नमस्कार मित्रांनो, ज्यांना ब्लॉगिंग करायची आहे, त्यांच्यासाठी बॅकलिंक म्हणजे काय? What is backlink in Marathi? हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.
आपण आपल्या SEO म्हणजे काय? या ब्लॉग मध्ये बघितलं होत की SEO आपल्या ब्लॉग ला रँक करण्यासाठी किती महत्वाचा आहे. आणि ब्लॉग चा म्हणजेच वेबसाईट चा SEO कसा करायचा. जर तुम्ही ब्लॉगिंग या फिल्ड मध्ये येणार असणार तर तुम्हला SEO बद्दल माहित असणे खूप आवश्यक आहे.
जर कोणती पण वेबसाईट बनवली तर त्या वेबसाईट चा SEO करणे खूप गरजेचं असते. SEO मुळेच कोणतीपण वेबसाईट google रँक करू शकते आणि वेबसाईट वर ट्राफिक आणता येते. त्यामुळे ब्लॉगिंग मध्ये SEO ला सर्वात महत्वाचं स्थान आहे.
SEO मधील च एक महत्वाचा घटक म्हणजे बॅकलिंक. तर या ब्लॉग मध्ये आपण बॅकलिंक म्हणजे काय? या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही ब्लॉगिंग क्षेत्रातील असाल आणि त्यातल्यात्यात नवीन ब्लॉगर असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहेत. कारण, ब्लॉग ला रँक करण्यासाठी SEO खूप महत्व्याचा आहे पण त्याचबरोबर बॅकलिंक सुध्दा खूप मोठी भूमिका बजावते.
बॅकलिंक मुळे गुगल सर्च इंजिन मध्ये आपले ब्लॉग रँक होण्यास मदत होते. कारण do-follow link मुळे एक विश्वास तयार होतो आणि DA & PA वाढतो. म्हणून high quality बॅकलिंक असणे खूप गरजेचे आहे.
तुम्हला do follow link – no follow link, DA-PA ये सर्व शब्द नवीन वाटत असतील. पण तुम्ही काळजी करू नका आपण हे सर्व डिटेल मध्ये बघणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला बॅकलिंक विषयी एक पण शंका राहणार नाही.
Table of Contents
बॅकलिंक म्हणजे काय?
What Is Backlink In Marathi?
तुम्हाला बॅकलिंक या नावावरून थोडी संकल्पना स्पष्ट होत असेल की, एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट वर जाण्यासाठी जी लिंक दिली असते ती बॅकलिंक असते.थोडं समजलं नसेल तुम्हाला!
तर चला अजून सोपं करून सांगतो, समजा तुमची वेबसाईट A आहे आणि माझी वेबसाईट B आहे. तर A वेबसाईट वरून B वेबसाईट वर जाण्यासाठी माझ्या वेबसाईट ची लिंक तुमच्या वेबसाईट मध्ये द्या लागते. म्हणजेच तुम्हाला A वेबसाईट वरून B वेबसाईट ला लिंक करून व्हिसिटर्स पाठवले जातात. त्याला बॅकलिंक असे म्हणतात.
वेबसाईट A ही वेबसाईट B सपोर्ट करत असते. उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमची संकल्पना स्पष्ट होईल. उदा. वेबसाईट A वर जास्त व्हिसिटर्स आहेत आणि चांगला DA & PA (Domain Authority & Page Authority) आहे. त्याने वेबसाईट B च्या ब्लॉग ची लिंक त्याच्या ब्लॉग मध्ये दिली म्हणजेच वेबसाईट B ला बॅकलिंक दिली.
याचा फायदा वेबसाईट B ला असा होईल की वेबसाईट A वरचे व्हिसिटर्स त्या बॅकलिंक वरून वेबसाईट B वर जातील म्हणजेच व्हिसिटर्स वाढेल आणि वेबसाईट A चांगला DA & PA असल्यामुळे गूगल चा विश्वास तयार होतो आणि वेबसाईट रँक होण्यास मदत होते.
बॅकलिंक चे प्रकार (Types Of Backlink In Marathi)
1) Do Follow Backlink:
Do follow लिंक ही एक लिंक आहे जी SEO च्या द्रुष्टीने मूळ साइटचे अधिकार दुसऱ्या साइटवर पाठवून मदत करते. या अधिकाराच्या पासिंगला, “लिंक ज्यूस” असे म्हणतात.
Do follow बॅकलिंक्स प्राप्त केल्याने वेबसाइटचे DA, PA आणि डोमेन रेटिंग सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे कीवर्ड रँकिंग सुधारण्यास मदत होते. डिफॉल्ट, सगळ्या लिंक्स Do follow असतात. त्यामुळे वेबसाइटला लिंक करताना Rel=”Do follow” ची गरज नसते.
उदा. तुम्ही एका शॉप मधून लॅपटॉप खरेदी केला आणि तेच शॉप तुम्ही तुमच्या मित्रांना रेफर करता की हे शॉप चांगले आहे तू येथून लॅपटॉप खरेदी कर. म्हणजे तुम्ही त्या शॉप बद्दल विश्वासाने सांगता. त्यामुळे त्या शॉप वर तुमचे अनेक मित्र खरेदी करायला जातात आणि खरेदी पण करतात.
याचप्रकारे Do Follow Backlink काम करते.
- Do follow बॅकलिंक चे फायदे (Benefits Of Do Follow Backlink In Marathi):
- वेबसाईट चा DA & PA वाढण्यास मदत होते.
- वेबसाईट ची सर्च इंजिन रँकिंग वाढते.
- वेबसाईट मधील पेज रँकिंग वाढण्यास मदत होते.
2) No-Follow Backlink:
No Follow लिंक, ही एक अशी लिंक आहे जी, ती लिंक करत असलेल्या वेबसाइटवर अधिकार देत नाही. ही लिंक SEO च्या दृष्टीने मदत करत नाही. लिंक No follow करण्यासाठी, वेबसाइटला लिंक करताना कोडमध्ये rel=”nofollow” ची गरज असते.
उदा. तुम्ही A शॉप मधून लॅपटॉप खरेदी केला आणि तेच शॉप तुम्ही तुमच्या मित्रांना सांगता की तुम्ही A शॉप मधून खरेदी केली. पण तुम्ही त्या शॉप बद्दल विश्वासाने सांगत नाहीत. त्यामुळे त्या शॉप वर तुमचे अनेक मित्र खरेदी करायला जातात पण जास्त खरेदी करत नाहीत.
- No Follow बॅकलिंक चे फायदे (Benefits Of No Follow Backlink):
- वेबसाईट ची डोमेन ऑथॉरिटी वाढण्यास मदत होते.
- मोठ्या प्रमाणात यूजर्स वेबसाईट वर येतात.
- ब्रँड ची awareness वाढण्यास मदत होते.
बॅकलिंक चे फायदे (Benefits Of Backlink In Marathi)
1) Referral Traffic:
बॅकलिंक चा उपयोग आपण high referral traffic आणण्यासाठी करतो. आपण जेव्हा referral traffic आणतो त्याचा bounce rate खूपच कमी असतो कारण ते आपल्या ब्लॉग रिलेटेडचेच traffic असते. बॅकलिंक्स मिळाल्याने लिंक रूट डोमेन वरचे व्हिसिटर्स तुमच्या वेबसाईट वर येतात आणि हे खुप जास्त ट्रॅफिक असते.
2) Increase Crawler Rate:
ब्लॉग पोस्ट इंडेक्स करण्याचे अनेक मार्ग आहेत. ज्यामध्ये बॅकलिंक खूप मदत करते. तुम्ही प्रत्येक पोस्ट मॅन्युअली नाहीतर ऑटोमॅटिक क्रॉल करता किंवा एखाद्या चांगल्या वेबसाइटला बॅकलिंक केल्यानंतर, शोध इंजिन बॉट त्या बॅकलिंकद्वारे तुमची वेबसाईट इंडेक्स करण्यास सुरवात करते.
नवीन वेबसाइट किंवा ब्लॉगसाठी हे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुमची वेबसाईट लवकर रँक होते आणि ब्लॉग पोस्ट लवकर रँक होते.
3) Search Engine Improvement:
उच्च-गुणवत्तेचे बॅकलिंक्स तुमची सर्च इंजिन रँकिंग सुधारण्यात मदत करतात. जेणेकरून तुमचा ब्लॉग Google वर टॉप रँक मिळवू शकेल. तुमच्या कोणत्याही ब्लॉग/वेबसाईट ला इतर वेबसाईट वरून बॅकलिंक मिळाल्यास, ऑटोमॅटिक ही ब्लॉग/वेबसाईट सर्च इंजिनमध्ये टॉप रँक मिळवते.
4) Highlight Brand Name:
आपले ब्लॉग/वेबसाईट टॉप रँक करायला लागले तर ऑटोमॅटिक आपले ब्रँड नाव प्रसिद्ध होते आणि यूजर्स आपल्याला आपल्या ब्रँड नावाने सर्च करतात.
5) High Reach/Free Promotion:
आपण पाहिलं आहे कि बॅकलिंक भेटली कि आपल्याला चांगले यूजर्स भेटतात आणि त्यांना बाउन्स रेट खूप कमी असतो. बॅकलिंक मुळे आपले पेज व्हायरल होते परिणामी जास्त यूजर्स आणि फ्री मार्केटिंग होते.
बॅकलिंक बनवताना कोणती काळजी घ्यावी?
बॅकलिंक हे एक वेबसाईट साठी मोठं वरदान आहे. पण यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
High Quality बॅकलिंक मुळे तुमच्या वेबसाईट ची High Reach/Free Promotion, Search Engine Improvement, Increase Crawler Rate, Referral Traffic ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी होतात. यामुळे तुमची वेबसाईट/ब्लॉग पेज टॉप रँक ला येते.
तसेच Low Quality बॅकलिंक मुळे तुमच्या वेबसाईट ची रँकिंग खूप कमी होते परिणामी तुमची वेबसाईट सर्च इंजिन मध्ये टॉप रँक ला जात नाही.
तसेच तुमच्या वेबसाईट वर चांगले ब्लॉग नाही, पोस्ट कमी आहेत, आणि तुम्ही जास्त बॅकलिंक घेत आहेत तर त्याचा सुद्धा उलट परिणाम होते. गूगल ला वाटते की तुम्ही स्पॅम करत आहेत. यामुळे गूगल तुमची वेबसाईट ची रँकिंग कमी करते.
पोस्ट आणि बॅकलिंक यांचा योग्य प्रमाण असावा. म्हणजे पोस्ट आणि बॅकलिंक बॅलन्स होतील.
तुम्ही जेव्हा एखाद्याला बॅकलिंक देता तेव्हा तुमच्या ब्लॉग च्या रेलटेड त्याचे ब्लॉग आहेत की नाही हे बघणे खूप आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्या ब्लॉगिंग निश (Niche) रिलेटेड च तुम्ही बॅकलिंक द्या.
समजा जर तुमचा ब्लॉग फिटनेस च्या रिलेटेड असेल आणि तुम्ही ट्रॅव्हल च्या ब्लॉग ला बॅकलिंक दिल्यावर तुमची रँकिंग कमी शकते.
बॅकलिंक कशी तयार करायची?(How To Create Backlink In Marathi?)
वेबसाईट साठी बॅकलिंक किती महत्वाची असते हे आपण बघितलं. तर आता आपण बॅकलिंक कश्या तयार करायच्या हे जाणून घेऊयात.
1) दर्जेदार कन्टेन्ट लिहणे (Quality Content):
बॅकलिंक घ्यावी तरी लागते नाहीतर द्यावी तरी लागते. नाही समजलं! अजून थोडं सोपं करूंन सांगतो जर तुमचा कंटेन्ट high quality असेल म्हणजेच तुमच्या कंटेन्ट वाचून सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असेल तर तुमचा कंटेन्ट high quality आहे.
ब्लॉग/वेबसाईट मध्ये योग्य त्या ठिकाणी images, map, anchor text, इतर लिंक असेल तर त्या ब्लॉग/वेबसाईट चा SEO चांगला होतो. आणि हे सर्व पाहून बाकीचे वेबसाईट/ब्लॉग तुम्हाला स्वतःहून पुढाकार घेऊन तुम्हाला बॅकलिंक देतात. ही लिंक Do follow बॅकलिंक असेल.
हे देखील वाचा>>
>>> कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय?
2) गेस्ट पोस्ट (Guest Post):
गेस्ट पोस्ट हा दर्जेदार बॅकलिंक्स तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हाला तुमच्या वेबसाइटच्या विषयाशी संबंधित काही लोकप्रिय ब्लॉग शोधावे लागतील जे गेस्ट पोस्ट स्वीकारतात. त्यानंतर त्या ब्लॉगवर एक आकर्षक आणि माहितीपूर्ण पोस्ट लिहून द्यावी लागते.
जर तुम्हाला अश्या वेबसाईट वरून बॅकलिंक हवी असेल तर तुम्हाला त्या वेबसाईट साठी चांगला ब्लॉग लिहून द्यावा लागतो. जेणेकरून त्या ब्लॉग मध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉग ची बॅकलिंक देऊ शकता. त्यातून तुम्हाला एक चांगली बॅकलिंक तर मिळेलच, पण त्या वेबसाइटचे यूजर्स तुमच्या पोस्ट वाचून तुमच्या वेबसाइटकडे आकर्षित होतील. ही लिंक Do follow बॅकलिंक असते.
3) कंमेंट लिंक (Comment Link):
आपल्या वेबसाईट/ब्लॉग संबंधित पेज ब्लॉग वर कमेंट देणे सुरु करा. कमेंट करताना त्या ब्लॉग बद्दल थोडेफार लिहून आपल्या ब्लॉग ची लिंक द्या. ही लिंक No follow बॅकलिंक असेल. कंमेंट केल्यानी त्या author सोबत तुमचे चांगले संबंध तयार करून बॅकलिंक घेण्यासाठी फायदेशीर ठरेल.
4) ई-मेल करणे (E-mail Sending):
बॅकलिंक साठी तुम्ही त्या author ला मेल करून बॅकलिंक साठी विनंती करू शकता. आणि त्यांनी परवानगी दिली तर त्या कडून तुम्ही बॅकलिंक घेऊ शकता. ही लिंक Do follow बॅकलिंक असते.
5) सोशल बुकमार्कींग (Social Bookmarking):
सोशल बुकमार्कींग म्हणजे तुम्ही सोशल मीडिया वर अकाउंट बनवून तुम्ही सोशल मीडिया वरचे यूजर्स वेबसाईट/ब्लॉग वर घेऊन येऊ शकता.
त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर ह्यासारख्या सोशल मीडिया वर अकाउंट तयार करा लागते. या अकाउंट वर तुम्ही तुमच्या ब्लॉग ची पोस्ट लिंक देऊ शकता. येथून तुम्हला तुमच्या वेबसाईट/ब्लॉग पज साठी बॅकलिंक भेटेल. ही लिंक Do follow बॅकलिंक असते.
6) प्रश्न आणि उत्तर (Quora & Reddit):
इंटरनेट वर अशा खूप वेबसाईट आहेत जेथे यूजर्स त्यांना पडलेले प्रश्न विचारतात. अशा वेबसाईट वर जाऊन तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता.
त्यासाठी त्या वेबसाईट वर तुमच्या niche संबंधित प्रश्न सोडून त्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुमच्या ब्लॉग ची बॅकलिंक देऊ शकता. अशा वेबसाईट वरून तुम्ही जास्त प्रमाणात यूजर्स तुमच्या वेबसाईट वर घेऊन येऊ शकता. ही लिंक No follow बॅकलिंक असेल.
उदा. quora.com & reddit.com इत्यादी
7) बॅकलिंक साठी पैसे देने (pay for backlink):
तुम्ही पैसे देऊन सुद्धा बॅकलिंक विकत घेऊ शकत. खूप साऱ्या अश्या वेबसाईट आहेत त्या पैसे घेऊन बॅकलिंक देतात. ही लिंक Do follow बॅकलिंक असेल.
बॅकलिंक मध्ये महत्व्याच्या व्याख्या:
- लिंक ज्युस (Link juice):
लिंक ज्यूस हा SEO बॅकलिंक साठी जगात वापरला जाणारा शब्द आहे जो एका वेबसाईट दुसर्या वेबसाईटवर पास केलेल्या लिंक ची value देण्यासाठी वापरला जातो. हे लिंक हायपर लिंक्सद्वारे दिले जाते. लिंक ज्युस मुळे पेज ऑथॉरिटी आणि डोमेन ऑथॉरिटी वाढते.
- कमी गुणवत्ता लिंक (Low quality backlink):
एखाद्या खराब किंवा स्पॅम साईट वरून आपल्या वेबसाईट ला बॅकलिंक येते अश्या बॅकलिंक ला Low quality backlink असे म्हणतात. Low quality backlink मुळे पेज रँक होत नाही. यूजर्स कमी येतात, रँकिंग कमी होऊन पेज चे नुकसान होते.
- उच्च गुणवत्ता लिंक (High quality backlink):
उच्च गुणवत्ता लिंक म्हणजे चांगला DA & PA असण्याऱ्या साईट वरून बॅकलिंक घेणे. ही बॅकलिंक खूप फायदेशीर असते. ह्या बॅकलिंक मुळे पेज/डोमेन/वेबसाईट रँक वाढते. जास्त यूजर्स येतात. चांगला DA & PA असलेल्या वेबसाईट वरून Do follow backlink भेटली तरी तिचा प्रभाव चांगला पडतो.
- DA & PA
Domain Authority हे इंटरनेटवरील सर्व वेबसाईट चे अधिकार दाखविण्यासाठी Moz ने तयार केलेले मेट्रिक आहे.
Page Authority हे इंटरनेटवरील सर्व वेबपेज चे अधिकार दाखविण्यासाठी Moz ने तयार केलेले मेट्रिक आहे.
Google ने त्यांचा PageRank डेटा update करणे बंद केल्याने आणि तो लोकांसाठी उपलब्ध करून दिला, त्यामुळे सर्च इंजिन परिणाम पृष्ठांमध्ये (SERPs) विशिष्ट वेबपेज कसे काम करेल याचा अंदाज लावण्यासाठी Page Authority हे industry standard म्हणून वापरले जात आहे.
PA 1-100 च्या स्केलवर मोजले जाते. जास्त PA म्हणजे वेब पेजला मजबूत अधिकार असतात चांगले रँकिंग मिळण्याची. कमी PA म्हणजे सर्च इंजिन मधल्या इतर समान पेज शी स्पर्धा करणे आणि रँक करणे.
- रेफरल ट्रॅफिक (Referral traffic):
आपल्या ब्लॉग चा संदर्भ देऊन आपले यूजर्स दुसऱ्या वेबसाईट वर पाठवणे म्हणजे रेफरल ट्रॅफिक होय.
- बाउन्स रेट (Bounce rate):
बाउंस रेट म्हणजे टक्केवारी. जे लिंकवर क्लिक करतात पण जास्त वेळ वेबसाईट वर राहत नाही आणि वेबसाईट वरून निघून जातात. बाऊन्स रेट कमी करण्यासाठी तुम्हाला चांगला कंटेन्ट लिहणे आवश्यक असते.
FAQ:
बॅकलिंग म्हणजे काय?
एका वेबसाईट वरून ट्रॅफिक दुसऱ्या वेबसाईट वर पाठवण्यासाठी ज्या लिंक चा उपयोग केला जातो, त्या लिंक ला बॅकलिंक असे म्हणतात.
बॅकलिंक चे प्रकार कोणते?
Do follow बॅकलिंक आणि No follow बॅकलिंक
बॅकलिंक चे फायदे कोणते?
बॅकलिंक दिल्याने वेबसाईट वरील ट्राफिक वाढते. Domain authority आणि page authority वाढते. वेबसाईट गूगल वर रँक करते.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये बॅकलिंक म्हणजे काय? What is backlink in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.
पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.