ब्लॉगिंग निश म्हणजे काय? [2022 Full Details] | Blogging Niche Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो, ब्लॉगिंग मध्ये सर्वात मोठा घटक म्हणजे ब्लॉगिंग निश निवडणे. What is blogging niche meaning in Marathi आणि ती कशी निवडायची हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा. तुम्हाला या ब्लॉग चा नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो ब्लॉगिंग सुरु करतानी सर्वात पहिले येणार प्रश्न म्हणजे ब्लॉगिंग कोणत्या niche वर सुरु करू? आणि हा प्रश्न त्यांनाच पडतो ज्यांना ब्लॉगिंग बद्दल थोडीफार माहिती आहे. पण ज्यांच्यासाठी ब्लॉगिंग ही टर्म नवीन आहे त्यांना ब्लॉगिंग niche म्हणजे काय हेच माहित नसते.

तुम्ही पण ब्लॉगिंग या फिल्ड मध्ये नवीन असणार तर तुम्हाला पण ब्लॉगिंग niche बद्दल माहित नसेल. तर काळजी नका करू मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण details मध्ये ब्लॉगिंग निश बद्दल माहिती देणार आहे.

तुम्ही या ब्लॉग वर आलात म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल थोडीफार माहिती असेलच, तरीपण ब्लॉगिंग म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊ म्हणजे ब्लॉगिंग niche किती important असते हे तुम्हाला समजायला मदत होईल.

ब्लॉगिंग म्हणजे काय?

ब्लॉगिंग म्हणजे इंटरनेट वरून पैसे कमवायचा एक सर्वात मोठा मार्ग होय.

ब्लॉगिंग चा सोपा अर्थ म्हणजे वेबसाईट बनवून त्या वेबसाईट मध्ये लेख/ब्लॉग लिहणे. आपण जे ब्लॉग लिहतो, ते योग्य पद्धतीने लिहून त्या ब्लॉग चा गूगल च्या नियमानुसार SEO करून तो ब्लॉग इंटरनेट वर प्रकाशित करणे, यालाच ब्लॉगिंग असे म्हणतात.

मित्रानो ब्लॉग आणि ब्लॉगिंग या मध्ये जाऊन घेण्यासारखं खूप काही आहे. त्यासाठी तुम्ही माझा खालील ब्लॉग वाचू शकता. या ब्लॉग मधून तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही हा ब्लॉग नक्की वाचा.

>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?

आशा करतो तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय हे पूर्ण समजलं असेल. तर चला आता niche म्हणजे काय हे बघूया.

ब्लॉगिंग निश म्हणजे काय?

What Is Blogging Niche Meaning In Marathi?

blogging niche meaning in marathi

मित्रांनो तुम्हाला जर सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर निश म्हणजे टॉपिक/विषय. म्हणजेच तुम्हाला ज्या टॉपिक वर ब्लॉग लिहायचे आहेत त्या टॉपिकला च niche असे म्हणतात.

उदा. जर एखाद्याला हेल्थ बद्दल ब्लॉग लिहायचे असतील तर हेल्थ या टॉपिक ला निश असे म्हणतात. तसेच जर कोणाला news चे ब्लॉग लिहायचे असतील किंवा रेसिपी चे ब्लॉग किंवा टेक्नॉलॉजी चे ब्लॉग लिहायचे असतील तर अशा टॉपिक ला niche असे म्हणतात.

जेव्हा तुम्ही तुमचं niche निवडता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये फक्त त्याच niche च्या related ब्लॉग पोस्ट लिहावे लागतात. म्हणजे जर तुम्ही news ब्लॉग बनवला तर तुम्हाला त्यामध्ये करंट news बद्दलच्या च पोस्ट लिहाव्या लागतील. टेक्नॉलॉजी ब्लॉग तर फक्त टेक्नॉलॉजी च्या संबंधितच ब्लॉग लिहाव्या लागतील.

तुम्ही एका niche मध्ये दुसऱ्या niche चे ब्लॉग लिहू शकत नाही. तसे तुम्ही लिहू शकता पण गूगल अशा वेबसाईट ला रँक करत नाही.म्हणून तुम्हाला एकच niche निवडून त्यावर च ब्लॉग लिहाव्या लागतील. आणि जास्त करून मोठं मोठे ब्लॉगर एखाद्या particular niche वर च ब्लॉग लिहतात.

खालील काही niche चे टॉपिक:

  • ट्रॅव्हल
  • न्यूज
  • फॅशन
  • बुक्स
  • एंटरटेनमेंट
  • स्टडी
  • कुकिंग
  • एज्युकेशन
  • टेक्नॉलॉजी
  • स्पोर्ट्स
  • सायन्स
  • फिटनेस
  • हेल्थ
  • बायोग्राफी
  • फिल्म

यांसारखे खूप टॉपिक आहेत.

तुम्ही एकदा niche निवडल्यावर तुम्हाला पूर्ण lifetime त्याच niche वर ब्लॉग लिहावे लागतील. उदा. तुम्ही टेक्नॉलॉजी च्या ब्लॉग मध्ये हेल्थ किंवा ट्रॅव्हल च्या ब्लॉग मध्ये रेसिपी असं करू शकत नाही.

एकदा niche निवडल्यावर तुम्हाला lifetime त्याच niche बद्दल माहिती द्यावी लागणार आहे.

तसे तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईट बनवून वेगवेगळ्या niche वर ब्लॉग लिहू शकता. पण यातून तुमची ब्रॅण्डिंग होत नाही. आणि सर्व ब्लॉग हॅन्डल करणे पण अवघड जाते. त्यामुळे तुम्ही niche निवडतानी काळजीपूर्वक निवडले पाहिजे.

आपण खाली बघू की niche कशी निवडली पाहिजे. त्याअगोदर niche चे प्रकार कोणते आहेत ते बघूया.

निश चे प्रकार कोणते? Types Of Niche In Marathi

तुम्हाला niche म्हणजे काय हे समजलं च असेल. पण niche मध्ये पण दोन प्रकार आहेत.

1) Global Niche/ Broad Niche:

मित्रांनो ग्लोबल निश म्हणजे एखादा मोठा टॉपिक. म्हणजेच तुम्ही त्या टॉपिक च्या रिलेटेड काहीही लिहू शकता. त्या टॉपिक मध्ये कितीपण sub niche असले तरीपण त्या सर्व टॉपिक बद्दल तुम्ही लिहू शकता.

उदा. हेल्थ ही एक ग्लोबल निश आहे. त्यामध्ये तुम्ही सर्व लिहू शकता. त्यामध्ये sub niche म्हणजे diet, exercise, men’s health, women health, baby care असे खूप टॉपिक येतात. ग्लोबल निश मध्ये तुम्ही या सर्व टॉपिक वर तुमच्या वेबसाईट वर ब्लॉग लिहू शकता.

पण मित्रांनो ग्लोबल niche मध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे. कारण अगोदर पासून लोक ग्लोबल niche वर च काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमची वेबसाईट गूगल वर रँकिंग करणे थोडं अवघड आहे. तुम्ही जर ग्लोबल niche निवडलं तर तुम्हाला त्यामध्ये खूप हार्ड वर्क करावे लागेल.

पण तुम्ही ग्लोबल niche मधून ब्लॉगिंग करून पण चांगल्या प्रकारे पैसे करमवू शकता फक्त तुम्हाला हार्ड वर्क आणि जास्त वेळ द्यावा लागेल.

2) Micro Niche:

Micro niche म्हणेजच ग्लोबल niche च्या sub niche च्या पण खाली येणारे टॉपिक. आपण sub niche ला पण micro niche consider करू शकतो.

उदा. टेक्नॉलॉजी ही जर आपण ग्लोबल niche पकडली तर त्यामध्ये mobile, tv, computer, earphone, इलेक्ट्रॉनिक वस्तू, यांसारखे sub niche येतात. पण समजा जर तुम्ही मोबईल ही sub niche पकडली तर apple mobile किंवा redmi mobile ही micro niche झाली.

म्हणजेच तुम्ही एखाद्या particular मोबाईल बद्दल च ब्लॉग बनवले तर ते micro niche मध्ये येते.

तसेच हेल्थ या ग्लोबल निश मध्ये फक्त weight loss याच टॉपिक वर ब्लॉग बनवले तर ते micro niche मध्ये येते.

मित्रांनो micro niche निवडण्याचे खूप फायदे आहेत. आणि आताचे जे ब्लॉगर आहेत ते पण फक्त micro निश वर ब्लॉग बनवत आहेत.

Micro निश ला कॉम्पिटिशन कमी असते. तुम्ही जर फक्त एखाद्या micro niche वर च ब्लॉग बनवला तर गूगल तुमच्या वेबसाईट ला लवकर रँक करते. Micro निश मध्ये लवकर earning सुरु होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे micro निश निवडणे फायदेशीर आहे.

तुम्हाला आता निश बद्दल सर्व माहिती समजलीच असेल तर आता निश कशी निवडायची ते बघूया.

प्रॉफिटेबल निश कशी निवडायची? How To Choose Profitable Niche?

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का जेव्हा १९९१ मध्ये वेब ची सुरुवात झाली होती तेव्हा किती वेबसाईट होत्या? १९९१ मध्ये फक्त ३ वेबसाईट होत्या आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे १९९२ मध्ये हा आकडा २०० टक्के नि वाढला आणि वेबसाईट ची संख्या १२ झाली.

त्यानंतर खूप जास्त प्रमाणात वेबसाईट ची पॉप्युलॅरिटी वाढली आणि हा आकडा २००० मध्ये १ करोड ८७ लाख झाला आणि आता २०२० मध्ये हा आकडा १ बिलियन ७५ करोड इतका झाला आहे आणि हा दरवर्षी वाढत च जाणार आहे.

तुम्ही या लिंक वर क्लिक करून live score बघू शकता.

यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की इंटरनेट वर किती कॉम्पिटिशन आहे. पण मित्रांनो कॉम्पिटिशन ला घाबरायचं काही कारण नाही. गूगल ने काही गोष्टी खूप सोप्या केल्या आहेत. तुम्ही तुमच्या regional भाषेत ब्लॉग लिहू शकता. स्वतःच्या मातृभाषेत जास्त कॉम्पिटिशन नसते.

पण तरीपण तुम्हाला खूप गोष्टी लक्षात ठेवून च निश निवडावी लागते. त्या कारण असं आहे की एकदा तुम्ही niche निवडल्यावर परत ती change करू शकत नाही.

तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये theme, plugin, तसेच तुमचा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पण change करू शकता. पण एकदा niche निवडल्यावर ती change करू शकत नाही.

थोडं सोपं करून सांगतो, जर तुम्ही एक निश निवडली तर तुम्ही त्या निश रिलेटेड डोमेन खरेदी करता आणि मग ते डोमेन नेम change होत नाहीत. आणि सर्वात मेन पॉईंट म्हणजे तुमची ऑडियन्स पण तुमच्या niche रिलेटेड च असते. त्यामुळे niche निवडतानी काळजीपूर्वक निवडणे खूप महत्वाचे असते.

मी आतापर्यंत हा खूप मोठा प्रॉब्लेम बघितला आहे की ज्यांना नवीन ब्लॉग सुरु करायचा आहे त्यांना हेच माहित नसते की कोणती niche निवडावी किंवा कोणत्या टॉपिक वर ब्लॉग बनवावा?

तर चला मित्रांनो मी तुम्हाला niche कशी निवडायची ते सांगतो.

1) आवड (Passion/ Interest):

निश सिलेक्ट करतानी सर्वात मोठा पॉईंट असतो ते म्हणजे तुमचं passion म्हणजेच तुमची आवड. हो मित्रांनो तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे तुम्ही तीच निश निवडली पाहिजे.

आपल्यापैकी खूप जणांना वेगवेगळ्या फिल्ड मध्ये इंटरेस्ट असतो आणि सर्वांना त्या फिल्ड बद्दल खूप काही deep knowledge असते.

ब्लॉग लिहणे म्हणजे काय मित्रांनो की तुमचं knowledge दुसऱ्या लोकांसोबत share करणे. तर तुम्हाला ज्या फिल्ड मधले knowledge आहे किंवा इंटरेस्ट आहे त्या निश चा तुम्ही ब्लॉग बनवले पाहिजे आणि तुमच्या ब्लॉग मधून ती माहिती लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे.

जास्तकरून आपल्याला आवड असेलेला टॉपिक च का निवडला पाहिजे? याच एकदम सोपं उत्तर आहे, ज्या टॉपिक मध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो त्या विषयी काम करायला आपल्याला कधीच कंटाळा येत नाही. त्या टॉपिक वर आपण कितीपण काम करू शकतो.

ब्लॉगिंग अशी फिल्ड आहे की तिथे खूप संयमाची गरज असते. त्यामुळे आपण आपल्याला आवड असलेल्या टॉपिक वर काम करणेच फायदेशीर ठरते.

2) स्किल (Skill):

सर्वांकडे काही ना काही एक वेगळं स्किल असतेच. आपण एखाद्या क्षेत्रात माहीर असतो. तर तेच स्किल तुम्ही लोकांना तुमच्या ब्लॉग मधून शिकवू शकता.

उदा. कोणाला डान्स च स्किल असते, कोणाला कुकिंग चांगली जमते, कोणाला चांगलं शिकवता येते, कोणाला एखाद स्पोर्ट चांगलं येते तर तुम्ही तुमच्या स्किल बद्दल ब्लॉग लिहू शकता म्हणजेच ते दुसर्यांना शिकवू शकता.

पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काही लोक मला विचारतात, की आमच्या कडे कोणतं च स्किल नाही तर मग आम्ही कशावर ब्लॉगिंग सुरु करू?

तर चला याच पण उत्तर तुम्हाला सांगतो, मित्रानो आता हा डिजिटल च युग आहे, इंटरनेट च युग आहे. आता एखाद स्किल तुम्ही घरी बसून शिकू शकता.

उदा . ग्राफिक डिझाईन, डिजिटल मार्केटिंग , विडिओ एडिटिंग, पब्लिक स्पीकर, डेटा एन्ट्री, सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेबसाईट डिझाईन, युट्युब, कॉम्पुटर यांसारखे खूप स्किल आहेत.

एखाद कोणतं पण स्किल शिकायला फक्त ३ ते ६ महिने लागतात. तर तुम्ही पण पहिले स्किल शिका आणि नंतर त्यावर ब्लॉगिंग चालू करा.

मित्रांनो जर तुम्हाला काही मोठं करायचं असेल आयुष्यात तर तुम्हाला एक स्किल शिकणे आणि त्यामध्ये माहीर होणे खूप गरजेचं आहे. आताच्या युगात डिग्री पेक्षा एका स्किल ला जास्त महत्व आहे. त्यामुळे तुम्ही स्किल शिकायला चालू करा ज्यामध्ये तुम्हाला आवड असेल ते स्किल शिका.

हे बघा माझ्या एका मित्राला सरकारी नौकरी बद्दल नॉलेज तर त्याने त्याची निश सरकारी नोकरी ही आहे.

>>> सरकारी नौकरी

हे पण वाचा >>> युट्युब वरून पैसे कसे कमवायचे?

3) अनुभव (Experience):

मित्रांनो आपला अनुभव लोकांसमोर मांडणे यावर पण तुम्ही सर्वात चांगले ब्लॉग बनवू शकता. जर तुम्ही एखादी गोष्ट achieve केली असेल तर तुम्ही तुमची journey तुमच्या अनुभवच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकता. म्हणजेच त्यावर ब्लॉग लिहू शकता.

किंवा तसेच तुम्हाला एखाद्या गोष्टीतला चांगला अनुभव असेल तर त्यावर पण ब्लॉग लिहून लोकांना शिकवू शकता.

4) गूगल ट्रेंड (Google Trend):

गूगल ट्रेंड हा एक बेस्ट मार्ग आहे ज्यांना निश निवडणे अवघड जात असेल त्यांच्यासाठी. मित्रांनो तुम्ही गूगल ट्रेंड च्या मदतीने India मधील ट्रेंडिंग टॉपिक वर ब्लॉग लिहू शकता.

म्हणजेच भारतामध्ये ज्या गोष्टीचे गूगल वर जास्त सर्चस होत आहेत त्या टॉपिक वर ब्लॉग बनवू शकता.

वरील सर्व पॉईंट्स वरून तुम्हाला निश निवडणे सोपे जाईल अशी अशा करतो. पण मित्रांनो निश निवडतानी काही गोष्टी लक्ष्यात ठेवून च निश निवडा लागेल.

निश निवडतानी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी?

1) Search Volume:

तुम्हाला निश निवडतानी जास्त लक्ष search volume वर द्यावा लागेल. Search volume म्हणजे आपल्या निश चे keyword गूगल वर किती लोक search करतात.

तुम्ही एखादी निश निवडली पण त्या निश बद्द्दल जर कोणी गूगल वर सर्च करत नसेल तर ती निश पूर्ण व्यर्थ आहे. त्या निश वर ट्रॅफिक येणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला earning पण होणार नाही.

त्यामुळे निश अशी निवडावी की त्या निश ला चांगला search volume असला पाहिजे.

तुम्ही search volume चेक करण्यासाठी खालील tools चा वापर करू शकता.

Ubersuggest

Google Keyword Planner

Ahrefs

Semrush

2) Cost Per Click (CPC):

CPC ला cost per click किंवा pay per click असेही म्हणतात. तर CPC म्हणजे जेव्हा तुमच्या वेबसाईट वर add दिसतात तेव्हा त्यावर एखाद्या user ने क्लिक केल्यावर ज्या add owner ने ती add place केली आहे त्याच्या biding नुसार पैसे कट होतात आणि ते तुमच्या अकॉउंट ला येतात.

तर निश निवडतानी ज्या निश चा CPC जास्त आहे अशी निश निवडली तर तुमची जास्त earning होते. त्यामुळे निश निवडतानी high CPC असलेले निश निवडा. हे पण तुम्ही वरील tool वर बघू शकता.

3) Competition:

निश निवडतानी जर तुम्ही एकदम high search volume आणि high cpc वाले कीवर्ड निवडले तर त्यावर success होणं थोडं अवघड आहे. कारण अगोदर च त्यावर मोठं मोठे ब्लॉग run करत आहेत.

त्यामुळे तुम्ही medium किंवा low competition ची निश निवडा त्यावर तुम्ही लवकर success होऊ शकता आणि तुमची लवकर एअरनिंग सुरु होऊ शकते.

ब्लॉगिंग निश आणि निश ब्लॉगिंग मध्ये काय फरक असतो? Difference Between Blogging Niche & Niche Blogging

ब्लॉगिंग निश आणि निश ब्लॉगिंग वेगवेगळी असते. काहीजण यामध्ये थोडं गोधळून जातात. तर चला मी तुम्हाला सर्व क्लिअर मध्ये सांगतो.निश वर पण

ब्लॉगिंग निश (Blogging Niche) म्हणजे ग्लोबल निश. आपण वरती बघितल्याप्रमाणे ही मोठी निश असते. यामध्ये खूप sub niche पण येतात, तुम्ही सर्व sub niche वर पण ब्लॉग लिहू शकता.

निश ब्लॉगिंग (Niche Blogging) ही एकाद्या sub niche वर केली जाते. निश ब्लॉगिंग ला micro niche असे पण म्हणतात. आपण micro niche बद्दल वरती बघितलंच आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये ब्लॉगिंग निश म्हणजे काय? What Is Blogging Niche Meaning In Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend

3 thoughts on “ब्लॉगिंग निश म्हणजे काय? [2022 Full Details] | Blogging Niche Meaning In Marathi”

Leave a Comment