ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? [2022 Full Guide] | What Is Blog In Marathi? & What Is Blogging In Marathi?

नमस्कार मित्रांनो, ब्लॉगिंग हा माझा आवडता विषय आहे. What is blog in marathi? & what is blogging in Marathi? ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? हे आपण या लेख मध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असेल तर ब्लॉगिंग हा सर्वात चांगला पर्याय आहे. 

मित्रांनो, आपण सर्वजण रोज इंटरनेट चा वापर करतो. आपल्याला जी माहिती पाहिजे असते ती गूगल वर सर्च करून मिळवत असतो. कधी तुम्ही हा विचार केला का हि माहिती आपल्याला कशी मिळते?

तर मित्रांनो ही माहिती आपल्याला इंटरनेट वर असलेल्या ब्लॉग मधून मिळते.

जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग करत असणार तर तुम्ही ब्लॉग, ब्लॉगर, ब्लॉगिंग ही नावं ऐकलंच असतील. तसेच जर कोणाला ऑनलाईन पैसे कमवायचे असतील तर तर सर्वात पहिले ब्लॉगिंग हाच पर्याय समोर येतो.

तुम्ही पण जर सर्च केल How to earn money online? ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? तर प्रत्येक ब्लॉग मध्ये ब्लॉगिंग बद्दल माहिती दिलेली असणारच.

आताचा काळ हा डिजिटल काळ आहे. आपला भारत देश पण डिजिटल होत आहे. त्यामुळे आताच्या काळात ऑनलाईन पैसे कमवण्याचे खूप मार्ग तयार झाले आहेत. जसे की, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, अफिलिएट मार्केटिंग, ब्लॉगिंग, कन्टेन्ट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग इत्यादी.

यांसारखे अजून खूप मार्ग आहेत. पण यामधून माझ्या मते ब्लॉगिंग हा सर्वात जुना आणि सोपा मार्ग आहे. लोक खूप वर्षांपासून ब्लॉगिंग करत आहेत आणि खूप पैसे कमवत आहेत.

आजच्या काळात एक चांगल करिअर आणि पैसे कमवण्याचं सर्वात चांगल माध्यम ब्लॉगिंग ला मानलं जात आहे. कारण यामध्ये पैसे सोबत एक चांगली लोकप्रियता पण मिळते.

तर चला what is blogging in Marathi? ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय? हे बघूया. पण त्याअगोदर ब्लॉग म्हणजे काय काय हे समजून घेऊ.

ब्लॉग म्हणजे काय?

What Is Blog In Marathi?

what is blog in marathi

ब्लॉग (Blog) हा इंग्लिश शब्द आहे. हा शब्द web-log या दोन शब्दांमधून बनवला गेला आहे. 1998 मध्ये ब्लॉग ची सुरवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत लोकांनी खूप ब्लॉग पब्लिश केले आहेत. आजपण दिवसेंदिवस खूप ब्लॉग इंटरनेट वर पब्लिश होत आहेत आणि समोर पण होत राहतील.

ब्लॉग मधून लोकांना माहिती मिळते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात, त्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्यामुळे लोक ब्लॉग वाचतात.

ब्लॉग म्हणजे आपले विचार, आपले स्किल, आपल्याला माहित असलेल ज्ञान, आपल्याला आवडत असणाऱ्या गोष्टी याबद्दल लिहून जेव्हा आपण इतरांना इंटरनेट च्या माध्यमातून शेअर करतो, त्याला लेख किंवा ब्लॉग असे म्हणतात.

उदा. तुम्ही तुमच्याबद्दल माहिती लिहू शकता, जर तुम्हाला टेक्नॉलॉजी बद्दल माहित असेल तर तुम्ही त्याबद्दल लिहू शकता. तुम्हाला फिरायला आवडत असेल तर त्याबद्दल लिहून लोकांना माहित देऊ शकता, जर तुम्हाला कूकिंग येत असेल तर त्याबद्दल लेख लिहू शकता. तुम्हाला जर एखाद स्किल येत असेल तर ते लिहून लोकांना शिकवू शकता.

असे खूप गोष्टी आहेत ज्या तुम्ही लिहून त्याबद्दल लोकांना माहिती देऊ शकता. पण तुमच्याकडे काही स्किल असणे किंवा त्या विषयामध्ये आवड असणे गरजेचं आहे. जर तुम्हाला त्या विषयाबद्दल आवड असेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉग लिहू शकता.

ब्लॉग चा उद्देश असा असतो की आपण लिहलेल्या ब्लॉग मधून लोकांना माहिती मिळाली पाहिजे. लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरे भेटली पाहिजे. अर्थात लोकांची मदत झाली पाहिजे.

असे ब्लॉग च चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात आणि त्यामधून चांगल्या प्रकारे पैसे मिळू शकतात.

मित्रांनो, तसेच जर तुम्हाला लिखाणाची ची आवड असेल तर तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग करू शकता.

ब्लॉगिंग म्हणजे काय?

What Is Blogging In Marathi?

what is blogging in marathi

ब्लॉगिंग म्हणजे आपल्या वेबसाईट वर दररोज ब्लॉग पोस्ट लिहून ते पब्लिश करणे. लिहलेल्या ब्लॉग ची चांगल्या प्रकारे डिझाईन करणे. गूगल च्या नियमानुसार त्यामध्ये सर्व गोष्टी ऍड करणे आणि आपल्या ब्लॉग च्या योग्य प्रकारे एसईओ करून इंटरनेट वर प्रकशित करणे. या प्रक्रियेलाच ब्लॉगिंग असे म्हणतात.

ब्लॉग लिहणाऱ्या व्यक्तीला time to time नवीन ब्लॉग पोस्ट करणे, ब्लॉग ची डिझाईन करणे, आलेल्या कॉमेंट्स ना रिप्लाय करणे याप्रकारे एका ब्लॉग ला चालवण्यासाठी ब्लॉगर जे काही करतो त्यालाच ब्लॉगिंग असे म्हणतात.

ब्लॉगर म्हणजे जो व्यक्ती ब्लॉग लिहतो त्याला ब्लॉगर असे म्हणतात.

मित्रांनो, तुम्ही ब्लॉगिंग कोणत्या पण विषयावर करू शकता. पण तुम्हाला त्यामधले knowledge असायला हवे. उदा. स्पोर्ट, एंटरटेनमेंट, टेक्नॉलॉजी, हेल्थ, सायन्स, कूकिंग, इन्फॉर्मशनल, न्यूज इत्यादी.

मित्रांनो ब्लॉगिंग हा एक बिजनेस आहे. तुम्ही जर योग्य प्रकारे ब्लॉगिंग केली तर तुम्ही यामध्ये खूप successful होऊ शकता.

ब्लॉगिंग करून लोकांनी बिजनेस उभे केले. काही लोक ब्लॉगिंग वर त्यांच्या कंपनी चालवत आहेत. त्यामुळे तुम्ही जर ब्लॉगिंग बद्दल serious असणार तर नक्कीच ब्लॉगिंग करा.

ब्लॉगिंग ला तुम्ही part time पण सुरु करू शकता आणि एकदा जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये success झाले तर तुम्ही full time करू शकता.

पण मित्रांनो ब्लॉगिंग करणे तेवढं सोपं पण नाही. ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला खूप वर्क करावे लागते. यामध्ये पण खूप टेक्निकल गोष्टी असतात ते तुम्हाला शिकून घ्यायला लागतात. नवनवीन गोष्टीची माहिती collect करावी लागते. आणि रेगुलर update राहावे लागते.

ब्लॉगिंग मध्ये सातत्य (consistency) असणे खूप महत्वाचे असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे धैर्य (patience) असणे खूप महत्वाचे असते. कारण यामध्ये ग्रो करायला time लागतो. पैसे कमवायला पण time लागतो. कोणताही ब्लॉगर एका दिवसात किंवा एका महिन्यात success होत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो.

पण जर तुम्हाला एकदा या सर्व गोष्टी समजल्या तर तुम्ही चांगल्या प्रकारे ब्लॉगिंग करू शकता.

>>>हे पण वाचा – वेबसाईट चे वेगवेगळे प्रकार 

ब्लॉगिंग वेगवेगळ्या प्रकारात केली जाते. ब्लॉगिंग चे प्रकार खालीलप्रमाणे:

ब्लॉगिंग चे प्रकार | Types Of Blogging In Marathi.

types of blogging in marathi

1) वैयक्तिक ब्लॉगिंग (Personal Blogging):

वैयक्तिक ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतः बद्दल ची माहिती ब्लॉग द्वारे लोकांना सांगणे.

यामध्ये तुम्ही स्वतः बद्दल ची सर्व माहिती देऊ शकता. तुम्ही काय करता? तुमची दिनचर्या कशी असते? तुम्ही दिवसभरात काय काम करता? तुमचं daily routine काय आहे? तुम्ही कोणते कोणते टास्क करता, तुमचे प्रॉब्लेम्स कसे solve करता? या प्रकारे तुम्ही माहिती ब्लॉग मध्ये लिहू शकता.

म्हणजे तुमच्याबद्दल सर्व माहिती तुम्ही ब्लॉग मधून मांडू शकता. खूप लोक आहेत जे की पर्सनल ब्लॉगिंग करत आहेत.

लोकांना असे वैयक्तिक ब्लॉग वाचायला आवडतात. म्हणून तुम्ही पर्सनल ब्लॉगिंग करू शकता.

2) बिझनेस/प्रोफेशनल ब्लॉगिंग (Business/Professional Blogging):

बिझनेस ब्लॉगिंग मध्ये तुम्ही तुमच्या प्रोफेशनल बद्दल ब्लॉग लिहून ती इन्फॉरमेशन लोकांना शेअर करू शकता.

तुम्ही जॉब करता की बिझनेस करता तर त्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ते तुम्ही कसे solve करता? तुम्ही कोणते कोणते नवीन टास्क करता? तुम्ही बिझनेस ग्रो करण्यासाठी काय काय करता? म्हणजेच तुम्ही तुमच्या बिझनेस ची इन्फॉरमेशन लोकांना शेअर करू शकता.

तसेच तुम्ही दुसऱ्या कोणत्यापण बिझनेस बद्दल ब्लॉग लिहून त्या बिझनेस ची इन्फॉर्मशन पण लोकांना शेअर करू शकता.

लोकांना असे बिझनेस ब्लॉग पण वाचायला आवडतात कारण त्यामध्ये त्यांना बिझनेस ची माहिती मिळते. तुम्ही जर बिझनेस करत असणार किंवा तुम्हा तुम्हाला बिझनेस बद्दल चांगलं knowledge असेल तर तुम्ही बिझनेस ब्लॉगिंग करू शकता.

3) निश/विषय ब्लॉगिंग (Niche Blogging):

निश ब्लॉगिंग म्हणजे एखादा विषय निवडून त्याच विषयावर ब्लॉग लिहणे. उदा. फिटनेस, कूकिंग, ट्रॅव्हल, डिजिटल मार्केटिंग, शेअर मार्केट, टेक्नॉलॉजी, सायन्स, एंटरटेनमेंट, मूव्ही इत्यादी.

यांसारख्या खूप निश कॅटेगरी असतात. तुम्ही यामधून कोणतीं पण एक निश निवडू शकता आणि त्यावर ब्लॉगिंग करू शकता.

उदा. जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर तुम्ही ट्रॅव्हल हि निश निवडून त्याबद्दल माहिती लिहू शकता. लोकांना वेगवेगळ्या ठिकाणचे इन्फॉरमेशन शेअर करू शकता.

उदा. तुम्हाला जर कूकिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्याबद्दल ब्लॉग लिहून ब्लॉगिंग करू शकता.

उदा. जर तुम्ही तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये एक्स्पर्ट असणार तर तुम्ही त्याबद्दल ब्लॉगिंग करू शकता.

4) अफिलिएट ब्लॉगिंग (Affiliate Blogging):

अफिलिएट ब्लॉगिंग म्हणजे कंपनी चे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल ब्लॉग लिहून ते सेल करणे.

तुम्ही यामध्ये कंपनी चे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस चे review लिहू शकता.तसेच amazon वरच्या प्रॉडक्ट चे review लिहून त्या प्रॉडक्ट ची लिंक तुमच्या ब्लॉग मध्ये देऊ शकता.

मित्रांनॊ इंटरनेट वर खूप लोक अफिलिएट ब्लॉगिंग करत आहेत. तुम्ही पण चांगले प्रॉडक्ट निवडून त्यावर अफिलिएट ब्लॉगिंग करू शकता.

5) रिवर्स ब्लॉगिंग (Reverse Blogging):

रिवर्स ब्लॉगिंग म्हणजे काही ब्लॉगर मिळून एका च ब्लॉग वर काम करणे.

यामध्ये तुम्ही गेस्ट पोस्टिंग साठी ब्लॉग बनवू शकता. रिवर्स ब्लॉगिंग मध्ये तुम्ही टीम ने काम जर शकता. तुम्हाला यामध्ये एकाच ब्लॉग मध्ये काम करावे लागते.

तुम्ही रिवर्स ब्लॉगिंग पण करू शकता.

6) मीडिया ब्लॉगिंग (Media blogging):

मीडिया ब्लॉगिंग सोशल मीडिया साठी ब्लॉग लिहणे. यामध्ये तुम्ही विडिओ ब्लॉग पोस्ट, इमेज ब्लॉग पोस्ट, इंस्टाग्राम ब्लॉग पोस्ट, फेसबुक ब्लॉग पोस्ट या रिलेटेड मीडिया ब्लॉगिंग करू शकता.

>>>हे पण वाचा – यूट्यूब मधून पैसे कसे कमवायचे?

>>>हे पण वाचा – इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

ब्लॉगिंग कस सुरु करायचं ? How To Start Blogging?

how to start blogging in marathi

1) निश/विषय निवडणे (Select Niche):

ब्लॉगिंग सुरु करतांनी सर्वात पहिले तुम्हाला कोणत्या विषयाच्या संबंधित ब्लॉग लिहायचे आहेत, हे निवडणे खूप महत्वाचे असते. म्हणजेच तुम्हाला एक निश/विषय निवडावा लागतो. विषय निवडल्यावर च तुम्ही त्यावर ब्लॉग लिहू शकता.

Niche म्हणजे ज्या विषयावर आपल्याला ब्लॉग लिहायचा असतो त्याला niche असे म्हणतात.

ब्लॉगिंग साठी विषय (Niche) कसा निवडायचा? How To Find Niche For Blogging In Marathi?

मित्रांनो ब्लॉगिंग मध्ये niche निवडणे च खूप अवघड जाते. कारण मला पण खूप यूजर्स विचारत असतात कि niche कशी निवडायची आणि कोणती निवडू म्हणून.

Niche निवडणे तेवढं अवघड पण नाही. तर चला मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सोप्या पद्धतीने niche कशी निवडू शकता.

सर्वात पहिले तुम्ही स्वतःला ओळखायला हवं. म्हणजेच तुमची आवड कशात आहे,तुम्हाला कोणते छंद आहेत, तुम्हाला कशामधलं कौशल्य आहे. जास्तकरून ज्या विषयात तुमची आवड असेल तोच विषय तुम्ही निवडायला हवा. कारण ज्या विषयात आपल्याला आवड असते त्या विषयात काम करायचा आपण कधीच कंटाळा करत नाही.

आवड असलेल्या विषयांमध्ये आपण चांगल्या प्रकारे लिखाण करू शकतो. त्यामुळे तुम्हाला ज्या विषयांमध्ये आवड असेल तर तुम्ही ती niche निवडा.

तसेच तुम्हाला एखाद स्किल असेल तर तुम्ही त्या स्किल वर तुम्ही ब्लॉग लिहू शकता.

अजून माझ्याकडे काही प्रश्न असेपण येतात की, जर आमच्याकडे काही स्किल नसेल तर आम्ही ब्लॉगिंग कशी करू?

तर याच उत्तर असं आहे की मित्रांनो सध्याच्या काळात एखाद स्किल शिकणे काही अवघड नाही. तुम्ही आता free मध्ये पण खूप स्किल शिकू शकता. तुम्ही त्यासाठी यूट्यूब आणि गूगल चा वापर करू शकता. युट्यूब वर स्किल शिकवणारे खूप जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत. तसेच गूगल वर free कोर्सेस ची माहिती उपलब्ध आहे.

तुम्हाला एक स्किल शिकण्यासाठी जास्तीत जास्त 6 महिने लागू शकतात.

मित्रांनो आपण 4 वर्ष डिग्री पूर्ण करायला घालवतो. त्यानंतर च आपल्याला जॉब लागते. म्हणून तुम्ही 6 महिने एक स्किल शिकण्यासाठी द्या आणि त्यानंतर त्या स्किल वर ब्लॉगिंग चालू करा.

तुम्ही खालील विषयावर ब्लॉग लिहू शकता.

  • डिजिटल मार्केटिंग
  • ट्रॅव्हल
  • फॅशन
  • कूकिंग
  • हेल्थ
  • फिटनेस
  • ब्युटी टिप्स
  • बॉडी ग्रूमिंग
  • फोटोग्राफी
  • फूड
  • मनोरंजन
  • लाईफस्टाईल
  • टेक्नॉलॉजी
  • सायन्स
  • बिजनेस
  • पॉलिटिक्स
  • गेमिंग
  • फायनान्स
  • शेअर मार्केट

तसेच यांसारखे अजून खूप विषय आहेत. वरील तुम्हाला आवड असलेल्या कोणत्या पण विषयावर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.

2) डोमेन आणि होस्टिंग (Domain & Hosting):

ब्लॉगिंग करायचं असल्यास तुमच्याकडे वेबसाईट असणे महत्वाचे आहे. तुम्ही वेबसाईट शिवाय ब्लॉगिंग करू शकत नाही. तुम्ही वेबसाईट वर च ब्लॉग लिहू शकतात. त्यामुळे वेबसाईट असणे आवश्यक आहे.

वेबसाईट म्हणजेच डोमेन आणि होस्टिंग.

डोमेन- डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईट च नाव. उदा. digitalstarx.com, digitalvipulk.com हे वेबसाईट च नाव आहे.

होस्टिंग – होस्टिंग म्हणजे आपल्या वेबसाईट ला इंटरनेट वर प्रकाशित करा लागते. म्हणजेच आपल्या वेबसाईट ला स्टोर करणारी एक जागा. bluehost.in ह्या लिंक वरून तुम्ही होस्टिंग घेऊ शकता. 

वेबसाईट घ्यायचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. 

Blogger.com

WordPress.com

Blogger.com वर तुम्ही फ्री मध्ये वेबसाईट घेऊन फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकता. पण मी तुम्हाला recommend करतो की तुम्ही WordPress वर वेबसाईट बनवा. Beginner साठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. तिथे तुम्हाला चांगले feature मिळतात.

WordPress मध्ये खूप plugin आहेत जे तुम्हाला SEO साठी मदत करतात. तुमचा ब्लॉग रँक करायला मदत करतात. तुम्ही blogger पेक्षा चांगल्या प्रकारे वेबसाईट बनवून ब्लॉग लिहू शकता.

तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमची वेबसाईट घेऊ शकता.

Bluehost.in

ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे? How to Earn Money From Blogging In Marathi?

मित्रांनो ब्लॉगिंग हे एक करिअर आहे. एक बिजनेस आहे. तर त्यामधून तुम्ही खूप जास्त प्रमाणात पैसे कमवू शकता. ब्लॉगिंग मधून पैसे कमवायला Time लागतो हे खर आहे. पण एकदा पैसे येणे चालू झालं की मग Continue येत राहतात.

1) गूगल ऍडसेन्स (Google AdSense):

ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात चांगला मार्ग म्हणजे गूगल ऍडसेन्स. तुमच्या वेबसाईट वर जर चांगलं ट्राफिक येत असेल तर तुम्ही गूगल ऍडसेन्स ला apply करू शकता. ऍडसेन्स Aprove झाल्यावर गूगल तुमच्या वेबसाईट वर ads दाखवते आणि त्या ads चे पैसे तुम्हाला pay करते.

तसेच तुम्ही वेगवेगळे ऍडसेन्स पण तुमच्या वेबसाईट वर add करू शकता.

जर तुमच्या वेबसाईट वर चांगल ट्राफिक असेल तर तुम्ही लाखो मध्ये पण पैसे कमवू शकता.

2) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):

काही ब्लॉगर फक्त अफिलिएट मार्केटिंग साठी ब्लॉगिंग करतात.आणि त्यामधून महिन्याला लाखो रुपये कमवतात.

तुम्ही प्रॉडक्ट चे review करून ते प्रॉडक्ट अफिलिएट करू शकता. आणि त्यामधून पैसे कमवू शकता.

>>>हे पण वाचा – अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? आणि अफिलिएट मार्केटिंग कशी करतात?

ब्लॉगिंग चे फायदे । Benefits Of Blogging In Marathi.

Benefits of blogging

  • तुम्ही तुमचं एक वेगळं करिअर बनवू शकता.
  • तुमचा कोणी बॉस नसणार. तुम्ही स्वतःचे च बॉस.
  • तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता.
  • तुम्ही कोणत्यापण ठिकाणाहून ब्लॉगिंग करू शकता.
  • तुमची पर्सनल ब्रॅण्डिंग वाढते. म्हणजेच तुमची लोकप्रियता वाढते.
  • तुम्ही स्वतःची कंपनी उभी करू शकता.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

मित्रांनो तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल सर्व कळलं च असेल. त्यासाठी तुम्ही एक नवीन करिअर ची सुरुवात करू शकता. तुम्ही तुमच्या कॉलेज सोबत ब्लॉगिंग करून पैसे कामू शकता. 

ब्लॉगिंग वेबसाईट असें आवश्यक आहेत ते तर तुम्हाला माहित झालं. तुम्ही जर biginner असणार तर Bluehost वरून तुमची वेबसाईट खरेदी करू शकता. Bluehost च का? या याची सर्व माहिती खालील ब्लॉग मध्ये दिली आहे.

>> ब्लूएहोस्ट होस्टिंग रिव्हिव्ह 

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्हाला या ब्लॉग मध्ये ब्लॉगिंग म्हणजे काय? What is blogging in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend

13 thoughts on “ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? [2022 Full Guide] | What Is Blog In Marathi? & What Is Blogging In Marathi?”

Leave a Comment