डोमेन नेम म्हणजे काय? [2022 Full Details] | What Is Domain Name Meaning In Marathi?

नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी वेबसाईट बनवली आहे का? What is domain name meaning in Marathi? डोमेन नेम म्हणजे काय? हे तुम्हाला माहित आहे का? तुम्ही जर वेबसाईट डिझाईन करत असणार तर तुम्हाला डोमेन नेम बद्दल थोडीफार माहिती असेलच.

जे डिजिटल मार्केटिंग च्या फील्ड मध्ये असणार त्यांना पण थोडीफार माहिती असेल. पण तुम्हाला डोमेन नेम बद्दल माहित नसेल आणि तुम्हाला डोमेन नेम बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी च आहे.

या ब्लॉग मध्ये तुम्हाला डोमेन नेम म्हणजे काय? डोमेन नेम चे प्रकार कोणते? डोमेन नेम कसे खरेदी करतात? डोमेन नेम चा बिजनेस करून पैसे कसे कमवायचे ? याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.

मित्रांनो या डिजिटल च्या काळात जर तुम्हाला तुमचा बिजनेस टिकवायचा असेल तर तुम्हाला तुमचा बिजनेस ऑनलाईन घेऊन जाणे खूप गरजेचं झालं आहे. आणि तुम्हाला जर बिजनेस ऑनलाईन घेऊन जायायचा तर त्यासाठी वेबसाईट शिवाय दुसरा पर्याय नाही आणि वेबसाईट चा मेन भाग म्हणजे डोमेन.

तसेच आजकाल खूप ब्लॉगर पण आहेत ज्यांना ब्लॉगिंग करून ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत त्यासाठी पण स्वतःच्या वेबसाईट वरून च ब्लॉगिंग करणे आवश्यक आहे. म्हणजेच जिथे जिथे वेबसाईट चा संबंध येतो तिथे तिथे डोमेन ची गरज असते.

तर चला आता बघूया डोमेन नेम म्हणजे नक्की काय आहे?

डोमेन नेम म्हणजे काय?

What Is Domain Name Meaning In Marathi?

domain name meaning in marathi

मित्रांनो कोणतीपण वेबसाईट बनवायची असेल तर त्यासाठी डोमेन असणे महत्वाचे असते हे आपण वरती बघितलंच. जर तुम्हाला सोप्प्या भाषेत सांगायचं झालं डोमेन नेम म्हणजे काय ? तर डोमेन नेम म्हणजे तुमच्या वेबसाईट चा पत्ता किंवा नाव.

उदा. समजा तुमचं एखाद हॉटेल आहे तर ते हॉटेल म्हणजे वेबसाईट आणि त्या हॉटेल च्या पत्ता म्हणजे डोमेन नेम.

तसेच तुम्ही TV वर Dhoni Sir ची ऍड बघितलीच असेल. त्यामध्ये ते Godaddy वरून डोमेन नेम खरेदी करायला सांगतात. कारण डोमेन हे खरेदी करा लागते त्यामुळेच प्रत्येक वेबसाईट ला एक विशिष्ठ ओळख निर्माण होते.

इंटरनेट हे केबल्स च कॉम्पुटर सोबत कनेक्ट केलेलं एक ग्लोबल नेटवर्क आहे. इंटरनेट वर सर्व कॉम्पुटर एकमेकांसोबत communicate करू शकतात. त्यामुळेच प्रत्येक कॉम्पुटर ला IP Address दिला जातो ज्याने त्या कॉम्पुटर ची ओळख होऊ शकते. IP Address खालील प्रमाणे दिसतो.

१४२.२३५.२३.५

तसेच प्रत्येक वेबसाईट ला पण असाच एक address असतो. पण तुम्ही विचार करा जर तुम्हाला तुमच्या आवडत्या वेबसाईट वर भेट द्यायची असेल किंवा एखाद्या विशिष्ट वेबसाईट वरून काही खरेदी करायचे असेल तर तुम्ही हा नंबर नेहमीसाठी लक्षात ठेवू शकणार का?

त्यामुळे हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डोमेन नेम ही concept आली आहे. डोमेन नेम हे के नाव असते. त्यामुळे कोणत्यापण browser वर ते नाव टाकून सहजपणे तुम्ही तुम्हाला पाहिजे असणाऱ्या वेबसाईट इंटरनेट वर शोधू शकता.

इन्टरनेट वर असंख्य वेबसाईट आहेत जर तुम्हाला तुम्ही वेबसाईट शोधायची असेल तर त्यासाठी डोमेन नेम असते. डोमेन नेम वरूनच तुम्ही तुम्ही वेबसाईट सहजपणे शोधू शकता.

उदा. digitalvipulk.com हे माझ्या वेबसाईट च डोमेन नेम आहे. तुम्ही हे नाव गूगल वर टाकून लगेच माझी वेबसाईट शोधू शकता. तसेच amazon.in, flipkart.com, digitalstarx.com हे सर्व डोमेन नेम आहेत.

मी आशा करतो तुम्हाला डोमेन नेम म्हणजे काय हे समजलं असेल. तर आता डोमेन नेम कसे काम करते ते पण तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. तर चला बघूया डोमेन नेम कसे वर्क करते.

डोमेन नेम कसे काम करते?

मित्रांनो वेबसाईट बनवण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. एक म्हणजे डोमेन नेम आणि दुसरी म्हणजे वेब होस्टिंग.

वेब होस्टिंग म्हणजे वेबसाईट आणि वेबसाईट चा सर्व डेटा हा इंटरनेट वर स्टोर करा लागतो आणि त्यासाठी इंटरनेट वर जागा खरेदी करावी लागते, त्या जागेला च वेब होस्टिंग असे म्हणतात.

तुम्हाला जर वेब होस्टिंग बद्दल संपूर्ण जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून माहिती मिळवू शकता.

>>> वेब होस्टिंग म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही एखाद्या ब्राउझर मध्ये वेबसाईट च नाव टाकता तेव्हा तुम्ही जी वेब होस्टिंग घेतली आहे ती त्या name server ला ते नाव फॉरवर्ड करते. आणि तुम्हला ती वेबसाईट दाखवते. त्याअगोदर तुम्ही जे डोमेन खरेदी केलेल असते ते तुम्ही घेतलेल्या वेब होस्टिंग ला DNS through कनेक्ट करा लागते.

खालील bluehost या वेब होस्टिंग कंपनी चे name server आहेत.

ns1.bluehost.com
ns2.bluehost.com

आता तुम्हाला कळलं असेल च की डोमेन नेम कसे काम करते. तर आता डोमेन नेम चे प्रकार कोणते आहेत ते बघूया.

डोमेन नेम चे प्रकार (Types Of Domain Name In Marathi)

मित्रांनो डोमेन नेम चे वेगवेगळे प्रकार आहेत. डोमेन नेम चे प्रकार हे डोमेन नेम च्या एक्स्टेंशन वरून पडले आहेत. उदा. .com, .in, .org, .edu, .online, .tv, .website यांसारखे खूप प्रकार आहते.

डोमेन नेम चे मुख्य तीन प्रकार आहेत:

1) TLD – Top Level Domain:

LTD चा अर्थ च आहे Top Level Domain. LTD डोमेन नेम एक्सटेंशन सर्वात जास्त वापरले जातात. आणि कोणीपण पण हेच डोमेन नेम घेण्यासाठी suggest करतात. कारण या डोमेन नेम ला Google, Yahoo, Bing यांसारखे सर्व सर्च इंजिन सर्वात जास्त importance देतात. यामुळेच हे डोमेन नेम सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.

तुम्हाला जर तुमच्या वेबसाईट ला गूगल च्या पहिल्या पेज वर आणायचं असेल तर टॉप लेवल डोमेन सर्वात जास्त उपयोगी येतात. असं नाही की बाकीचे डोमेन नेम गूगल च्या पहिल्या पेज वर येत नाहीत पण TLD हे डोमेन लवकर येतात.

TLD हे डोमेन नेम SEO फ्रेंडली असतात म्हणजेच यांचा SEO स्कोर चांगला असतो. SEO करून च तुम्ही तुमची वेबसाईट गूगल वर रँक करू शकता. SEO बद्दल पूर्ण details जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लीक करू शकता.

>>> SEO म्हणजे काय?

आता top level domain ची काही उदाहरणे बघू, म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल की TLD कोणते असतात.

१) .com :

हे डोमेन सर्वात जास्त पॉपुलर आहेत. कारण जास्त वेबसाईट याच डोमेन वर बनल्या आहेत. आणि लोकांना हे लक्षात पण राहते. या डोमेन नेम चा जास्त करून commercial वेबसाईट बनवण्यासाठी उपयोग केला जातो.

तुम्हाला पण जर वेबसाईट बनवायची असेल किंवा बनवून घ्यायची असेल तर याच डोमेन नेम ची घ्या.

२) .net :

जेव्हा networking च्या संबंधित वेबसाईट बनवायची असते तेव्हा हे डोमेन वापरतात.

३) .org :

या नावावरून च कळते की हे डोमेन नेम organization साठी वापरले जाते. जे मोठे मोठे organization असतात ते या डोमेन नेम चा use करतात.

2) CCTLD-Country Code Top Level Domain:

CCTLD या प्रकार चे डोमेन एक्सटेंशन हे specific देशासाठी वापरले जातात. म्हणजे प्रत्येक देशाचे वेगळे डोमेन नेम आहेत. म्हणजेच त्या देशात राहणारे लोक CCTLD या डोमेन नेम चा वापर करू शकतात. खालील काही उदाहरण CCTLD चे आहेत.

१) .in :

हे आपल्या भारत देशासाठी वापरले जाते.

२) .us :

हे डोमेन नेम united states साठी वापरले जाते.

३) .uk :

हे डोमेन नेम united kingdom या देशासाठी वापरले जाते.

४) .de :

हे डोमेन नेम जर्मनी या देशासाठी वापरले जाते.

५) .ca :

हे कॅनडा या देशासाठी वापरले जाते.

या प्रकारचे डोमेन नेम CCTLD असतात.

3) STLD – Sponsored Top Level Domain:

STLD हे डोमेन एक्सटेंशन एखाद्या particular फिल्ड साठी वापरले जाते. उदा म्हणजे जर कोणाला education च्या संबंधित वेबसाईट बनवायची असेल तर या डोमेन एक्सटेंशन चा वापर केला जातो.

१) .edu :

जर कोणी education वेबसाईट बनवत असेल तर या डोमेन एक्सटेंशन चा वापर करू शकतो.

) .gov :

ज्या government च्या वेबसाईट असतात ते या डोमेन नेम चा वापर करतात. कारण या डोमेन नेम चा use केल्याने ती वेबसाईट government ची आहे हे समजते. त्यामुळे government च्या वेबसाईट मध्ये या डोमेन एक्सटेंशन चा वापर केला जातो.

सब डोमेन म्हणजे काय? (What Is Sub Domain In Marathi?)

मित्रांनो खूप लोकांना डोमेन म्हणजे काय हे तर माहित असते पण सब डोमेन म्हणजे काय हे माहित नसत्ते. सब डोमेन हे एक प्रकारचे डोमेन च असते. जेव्हा आपण डोमेन न होस्टिंग खरेदी करतो तेव्हा त्यासोबत सब डोमेन पण येतात. म्हणजेच आपण आपल्या मुख्य डोमेन चा च सब डोमेन बनवू शकतो.

सब डोमेन हे आपल्यावर depend असते बनवायचा की नाही. आपल्या आवश्यकतेनुसार आपण सब डोमेन बनवू शकतो. सब डोमेन बनवायला कोहताही खर्च येत नाही.

उदा. digitalvipulk.com हे माझं मुख्य डोमेन नेम आहे. blog.digitalvipulk.com हे माझं सब डोमेन होऊ शकते.

तुमच्या मुख्य डोमेन च्या अगोदर तुम्ही कोणतेपण नाव लावून सब डोमेन बनवू शकता.

डोमेन नेम कस निवडायचं? (How To Find Domain Name In Marathi?)

मित्रांनो जेव्हापासून इंटरनेट सुरु झालं आहे तेव्हापासून शेकडो डोमेन नेम खरेदी झाले आहेत म्हणजेच रजिस्टर झाले आहेत. आणि रोज हजारो डोमेन नेम रजिस्टर होत आहेत. तर यामध्ये आपलं एखाद युनिक असं डोमेन नेम निवडणे खूप अवघड झालं आहे.

पण तुम्ही काळजी नका करू मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ते वापरून तुम्ही तुम्हाला हवं तस चांगलं डोमेन नेम खरेदी करू शकणार.

१) सर्वात पहिले तुम्ही हे बघा की तुमच्या डोमेन नेम च एक्स्टेंशन .com असलं पाहिजे. कारण वरती सांगितल्याप्रमाणे हे डोमेन एक्सटेंशन सर्वात जास्त पॉप्युलर आहे आणि त्यामुळे लोकांच्या easily लक्षात राहू शकते.

२) दुसरं म्हणजे तुम्ही ज्या संबधित वेबसाईट बनवणार आहात त्या related तुमचं डोमेन नेम असणे आवश्यक आहे. म्हणजे डोमेन नेम वरून च लोकांना कळलं पाहिजे की वेबसाईट कोणत्या टॉपिक संबधित असू शकते. त्यामुळे लोक वेबसाईट च्या नावावरूनच वेबसाईट ला भेट देऊ शकतात,

तसेच तुम्ही जर ब्लॉगिंग वेबसाईट बनवत असणार तर तुमचं ब्लॉगिंग niche कोणतं आहे यावरून तुमच्या तुमच्या वेबसाईट च नाव ठेवू शकता.

३) डोमेन नाव युनिक असावं त्यामुळे ते नाव लोकांच्या लक्ष्यात राहणे सोपे जाईल.

४) डोमेन नाव हे लहान असावं कारण जास्त मोठे डोमेन नेम हे लक्षात राहत नाहीत.

५) डोमेन नेम हे pronounce करायला सोपे असावे म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या वेबसाईट चे नाव त्याच्या मित्राला रेफर करायचं असेल तर त्याला easily pronounce करता आपले पाहिजे.

६) डोमेन नेम मध्ये नंबर आणि hyphen नसावे.

वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन च डोमेन नाव खरेदी करु शकता.

चला आता अजून एक बोनस टीप म्हणून मी तुम्हाला एक अशी वेबसाईट सांगतो त्यावरून तुम्ही तुमच्या वेबसाईट च डोमेन नेम easily निवडू शकता.

LeanDomainSearch

या वेबसाईट वर जाऊन तुम्ही easily तुम्हाला हवं तस डोमेन नेम निवडू शकता.

आपण जेव्हा डोमेन नेम खरेदी करत असतो तेव्हा खूप वेळा असं होते की this domain name is not available. पण आपल्याला तेच डोमेन नेम हवे असते. तेव्हा तुम्ही या वेबसाईट वर जाऊन आपल्याला हवं असणार डोमेन नेम शकता आणि एक परफेक्ट डोमेन नेम निवडू शकता.

समजा जर मला माझ्या नावाची वेबसाईट बनवायची असेल तर मी या वेबसाईट वर जाऊन माझं नाव टाकलं आणि त्यांनी माझ्या नावाच्या result मध्ये खूप डोमेन नेम दाखवले त्यातून मी कोणतपण एखाद नाव निवडू शकतो. तुम्ही पण या वेबसाईट चा नक्की use करून बघा.

domain name meaning in marathi

डोमेन नेम मधून पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Domain Name In Marathi?)

मित्रांनो वेबसाईट आणि ब्लॉगिंग करून तुम्ही पैसे कमवू शकता. पण तसेच तुम्ही डोमेन नेम खरेदी विक्री करून पण पैसे कमावू शकता.

>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?

डोमेन खरेदी विक्री हा एक बिजनेस च आहे. हा स्टॉक मार्केट सारखा बिजनेस आहे. म्हणजे कमी किमतीत डोमेन नेम खरेदी करून ठेवायचे आणि ते जास्त किमतीत विकायचे. खूप लोक हा बिजनेस करतात.

तुम्ही godaddy.com, bluehost.in यांसारख्या वेबसाईट वरून डोमेन नेम खरेदी करू शकता आणि sedo.com, namecheap.com यांसारख्या वेबसाईट वर ते जास्त किमतीत विकू शकता.

डोमेन नेम खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतात?

मित्रांनो, डोमेन नेम जर खरेदी करायचं असेल तर त्यासाठी साधारण ५००-१००० रुपये लागतात. तुम्ही कोणत्या डोमेन आणि होस्टिंग कंपनी कडून घेत आहेत यावर लागणारे पैसे डिपेंड करतात.

तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून बेस्ट डोमेन नेम खरेदी करू शकता.

Bluehost.in

Godaddy.com

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये डोमेन नेम म्हणजे काय? What Is Domain Name Meaning In Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नवनवीन पोस्ट भेटतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend