वेब होस्टिंग म्हणजे काय? [2022 Full Details] | Hosting Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात कोणत्या पण बिजनेस साठी वेबसाईट असणे किती आवश्यक झालं आहे हे तर तुम्हाला माहित असेलच. Web Hosting Meaning In Marathi / वेब होस्टिंग म्हणजे नक्की काय? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. 

तुम्ही डिजिटल मार्केटिंग च्या फिल्ड मध्ये असल्यावर वेब होस्टिंग हा शब्द तुमच्या कानावर नक्कीच पडला असेल. तर काहींना याबद्दल थोडंफार माहित सुध्दा असेल, पण आम्ही या ब्लॉग मध्ये तुम्हाला वेब होस्टिंग बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.

मित्रांनो मी 2+ वर्षांपासून डिजिटल मार्केटिंग च्या फिल्ड मध्ये आहे. तर मला नेहमीच असे प्रश्न येत राहतात, की कोणती वेब होस्टिंग घेऊ? आमच्या बिजनेस साठी कोणती वेब होस्टिंग बेस्ट राहील? मी डिजिटल मार्केटिंग च्या फिल्ड मध्ये नवीन आहे तर मी कोणती होस्टिंग घेऊ?असे प्रश्न माझ्याकडे येत राहतात आणि मी त्यांना नेहमी चांगलं guide करतो.

ज्यांच्यासाठी जी वेब होस्टिंग परफेक्ट आहे मी तीच होस्टिंग त्यांना recommended करत असतो. कारण होस्टिंग ही एक खर्चिक बाब आहे. त्यानंतर त्यावर त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया पण येतात की आमची वेबसाईट चांगली रन होत आहे.

मित्रांनो तुम्हाला सर्वाना माहित आहे की आजचा जो काळ आहे तो डिजिटल काळ आहे. आपला भारत देश पण डिजिटली ग्रो करत आहे. तर या डिजिटल च्या युगात बिजनेस ला टिकायचं असेल तर बिजनेस ची वेबसाईट असणे गरजेचं झालं आहे.

वेबसाईट बनवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक म्हणजे डोमेन नाव आहि दुसरं म्हणजे होस्टिंग. डोमेन नाव हे जास्त खर्चिक नसते, पण होस्टिंग हे खर्चिक असते. होस्टिंग आणि डोमेन ला आपण घेतलेल्या plan नुसार 6 महिन्यानंतर किंवा 1-2 वषांनंतर upgrade करा लागते.

होस्टिंग चे वेगवेगळे प्लॅन असतात आणि ते आपण आपल्या बजेट नुसार घेत असतो. तर चला आम्ही तुम्हाला या ब्लॉग होस्टिंग म्हणजे काय? होस्टिंग कशी काम करते? होस्टिंग चे किती प्रकार आहेत? आणि होस्टिंग घेण्यासाठी काय महत्वाच्या गोष्टी असतात? या सर्व गोष्टी सांगणार आहोत.

वेब होस्टिंग म्हणजे काय? हे जाऊन घेण्या अगोदर डोमेन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. कारण आपण वरती बघितलं की वेबसाईट बनवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या असतात. डोमेन नाव आणि होस्टिंग.

डोमेन नाव म्हणजे काय? What Is Domain Name In Marathi?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डोमेन नाव म्हणजे आपल्या वेबसाईट चा पत्ता किंवा आपल्या वेबसाईट चा नाव. उदा. amazon.in, filpkart.com, digitalstarx.com आणि आता तुम्ही जो ब्लॉग वाचत आहात या वेबसाईट च डोमेन नाव digitalvipulk.com आहे.

जेव्हा आपल्याला वेबसाईट घ्यायची असते तेव्हा वेबसाईट च योग्य अस नाव आपल्याला ठेवा लागते. वेबसाईट साठी डोमेन नाव उचित ठेवणे खूप महत्वाचे असते. डोमेन नाव वरूनच आपली वेबसाईट कशाबद्दल असेल ते समजते.

तुम्ही डोमेन नाव खालील वेबसाईट वरून विकत घेऊ शकता:

Bluehost.in

Godaddy.com

वेब होस्टिंग म्हणजे काय?

What Is Web Hosting Meaning In Marathi?

web hosting meaning in marathi

मित्रांनो तुम्हाला एक उदाहरण देतो, जेव्हा आपल्याला हॉटेल सुरु करायचं असते, तेव्हा आपल्याला हॉटेल मधील साहित्य (टेबल, खुर्ची, किचन चे सामान) ठेवण्यासाठी एक जागा लागते. आपण ती जागा भाड्याने घेऊन महिन्याचे किंवा वार्षिक भाडे (पैसे) देतो. होस्टिंग च पण असच आहे.

वेबसाईट बनवताना आपल्याला त्या वेबसाईट वरील कंटेन्ट, इमेजेस, विडिओ, डेटा, फाईल्स स्टोर करण्यासाठी इंटरनेट वर जागा घ्या लागते. त्या जागेलाच वेब होस्टिंग असे म्हणतात.

इंटरनेट एक खूप मोठी सिस्टिम आहे. जर आपल्याला आपली वेबसाईट इंटरनेट वर प्रकाशित करायची असेल तर आपल्या वेबसाईट ला होस्टिंग घेणे महत्वाचे ठरते.

होस्टिंग मुळेच वेबसाईट इंटरनेट सोबत कनेक्ट होऊ शकते आणि सर्वाना गूगल वर वेबसाईट दिसू शकते. होस्टिंग एक अशी सर्व्हिस आहे जी, वेबसाईट ला इंटरनेट वर अपलोड करण्याची सुविधा देते.

इंटरनेट वर खूप वेबसाईट आहेत, म्हणून वेबसाईट ला होस्टिंग वर रन करण्यासाठी एखाद्या पॉवरफुल सर्व्हर ची गरज असते, जे आपल्या वेबसाईट ला 24/7 चालवू शकेल ते पण आपल्या युझर्स ला कोणताच प्रॉब्लेम न येता.

त्यामुळे मार्केट मध्ये खूप कंपनी आहेत ज्या चांगली होस्टिंग सर्व्हिस provide करतात. मित्रांनो वेबसाईट ला योग्य रित्या चालवण्यासाठी आणि यशस्वी बनवण्यासाठी एक चांगली होस्टिंग खूप मोठा रोल प्ले करते.

आपण कोणती-पण वेब होस्टिंग घेऊन चालत नाही, आपल्या बिजनेस नुसार किंवा आपल्या वेबसाईट वर किती लोड असणार आहे म्हणजेच किती ट्रॅफिक आहे यावर अनुसरून वेबसाईट घ्या लागते.

तुम्ही जेवढी चांगली आणि पॉवरफुल होस्टिंग घेणार तेवढी चांगली value तुमच्या वेबसाईट मधून तुमच्या युझर्स ला देऊ शकता. त्यामुळे कधीपण वेब होस्टिंग घेतानी त्या होस्टिंग बद्दल अभ्यास करून च खरेदी करा.

तर चला वेब होस्टिंग नक्की कसे काम करते? ते बघूया.

वेब होस्टिंग कसे काम करते? (How Web Hosting Works?)

मित्रांनो खूप साऱ्या कंपनी आहेत ज्या चांगल्या वेब होस्टिंग provide करतात. जेव्हा आपण वेब होस्टिंग घेऊन एखादी वेबसाईट बनवतो त्यामध्ये आपण लिहलेला content, videos, files, images आपण घेतलेल्या वेब होस्टिंग मध्ये स्टोर केले जाते म्हणजेच ते इंटरनेट वर प्रकाशित केले जाते.

जेव्हा कोणता पण युझर्स आपल्या वेबसाईट बद्दल त्याच्या ब्राउझर्स च्या URL मध्ये सर्च करतो किंवा एखादा कीवर्ड गूगल वर type करतो आणि त्या संबंधित जर आपली वेबसाईट असेल किंवा आपण त्यामध्ये त्या कीवर्ड संबंधित काही कंटेन्ट लिहला असेल तर त्या युझर्स चा कॉम्पुटर किंवा मोबाईल आपण घेतलेल्या होस्टिंग सोबत कनेक्ट होतो आणि त्याच्या ब्राउझर वर आपली वेबसाईट दाखवली जाते.

>>> हे देखील वाचा ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?

वेब होस्टिंग चे प्रकार (Types Of Web Hosting)

आपण वरती बघितलं web hosting meaning in Marathi? / वेब होस्टिंग म्हणजे काय? ते कसे काम करते. तर आता वेब होस्टिंग चे किती प्रकार आहे आणि कोण कोणते आहेत ते बघूया.

वेब होस्टिंग चे मुख्य चार प्रकार आहेत ते खालीलप्रमाणे:

  • Shared Web Hosting
  • VPS Web Hosting
  • Dedicated Web Hosting
  • Cloud Web Hosting

1) शेअर्ड वेब होस्टिंग (Shared web hosting):

शेअर्ड वेब होस्टिंग म्हणजे सामायिक होस्टिंग. जसे आपण घरात खूप सारे लोक राहतो तसेच शेअर्ड वेब होस्टिंग मध्ये एकाच सर्वर वर खूप साऱ्या वेबसाईट च्या फाईल्स स्टोर केलेल्या असतात.

जेव्हा तुम्हाला नवीन वेबसाईट बनवायची असेल तर शेअर्ड वेब होस्टिंग सर्वात बेस्ट आहे. कारण ही वेबसाईट होस्ट करणे सोपं असते. जेव्हा तुमची वेबसाईट नवीन असते तेव्हा त्यावर जास्त ट्रॅफिक नसते त्यामुळे ही होस्टिंग चांगल्या प्रकारे कमी रहदारी हॅन्डल करू शकते.

पण जेव्हा तुमच्या वेबसाईट वर जास्त ट्राफिक यायला लागेल तेव्हा ही होस्टिंग बरोबर वर्क करणार नाही आणि तुमची वेबसाईट डाउन होईल. म्हणून जेव्हा तुमच्या वेबसाईट वरील ट्राफिक वाढेल तेव्हा तुम्हाला VPS होस्टिंग किंवा डेडीकेट होस्टिंग मध्ये तुमची वेबसाईट ट्रान्सफर करावी लागेल.

शेअर्ड वेब होस्टिंग चे फायदे:

  • ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत आणि त्यांना नवीन वेबसाईट बनवायची आहे त्यांच्यासाठी ही होस्टिंग बेस्ट आहे. कारण दुसऱ्या वेब होस्टिंग च्या तुलनेत ही सर्वात स्वस्त वेब होस्टिंग आहे.
  • या होस्टिंग ला customize करणे खूप सोप्पे आहे.
  • या वेब होस्टिंग मध्ये खूप tools आणि plugin इन्स्टॉल करू शकता.
  • जर तुमचा छोटा बिजनेस असेल तर तुम्ही या होस्टिंग वर वेबसाईट बनवू शकता.
  • ही वेब होस्टिंग होस्ट करायला सोपी आहे.

मी तुम्हाला recommend करेल की तुम्हाला जर नवीन वेबसाईट बनवायची असेल तर हीच वेब होस्टिंग वापर. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही नवीन वेबसाईट खरेदी करू शकता.

Bluehost.in

2) व्ही पी एस (VPS web hosting):

VPS वेब होस्टिंग म्हणजे virtual private service. या वेब होस्टिंग मध्ये एका virtual server ला वेगवेळ्या रिसोर्स मध्ये use केलं जाते. यामध्ये एका वेबसाईट ला एक सर्व्हर space दिले जाते. त्या एका सर्वर मध्ये एकाचीच वेबसाईट होस्ट केली जाते.

जेव्हा वेबसाईट वर जास्त visitor येतात तेव्हा या होस्टिंग चा वापर करू शकता. ही वेब होस्टिंग चांगल्या प्रकारे जास्त ट्राफिक हाताळू शकते. त्यामुळे तुमची वेबसाईट डाउन होत नाही. ही वेब होस्टिंग कमी पैशामध्ये डेडिकेट सर्व्हर सारखे परफॉर्मन्स देते. ही वेब होस्टिंग सर्वात चांगली security provide करते.

VPS वेब होस्टिंग चे फायदे:

  • ज्या वेबसाईट कमी वेळात जास्त ट्राफिक gain करतात त्या वेबसाईट पण या होस्टिंग चा use करू शकतात.
  • बेस्ट privacy आणि security provide करते.
  • शेअर्ड होस्टिंग च्या तुलनेत जास्त स्पीड provide करते.
  • या वेब होस्टिंग मध्ये डेडिकेट होस्टिंग सारखं पूर्ण कंट्रोल दिल जाते.

3) डेडिकेट वेब होस्टिंग (Dedicate web hosting):

शेअर्ड वेब होस्टिंग मध्ये एका सर्व्हर वर खूप साऱ्या वेबसाईट च्या files स्टोर केल्या जातात पण डेडिकेट वेब होस्टिंग मध्ये एका सर्व्हर मध्ये फक्त एकच वेबसाईटच्या files स्टोर केल्या जातात. यामध्ये प्रत्येक वेबसाईट ला वेगवेगळे सर्व्हर provide केले जाते.

डेडिकेट वेब होस्टिंग सर्व्हर सर्वात फास्ट सर्व्हर आहे आणि एकच वेबसाईट होस्ट केली जाते त्यामुळे ही होस्टिंग खूप महाग आहे.

ज्यांच्या वेबसाईट वर दर महिन्याला खूप जास्त ट्रॅफिक येत असेल तर ही होस्टिंग त्यांच्यासाठी आहे. तसेच ज्या वेबसाईट ला जास्त security ची गरज असते त्या वेबसाईट साठी डेडिकेट वेब होस्टिंग खूप महत्वाची असते.

शेअर्ड आणि VPS होस्टिंग पेक्षा ही वेब होस्टिंग महाग असते, म्हणून जास्त ट्रॅफिक असलेल्या वेबसाईट च ही वेब होस्टिंग use करतात.

डेडिकेट वेब होस्टिंग चे फायदे:

  • या वेब होस्टिंग मध्ये आपल्या वेबसाईट चा स्पीड आणि परफॉर्मन्स वाढतो.
  • खूप जास्त ट्रॅफिक हाताळू शकते.
  • बेस्ट security provide केली जाते.

4) क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Web Hosting):

सर्व वेब होस्टिंग मध्ये क्लाऊड वेब होस्टिंग ही सर्वात secure वेब होस्टिंग मानली जाते. क्लाऊड वेब होस्टिंग मध्ये वेबसाईट चे सर्व्हर कधीच डाउन होत नाही. कारण क्लाऊड वेब होस्टिंग अनेक सर्व्हर चे मिळून एक पॉवरफुल सर्व्हर तयार करते.

म्हणजे आपल्या वेबसाईट चे एक सर्व्हर डाउन झाले तर दुसऱ्या सर्व्हर ला आपोआप कनेक्ट होऊन access करते. त्यामुळे या होस्टिंग वर असलेल्या वेबसाईट चा युझर्स experience चांगला असतो. त्यामुळे ही वेब होस्टिंग खूप खर्चिक असते.

क्लाऊड वेब होस्टिंग चे फायदे:

वेबसाईट चा सर्व्हर कधीच डाउन होत नाही.

सर्वात जास्त सुरक्षित आहे.

खूप मोठ्या प्रमाणात रहदारी हाताळू शकते.

होस्टिंग घेताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे?

अपटाईम (Uptime):

आपली वेबसाईट जेवढ्या वेळ ऑनलाईन available राहते त्याला अपटाईम असे म्हणतात आणि काही प्रॉब्लेम मुळे कधी कधी आपली वेबसाईटओपन होत नाही किंवा access होत नाही म्हणजे डाउन होते तेव्हा त्याला डाउनटाईम म्हणतात. पण आजकाल च्या सर्व वेब होस्टिंग कंपनी 99.99% अपटाईम ची gaurantee देतात.

डिस्क स्पेस (Disk Space):

डिस्क स्पेस म्हणजे, जस आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप मध्ये 500GB किंवा 1TB चा स्पेस असतो आणि आपण त्यामध्ये विडिओ, फाईल्स, इमेजेस, डेटा स्टोर करतो.

तसेच वेबसाईट च्या फाईल्स, इमेजेस, डेटा, विडिओ हे स्टोर करण्यासाठी डिस्क स्पेस असतो. मी तुम्हाला recommend करेल की unlimited डिस्क स्पेस असणारी च होस्टिंग खरेदी करा म्हणजे स्पेस कधी फुल होणार नाही.

बँडविड्थ (Bandwidth):

बँडविड्थ वेबसाईट मधील एक मेन फॅक्टर आहे. बँडविड्थ म्हणजे आपल्या वेबसाईट वर एका सेकंदात किती डेटा access होऊ शकतो.

जेव्हा कोणता visitor आपल्या वेबसाईट वर येतो तेव्हा आपल्या वेबसाईट चे होस्टिंग सर्व्हर डेटा access करून त्यांना वेबसाईट वरील result दाखवतो. आणि जेव्हा खूप जास्त visitor वेबसाईट वर येतात तेव्हा बॅण्डविड्थ चा खूप मोठा रोल असतो.

या सर्व visitor ला हॅन्डल करण्यासाठी आणि त्यांना सेकंदामध्ये result दाखवण्यासाठी आपल्या वेबसाईट ची बँडविड्थ जास्त असणे आवश्यक असते.

बॅकअप (Backup):

वेबसाईट ला बॅकअप असणे खूप आवश्यक असते. कधी कधी वेबसाईट हॅक केल्या जातात किंवा एखाद्या unwanted plugin मुळे पण आपली वेबसाईट क्रॅश होऊ शकते. त्यामुळे त्या सर्व्हर वरून आपल्याला बॅकअप घेणे महत्वाचे असते.

म्हणून ज्या वेब होस्टिंग बॅकअप provide करते त्याच वेब होस्टिंग घेणे चांगलं असते.

कस्टमर सपोर्ट (Customer Support):

मित्रांनो तुम्ही वेब होस्टिंग घेतानी सर्वात पहिले ती वेब होस्टिंग कसा कस्टमर सपोर्ट provide करते ते बघणे आवश्यक आहे. पण आताच्या सर्व वेब होस्टिंग चांगलेच कस्टमर सर्व्हिस provide करतात.

वेब होस्टिंग कुठून खरेदी करावी?

मित्रांनो, आता खूप वेब होस्टिंग provide करणाऱ्या कंपन्या आहेत. आपल्या भारतामध्ये पण आणि बाहेर देशात पण चांगल्या होस्टिंग provide करणाऱ्या कंपनी आहेत.

पण जर तुमचे युझर्स आपल्या भारत देशातील असतील तर मी तुम्हाला आपल्या देशातील च वेब होस्टिंग घेणे recommend करेल. कारण होस्टिंग सर्व्हर दुसऱ्या देशात असल्याने डेटा access करायला वेळ लागतो आणि जर सर्व्हर आपल्या देशात असेल तर वेबसाईट वरचा डेटा लवकर access होतो.

तसेच जर तुम्ही विदेशी कंपनी कडून होस्टिंग घेत असणार तर तुम्हाला क्रेडिट कार्ड ची गरज लागते. पण जर तुम्ही आपल्या देशातील कंपनी मधून होस्टिंग घेतली तर क्रेडिट कार्ड ची गरज लागत नाही.

वेब होस्टिंग provide करणाऱ्या काही बेस्ट कंपनी:

  • Bluehost.in
  • Hostinger.in
  • Siteground.com
  • Hostgator.in
  • A2hosting.com

पण मी तुम्हाला recommend करेल की तुम्ही bluehost ची होस्टिंग खरेदी करा. मी स्वतः bluehost ची होस्टिंग use करतो आणि माझ्या क्लायंट ला पण हीच वेब होस्टिंग देऊन त्यांच्या वेबसाईट create करून देतो. कारण bluehost हि एक trusted आणि value for money होस्टिंग provider कंपनी आहे.

Bluehost ची कस्टमर सर्व्हिस पण सर्वात चांगली आहे. तुम्हाला जर वेबसाईट बनवायची असेल तर नक्कीच bluehost ची वेबसाईट खर्डी करा. खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता.

[ Bluehost.in ]

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या लेखात होस्टिंग म्हणजे काय? What is hosting meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल मराठी भाषेतून माहिती हवी असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटत राहतील.

तुम्ही पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास आपल्या मित्रांना पण शेअर करा.

 

Share This Post With Your Friend