ब्लूएहोस्ट होस्टिंग रिव्हिव [2022 Full Details] | Bluehost Hosting Review In Marathi

नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण वेब होस्टिंग खरेदी करतानी खूप विचार केला का? माझ्या मतानुसार तुम्ही पण विचार केलाच असेल कारण मी सुध्दा केला होता. तुम्ही वेब होस्टिंग खरेदी करताना तुमच्या समोर ब्लूएहोस्ट या कंपनी च नाव एकदा तरी आलेच असेल! तर Bluehost hosting review in Marathi हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

Bluehost या वेब होस्टिंग बद्दल आपण या ब्लॉग मध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहोत. माझ्या काही वेबसाईट या ब्लूएहोस्ट वर च होस्टेड आहेत. म्हणून Bluehost या वेब होस्टिंग बद्दल मला चांगलं च माहित आहे. त्यामुळे तुमच्या साठी हा ब्लॉग Bluehost चा review आहे असे समजा.

तुम्ही या ब्लॉग मध्ये अशा काही गोष्टी जाणून घेणार आहात की जे WordPress Blog साठी खूप महत्वाच्या आहेत आणि असे काही प्रश्नाचे उत्तर जे तुमच्या ब्लॉगिंग जर्नी मध्ये येणार आहेत! ब्लॉगिंग मध्ये यश मिळवायचं असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.

जेव्हा आपण ब्लॉगिंग मध्ये नवीन असतो तेव्हा आपल्यासमोर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वेब होस्टिंग कोणती खरेदी करावी?

आणि हा प्रश्न तसा खूप सिरीयस सुध्दा आहे. कारण तुमची blogging journey ही वेब होस्टिंग वर च अवलंबून असते. कोणताही विचार न करता तुमच्या वर्डप्रेस ब्लॉग साठी कोणतीपण वेब होस्टिंग घेतली तर समोर जाऊन ते खूप नुकसानदायी ठरू शकते.

कारण वेब होस्टिंग ते असते ज्यावर तुमचे ब्लॉग आणि तुमच्या वेबसाईट ची success अवलंबून असते.

एक खराब होस्टिंग जर तुम्ही घेतली तर त्यामध्ये त्या होस्टिंग चा speed, server issue, backup, technical problem, website च वारंवार offline होणं यांसारख्या प्रॉब्लेम मध्ये अडकून राहसाल आणि जर त्या वेब होस्टिंग चा customer support जर चांगला नसेल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकणार नाही.

चुकीच्या वेब होस्टिंग मुळे आपली वेबसाईट तर बंद पडतेच तसेच आपल्या पैशाचं पण नुकसान होते.

वर्डप्रेस वर ब्लॉग बनवण्यासाठी त्याचा base हा एक चांगली वेब होस्टिंग असतो. ज्यामध्ये चांगला up time, चांगली speed, चांगल server, चांगली security आणि चांगला quality support असणे गरजेचं असते.

त्यामुळे मित्रांनो वेब होस्टिंग निवडतानी खूप काळजीपूर्वक निवडा.

जर तुम्ही ब्लॉगिंग या फिल्ड मध्ये beginner असाल तर तुम्ही पहिले वेब होस्टिंग काय असते ते जाणून घ्या. खालील लिंक वर क्लिक करून वेब होस्टिंग बद्दल सर्व माहिती मिळवा.

>>> वेब होस्टिंग म्हणजे काय?

>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?

मित्रांनो जर तुम्हाला नवीन ब्लॉग सुरु करायचा असेल आणि त्यासाठी एक चांगली वेब होस्टिंग घेण्याच्या विचारात असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. मी तुम्हाला कमी किमतीमध्ये सर्वात बेस्ट वेब होस्टिंग बद्दल माहिती देणार आहे. आणि माझा त्या वेब होस्टिंग सोबत चा अनुभव पण सांगणार आहे.

मित्रांनो वेब होस्टिंग चे खूप प्रकार आहेत. मार्केट मध्ये वेब होस्टिंग provide करणाऱ्या कंपनी पण खूप आहेत. तुम्हाला आपल्या वेब होस्टिंग म्हणजे काय? या ब्लॉग मध्ये त्याची सर्व माहिती मिळेल.

जेव्हा मी पण नवीन होतो या फिल्ड मध्ये तेव्हा मी पण चुकीची होस्टिंग नवडली होती. त्यानंतर थोडा अनुभव आला. वेब होस्टिंग बद्दल माहिती कळली त्यामुळे आता माझ्या वेबसाईट या Bluehost वर होस्टिंग आहेत.

Digitalstarx.com ही माझी वेबसाईट ब्लूएहोस्ट वर होस्टेड आहे. आणि आम्ही आमच्या client च्या वेबसाईट पण Bluehost वर बनवून देतो. कारण माझ्या experience नुसार Bluehost ही कंपनी best value for money आहे.

तुम्ही Youtube वर किंवा Google वर जरी सर्च केलं बेस्ट वेब होस्टिंग त्यामध्ये Bluehost च नाव असेलच. 

तर आता Bluehost बद्दल संपूर्ण डिटेल मध्ये बघू. त्यामुळे तुम्हाला पण एक चांगली होस्टिंग निवडायला मदत होईल.

ब्लूएहोस्ट कंपनी ची माहिती ( Bluehost Hosting Review In Marathi)

Bluehost hosting review in marathi.

Bluehost ही एक वेब होस्टिंग कंपनी आहे. Bluehost ची स्थापना 1996 मध्ये Matt Healton आणि Danny Ashworth यांनी केली होती. पण आता ब्लूएहोस्ट ला  Endurance International Group यांनी घेतलं आहे.

आज पूर्ण वर्ल्ड मध्ये ब्लूएहोस्ट ला quality web hosting provide करणारी कंपनी म्हणून ओळखलं जाते. मित्रांनो स्वतः WordPress ने Bluehost ला recommend केलं आहे. कारण ही एक सर्वात जुनी आणि reliable कंपनी आहे जी continue growth देत आहे.

Bluehost कंपनी तुम्हाला सर्व type चे प्लॅन provide करते ज्यामध्ये beginner साठी basic प्लॅन पासून ते professional साठी advance प्लॅन आहेत. आणि यामध्येपण पण सर्व hosting solution ते best deal offer provide करते. उदा.

  • Shared Hosting
  • VPS Hosting
  • Dedicated Hosting
  • WordPress Hosting
  • Managed Hosting
  • Reseller Hosting
  • Woo-Commerce Hosting

तर चला मित्रांनो आता main मुद्द्यावर येऊ की ब्लूएहोस्ट चा कोणता प्लॅन तुमच्या वेबसाईट साठी योग्य राहील.

ब्लूएहोस्ट वेब होस्टिंग वर कोणता प्लॅन निवडावा? (Best Web Hosting In Marathi)

मित्रांनो होस्टिंग प्लॅन निवडणे पण थोडं अवघड जाते. कारण आपण तिथेच पैसे देतो. तर बेस्ट प्लॅन कसा निवडायचा ते तुम्हाला सांगतो.

जर तुमची blog वेबसाईट असेल आणि तुम्ही beginner असाल तर basic प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला static वेबसाईट बनवायची असेल तरी सुध्दा हाच प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट राहील. याची costing पण कमी आहे आणि बेस्ट server दिले जाते. बेसिक प्लॅन ला share hosting असे म्हंटले जाते.

1) Share Hosting:

Share hosting हा Bluehost चा सर्वात जास्त विकला जाणार प्लॅन आहे. जर तुम्ही कमी कमतीमध्ये बेस्ट hosting प्लॅन घेण्याचा विचार करत असाल तर Bluehost च्या share hosting सारखा दुसरा प्लॅन नाही.

यामध्ये तुम्हाला जर एकापेक्षा जास्त वेबसाईट होस्ट करायच्या असतील तर ब्लूएहोस्ट चा choice plus plan येतो. ज्यामध्ये तुम्हाला unlimited storage सुध्दा मिळते.

Bluehost hosting review in marathi

2) Cloud Hosting:

Cloud Hosting ही share होस्टिंग पेक्षा थोडी महाग असते. कारण क्लाऊड होस्टिंग वर तुमच्या वेबसाईट चा डेटा वेग वेगळ्या सर्व्हर स्टोर केला जातो. त्यामुळे एका सर्वर ला प्रॉब्लेम जरी आला तरी दुसऱ्या सर्वर वरून तुमच्या users ला तुमच्या वेबसाईट वरील डेटा मिळतो.

जर तुमच्या वेबसाईट वर खूप ट्राफिक येत असेल तर तुम्ही cloud hosting निवडू शकता. पण जर तुम्ही नवीन असणार तर share होस्टिंग तुमच्यासाठी बेस्ट राहील.

3) WordPress Hosting:

WordPress hosting ही खास करून वर्डप्रेस साठी असते. ज्यामध्ये तुम्ही वर्डप्रेस वर ब्लॉग वेबसाईट, स्टॅटिक वेबसाईट किंवा ईकॉमर्स वेबसाईट बनवू शकता.

पण मित्रांनो तुम्हाला एक क्लिअर करतो share hosting आणि WordPress hosting हे एकच आहे. फक्त आजकाल खूप जास्त वेबसाईट या वर्डप्रेस वर बनत आहेत. आणि लोक google वर wordpress hosting च जास्त सर्च करत आहेत.

त्यामुळे होस्टिंग कंपन्यांनी wordpress hosting म्हणून नाव दिल आहे की ज्यामुळे लोकांना वर्डप्रेस होस्टिंग च दिसेल आणि ते खरेदी करतील.

तुम्ही पण वर्डप्रेस किंवा share होस्टिंग खरेदी करू शकता. दोन्ही पण एकच आहेत.

WordPress वर वेबसाईट बनवायला कोणतेही coding knowledge लागत नाही. त्यामुळे सहज कोणीपण वर्डप्रेस वर वेबसाईट बनवू शकतो. वर्डप्रेस का बेस्ट आहे? आणि तुम्ही कशाप्रकारे वर्डप्रेस वर ब्लॉग बनून पैसे कमवू शकता हे खालील ब्लॉग मध्ये दिल आहे. तुम्ही हे पण वाचू शकता.

>>> वर्डप्रेस म्हणजे काय? वर्डप्रेस मध्ये पैसे कमवणारा ब्लॉग कसा बनवायचा?

4) Dedicate Hosting:

Dedicate hosting मध्ये तुम्हाला तुम्हाला सेपरेट एक सर्व्हर च दिले जाते. ज्यावर तुमचं पूर्ण कंट्रोल असते. पण ही होस्टिंग खूप महाग असते. ज्याच्या वेबसाईट वर खूप ट्रॅफिक असते, तसेच मोठं मोठ्या organization या होस्टिंग चा वापर करतात.

तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला ही होस्टिंग recommend करणार नाही.

5) VPS Hosting:

VPS hosting होस्टिंग मध्ये तुम्हाला share आणि dedicate या दोन्हीचे features मिळतात. यामध्ये तुम्हाला एक virtual server दिले जाते पण त्यामध्ये तुम्हाला सेपरेट space दिली जाते.

तुम्ही नवीन असणार तर हे पण तुमच्यासाठी नाही.

मी या सर्व होस्टिंग बद्दल का सांगतोय की तुम्हाला पण होस्टिंग बद्दल थोडाफार माहित झालं पाहिजे.

6) Woo-Commerce Hosting:

Woo-Commerce Hosting ही ऑनलाईन शॉपिंग साठी आहे. जर तुम्हाला ऑनलाईन प्रॉडक्ट विकायचे असतील तर तुम्ही ही होस्टिंग खरेदी करू शकता.

वर्डप्रेस ब्लॉग साठी होस्टिंग कशी असली पाहिजे?

ब्लॉगिंग वेबसाईट मध्ये सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे वेबसाईट चा loading time. कारण आपण जेव्हा ब्लॉग पोस्ट करतो तेव्हा आपले users ते वाचत असतात. पण जर आपली वेबसाईट लवकर ओपन होत नसेल तर ते users दुसऱ्या वेबसाईट वर जातात.

तसेच वेबसाईट चा स्पीड सर्च इंजिन (SEO) मध्ये सर्वात महत्वाचा ठरतो कारण ज्या वेबसाईट चा loading speed सर्वात कमी असतो त्याच वेबसाईट google रँक करू शकतात. आणि तुम्हाला जर तुमची वेबसाईट google मध्ये रँक करायची असेल तर तुमच्या वेबसाईट चा स्पीड खूप important असतो.

SEO बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचू शकता.

>>> SEO म्हणजे काय?

वेबसाईट चा स्पीड कमी होण्याचे खूप कारण असतात, जसे की server load time, up time, technical support इत्यादी.

वेब होस्टिंग घेतानी कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे:

  • Reliable आणि  24x7x365 days Uptime असला पाहिजे.
  • Fast Server Load Time असणे खूप आवश्यक आहे.
  •  Hosting Server Response Time चांगला असणे खूप आवश्यक आहे.
  • Easy c-Panel आणि Dashboard use
  • WordPress Install करायला सोपं असलं पाहिजे.
  • 24×7 Customer support हे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे.
  • Affordable Web Hosting असली पाहिजे.
  • Free domain, Free SSL , Free business email id. या सर्व गोष्टी असल्या पाहिजेत.

मित्रांनो वरील सर्व गोष्टी Bluehost कंपनी provide करते.

ब्लूएहोस्ट होस्टिंग रिव्हिव्ह

Bluehost Hosting Review In Marathi

Bluehost hosting review in marathi.

मित्रांनो मी मागच्या 2 वर्षांपासून ब्लूएहोस्ट होस्टिंग use करत आहेत. तसेच मी बाकीच्या कंपनी Go-Daddy, Hostgator, Green-Geeks, यांच्या पण होस्टिंग use करून बघितल्या आहेत. पण कमी किमतीमध्ये सर्वात चांगली वेब होस्टिंग मला Bluehost च वाटली आहे.

2 Million पेक्षा जास्त वेबसाईट या bluehost वर आहेत. त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की ब्लूएहोस्ट ने लोकांना किती value for money दिले असेल.

Bluehost तुम्हाला unlimited storage देतो आणि server एवढं चांगलं आहे की तुमची website slow होईल याची तुम्ही चिंता च करू नका. त्यामुळे मोठं मोठे business या वेब होस्टिंग चा use करतात.

ब्लूएहोस्ट होस्टिंग फीचर्स आणि फायदे (Bluehost Hosting Features & Benefits)

1) Bluehost Performance:

मित्रांनो तुम्हाला समजलं च असेल की वेबसाईट चा loading speed किती महत्वाचा असतो. जर एखादी वेबसाईट 4 sec च्या आता ओपन होत असेल तर त्या वेबसाईट चा स्पीड सर्वात चांगला असतो. आणि जर एखादी वेबसाईट 4sec च्या नंतर ओपन होत असेल तर त्या वेबसाईट चा स्पीड खराब आहे असं समजलं जाते.

SEO मध्ये वेबसाईट च्या loading speed ला खूप महत्व दिले जाते. त्यामुळे तुमची वेबसाईट ही 1-2sec मध्ये ओपन होणे खूप आवश्यक असते. आणि हा स्पीड hosting server वर depend असतो.

Bluehost कंपनी सर्वात चांगलं hosting sever provide करते. त्यामुळे तुम्ही loading time ची चिंता च करू नका.

Bluehost कंपनी तुम्हाला 99.99% uptime guaranteed देते. तसेच average load time 1.48 sec आणि server response time 1.26sec चा देते ज्यामुळे तुमच्या वेबसाईट ची स्पीड खूप चांगली राहते.

2) Free SSL certificate:

Bluehost तुम्हाला होस्टिंग सोबत free ssl certificate देते ज्यामुळे तुम्हची वेबसाईट हॅकर पासून secure राहते.

3) Free Domain & Free Business Mail:

Bluehost तुम्हाला होस्टिंग बरोबर च free डोमेन नेम देते. तसेच तुम्हला 5 Business mail फ्री दिले जातात. तुमच्या कंपनी साठी किंवा पर्सनल use साठी business मेल खूप महत्वाचे असतात.

>>> डोमेन नेम म्हणजे काय?

4) WordPress Installation:

Bluehost तुम्हाला one-click वर WordPress installation देते. तुम्ही खूप easily wordpress install करू शकता.

5) 30 Days Money-back Guarantee:

Bluehost तुम्हाला 30 दिवसाची money back ची हमी देते. समजा जर तुम्हाला होस्टिंग घेतल्यावर काही प्रॉब्लेम वाटला तर 30 दिवसाच्या आत तुम्ही तुमचे पैसे रिटर्न घेऊ शकता.

6) Customer Support:

Bluehost चा कस्टमर सपोर्ट खूप चांगला आहे. मी काही वेळा त्यांच्या कस्टमर सोबत बोललो आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येतील ते पूर्ण सोडवतात. म्हणून त्यांचा कस्टमर सपोर्ट चांगला आहेत. Bluehost 24*7 कस्टमर सपोर्ट प्रोविडें करते.

Bluehost Security Features:

मित्रांनो कोणतीही वेब होस्टिंग खरेदी करताना त्याची security बघणे खूप गरजेचं आहे. कारण खालील लिंक वर जाऊन बघू शकता, तुम्ही घेतलेली hosting security जर चांगली नसेल तर काय होते?

https://www.news18.com/news/tech/godaddy-hacked-data-of-12-lakh-wordpress-users-at-risk-all-details-4476326.html

Bluehost बेस्ट security देते त्याचे काही पॉईंट खालीलप्रमाणे.

पासवर्ड रीसेट पेज सुधारणा (Password Reset Page revamp):
Bluehost ने पासवर्ड रीसेट पेज सुधारित केले आहे, ते अधिक प्रवेशयोग्य आणि वापरण्यास सोपे बनवले आहे. तुम्ही नवीन पासवर्ड तयार करता तेव्हा, तुम्ही आता तो पुन्हा टाइप न करता थेट तुमच्या खात्यात लॉग इन करण्यासाठी वापरू शकता.

सिंगल साइन-ऑन वैशिष्ट्य (Single Sign-On Feature):
सर्व Bluehost खाती आता सिंगल साइन-ऑन (SSO) वैशिष्ट्यास समर्थन देतात. याचा अर्थ तुम्ही तुमची Google आणि Bluehost खाती लिंक करू शकता आणि साइन इन करण्यासाठी तुमचे Google लॉगिन वापरू शकता.

दोन-घटक प्रमाणीकरण (Two-Factor Authentication):
तुम्ही आता तुमच्या Bluehost खात्यावर द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम करू शकता. हे वैशिष्‍ट्य तुम्‍हाला वाढीव सुरक्षा देते.

तुम्‍हाला काहीतरी (तुमचा पासवर्ड) माहित असणे आवश्‍यक आहे आणि लॉग इन करण्‍यासाठी काहीतरी (तुमचा फोन) असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे एखाद्याने तुमच्‍या पासवर्डचा अंदाज लावला तरीही ते तुमचे खाते अ‍ॅक्सेस करू शकणार नाहीत. हे द्वि-घटक प्रमाणीकरण चालू केले आहे.त्यामुळे अधिक सुरक्षा भेटते.

टोकनद्वारे खाते प्रमाणीकरण (Account Validation by Token):
तुम्ही आता तुमच्या नियंत्रण पॅनेलच्या तळाशी दिलेलं टोकन देऊन सपोर्ट टीम शी संपर्क साधता तेव्हा तुमची ओळख प्रमाणित करू शकता. हा सहा-अंकी कोड तुम्हाला तुमच्या पासवर्डचा कोणताही भाग सपोर्ट एजंटला न देता तुम्ही तुमचे खाते असल्याचे सिद्ध करू शकेल.

Bluehost होस्टिंग घेण्याचे फायदे:

तुम्हाला यामध्ये फक्त होस्टिंग नाही तर त्यासोबत खूप चांगले features सुद्धा मिळतात.

  • 99.99% uptime मिळतो.
  • Free Domain 1 वर्षासाठी
  • Free SSL
  • C-Pannel easy to handle
  • Free WordPress Theme मिळते.
  • खूप  Site tools and add-ons
  • Free CDN integration
  • Free मध्ये website builder मिळते.
  • बेस्ट  Technical  Support मिळते.
  • Free Infinite Business Email Setup
  • One plan for Unlimited Website with Unlimited disk storage
  • Higher security

या सर्व गोष्टी लक्षात घेता, तुम्हाला जर ब्लॉगिंग मध्ये करिअर करायचं असेल किंवा तुमच्या business साठी वेबसाईट बनवायची असेल तर तुम्ही Bluehost वरून खरेदी करू शकता.

आता Black Friday ची ऑफर चालू आहे. ही ऑफर वर्षातून एकदाच येते. त्यामुळे तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमच्या वेबसाईट साठी बेस्ट होस्टिंग घेऊ शकता. Bluehost ची hosting घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Bluehost Web Hosting

होस्टिंग खरेदी करणे खूप सोपं आहे. खालील ब्लॉग मध्ये Bluehost Hosting कशी खरेदी करायची याची step by step माहिती दिली आहे.

>>> वर्डप्रेस वर ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लूएहोस्ट ची होस्टिंग कशी खरेदी करायची?

तसेच तुम्ही खालील विडिओ बघून सुध्दा easily होस्टिंग खरेदी करू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये Bluehost Review In Marathi याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend

Leave a Comment