नमस्कार मित्रांनो, Carpe Diem Meaning In Marathi (कार्पे डिएम) म्हणजे काय? तर याबद्दल सर्व माहिती आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
तुम्हाला या ब्लॉग मध्ये खूप चांगली माहिती मिळणार आहे ती पण थोड्या हटके अंदाज मध्ये. त्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा.
जस जस तुम्ही वाचत जाणार तसा तसा तुमचा इंटरेस्ट वाढत जाणार ही खात्री आहे माझी!
Table of Contents
कार्पे डिएम म्हणजे काय? |
Carpe Diem Meaning In Marathi
Carpe Diem हा लॅटिन भाषेतला वाक्यप्रचार आजकल खूप ठिकाणी वापरला जातो. ज्याचा शब्दश:अर्थ ‘ दिवस हिसकावून घ्या’ (Pluck the day )असा होत असला तरी त्याचे भाषांतर ” तुम्हीच तुमच्या दिवसाचे ताबेदार व्हा “, जे काही करायचे, जगायचे आहे ते ताबडतोब करा. कशाला उद्याची बात म्हणत आत्ताच्या घडीचा आनंद घ्या.
काही लोकांसाठी carpe diem ही आजवरच्या जीवन जगण्याची सगळ्यात प्रभावी,आवडत्या कलांमध्ये आणि तत्वज्ञानात समाविष्ट केली जावून. महत्वपूर्ण ठरली आहे.
मग आपण जर शब्दांपूरते मर्यादित न राहून,ह्या वाक्याप्रचाराचा स्वैर अनुवाद (free translation ) करून त्यामागचा भाव जाणून घेत, विस्तारणे खरा अर्थ शोधायचं म्हंटलं; तर तो “उद्याची, भविष्यातील कसलीही चिंता न करता संधी मिळतीये,वेळ आहेच.
तर मग आत्ता ह्या क्षणी त्याचा लगेच फायदा घेवून आनंद लूटा आणि स्वतःला आनंदी ठेवत सुखी समाधानी करा”. तुमचा स्वतः चा दिवस तुम्ही स्वतः साठी जप्त अर्थात काबीज करा. त्याचे स्वतः ताबेदार व्हा. (Seize the Day). असा होतो.
Carpe Diem Meaning In Marathi | प्राचीन उगम आणि अर्थ :
इसवी सन पूर्व 23व्या शतकातील रोमन कवी होरेस (Horace ) च्या एका Ode(गीतात्मक कविता) मध्ये पहिल्यांदाच Carpe diem ही संकल्पना दिसून आली. होरेसची ही कविता त्याच्या लेवूकोनो(Leuconoe) नावाच्या दासीला मोहित करण्याच्या उद्देशाने सुरु होते.
पुढे तिला तिचं भविष्य जाणण्यात खूपच रस असतो. त्यावेळी कवी तिला याविषयी नकारात्मक करत मोहविण्यासाठी, उद्यावर शक्य तितका कमी विश्वास ठेवत,
वाईन ला जवळ खेचत तू जग असं की carpe diem.
(strain the wine and ‘carpe diem’, trusting as little in tomorrow as possible.) अशा अर्थाने केला आहे.
होरेसनेही या जुन्या लॅटिन कवितेत carpe diem ही संकल्पना वाईन आणि फळाचा रुपक अलंकार (methaphor) वापरून उत्कृष्ठरित्या साधून. जगाला एकप्रकारची देणगीच दिली. थोडक्यात त्याने “जिंदगी ना मिलेगी दोबारा “म्हणत “इस पल यहाँ, जी भर जियो, जो है समा, कल हो ना हो ” अर्थ बोध दिलाय.
भाषा शास्त्रीय अर्थ विचार :
या आणि अशा अनेक वाक्याप्रचार आणि शब्दांची पाळेमुळे ही शेवटी लॅटिन भाषात तसेच रोमन संस्कृतीत येऊन मिळतात. जे खूप छोटे वाटतात पण खोल अर्थात बुडालेला बहुमोल विचार सांगून जातात.
त्याकाळातील रोमनांच्या मोठ्याप्रमाणात असलेल्या कंटाळवाण्या, रटाळ, शैलीतल्या भटक्या, मेंढपाळ, खेडूत यांच्याशी संबंधीत कवितांमधील (pastoral poetry) एक फलित म्हणजे ह्या वाक्यप्रचारा मागील होरास ने मांडलेली त्याची ही संकल्पना आहे.
मूळ लॅटिन क्रियापद carpere पासून तयार झालेला, तसेच carpe म्हणजे खुडणे, धैर्याने हिसकावने, अथवा लाभ, फळ प्राप्ती करून घेणे आणि अशा रीतीने carpe diem चा भाषाशास्त्रीय दृष्ट्या अर्थ, तुमचा दिवस हिसकावून घ्या (pluck the day )असा करता येईल. त्या काळातील इतर कवींप्रमाणे होरस ने देखील; त्याच्या कवितांमध्ये भरपूर शेतीविषयक शब्द व संकल्पनांचा वापर केलेला आहे. त्याचेच हे एक उदाहरण म्हणता येईल.
आत्ताच्या काळात इतकी प्रसिद्ध कशी झाली?
खऱ्या अर्थाने 1989 साली आलेलेल्या The Dead Poet’s Society ह्या चित्रपटातील Robin Williams यांच्या एका scene मुळे आजच्या जगाला Carpe Diem ची ओळख झाली.
नावाजलेल्या, शिस्तप्रिय शाळेतला नियम मोडून मुलांना पुस्तका बाहेरच जगायला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या भूमिकेत, त्याच्या वर्गातील मुलांना Robin Williams, माजी विद्यार्थ्यांच्या फोटोकडे पहायला सांगत;प्रत्येक क्षणाचा आनंद घेत,तुम्ही तुमची आयुष्य असामान्य करा.
अशा उद्देशाने Seize The Day boys,make your lives extraordinary ही संकल्पना वापरतो. Carpe Diem संकल्पना शिकवून त्याप्रमाणे जगायला सांगतो. तिथूनच Carpe Diem खूप फेमस व्हायला सुरुवात झाली.
आजच्या जगाने लावलेले वेगवेगळे अर्थ :
आजच्या आधुनिक जगासाठी Carpe Diem काहीतरी असामान्य करून, आजचा दिवस माझा असं जगाला दाखवून देत. त्या वेळेला महत्वपूर्ण ठरवण्यासाठी देखील केला जातो.
आपल्या instagram, tiktok च्या पिढीला रोज नवे हॅश टॅग(#) लागतात. #YOLO हा Carpe Diem चाच अर्थ आणि संकल्पना घेवून जगभर viral होत प्रचलित झालेला हॅश टॅग म्हणावा लागेल.
>>> हे देखील वाचा – कन्टेन्ट रायटिंग म्हणजे काय?
हे जगप्रसिद्ध करणारे काही प्रसिद्ध मंडळी :
- 2016 साली जुडी डेंच ह्या अभिनेत्रीने तिच्या मनगटावर Carpe Diem असा टॅटू कोरला त्याचा ही फोटो खूप viral झाला.
- 2017 साली Carpe Diem Regained हे पुस्तक ऑस्ट्रेलियन तत्वज्ञ रोमन क्रीझनरिक यांनी प्रकाशित केलं. या पुस्तकानंतर ह्या संकल्पनेचा सर्वच क्षेत्रात खुपच बोलबाला झाला. यात आजच्या आधुनिक जगाच्या दृष्टीने त्याने carpe diem चा अर्थ “फक्त ते करा, Just Do It” असा कथन केला.
- तो आज रोजच्या जगण्यात वेळोवेळी प्रभाव पाडणाऱ्या चार गोष्टीच्या संदर्भात उपहासात्मक(Sarcastically) सांगत, त्यांनी या संकल्पनेला खुपच महत्व प्राप्त करून दिलं. ते असं म्हणतात की हा अर्थ आजच्या चार वेगवेगळ्या क्षेत्रातील गटांनी पळवलाय (hijack) केलाय. नव्या ग्राहक संस्कृतीने तो “फक्त विकत घ्या ” (Just buy it) असा,आधुनिक मनोरंजन आणि समाज माध्यमाच्या साधनानी (Digital entertainment and social media) ने “फक्त बघा (just watch it ),वेळच्या नियोजनबाबतीत तो “फक्त नियोजन करा “(just plan it )असा लावत, मानसिक आरोग्याशी संबंधीत mindfulness मोव्हमेन्ट ने तो “फक्त श्वास घ्या (Just Breathe) असा रूढ केलेला आहे. त्यांनी सांगितलेला हा अर्थ सखोल असा पण सोप्पा वाटणारा असला. तरी पण साऱ्या जागतिकीकरण झालेल्या दुनियेला इशारा देऊन कान पिचक्या काढणार ठरतोय.
- सर्वच क्षेत्रात आणि एक जीवन शैली(life style)सुद्धा :
अनेक हॉटेल, कॅफे,जिम, नवे उद्योगधंदे, रिसॉर्ट, बूट कॅम्प,
- माल वाहतूक, टेकनॉलॉजि कंपनी यांची नावेही आपल्याला Carpe Diem अशी ठेवलेली पाहायला मिळतायत. अगदी पुणे, मुंबईच्या आसपाससुद्धा बरीच सापडतात.
- आजकल Carpe Diem हा अनेकांसाठी सुंदर जगण्यासाठी औषधासारखा उपयोगी ठरतोय. तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करण्यासाठी धीर देणाऱ्या एखाद्या साधूसंताच्या उपदेशासारखा मार्ग दाखवणारा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या प्रमाणे जगप्रसिद्ध झालाय.
घर की मुर्गी दाल बराबर :
एखादा इंग्रजी संकल्पना आपल्याकडे आली की तिचा आपण उदोउदो केल्याशिवाय आजकल राहत नाही. तशी पद्धतशीर जाहिरातबाजी करून जे काही भारतीयकडे आहे ते सर्व मागास आणि बुरसाटलेले.
आमच्याच इतिहासात सर्वात चांगल मिळेल. अशी भूमिका घेत अशा संकलपानांचा गवगवा करायाला आजची माध्यमे भाग पडतात. पण आपल्याकडे सुद्धा चार्वाक ऋषींनी “आजचा दिवस माझा “अस म्हणतं आयुष्य जगण्याचा सल्ला Carpe Diem च्या जल्माआधी दिलाय.
गौतम बुद्ध ही कशाचीही अपेक्षा न ठेवता. वर्तमानात जगा. चालू घडीचा विचार करा. असा उपदेश ह्या संकल्पनेच्या आधी सांगितला आहे. आपण आपल्याला विचार, व्यवहाराच्या बाबतीत बाहेरून आलेल्या संकल्पनाच भारी वाटतात.
त्यात अगदी कमरेच सोडून डोक्याला बांधायचा trend किंवा #तयार झाला तरी आम्ही डोक्यावर घेऊन नाचणार. म्हणजे घर की मुर्गी दाल बराबर अशीच स्थिती आजकल आपल्याला पाहायला मिळते. आपण सुद्धा आपल्याकडच्या अजरामर तत्वज्ञानाला जगात भारी असल्याच सांगण्यासाठी पुढं आल पाहिजे. वरच्या संकल्पनेला समांतर गोष्टी trend करत आपलही तत्वज्ञानची खोली जगाला दाखवून दिली पाहिजे.
Carpe Diem चा आमच्यासाठी अर्थ :
आमच्यासाठी Carpe Diem म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नवनवीन शक्यता आजमावून पाहायच्या आणि त्यातून येणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करायचं. त्यासाठी आत्ताच्या घडीचा आनंद घेत जोमाने प्रयत्न करायचा.
याचबरोबर जिंदगी ना मिलेगी दोबारा म्हणत जिथं आहोत तिथ स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी जगायचं. उद्याचा विचार न करता. तसा कुठलीही जबाबदारी स्वीकारायची नसल्यावरही आपण Carpe Diem म्हणत दिवस काढू शकतो. पण मग आपला कबीर सिंग व्हायला वेळ नाही लागणार.
मात्र आपण Carpe Diem चा योग्य अर्थ घेत, ये जवानी है दिवानी गुणगुणातही आयुष्यातील सर्व अडचणींना मात देत. स्वतःला धीर देवून खंबीर बनवत. आपल्याला जे पाहिजेल ते साध्य करू शकतो.
लेखक-शिवप्रसाद माजगांवकर…
१) कार्पे डीएम म्हणजे काय?
उत्तर- करपे डीएम म्हणजे ”तुम्हीच तुमच्या दिवसाचे ताबेदार व्हा “, जे काही करायचे, जगायचे आहे ते ताबडतोब करा. कशाला उद्याची बात म्हणत आत्ताच्या घडीचा आनंद घ्या.
२) कार्पे डीएम ची संकल्पना सर्वात पहिले कुठे दिसून आली?
उत्तर- इसवी सन पूर्व 23व्या शतकातील रोमन कवी होरेस (Horace ) च्या एका Ode(गीतात्मक कविता) मध्ये पहिल्यांदाच Carpe diem ही संकल्पना दिसून आली.
३) कार्पे डीएम हा कोणत्या भाषेतील शब्द आहे?
उत्तर- Carpe Diem हा लॅटिन भाषेतला वाक्यप्रचार आजकल खूप ठिकाणी वापरला जातो.
४) कार्पे डीएम का आताच्या घडीतील अर्थ काय?
उत्तर- आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नवनवीन शक्यता आजमावून पाहायच्या आणि त्यातून येणाऱ्या प्रत्येक संधीच सोनं करायचं. त्यासाठी आत्ताच्या घडीचा आनंद घेत जोमाने प्रयत्न करायचा.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये कार्पे डीएम म्हणजे काय? Carpe diem meaning in Marathi याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.
Beautiful Blog
Nicely Explained
Interesting and Engaging
Thank you for the information and…
We want some more blogs
Thank You For Your Comment!
Superb, fruitful and informative
Thank You, Supriya For Your Comment!
fruitful and informative
Thank You!
Nice explanation and crisp content..