[2022] मध्ये ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग|1लाख/महिना [20 Best Way] | How To Make Money Online In Marathi?

नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात ऑनलाईन पैसे कसे कमावायचे? how to make money online in Marathi? असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर आपण या ब्लॉग मध्ये हेच बघणार आहोत की ऑनलाईन काम करून महिन्याला १ लाख रुपये कसे कमवू शकतो? त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग/लेख पूर्ण वाचा.

मित्रांनो आजचा काळ हा डिजिटल चा काळ आहे. सर्व जग डिजिटल होत आहे. आपला भारत देश पण डिजिटल होत आहे. हा डिजिटल होण्याचा काळ ५ वर्षानंतर आला असता, पण २०२०-२०२१ च्या कोविड व्हायरस मुळे हे आताच शक्य झालं आहे.

थोडं स्पष्ट करून तुम्हाला सांगतो, जर आपल्या देशात Covid virus मुळे lockdown झालं नसत तर लोकांना ऑनलाईन बद्दल जास्त समजलं नसत. म्हणजेच ऑनलाईन ची Value आता जाणवली नसती. पण आता २०२०-२१ मध्ये झालेल्या lockdown मुळे आताच ऑनलाईन ची गरज जाणवली.

कारण Lockdown मुळे लोकांचे व्यवसाय ठप्प झाले. जे व्यवसाय ऑनलाईन नव्हते ते बंद पडले. त्यामुळे लोकांना ऑनलाईन बिजनेस ची value समजली.

लॉकडाऊन मुले खूप लोकांचे जॉब/व्यवसाय गेले. आपल्या भारतात तर मागच्या (२०२०) वर्षी १४ करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या वर्षी (२०२१) पण खूप लोकांचे जॉब गेले. त्यामुळे लोकांचा ऑनलाईन बिजनेस कडे कल झाला. मागच्या आणि या वर्षी खूप लोकांनी ऑनलाईन बिजनेस करायला सुरुवात केली. कारण ऑनलाईन बिजनेस आपण घरी बसून पण करू शकतो.

मित्रांनो आपल्या सर्वाना एक Secure life पाहिजे असते. आपल्या परिवाराला सर्व गोष्टी मिळाव्या यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. आपण स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करायला आपण जॉब किंवा बिजनेस करत असतो.

आताच्या काळात आपल्याला सर्व गोष्टी मिळवण्यासाठी ऑनलाईन काम करणे किंवा आपले बिजनेस ऑनलाईन घेऊन जाणे गरजेचं आहे. आताच्या काळात आणि येणाऱ्या काळात ऑनलाईन बिजनेस शिवाय पर्याय नाही. तर आताच मित्रांनो ऑनलाईन काम करायला चालू करा.

मित्रांनो आता ऑनलाईन पैसे कमवणे खूप सोपं झालं आहे. ऑनलाईन पैसे कमवण्याचे खूप मार्ग तयार झाले आहेत.

मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये २० असे मार्ग सांगणार आहे ज्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता. जर तुम्ही खूप मेहनतीने काम केलं तर तुम्ही महिन्याला १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पैसे पण कमवू शकता. तुम्ही जॉब पेक्षा पण जास्त पैसे ऑनलाईन काम किंवा ऑनलाईन बिजनेस करून कमावू शकता.

पण तुम्हाला ऑनलाईन काम करण्यासाठी ते काम शिकणे महत्वाचे आहे. तुम्हाला ते स्किल येणे आवश्यक असते. मी तुम्हाला शॉर्ट टर्म साठी कसे पैसे कमवायचे किंवा गेम खेळून कसे पैसे कमवायचे हे सांगणार नाही. कारण शॉर्ट टर्म पैसे कमावून कोणी आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही.

मित्रांनो तुम्हाला काही स्किल येत पण असणार आणि नवीन स्किल शिकणे आता काही अवघड नाही. तुम्ही ३-६ महिन्यात चांगले स्किल शिकून ऑनलाईन बिजनेस करू शकता.

तर चला मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग कोणते ते बघूया.

Table of Contents

ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग कोणते?How to make money online in marathi

How To Make Money Online In Marathi?

१) डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing):

तुम्ही या मागील काही वर्षात डिजिटल मार्केटिंग बद्दल नक्कीच ऐकलं असेल. डिजिटल मार्केटिंग ला आता खूप स्कोप आला आहे. संपूर्ण जग आता डिजिटल होत आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग ची डिमांड वाढली आहे. आणि ही डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

बिजनेस ला इंटरनेट वर घेऊन येण्यासाठी डिजिटल मार्केटिंग ची खूप गरज आहे. डिजिटल मार्केटिंग मुळे तुम्ही तुमच्या बिजनेस ला ऑनलाईन इंटरनेट वर नेऊ शकता.

तुम्हाला तर माहितच आहे बिजनेस मध्ये मार्केटिंग किती महत्वाची असते. ट्रॅडिशनल मार्केटिंग ला लागणारे पैसे आणि वेळ खूप आहे, त्यामुळे जास्तीत जास्त बिजनेस हे डिजिटल मार्केटिंग करत आहे.

तुम्ही डिजिटल मार्केटिंग ही स्किल शिकून छोट्या व मोठ्या व्यसायांना डिजिटल मार्केटिंग च्या सर्व्हिसेस देऊ शकता. यामध्ये facebook ads, google ads यांसारख्या सर्व्हिसेस देऊन तुम्ही त्यांच्या बिजनेस ना इंटरनेट वर किंवा सोशल मीडिया वर प्रोमोट करू शकता.

अशा सर्व्हिस मधून तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता. असे सर्व्हिसेस देऊन खूप डिजिटल मार्केटर महिन्याला लाखों रुपये कमवत आहेत. ते स्वतःची डिजिटल मार्केटिंग ची कंपनी चालवत आहेत. तसेच तुम्ही सुद्धा डिजिटल मार्केटिजिंग ची कंपनी पण टाकू शकता आणि त्यामधून चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता.

digitalstarx.com, digitaloceanx.in,  इत्यादी डिजिटल मार्केटिंग कंपनी आहेत.

मित्रांनो डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज बनली आहे. त्यामळे तुम्ही ही स्किल शिकून एक चांगले डिजिटल मार्केटर बनू शकता.

तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करा.

>>> डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

२) युट्यूब चॅनेल (YouTube Channel):

मित्रांनो युट्यूब हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, त्यामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमावू शकता. युट्यूब हे जगामधील दुसऱ्या नंबर च सर्वात मोठं सर्च इंजिन प्लॅटफॉर्म आहे. गूगल नंतर सर्वात जास्त युट्यूब वर सर्च केलं जाते.

आजचा काळ तर व्हिडिओ चा काळ असं मानलं जात आहे. लोकांना आता व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती बघायला आवडत आहे. आणि व्हिडिओ च्या मध्यमातून ती माहित लवकर समजते. त्यामुळे व्हिडिओ ची डिमांड खूप वाढली आहे.

या २ वर्षात (२०२०-२०२१) सर्वात जास्त युट्यूब चॅनेल बनवले गेले. कारण लॉकडाऊन मुळे लोक घरी होते आणि त्यांनी ऑनलाईन इनकम सोर्स म्हणून युट्यूब हा मार्ग निवडला. कारण हा एक सोपा मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्या युट्यूब चॅनेल वर अपलोड करायचे असतात.

अपलोड केल्याला व्हिडिओ वर गूगल ads दाखवते आणि त्या ads चे पैसे आपल्या अकॉउंट मध्ये जमा होतात. जेवढे जास्त views तेवढी जास्त इनकम.

व्हिडिओ टाकताना काही गोष्टी योग्य रीतीने कराव्या लागतात. म्हणजेच तुम्हाला एका कॅटेगरी चे व्हिडिओ बनवणे आवश्यक असते. उदा. फिटनेस, ट्रॅव्हल, कूकिंग, डिजिटल मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, कॉमेडी विडिओ, इत्यादी. यांसारख्या niche वर व्हिडिओ बनवू शकता.

तसेच तुम्हाला रेगुलर व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक असते. तुमचे १००० subscriber आणि ४ हजार तासाचा watch time पूर्ण व्हावा लागतो. त्यांनतरच तुमच चॅनेल Monetize होते.

मित्रांनो आता युट्यूब ला चांगलीच डिमांड आहे. तुम्हाला जर व्हिडिओ बनवायची आवड असेल तर नक्कीच तुम्ही युट्यूब चॅनेल चालू करून त्यामधून पैसे कमवू शकता.

तुम्हला जर युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लीक करा.

>>> युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे?

३) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):

मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवण्याच्या मार्गात अफिलिएट मार्केटिंग सर्वात सोपा आणि जास्त इनकम असलेला मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला कंपनी चे प्रॉडक्ट अफिलिएट करायचे असतात.

अफिलिएट मार्केटिंग म्हणजेच एखाद्या कंपनी चे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस लोकांना रेफर करणे. रेफर करून जी वस्तू किंवा सेवा लोक घेतात, त्यामागे तुम्हाला काही टक्के कमिशन दिले जाते.

तुम्ही कंपनी चे अफिलिएट प्रोग्राम जॉईन केल्यावर कंपनी कडून तुम्हाला एक लिंक दिली जाते. ती लिंक तुम्हाला दुसऱ्या लोकांना रेफर करावी लागते. ही लिंक तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनेल वर किंवा तुमच्या वेबसाईट वर देऊ शकता. त्यामधून तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता.

मित्रानो तुम्ही जर अफिलिएट मार्केटिंग शिकली आणि थोडी मेहनत घेऊन अफिलिएट मार्केटिंग केली तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये सहज कमावू शकता.

तुम्हाला जर अफिलिएट मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता.

>>> अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

४) इंस्टाग्राम अकॉउंट (Instagram Account):

इंस्टाग्राम हे सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम च app आता सर्वांच्या मोबाईल मध्ये use केलं जाते.

सध्याच्या काळात इंस्टाग्राम खूप मोठं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलं आहे. इंस्टाग्राम वर दर महिन्याला ४०० मिलियन यूजर्स active असतात. आणि हा आकडा पाहून तुम्हला कळलं असेल च की इंस्टाग्राम हे किती मोठं प्लॅटफॉर्म झालं आहे.

इंस्टाग्राम वर तुम्ही तुमच्या आवडत्या niche वर किंवा तुमच्या स्किल नुसार पेज बनवू शकता. रेगुलर पोस्ट टाकून त्यावर फॉलोवर्स वाढवू शकता. जेव्हा तुमचे जास्त फॉलोवर्स होतील तेव्हा तुम्ही कंपनी चे प्रॉडक्ट प्रोमोट करून त्यामधून पैसे कमावू शकता. इंस्टाग्राम वर पण तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता.

इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवतात त्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून माहिती मिळवू शकता.

>>> इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?

५) फेसबुक पेज (Facebook Page):

मित्रांनो इंस्टाग्राम प्रमाणेच तुम्ही फेसबुक वर पण पैसे कमवू शकता. आपल्या भारतात पण फेसबुक वापरकर्ते खूप आहेत. तुम्ही तुमच्या स्किल नुसार पेज बनवू शकता आणि त्यावर फॉलोवर्स वाढवू शकता.

जास्त मेंबर च फेसबुक पेज बनवून तुम्ही ते पेज विकू पण शकता आणि त्याबदल्यात जास्त पैसे कमावू शकता. यामध्ये पण तुम्ही तुमच्या पेज वर कंपनी चे प्रॉडक्ट अफिलिएट करून पैसे कमवू शकता. याप्रकारे तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वरून पण ऑनलाईन पैसे कमावू शकता.

६) फ्रीलांसींग (Freelancing):

Freelancing म्हणजे आपण आपल्या स्किल नुसार क्लायंट ची ऑनलाईन कामे कामे घेऊन ती पूर्ण करून देणे. फ्रिलांसींग मध्ये तुम्ही ऑनलाईन कामे घेऊ शकता आणि ती complete करून दिल्यावर तुमचे क्लायंट तुम्हाला pay करतात.

फ्रिलांसींग असं काम आहे की तुम्ही तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. तुम्हाला जेवढं काम पाहिजे तेवढं घेऊ शकता. त्यामधून तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता.

जर तुमच्याकडे वेबसाईट डिझाईन, लोगो डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अँप डेव्हलपर, डेटा एंर्टी, व्हिडिओ एडिटिंग यांसारखे कोणते पण स्किल असेल तर तुम्ही फ्रिलांसींग वर्क करू शकता.

Freelancer.com, fiverr.com, upwork.com ह्या website वर तुम्ही तुमची प्रोफाईल बनवू शकता. आणि तुम्ही तुमच्या स्किल्स नुसार काम घेऊन पूर्ण करून देऊ शकता.

आपल्या भारतात पण खूप लोक असे आहेत जे की फ्रिलांसींग वर्क करत आहेत. काहीजण part-time मध्ये तर काही जण full-time फ्रिलांसींग करत आहेत आणि त्यामधून खुप जास्त पैसे कमवत आहेत. ऑनलाईन पैसे कमवण्याचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे फ्रिलांसींग.

तर तुमच्याकडे पण काही स्किल असेल तर तुम्ही फ्रिलांसींग करून महिन्याला लाखो रुपये सहज कमावू शकता.

७) ब्लॉगिंग (Blogging):

ब्लॉगिंग ही अशी फिल्ड आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा बिजनेस पण सुरु करू शकता. ब्लॉगिंग म्हणजे तुमचे विचार, तुमचे स्किल आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी लिहून गूगल वर प्रकाशित करणे.

यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयावर लेख लिहून तुम्ही पैसे कमावू शकता. होय मित्रांनो तुम्ही फक्त लिखाण काम करून पैसे कमवू शकता.

जर तुम्हाला टेक्नॉलॉजी मध्ये आवड असेल तर तुम्ही त्याबद्दल माहिती लिहून पैसे कमवू शकता. तसेच ट्रॅव्हल ब्लॉग, कूकिंग ब्लॉग, मूव्ही ब्लॉग अशा कोणत्यापण तुम्हाला आवडणाऱ्या विषयावर लिहून तुम्ही पैसे कमावू शकता.

तुम्हाला यामध्ये काही जास्तीचा खर्च करावा लागत नाही. तुम्हाला फक्त एक वेबसाईट खरेदी करून त्यावर ब्लॉग लिहावे लागतात.

वेबसाईट खरेदी करण्यासाठी bluehost.in वर क्लिक करा. 

मित्रांनो खूप लोकांनी त्यांच्या ब्लॉगिंग journey ला एक करिअर म्हणून घेतलं आहे आणि त्यामधून एक चांगली lifestyle बनवली आहे. जर खर्च तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवायचे असेल आणि तुम्हाला लिहायला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच ब्लॉगिंग करू शकता.

ब्लॉगिंग बद्दल ची संपूर्ण माहित हवी असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून मिळवू शकता.

>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?

८) स्वतः काढलेले फोटो online विकणे (Photo selling):

 

जर तुम्ही चांगले फोटोग्राफी करत असाल तर तुम्ही तुमचे फोटो विक्री करून पैसे कमावू शकता. खूप साऱ्या अश्या online website आहेत, त्यावर तुम्ही तुमचे फोटो अपलोड करू शकता आणि ते फोटो विकून त्या बदल्यात तुम्ही पैसे मिळवू शकता.

Shutterstock, Fotolia, istockphoto, इत्यादी Website वर तुम्ही काढलेले चांगले फोटो अपलोड करून पैसे कमावू शकता.

९) फोटो एडिटिंग (Photo Editing):

आजकाल इंस्टाग्राम वर किंवा फेसबुक असे बरेच पेज आहेत जे की फक्त फोटो एडिटिंग चे काम करत आहेत.

त्यांनी एडिट केलेले फोटो ते त्यांच्या सोशल मीडिया वर अपलोड करतात आणि त्यांच्या फॉलोवर्स ला जर त्यांची एडिटिंग आवडली तर ते त्यांना त्यांचे फोटो एडिट करायला देतात आणि त्यांना pay करतात.

एक फोटो एडिटिंग चे लोक २००रु. ते १०००रु. पर्यंत पैसे घेतात आणि लोक पैसे देतात सुध्दा. तर मित्रांनो तुम्ही विचार करा दिवसातून १० फोटो जरी एडिट केले तर तुम्ही किती कमावू शकता. फक्त तुम्हाला फोटो एडिटिंग च स्किल असलं पाहिजे.

तुमच्याकडे जर स्किल नसेल तर तुम्ही ते शिकून घ्या आणि ऑनलाईन पैसे कमवायला सुरुवात करा.

१०) वेबसाईट डिझाईन (Website Design):

मित्रांनो वेबसाईट डिझाईन हे असं स्किल आहे ज्यामधून तुम्ही खूप जास्त पैसे कमावू शकता. आता लोकांना त्यांच्या बिजनेस साठी वेबसाईट ची खूप गरज आहे. त्यामुळे लोक वेबसाईट बनवत आहेत.

एका वेबसाईट चे १०००० रुपयेच्या पुढे पैसे घेतले जातात. साधी वेबसाईट बनवायला फक्त ४ ते ५ तास लागतात. तरीपण जर एक दिवस पण घेतला तरी तुम्ही दिवसाला १०००० कमावू शकता. तर तुम्ही ठरवा की महिन्याला किती वेबसाईट डिझाईन चे काम पूर्ण करू शकता.

तुम्ही महिन्याला १० वेबसाईट जरी बनवल्या तरी तुम्ही १ लाख रुपये कमवू शकता. Freelancer.com, upwork.com, fiver.com या अशा वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही क्लायंट कडून वेबसाईट डिझाईन चे काम घेऊ शकता.

११) ग्राफिक डिझाईन (Graphic Design):

ग्राफिक डिझाईन ला आता या २ वर्षात चांगलाच स्कोप आला आहे. खूप कंपनी ला ग्राफिक डिझाईनर ची गरज भासत आहेत. कारण त्यांच्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग करायला त्यांना चांगले ग्राफिक वापरून पोस्टर,इमेजेस तयार करा लागतात.

तुम्ही ग्राफिक डिझाईन च्या सर्व्हिस ऑनलाईन पण देऊ शकता. Freelancer.com, fiverr.com, upwork.com  यांसारखाय वेबसाईट वर पण ग्राफिक डिझाईनर ची क्लायंट ला खूप गरज असते. त्यांच्या युट्यूब चॅनेल साठी, वेबसाईट साठी, तसेच त्यांच्या कंपनी च्या प्रॉडक्ट साठी त्यांना ग्राफिक डिझाईनर लागतात.

तुम्ही ग्राफिक डिझाईनर बनून चांगल्या प्रकारे ओनलाईन पैसे कमावू शकता.

१२) व्हिडिओ एडिटिंग (Video Editing):

तुम्हला वरती सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ ला खूप डिमांड आलं आहे. लोक सर्वात जास्त युट्यूब वर सर्च करत आहेत. कंपनी च्या advertising पण व्हिडिओ मध्ये जास्त दाखवल्या जात आहे. त्यामुळे तुम्ही कंपनी चे व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकता.आणि त्यामधून पैसे कमावू शकता.

नवीन नवीन युट्युबर बनत आहेत आणि जे मोठे युटूबर आहेत त्यांना पण व्हिडिओ एडिटर हवे असतात. त्यामुळे तुम्ही त्यांच्या व्हिडिओ चे एडिटिंग करून देऊ शकता.

एक विडिओ एडिट करायला लोक ५०० ते १००० रुपये चार्जेस घेत आहेत. तुम्ही दिवसातून ५-१० व्हिडिओ सहज एडिट करू शकता. तर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग ही स्किल शिकून पण चांगले प्रकारे पैसे कमावू शकता.

१३)अँप्लिकेशन डेव्हलोपमेंट (Application Development):

लोकांना त्यांच्या बिजनेस साठी अँप्लिकेशन ची गरज असते. तुम्ही अँप्लिकेशन बनवून त्यांना ही सर्व्हिस देऊ शकता.

त्यासाठी तुम्हाला अँप्लिकेशन डेव्हलोपमेंट हे स्किल शिकणे आवश्यक आहे. एक अँप्लिकेशन बनवायचे खूप चार्जेस लोक घेत आहेत. कारण अँप्लिकेशन बनवायला कोडींग लागते आणि वेळ लागतो. पण जर एकदा तुम्ही अँप्लिकेशन बनवायला शिकले तर मग खूप जास्त पैसे कमवू शकता.

१४) ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट (Online Shopping Website):

मित्रांनो जर तुमचा एखादा बिजनेस असेल किंवा एखाद प्रॉडक्ट असेल. तर तुम्ही ते ऑनलाईन विकू शकता. तुम्हाला त्यासाठी एक शॉपिंग ची Ecommers वेबसाईट बनवून त्यावर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करून ते विकू शकता.

जर तुमच्याकडे कोणतं प्रॉडक्ट नसेल तर तुम्ही ज्यांचे बिजनेस आहेत त्याच्यासोबत टायअप करून त्यांच्या प्रॉडक्ट ची ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट बनवून त्यांचे प्रॉडक्ट विकू शकता आणि तुमच्या वेबसाईट मधून विकलेल्या प्रॉडक्ट वर कमिशन घेऊ शकता.

उदा. एखाद्या कपड्याच्या शॉप सोबत टायअप करून त्यांचे प्रॉडक्ट तुम्ही बनवलेल्या वेबसाईट वर लिस्ट करायचे आणि नंतर तुमच्या वेबसाईट वरून जेवढा पण सेल होईल त्याबदल्यात तुम्ही कमिशन घेऊ शकता.

१५) कंटेन्ट आणि कॉपी रायटिंग (Content & Copy Writing):

कंटेन्ट रायटिंग खूप लोक खूप जास्त पैसे कमवत आहेत. कंटेन्ट रायटिंग म्हणजे कंपनी चे किंवा मोठ्या वेबसाईट चे ब्लॉग लिहणे. म्हणजेच एक इन्फॉरमेशन देणे.

आजकाल कंपनी ना कंटेन्ट writing ची डिमांड खूप जास्त आहे आणि भविष्यात पण राहील. कंटेन्ट रायटिंग हे पण एक स्किल आहे. तुम्ही हे स्किल शिकून चांगले पैसे कमावू शकता.

कॉपी रायटिंग म्हणजे सोशल मीडिया साठी पोस्ट लिहणे. म्हणजेच एखाद प्रॉडक्ट च्या संबंधित तुम्ही ती पोस्ट लिहू शकता. जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना पण कॉपी रायटर ची गरज असते. म्हणून तुम्ही अशा लोकांना कॉपी रायटिंग च्या सर्व्हिस देऊ शकता.

१६) स्वतःचे कोर्स विकणे (Sell Your Course):

मित्रांनो जर तुमच्याकडे काही स्किल असेल तर ते तुम्ही कोर्स च्या माध्यमातून विकू शकता. तुम्ही तुमच्या स्किल नुसार ते कोर्स बनवा आणि त्यांना सोशल मीडिया चा वापर करून विका. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त फायदा आहे. म्हणजे कोर्स हे तुमचं स्वतःच प्रॉडक्ट आहे. त्यामुळे ते विकल्यावर सर्व पैसे तुम्हाला च भेटणार आहेत.

तसेच या डिजिटल च्या काळात अश्या काही वेबसाईट बनवल्या आहेत ज्यावर तुम्ही डायरेक्ट तुमचा कोर्स विकू शकता. Udemy, Unacademy यांसारख्या वेबसाईट वर तुम्ही तुमचा कोर्से विकू शकता.

१७) ऑनलाईन ट्युशन (Online Tuition):

जर तुम्हाला शिकवायला आवडत असेल तर तुम्ही लोकांना ऑनलाईन ट्युशन देऊ शकता. म्हणजेच ऑनलाईन शिकवू शकता. यामध्ये तुम्ही कोणते पण subject शिकवू शकता. तसेच तुम्ही तुमच्याकडे असलेले स्किल शिकवू शकता.

उदा. जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन येत असेल तर तुम्ही ते ऑनलाईन शिकवू शकता. आजकाल असे काही टूल्स उपलब्ध आहेत जे वापरून तुम्ही लोकांना ऑनलाईन शिकवूं शकता.उदा. Zoom app.

तुम्ही ऑफलाईन ट्युशन पेक्षा ऑनलाईन शिकवून जास्त पैसे कमावू शकता. म्हणजे जर तुम्ही एका रूम मध्ये शिकवत असाल तर त्यामध्ये ५०-१०० जण बसू शकतील. पण जर तुम्ही ऑनलाईन शिकवणे चालू केले तर त्याला लिमीट नाही. तुम्ही किती पण लोकांना एकाच वेळेस ऑनलाईन शिकवू शकता.

१८) शेअर मार्केट (Share Market):

शेअर मार्केट बद्दल तुम्ही ऐकलं असेलच. शेअर मार्केट पण एक अशी फिल्ड आहे ज्यामधून तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. हा शेअर मार्केट मध्ये रिस्क पण असते. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केट बद्दल चांगलं knowledge घेणे आवश्यक असते.

मित्रांनो तुम्ही जर चांगलं knowledge घेऊन शेअर मार्केट मध्ये उतरले तर तुम्ही खूप जास्त इनकम जनरेट करू शकता.

१९) युआरएल शॉर्टनर (URL Shortner):

युआरएल शॉटर्नर मधून पण तुम्ही ऑनलाईन इनकम करू शकता.

यामध्ये तुम्हला युट्यूब विडिओ ला शॉर्ट करून रेफर करा लागते. तुम्ही सेंड केलेल्या url वर क्लिक केल्यावर त्यावर ads दाखवले जातात. जेवढे क्लिक येतील तेवढे पॆसे तुम्हाला मिळतात. 

bitly.com, tinyurl.com, short.io या काही वेबसाईट आहेत ज्यावरून  तुम्ही विडिओ च्या लिंक शॉर्ट करून पैसे कमवू शकता.

जर तुमच्याकडे फॉलोवर्स आहेत किंवा तुमच्या युट्यूब चॅनेल वर चांगले subcriber आहेत तर च तुम्ही url shortner चा इनकम जेनरेट करण्यासाठी उपयोग करा. कारण तुम्हाला लिंक रेफर करायला पण subscriber पाहिजे असतात.

२०) डोमेन विकणे (Domain Sell):

मित्रांनॊ डोमेन खरेदी करून विकणे हा स्टॉक मार्केट सारखा बिजनेस आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे डोमेन खरेदी करून ठेवायचे आणि ते जास्त किमतीत विकायचे. खूप लोक हा बिजनेस करत आहेत.

यामध्ये तुम्ही ४००-१००० पर्यंत डोमेन खरेदी करायचे आणि ते तुम्ही जास्त किमतीत विकायचे. जेव्हा कंपनी ला गरज असते त्या नावाची तर ती कंपनी किंवा व्यक्ती ते डोमेन नाव लाख रुपये ला पण खरेदी करतात. 

तुम्ही हे डोमेन नाव Godaddy.com, Bluehost.com अश्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता. आणि हे डोमेन नाव sedo.com, namecheap.com यांसारख्या डोमेन मार्केटप्लेस असलेल्या वेबसाईट वर विकू शकता.

तुम्ही या वेबसाईट चेक करा आणि बघा १ डोमेन ची किंमत किती मोठी आहे. तुम्ही पण हे ऑनलाईन काम करून पैसे कमवू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्हाला या ब्लॉग मध्ये ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग कोणते आहेत? How to make online money in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend

3 thoughts on “[2022] मध्ये ऑनलाईन पैसे कमवायचे मार्ग|1लाख/महिना [20 Best Way] | How To Make Money Online In Marathi?”

Leave a Comment