do Freelancing Work In Marathi?)

Freelancer meaning in marathi

फ्रीलांसींग काम चालू करणे खूप easy आहे. हे तर तुम्हाला कळलं च असेल की तुमच्याकडे एखाद स्किल असेल तर तुम्ही फ्रीलान्सर बनू शकता.

तर आता तुम्ही फ्रीलांसींग च वर्क कस घेणार मारकेतूंग मधून ते बघूया.

खालील काही टॉप फ्रीलांसींग वेबसाईट आहेत.

मित्रांनो, या ग्लोबल फ्रीलान्सर वेबसाईट आहेत. यावरून तुम्ही तुम्हाला स्किल related क्लायंट मिळवू शकता. ते तुम्हाला online काम देतील आणि तुम्ही त्यांना ते काम online करून द्यायच. या वेब्सिते वर तुम्ही बाहेरील देशामधील लोकांचे पण काम घेऊ शकता.

1) यापैकी कोणत्याही वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला तुमचं अकाउंट open करा लागेल.

2) त्यानंतर तुम्हाला तुमचा profile चांगल्या प्रकारे सेट करावा लागेल. तुम्हाला ज्या ज्या स्किल येतात त्या स्किल प्रोफाईल मध्ये टाका लागते. जेवढं स्ट्रॉंग तुमचं प्रोफाईल असेल तेवढ जास्त project मिळण्याचे chance असतो. कारण या वेबसाईट वर खूप competition असते.

3) तुमचं profile स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट लागते. तुमच्या वेबसाईट वर वर तुमचा पोर्टफोलिओ पाहिजे असतो. कारण जेव्हा कोणता क्लायंट तुमची वेबसाईट बघेल तेव्हाच तो तुम्हला काम देईल.

3) प्रोफाईल सेट करून झाल्यावर तुम्हाला biding लावा लागते. तुम्हाला जे काम येते त्या कामाचे rate आणि experience ची पोस्ट करा लागते.

4) बस एवढंच, झालं मग तुमचं अकाउंट सेट. ज्या लोकांना तुमचं प्रोफाईल चांगलं वाटेल ते तुम्हाला काम देतात. यामध्ये खूप फ्रीलान्सर लाखो मध पैसे कमवत आहेत.

5) यांसारख्या वेबसाईट वर काम भेटणे सुरवातीला खूप अवघड जाते. कारण या वेबसाईट वर दुनियाभरातील लोक काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला client भेटायला time लागू शकतॊ.

टीप - मित्रांनो, तुम्हाला जर लवकर client पाहिजे असतील तर तुम्ही तुमच्या स्किल च्या रिलेटेड Facebook group वर जाऊन तुमच्या कामाची माहिती देऊ शकता, पोस्ट टाकू शकता. त्यामधून तुम्हाला लवकर क्लायंट मिळतील. 

तसेच सुरवातीला तुम्ही तुमच्या ओळखीमधल्या लोकांचे काम करायला घ्या. त्यामधून तुम्हाला हळू हळू बाहेरील काम पण भेटायला लागतील आणि तुम्ही तुमचा फ्रीलासिंग बिजनेस वाढवू शकता.

मी सुध्दा सुरवातीला असेच काम मिळवले आणि हळू हळू मला जास्त काम मिळायला लागले. आणि नंतर मी एक टीम बनवली आणि आमची agency चालू केलं. digitalstarx.com ही माझी agency आहे.

मित्रांनो, तुम्ही freelancing वेबसाईट वरून काम घ्या किंवा फेसबुक ग्रुप किंवा बाहेरील ओळखींमधून. सर्वजण तुमची वेबसाईट चेक करतीलच. त्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट असणे खूप आवश्यक आहे. तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून वेबसाईट खरेदी करू शकता.

Hostinger.in

कमी किमतीमध्ये बेस्ट होस्टिंग आहे. जर तुम्ही beginer असाल तर मी तुम्हाला hostiger recomend करेल. तुम्ही कमी किमतीमध्ये एक चांगली वेबसाईट बनवू शकता.

फ्रीलांसींग करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते?

1) Skill: वरती सांगिल्याप्रमाणे स्किल असेल तर च तुम्ही फ्रीलांसींग चे काम करू शकता. त्यामुळे तुम्हाला स्किल शिकणे महत्वाचे असते.

2) Mobile, Laptop: तुम्हाला क्लायंट ची काम करायला या दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. लॅपटॉप वरून च तुम्ही चांगल्या प्रकरणे काम करू शकता. जास्त महागाचा लॅपटॉप असण्याची काही गरज नाही.

3) Internet Connection: फ्रीलांसींग चे काम करायला इंटरनेट लागतेच. त्यामुळे इंटरनेट च connection असणे गरजेचं आहे.

4) Client: स्किल जरी तुमच्यकडे असलं तरी तुम्हाला क्लायंट शोधायला लागेल. क्लायंट असल्यावर च तुम्ही पैसे कमवू शकता.

5) Bank Account: फ्रीलांसींग चे काम ऑनलाईन असल्यामुळे तुमचं आणि तुमच्या क्लायंट मधील transaction पण ऑनलाईन होते. त्यामुळे तुमच्याकडे बँक अकॉउंट लागते.

एक यशस्वी फ्रीलान्सर कस बनायचं?

Freelancing काम करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता पण त्यासाठी तुम्हाला high paying client ची गरज असते, त्यासाठी तुम्हाला खालील points लक्षात ठेवा लागतील.

1) Expertise Your Skill:

Freelancing काम करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला येत असेलेल्या स्किल मध्ये मास्टर असणे खूप गरजेचं आहे. कारण ज्याचं काम उत्तम असते, क्लायंट पण त्यांनाच काम देतो.

2) Plan Your Work:

फ्रीलांसींग मध्ये तुम्हला एका वेळेस खुप क्लायंट ना handle करा लागते. त्यामुळे तुमच्या सर्विस ची योग्य प्लॅनिंग असणे खूप आवश्यक आहे. तसेच कोणत्याही कामाची जर प्लॅनिंग केली तर ते काम चांगल्या प्रकारे होतात.

3) Deliver Quality Work:

तुम्ही कोणतीही सर्विस देत असाल पण ती हमेशा quality मधेच असली पाहिजे. जर तुम्ही quality वर्क दिल तर तुम्हाला अजून जास्त काम मिळतील.

4) Social Media Profile:

मित्रांनो, जर तुम्हाला freelancer बनायचं असेल तर तुम्हाला तुमच profile सोशल मीडिया वर तयार करा लगेल. सोशल मीडिया वर profile असल्याने तुमच्या कस्टमर चा तुमच्या विश्वास बसतो.

5) Create Your Portfolio:

फ्रीलांसींग करताना सर्वात पहिले बघितला जातो ते म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ. त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट बनवणे खूप गरजेचं आहे. वरती मी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही वेबसाईट खरेदी करू शकता. खालील लिंक वर क्लिक करून पण वेबसाईट खरेदी करू शकता.

Hostinger.in

6) Take Feedback:

तुम्ही ज्या ज्या क्लायंट चे वर्क करणार त्या क्लायंट चे फीडबॅक घेणे महत्वातचे असते. त्यामुळे तुम्ही नवीन कस्टमर ला तुमच्या जुन्या क्लायंट चे फीडबॅक सांगितल्याने तुम्हाला लवकर काम मिळेल.

7) Pricing:

मित्रांनो जेव्हा तुम्ही या फिल्ड मध्ये नवीन असता तेव्हा तुम्हाला कमी किमतीमध्ये सर्विस द्या लागते. कधीकधी कस्टमर ला काही दिवस फ्री वर्क सुद्धा करून द्या लागते. त्यामुळे तुम्ही स्ट्रॅटिन्ग ला कस्टमर कडून पैसे न घेता किंवा कमी पैशामध्ये काम करून द्या.

एकदा जर तुम्ही चांगलं काम करून दिल तर नंतर तुम्ही जास्त charges घ्या. कारण फ्रीलांसींग मध्ये एका क्लायंट चे continue काम असतात. आणि काम चांगलं करून दिल्यावर तो तुमचं नाव त्यांच्या ओळखींमध्ये असलेल्या बिजनेस ना पण recomend करतात.

फ्रीलांसींग चे फायदे (Advantage Of Freelancing In Marathi):

1) यामध्ये तुम्ही तुमचे बॉस असता. हे सर्वात मोठा फ्रीलांसींग चा फायदा आहे.

2) तुम्हला यामध्ये जागेचे स्वतंत्र असते. तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून काम करू शकता. तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेले किंवा enjoy करायला जरी गेले तिथून सुध्दा तुम्ही काम करू शकता. तुम्हाला ऑफिस मध्ये जायायची गरज नसते.

3) तुम्हाला कोणते काम करायचे? किती काम करायचे? हे सर्व तुमच्यावर अवलंबून असते.

4) अजून सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये तुम्हाला वेळेचे स्वतंत्र असते. तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता.

5) फ्रीलांसींग मध्ये zero इन्व्हेस्टमेंट मध्ये काम बिजनेस चालू करता येतो. तुम्हाला पैशाची गुंतवणूक करा लागत नाही.

6) फ्रीलांसींग मध्ये तुम्ही कधीपण सुट्टी किंवा विश्रांती घेऊ शकता. कारण इथे तुम्ही तुमचे बॉस असता.

7) सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या rate नुसार क्लायंट कडून पैसे घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला पैसे कमवायला limit नसते. जेवढं जास्त काम तुम्ही करणार तेवढे जास्त पैसे तुम्हाला मिळणार. महिन्याला लाखों रुपये पण तुम्ही सहज कमवू शकता.

फ्रीलांसींग करताना काही गोष्टी लक्षात ठेवून करा लागतात.

याला फ्रीलांसींग चे तोटे म्हणता येणार नाही म्हणू मी तुम्हाला तोटे म्हणून सांगणार नाही. फक्त काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे.

1) फ्रीलांसींग करायची असल्यास क्लायंट तुम्हाला शोधावे लागतात. सुरवातीला क्लायंट मिळवणे थोडं अवघड जाते.

2) यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे कामाची सुरक्षितता नसते. म्हणजेच या महिन्यात क्लायंट च काम आहे पण ते पुढच्या महिन्यात असेल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदर च जास्त क्लायंट सोबत ठेवून च काम करा लागते.

3) फ्रीलांसींग मध्ये तुम्हाला fix payment नसतो. म्हणजेच जेवढं काम तुम्ही करतात तेवढाच payment तुम्हाला मिळतो.

4) कधी कधी क्लायंट ला अर्जंट असेल तर तेव्हाच तुम्हाला काम करू द्या लागते.

5) तुमच्या कामामध्ये काही चूक झाली तर त्याचे जबादादर तुम्ही असता. सहसा चूक होत नाही कारण काम घेताना आपण आपल्याला काय जमते तेच काम घेतो.

6) फ्रीलांसींग मध्ये तुम्हाला सतत तुमच्या स्किल मध्ये improvemnt करा लागते. तसेच नवीन नवीन स्किल शिका लागतात.

फ्रीलांसींग मधून पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Freelancing?)

how to earn money from freelancing in marathi

वरती तुम्हाला एक अंदाजा आलाच असेल की फ्रीलांसींग मधून कसे पैसे कमवू शकतो.

मित्रांनो, freelancing आताच्या काळात पैसे कमवण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग आहे.

  • फ्रीलांसींग मधून पैसे कमावण्यासाठी तुम्ही फ्रीलांसींग च्या वेबसाईट वर रजिस्टर करून तिथून प्रोजेक्ट घेऊ शकता. आणि त्यामधून लाखो रुपये कमवू शकता.
  • तसेच तुम्ही फेसबुक ग्रुप किंवा इंस्टाग्राम वरून क्लायंट मिळवू शकता. आणि तिथून पैसे कमावू शकता.
  • तुम्ही तुमच्या friends circle मधून काम घेऊ शकता किंवा आजूबाजूंच्या बिजनेस ला भेट देऊन त्यांच्याकडून फ्रीलांसींग चे काम करू शकता.

जॉब vs फ्रीलांसींग (Job Vs Freelancing)

हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून आहे. पण सध्याची देशातील स्तिथी बघता जॉब मिळणे खूप अवघड झालं आहे.

जॉब:

  • जॉब मध्ये तुम्हाला रेगुलर एकच वर्क करा लागते.
  • जॉब तुमचा payment ठराविक असतो.
  • जॉब तुम्हाला वेळेचे बंधन असते.
  • जॉब मध्ये लवकर growth होत नाही.
  • जॉब मध्ये तुम्हाला सर्व बॉस च्या प्रमाणेच करा लागते.

फ्रीलान्सर:

  • यामध्ये तुम्ही वेगवेगळे काम करू शकता.
  • यामध्ये तुम्हाला पैसे कमवायची काही limit नसते. तुम्ही महिण्याला लाखों रुपये पण कमवू शकता.
  • वेळेचे बंधन नसते.
  • तुमची growth लवकर होते.
  • यामध्ये तुम्ही तुमचे बॉस असता.

माझ्या मते फ्रीलान्सर हे जॉब पेक्षा श्रेष्ठ आहे.

FAQ:

फ्रीलान्सर म्हणजे काय?

फ्रीलान्सर हणजे असा व्यक्ती जो त्याच्या मर्जीने काम करून पैसे कमवतो.

फ्रीलांसींग कशी करतात?

फ्रीलांसींग वर्क करायला तुमच्याकडे स्किल असणे आवश्यक आहे. तुमच्याकच्या स्किल ला तुम्ही सर्विस म्हणून विकू शकता. म्हणजेच क्लायंट कडून काम घेऊन तुम्ही ते काम करून देऊ शकता.

फ्रीलांसींग करायला कोणते स्किल पाहिजे?

फ्रीलांसींग करण्याठी कोणतेही स्किल चालेल. सध्या मार्केट मध्ये डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन, डेटा एन्ट्री, सोशल मीडिया मार्केटिंग, सोचल मीडिया हँडलिंग, कंटेन्ट रायटर यांसारख्या स्किल ची खूप डिमांड आहे.

आपल्याला जॉब सोबत फ्रीलांसींग करता येते का?

हो मित्रांनो, तुम्ही जॉब सोबत फ्रीलांसींग करू शकता. तुम्ही जॉब सोबत part time फ्रीलांसींग करू शकता.

फ्रीलांसींग मध्ये करिअर करू शकतो का?

फ्रीलांसींग स्कोप मार्केट मध्ये खूप वाढत चालला आहे. ही एक करिअर ची नवीन संधी आहे. तुम्ही फ्रीलांसींग मध्ये करिअर करू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये फ्रीलान्सर म्हणजे काय? What is freelancer meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.

Share This Post With Your Friend

0 thoughts on “फ्रीलान्सर म्हणजे काय? 1 लाख/महिना 2022 Full Details| What Is Freelancer Meaning In Marathi?”

  1. Thanx sir beacuse deeply knowledge about freelancing…now i am very inspire this concept and i am in next month lounch these concept and i creat of my own website..
    So.massively thanx for my extra yield…

    Reply
  2. Hi plz mala tuchya job madhe admin hoyla avdel plz mala add Kara mala shikva majhya kade laptop ahe pn tumchi khup garj ahe mala … reply sir …and you great sir…

    Reply

Leave a Comment