नमस्कार मित्रांनो, तुम्ही कंटेन्ट रायटिंग हे नाव कदाचित ऐकलं असेलच. तर What is content writing meaning in Marathi? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आजकाल सोशल मीडिया वर पण आपल्याला कंटेन्ट रायटिंग बद्दल इमेजेस किंवा इन्फॉरमेशन दिसते. तर नक्की हे कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
माझा एक कॉलेज मित्र आहे. असच एकदा आम्ही भेटलो तर असच आम्ही एकमेकांबद्दल विचारत होतो. तर तो बोलला मी घरी बसून पैसे कमवतो ते फक्त लिहून! तेव्हा याबद्दल जास्त माहिती नव्हतं, म्हणून माझा पण काही विश्वास बसला नाही.
पण जेव्हा त्याने त्याचे सर्व details दाखवल्या आणि त्याची Earning पण दाखवली तेव्हा मला त्याबद्दल समजलं आणि मी त्यावर ची सर्व माहिती घेतली.
हो, हे खरं आहे मित्रांनो, तुम्ही पण घरी बसून फक्त लिखाण काम करून चांगले पैसे कमवू शकता.
आपल्या मधून खूप लोकांना लिहण्याची आवड असते. मग त्यात कविता, शायरी, लेख, कथा, लोकांचे व्यक्तिमत्व यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. तर तुम्ही तुमचे हे स्किल वापरून घरी बसून पैसे कमवू शकता. पण आपल्यापैकी खूप लोकांना हे माहिती नसते की त्यामधून पैसे कसे कमवायचे?
काहींना पैसे कमवायचे माहिती असते पण त्यांना लिहता येत नाही. मित्रांनो लिहणे काही अवघड नाही, लिहणे ही पण एक कला आहे. तुम्हाला जर ही कला जमली तर तुम्ही पण घरी बसून पैसे कमवू शकता. या स्किल ला कंटेन्ट रायटिंग असे म्हणतात.
तर चला आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये हेच सांगणार आहोत की घरातून ऑनलाईन काम करून पैसे कमवायचा सर्वात लोकप्रिय मार्ग कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय? content writing meaning in Marathi.
तुम्हाला पण जर घरातून इंटरनेट वर लिखाण काम करून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हा लेख/ब्लॉग पूर्ण लक्षपूर्वक वाचा कारण आम्ही यामध्ये एक ऑनलाईन पैसे कमवण्याचा मोठा मार्ग याबद्दल सर्व details मध्ये माहिती दिली आहे.
तर चला आता आपल्या मराठी भाषेतून बघूया कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय? आणि कंटेन्ट रायटर बनून तुम्ही लाखों रुपये कसे कमवू शकता?
कंटेन्ट रायटिंग समजण्यासाठी पहिले कंटेन्ट म्हणजे काय? हे समजून घेऊ.
Table of Contents
कंटेन्ट म्हणजे काय? What Is Content Meaning In Marathi?
तुम्ही जर गूगल वर सर्च केलं तर कंटेन्ट चा मराठी मधला अर्थ सामग्री किंवा सामान दाखवते. पण लिखाणामध्ये कंटेन्ट चा अर्थ होतो, तुम्ही एखादी गोष्ट लिहणे. त्यामध्ये कोणतीही गोष्ट असू शकते. उदा. लेख, कविता, संग्रह, सुविचार, संदेश, कथा, शायरी, एखादी इन्फॉरमेशन इत्यादी.
म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादी माहिती लिहता त्याला कंटेन्ट असे म्हणतात.
इंटरनेट वर कंटेन्ट तीन प्रकारचे असू शकतात.
- ऑडिओ कंटेन्ट (Audio Content) – ज्या इन्फोर्मेशन, लेख किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही ऐकता तेव्हा तो कंटेन्ट ऑडिओ कंटेन्ट असतो. उदा. पॉडकास्ट, रेडिओ, इत्यादी.
- विडिओ कंटेन्ट (Video Content) – ज्या कंटेन्ट मधून तुम्ही विडिओ च्या माध्यमातून माहिती प्राप्त करता, त्याला विडिओ कंटेन्ट म्हणतात. उदा. YouTube, movies, इत्यादी.
- टेक्स्ट कंटेन्ट (Text Content) – जे कंटेन्ट तुम्ही वाचू शकता, त्याला टेक्स्ट कंटेन्ट असे म्हणतात. उदा. ब्लॉग/लेख, books, इत्यादी.
टेक्स्ट कंटेन्ट मध्ये writing केली जाते आणि लिहलेले कंटेन्ट वाचले जातात म्हणून कंटेन्ट रायटिंग ही टेक्स्ट कंटेन्ट मध्ये येते.
तर आता कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय? आणि कंटेन्ट रायटिंग कशी करायची ते बघूया.
कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय?
What Is Content Writing Meaning In Marathi?
तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंटेन्ट रायटिंग म्हणजे एखाद्या कोणत्या पण विषयावर लेख लिहणे.
मराठी मध्ये कंटेन्ट रायटिंग म्हणजे मजकूर/ माहिती लिहणे. आपल्या लक्षित प्रेक्षकांपर्यंत प्रभावी संदेश/मजकूर पोहोचविण्यासाठी जो संदेश/मजकूर लिहला जातो त्याला कन्टेन्ट रायटिंग असे म्हणतात.
कंटेन्ट रायटिंग हे काम वयक्तिक ब्लॉग साठी, कंपनी च्या वेबसाईट साठी, न्यूज चॅनेल साठी केले जाते. म्हणजेच लोकांना रायटिंग मधून सर्व माहिती पोहचवण्यासाठी केले जाते.
कंटेन्ट रायटर म्हणजे काय? What Is Content Writer In Marathi?
कंटेन्ट रायटर म्हणजे जो कंटेन्ट लिहतो, म्हणजेच जो व्यक्ती वयक्तिक ब्लॉग,कंपनी वेबसाईट, मॅगजीन, न्यूज यांच्यासाठी कंटेन्ट लिहतो, त्या व्यक्तीला कंटेन्ट रायटर म्हणतात.
उदाहरण, तुम्ही हा ब्लॉग वाचत आहेत. हा ब्लॉग मी लिहला आहे तर मी या ब्लॉग चा कंटेन्ट रायटर आहे आणि हा ब्लॉग कन्टेन्ट.
असेच तुम्ही पण ब्लॉग लिहून कंटेन्ट रायटर बनू शकता.
मित्रांनो तुम्ही कोणत्या पण भाषेत कंटेन्ट रायटर बनू शकता किंवा कंटेन्ट रायटिंग करू शकता. तुम्हाला ज्या भाषेत रायटिंग करणे सोपे जाते किंवा जी भाषा आवडते त्या भाषेत लिहून तुम्ही कंटेन्ट रायटर बनू शकता.
तुम्हाला आता वाटत असेल की कंटेन्ट रायटिंग ची नक्की गरज कोणाला असते?
कन्टेन्ट रायटिंग ची गरज (Importance Of Content Writing):
मित्रांनो कंटेन्ट रायटिंग हि एक अशी फिल्ड आहे, जिथे खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे. कंटेन्ट रायटिंग ची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्हाला प्रश्न पडत असेल की नक्की कशी डिमांड वाढत असेल? तर चला मी तुम्हाला सांगतो.
पूर्ण जगभरात असे खूप लोक आहेत, ज्यांच्या मोठ-मोठ्या ब्लॉग वेबसाईट आहेत, ज्यांच्या कंपनी आहेत, न्यूज वेबसाईट आहेत. तर अशा लोकांना त्यांचे ब्लॉग चालवण्यासाठी जास्त प्रमाणात कॉन्टेन्ट पाहिजे असते. म्हणजे जेवढा जास्त कंटेन्ट त्यांच्या वेबसाईट वर असतो तेवढे ते ग्रो करत असतात.
त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कंटेन्ट त्यांच्या वेबसाईट साठी तयार करावा लागतो. न्यूज वेबसाईट आणि ब्लॉग वेबसाईट वर रोज कंटेन्ट अपलोड करावा लागतात. जर त्यांना दिवसाला १० पोस्ट लिहायचे असतील तर ते एक किंवा दोन कंटेन्ट रायटर कडून पूर्ण होऊ शकत नाही.
त्यासाठी त्यांना जास्त कॉन्टेन्ट रायटर पाहिजे असतात. मग तेव्हा त्या ब्लॉग चे मालक दुसरे कंटेन्ट रायटर ची मागणी करतात. म्हणजेच त्यांच्या ब्लॉग च्या पोस्ट लिहिण्याचे काम देतात आणि त्याबद्दल त्यांना चांगले पैसे देतात.
अजून असे काही ब्लॉगर असतात त्यांना चांगला कंटेन्ट लिहता येत नाही ते पण कंटेन्ट रायटर ला hire करतात आणि त्याच्या वेबसाईट साठी ब्लॉग पोस्ट लिहिण्याचे काम देतात आणि त्यांना प्रत्येक ब्लॉग च्या बद्दल पैसे देतात.
आता तर कंटेन्ट रायटर ची डिमांड वाढल्याने per word साठी कंटेन्ट रायटर ला पैसे द्या लागतात. आणि चांगले कंटेन्ट रायटर per word च्या हिशोबाने पैसे घेत आहेत. एक ब्लॉग १०००- १०००० वर्ड चा असतो. तर तुम्ही अंदाजा लावू शकता, की कंटेन्ट रायटर किती पैसे कमवत असतील.
कंटेन्ट रायटर चे प्रकार (Types Of Content Writer In Marathi):
ऑनलाईन कंटेन्ट रायटर (Online Content Writer):
ऑनलाईन कंटेन्ट रायटर म्हणजे जेव्हा एखादा कंटेन्ट रायटर घरातून इंटरनेट वरून ऑनलाईन काम घेतो आणि ते काम पूर्ण करून क्लायंट ला देतो त्याला ऑनलाईन कंटेन्ट रायटर असे म्हणतात.
ऑनलाईन कंटेन्ट रायटिंग मध्ये जेवढं तुम्ही काम घेसाल तेवढं तुम्ही पैसे कमावणार. यामध्ये तुम्ही कोणत्या पण ऑनलाईन नेटवर्क वरून काम घेऊन ते पूर्ण करू शकता. उदा. फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया वर तुम्ही क्लायंट कडून कंटेन्ट रायटिंग चे काम घेऊ शकता.
ऑफलाईन कंटेन्ट रायटर (Offline Content Writer):
ऑफलाईन कंटेन्ट रायटर म्हणजे असा व्यक्ती जो आजूबाजूच्या बिजनेस लोकांकडून किंवा पोस्ट ऑफिस चे काम ऑफलाईन पद्धतीने घेतो आणि पूर्ण करून देतो, त्याला ऑफलाईन कंटेन्ट रायटर असे म्हणतात.
पण आजकाल ऑफिलाईन कंटेंट रायटर ला काम लवकर भेटत नाहीत म्हणून तुम्ही ऑफलाईन कंटेन्ट रायटिंगचे काम करण्यापेक्षा ऑनलाईन पद्धतीने करा.
फ्रीलांस कंटेन्ट रायटर (Freelance Content Writer):
फ्रीलान्स कंटेन्ट रायटर जो असा व्यक्ती असतो, तो कोणत्याही कंपनी साठी काम करत नाही. तो त्याचा स्वतंत्र असतो. तो freelancer.com, upwork.com, यांसारख्या फ्रीलांसींग कंपनी च्या माध्यमातून क्लायंट कडून काम घेतो आणि त्यांना complete करून देतो.
फ्रीलांस कंटेन्ट रायटर हा त्याच्या मर्जी ने काम करत असतो, त्याचा कोणीही बॉस नसतो. तो कंपनी कडून कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम घेतो व कंपनी त्याला त्याबदल्यात पैसे pay करते.
रेगुलर कंटेन्ट रायटर (Regular Content Writer):
रेगुलर कंटेन्ट रायटर हा एखाद्या कंपनी साठी काम करत असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो कंपनी मध्ये कंटेन्ट रायटर चा जॉब करत असतो. त्याला रेगुलर payment केले जाते.
तसेच तुम्ही कशाबद्दल कंटेन्ट लिहिताय त्यावरून पण त्याचे प्रकार पडले जातात.
- बिजनेस वेबसाईट साठी कंटेन्ट रायटिंग
- SEO साठी कंटेन्ट रायटिंग
- ब्लॉग साठी कंटेन्ट रायटिंग
- मैगजीन्स साठी कंटेन्ट रायटिंग
- वर्तमान पत्र साठी कंटेन्ट रायटिंग
- टेलीविजन चॅनेल साठी कंटेन्ट रायटिंग
- YouTube विडिओ साठी कंटेन्ट रायटिंग
कंटेन्ट रायटिंग मध्ये सारखे वापरात येणारे words जाणून घेऊया याबद्दल एका कंटेन्ट रायटर ला माहित असणे आवश्यक आहे.
महत्वाचे कंटेन्ट रायटिंग टर्म्स (Importance Terms Of Content Writing In Marathi):
वर्ड काउन्ट: एका आर्टिकल मध्ये किती शब्द लिहिले जातात त्या पूर्ण काउन्ट ला वर्ड काउन्ट म्हणतात. उदा. एका आर्टिकल १००० शब्द आहेत तर त्याचा वर्ड काउन्ट १००० आहे.
पी पी डब्लू (PPW- price per word): आपण जर कंटेन्ट रायटिंग चे पैसे घेत असेल तर ते पैसे आपल्याला वर्ड काउन्ट च्या हिशोबाने मिळतात म्हणजे price per word. एका शब्द ला ५०-६० पैसे ह्या हिशोबाने पैसे मिळतात.
एसईओ (SEO): SEO म्हणजे ‘Search Engine Optimization’. म्हणजेच आपण लिहलेल्या कंटेन्ट ला गूगल वर रँक करणे महत्वाचे असते. रँक केल्यावरच तो लिहलेला कंटेन्ट जास्त वाचला जातो आणि त्या कंटेन्ट चा फायदा होतो. म्हणून जो कंटेन्ट रायटर आहे त्याला SEO बद्दल माहित असणे खूप आवश्यक आहे.
>>> एसईओ म्हणजे काय? एसईओ कसा करायचा? संपूर्ण माहिती.
क्लायंट: जो व्यक्ती आपल्याला कंटेन्ट रायटिंग चे काम करायला देतात, त्या व्यक्तीला आपण क्लायंट असे बोलतो.
कन्टेन्ट प्रोजेक्ट: क्लायंट कडून ब्लॉग/आर्टिकल च काम करायला घेणे म्हणजे कंटेन्ट प्रोजेक्ट घेणे.
फ्रीलान्सर: जो व्यक्ती घरी बसून प्रोजेक्ट घेतो, त्याला फ्रीलान्सर म्हणतात. तो कोणत्या कंपनी साठी काम नाही करत तो स्वतःचे प्रोजेक्ट स्वतः मिळवतो.
कंटेन्ट रायटिंग कशी शिकायची? (How To Do Content Writing In Marathi):
कंटेन्ट रायटिंग शिकणे एवढं काही अवघड नाही. कंटेन्ट रायटिंग कोणीपण करू शकते फक्त तो व्यक्ती थोडाफार शिकलेला आणि त्याला लिहण्याची आवड पाहिजे आणि आवड नसली जरी तुम्ही ती आत्मसात करू शकता, जर तुम्हाला कंटेन्ट रायटर बनायचं असेल तर.
कंटेन्ट रायटिंग शिकण्यासाठी आणि त्यामधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकणे महत्वाचे आहे.
१) विषय निवडणे (Niche Select):
कंटेन्ट रायटिंग करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयावर लिहायचे आहे त्याच संपूर्ण knowledge तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
Niche म्हणजे तुम्हाला ज्या टॉपिक वर लिहायचं आहे तो विषय.
तुम्ही हा ब्लॉग बघू शकता यामध्ये यामध्ये ते पॅरेंटिंग वर ब्लॉग बनवतात.
अशी तुम्ही कोणतीही तुम्हाला आवडणारी निश घेऊ शकता.
जेव्हा तुम्ही तुमचं niche सिलेक्ट करता तेव्हा तुम्हाला त्या niche वर लिहणे सोप्पे जाते. म्हणून तुम्हाला कोणत्या विषयांची आवड आहे किंवा त्यामधल तुम्हाला चांगलं knowledge आहे असाच विषय तुम्ही निवडा.
२) ऑब्झरव्हेशन (Observation):
कंटेन्ट रायटिंग मध्ये ऑब्झर्व्हेशन करणे खूप महत्वाचे ठरते. तुम्हाला लोकांचे content observe करा लागतील. कोण असा content लिहतो, कसे इमेजेस use करतो, किती वर्ड चा कंटेन्ट लिहतो या सर्व गोष्टी observe करणे महत्वाचे असते.
तसेच तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या ब्लॉग साठी कंटेन्ट लिहत असणार तर तुमच्या competitor चे ब्लॉग observe करणे खूप गरजेचं आहे. Observe केल्याने तुम्हाला समजते की त्यांनी कसा कंटेन्ट लिहला आहे, कोण कोणत्या गोष्टी त्यांनी ऍड केल्या आहेत, किती words चा कंटेन्ट लिहला आहे.
या सर्व गोष्टी observe केल्याने तुम्हाला तुमचा कंटेन्ट लिहायला मदत होते. उदा. तुमच्या competitor जर काही गोष्टी त्यांच्या ब्लॉग मध्ये add केल्या नसतील तर तुम्ही ते points तुमच्या ब्लॉग मध्ये add करू शकता. त्यांच्यापेक्षा जास्त words लिहू शकता.
त्यामुळे कंटेन्ट लिहतांनी observation करणे महत्वाचे ठरते.
तर चला आता बघूया चांगला कंटेन्ट कसा लिहायचा?
चांगला कन्टेन्ट कसा लिहायचा? How To Write Good Content In Marathi?
मित्रांनो चांगला कंटेन्ट रायटर बनायला चांगला कंटेन्ट लिहणे आवश्यक असते. तरच तुम्ही कंटेन्ट रायटिंग मध्ये करिअर करू शकता आणि चांगल्या प्रमाणात पैसे कमावू शकता. तर चांगला कंटेन्ट लिहायला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते बघूया.
- जास्तीत जास्त वाचन करा.
महत्व्याचे म्हणजे आपल्याला वाचनाची सुध्दा आवड हवी. एक चांगला कंटेन्ट रायटर बनण्यासाठी आपल्याला खूप सारे वाचन करावं लागतं. वाचन केल्याने नवनवीन कल्पना सुचतात, त्या तुम्ही लिहून ठेवा.
यशस्वी कन्टेन्ट रायटर होण्यासाठी लेखकांनी वेगवेगळ्या लेखन शैली साध्य करणे आवश्यक आहे उदा. कथा, कांदबरी, वैयक्तिक ब्लॉग इत्यादी.
तुम्ही एखादा विषय लिहिण्यासाठी निवडला तर त्या विषयावर खूप सारे वाचन करा. तो विषय पूर्ण समजून घ्या. नंतर त्या विषयावर तुमच्या भाषेत लेख/मजकूर लिहायला सुरुवात करा.
- मुद्याला अनुसरून लिहा.
तुम्ही ज्या विषयावर लिहिणार आहेत त्याच विषयावर लिहा. त्या विषया संबंधित गोष्टीवर थोडीफार चर्चा करणे ठीक आहे, पण त्या दुसऱ्या गोष्टीच्या खोलवर जाणे योग्य नाही कारण तुमच्या वाचकांचा लक्ष विचलित होऊ शकते.
उदा. तुम्ही बिजनेस कसा करायचा हे सांगत आहात, तर तुम्ही तुमचा बिजनेस फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जाहिरात करा हे सांगू शकता पण फेसबुक आणि इंस्टाग्राम बिजनेस मार्केटिंग कशी करायची हे त्या ब्लॉग मध्ये सांगू नका.
ज्या गोष्टी आपणास माहित नाही त्या गोष्टी लिहू नका. तुम्ही पॉइंट टू पॉइंट लिहायला शिका. खाली वर पॉईंट लिहू नका. जे पहिले लिहायला हवं ते पहिलेच लिहा आणि जे शेवटला लिहायला हवे ते शेवटी लिहा. बेसिक बसून ऍडव्हान्स पर्यंत लिहा. जेणेकरून वाचकांना समजण्यास सोपे सरळ पडेल.
- चुकांना घाबरू नका.
सतत लिहीत राहा, लिहिल्याने तुम्हाला तुमच्या लिखाणात काय चुका होत आहेत हे समजेल. तसेच तुम्ही लिहिलेले ब्लॉग तुमच्या मित्रांना वाचायाला द्या, त्यांकडून फिडबँक घ्या आणि आपल्या चुका सुधारा.
- Technology चा उपयोग करा.
इंटरनेटचा उपयोग करून तुम्ही तुमचे लेखन अधिक सुधारू शकता. इंटरनेट वर दुसऱ्यांचे लेख वाचून तुम्ही अधिक माहिती गोळा करू शकता. लॅपटॉप किंवा मोबाईल वर तुम्ही MS-OFFICE/Word चा उपयोग करून लेख लिहू शकता. तुमचे ब्लॉग/लेख इंटरनेट वर प्रकाशित करून शकता.
>>>हे देखील वाचा – ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
- चुकीचा कन्टेन्ट लिहू नका.
ज्या विषयावर आपण लिहिणार आहेत त्या विषयावर माहिती गोळा करून लिहा. तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी लिहु नका. तुम्ही जर काही चुकीची माहिती लिहिली तर तुमच्या कंटेन्ट वर असलेला लोकांचा विश्वास नाहीसा होईल आणि परत ते visitors तुमच्या ब्लॉग वर येत नाहीत. त्यामुळे तुम्ही बरोबर असलेला च कंटेन्ट लिहा.
- अप टु डेट राहा
तुम्ही तुमचा कंटेन्ट ठराविक महिन्यांनी update करत राहा. तुमच्या ब्लॉग/लेख वर येणाऱ्या कंमेंन्ट वर प्रतिउत्तर द्या. तुमच्या वाचकांचा इंटरेस्ट कशा मध्ये आहे हे शोधा आणि तसा कंटेन्ट लिहा.
कंटेन्ट रायटिंग मधून पैसे कसे कमवायचे? How To Earn Money From Content Writing?
मित्रांनो कंटेन्ट हे future आहे, त्यामुळे याची डिमांड कमी होणार नाही. लोकांना कंटेन्ट रायटर ची गरज लागणार च आहे, त्यामुळे तुम्ही एक चांगले content writer बनून पैसे कमवू शकता. खालील काही गोष्टी करून तुम्ही कंटेन्ट रायटिंग मधून पैसे कमवू शकता.
- पहिले तुम्ही तुमच्या टॉपिक बद्दल माहिती काढून घ्या. त्या टॉपिक बद्दल book, blogs वाचा. त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त लिहण्याची practice करा. लिहण्याचा नव-नवीन पद्धती शोधा आणि नवीन style ने कंटेन्ट लिहण्याचा प्रयत्न करा.
- तुम्ही लिहलेले कंटेन्ट pdf फाईल मध्ये save करून ठेवा. कारण जेव्हा तुम्हाला क्लायंट मिळतील तेव्हा ते तुमचा लिहलेला कंटेन्ट मागतात एक डेमो म्हणून.
- जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे कंटेन्ट लिहायला लागले तर freelancer.com, upwork.com यांसारख्या प्लॅटफॉर्म वर जाऊन तुमचा पोर्टफोलिओ ऍड करा. म्हणजेच तुमचं अकाउंट ओपन करा. यावरून तुम्हाला खूप जास्त क्लायंट मिळू शकतात.
- तसेच तुम्ही फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्ही तुमचे काम लोकांना दाखवून क्लायंट मिळवू शकता. तसेच इंस्टाग्राम वर पण सुध्दा कंटेन्ट रायटिंग च्या किंवा त्याच्या related pages ला follow करून त्यांना message करून क्लायंट मिळवू शकता.
- जर तुमच्याकडे WhatsApp group असतील तर तिथून पण तुम्ही क्लायंट मिळवू शकता.
- तुम्हाला माहित आहे कि आता खूप सारे YouTube चॅनेल ओपन होत आहेत. त्यांना सुध्दा कंटेन्ट ची गरज असते. तुम्ही त्यांना लिहलेल्या content चे mail करून कंटेन्ट रायटर साठी Enquiry करू शकता आणि क्लायंट मिळवू शकता.
>>> हे देखील वाचा- युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे?
कंटेन्ट रायटिंग चे काम करून किती पैसे कमवू शकता?
कंटेन्ट रायटिंग मध्ये तुम्हला per word मागे पैसे दिले जातात. एक वर्ड मागे ५० पैसे ते १ रु. तर आता १.५० रु. चार्ज करत आहेत आणि एक ब्लॉग किंवा कंटेन्ट १००० words पेक्षा जास्त असतो. तुमच्या क्लायंट ची जेवढी requirement असेल तेवढ्या words चा कंटेन्ट लिहून तुम्ही त्यांना चार्ज करू शकता.
तुम्ही एका दिवसात तुमच्या लिह्ण्याच्या capacity नुसार प्रोजेक्ट घेऊ शकता आणि complete करून देऊ शकता. जर तुम्ही दिवसाला १००० words चे कमीत कमी २ प्रोजेक्ट जरी पूर्ण करून दिले तर तुम्ही दिवसाला २००० रुपये कमावू शकता. आणि महिन्याला ५०-६० हजार सुद्धा कमवू शकता.
पण हे तुम्ही freelancing काम करून च करू शकता. पण जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही कोणत्या कंपनी मध्ये जॉब करत आहात यावरून तुम्हाला payment केले जाते.
जॉब मध्ये फ्रेशर ला जास्त payment दिले जात नाही. तुमच्या लिह्ण्याच्या स्किल वरून तुम्हाला महिन्याला १५-२० हजार payment दिला जातो. पण तुम्ही जॉब सोबत part time मध्ये freelancing चे काम पण करू शकता.
याप्रकारे तुम्ही कंटेन्ट रायटिंग चे काम करून पैसे कमवू शकता.
कंटेन्ट रायटिंग चा विडिओ खाली दिला आहे. तुम्ही तो विडिओ पण बघू शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय? What Is Content Writing Meaning In Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटतील.
पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.
Thanks for the such a useful information.
Most welcome madam! & धन्यवाद तुमच्या कमेंट साठी.
खूप छान माहिती दिलीत सर तुम्ही….मलाही हे करायचे आहे….पण सुरवात कोठून आणी कशी करू हे समजत नाही….
[email protected]
Just msg me on my whatsapp no. 7350250161 I’ll guide you.
Msg me on instagram @vipul.khadse
Thank you sir , khup chaan information dili ahe.
Mla pn bolgs lihinyachi iccha ahe pn suruvat kshi kravi te kalat nahi.
Plz kahitri guidance dya.
Hi Sonali, Massege me on instagram. I’ll guide you. Instagram ID – vipul.khadse
Tumhi far Sunday maritime dili
Thanks
Purn blog read kelyabddal thank you ma’am..!
Tumhi far Sundar marhiti dili
Thanks
Thanx For Your comment ma’am..!
Thankful for the information. Tumhi chhan mahiti deeli. Thank you
Most Welcome Sir! & also thanx to you for your comment!
Thank you! Sir
Tumi prateyk gosht khup chan samjavun sangitlat.
Thank you ma’am for your comment.!
Thank you! Sir
Mi aaj pahilyandach content writing shabd aikla.mala lihinyachi avad hoti pn ya baddal kahich mahiti navate jevha mi Google vr search kela. Teva tum cha hi sait on krun bgitli.
Tumi pratek gosht khup chan samjaun sangitlit.
Most welcome ma’am.! & thanks for your comment.
Khup important mahiti dili sir.
Mala likhanachi aavad aahe pan ti cha asa suddha use hou shakto he samjla tnx for giving right path.Good wishes for your future journey.
Thank You, madam!
Hi Sir Good Afternoon,
We are Skyavenue Pvt. Ltd. Which is Provide to Open a Free Demat Account and also a Call Support Stock Market Training. So I request to you please promote my link. i will gave you charges for it.
link : Sky Stock Market. (http://Skystockmart.com) or Angel One (https://tinyurl.com/angelroyal)
Thank You,
Call or Whatsapp : 020 27148807/9011595007/9763018410
Thank You For contacting us!
खुप सुंदर माहिती,
कंटेन्ट रायटिंग करून ह्या क्षेत्रात आपले भवि्तव्य घडवणे हे किती सोप्पे आहे हे आपण आपल्या ब्लॉग मध्ये सहजरित्या समजाविले आहे. मनापासून धन्यवाद
Thank you!
Hii sir ,Khup uttam mahiti dili ahe,Me Scripts ,Songs vagaire lihile ahet aani content writing aata suru keli ahe tr pudhe kashi vatchal karu kalat nahiye ,Tr tumchya margdarshnachi garaj ahe.
Yes nakkich, mla instagram vr msg kr!
महत्त्वाच्या विषयाबद्दलची उत्तम माहिती तुम्ही मुद्देसूद मांडलेली आहे, धन्यवाद
Thanx For Your Comment
तुम्ही पध्दतशीर विषय समजावून सांगितला आहे….
आपल्यापैकी जवळपास सगळेजण आपापल्या शाळा कॉलेज वयात, प्रेमाबद्दल, मैत्रीबद्दल लेखन करत असतात,तेवढं लेखन मीही करायचो,
काळानुसार बदलत गेलो आणि आता फक्त सवडीअंती जुन्या डायऱ्या वाचून तो आनंद घेत असतो,,
लिहिण्याची सवय राहिली नाही,पण तुमचा लेख वाचून समजलं की त्यातून आनंदासोबत पैसे सुध्दा कमावले जाऊ शकतात, तेव्हा परत लिहायला सुरुवात नक्की करायला आवडेल..
धन्यवाद
Thats Great! Keep Going…
Khup chan blog ahe sir. mahiti pn chan bhetl vevthit ani sutsutit. Thank u sir
Thank You!
Thanks for detailed information.
I am really interested ro know about digital marketing.
मला content writing करायला पण आवडेल.
Please give me further info.
I will be happy to join in your group
Kindly mail your resume to [email protected]
Hi sir khup chan sangital ahe me pn he karnar ahe tumcha ha blog mala khup insipre vatala ani detail sagal sangital ahe
Thank you for your comment!
खूप सुंदर माहिती दिलीत सर धन्यवाद मी एकदा गूगल वर वाचलंय ह्या बद्दल पण सुरवात कशी आणि कुठून करायची ते माहित नव्हता आपण ती माहिती आपल्या लेखातून दिलीत
हा लेख सर्वंनी वाचावा छान उपयोगी आहे धन्यवाद सर
Osm sir
खरंच खुप छान आणि महत्वाची माहिती माहिती दिली आपण
धन्यवाद……..!!❤️