बिजनेस लोन कसे घेतात? [Full Detalis] | Business Loan Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, हे दशक इंटरप्रेनिरशीप च आहे असं म्हंटल जात आहे. कारण आजकाल खूप नवीन स्टार्टअप सुरु होत आहेत. त्यामुळे आपण या ब्लॉग मध्ये Business Loan Information In Marathi म्हणजेच बिजनेस लोन ची संपूर्ण माहिती आणि ते कसे घ्यायचे हे बघणार आहोत.

मित्रांनो, माझा पण बिजनेस आहे. मी माझा बिजनेस २०१९ मध्ये सुरु केला होता. त्या बिजनेस साठी मी सुद्धा कर्ज घेतलं होत. मी १५ लाख च PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme) मधून कर्ज घेतलं होत.

म्हणून मला याबद्दल संपूर्ण माहिती आहे. हीच माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 

बिजनेस लोन म्हणजे काय? |

Business Loan Information In Marathi

business loan information in marathi
Image Credit- Freepik.com

कर्ज हा शब्द काही आपल्याला नवीन नाही. आयुष्यात प्रत्येक जण या ना त्या कारणाने कर्ज घेतच असतो. बऱ्याचदा ते पैशाच्या स्वरूपात नसेलही, पण उधारी, मदत, एका गोष्टीच्या बदल्यात दुसऱ्या गोष्टीची देवाण-घेवाण. हे व असे अनेक कर्जाचे प्रकार आपल्याला माहित आहेत.

बिजनेस करण्यासाठी किंवा बिजनेस वाढवण्यासाठी जे कर्ज घेतलं जाते त्याला बिजनेस लोन असते म्हणतात.

आज भारत देशाला आजाद होऊन 75 वर्ष झाली असली तरीही म्हणावे असे उद्योग आपल्याकडे विकसित झालेले नाहीत. त्यामुळे अजून बेरोजगारी समस्या सुरू च आहे.
कोरोना नंतरच्या भारतात बदलाचे वारे वाहू लागलेत खरे. याला लॉकडाऊन मध्ये आपल्या सगळ्यांनीच झालेली पंचायत कारणीभूत आहे. त्यामुळे पालेभाजी पासून ते हॉटेलचा पार्सल पर्यंत सगळ्यातच नव्या पिढीला व्यवसाय बिजनेस दिसून आलेला आहे.

गाव असो की शहर जे दिसेल आवडेल त्या सर्व क्षेत्रात जो तो आपलं डोकं लावून, स्वतःचा व्यवसाय टाकतोय किंवा वाढवतोय.या सगळ्यांनाच मार्गदर्शनपर हा ब्लॉग लिहितोय.

मनात कितीही जिद्द कष्ट करायची तयारी वेगवेगळ्या बिजनेस आयडिया प्लॅन असले तरीही पैशाशिवाय काही साध्य होऊ शकत नाही. ते म्हणतात ना “पैशाचं सोंग करता येत नाही”. त्यावेळी उद्योग धंदा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज हाच एकमेव पैसा उभा करण्याचा मार्ग असतो.

अशावेळी घाई गडबड न करता व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी, कर्ज कसे घ्यावे? त्यासाठी कोणत्या अटी असतात?कुठली कागदपत्रे लागतात? याची संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे असते. नाहीतर “आगीतून फुफाट्यात उडी” अशी गत होऊन बसते.

कर्जाचे प्रकार कोणते आहेत? | Types Of Loan

Loan Information In Marathi

business loan information in marathi
image credit- freepil.com

व्यवसायिक कर्जाचे दोन प्रकार पडतात.

1) सुरक्षित कर्ज (Secured Loan):

पहिल्या प्रकारातील कर्जाला आपण ‘तारण कर्ज’ असेही म्हणू शकतो. कारण ते सुरक्षित कर्ज आहे. आपण एखादी गोष्ट बँकेकडे गहाण ठेवली तरच दिले जाते. प्रत्येक छोटी किंवा नुकतीच सुरू झालेली बँक ही अशा प्रकारची कर्ज देण्यात जास्त पसंत करतात.

आपण सोशल मीडियावर अशा अनेक व्हिडिओज किंवा मोटिवेशनल स्टोरीज पाहत असतो; की खिशात एक पैसा नसतानाही आम्ही व्यवसाय सुरू केला. त्याच्यामागे अशा कर्जांचा हातभार असतोच. मात्र फेमस झाल्यावर आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी, काहीच नसता नाही हे रडगाणं गायलं की भारतीय लगेच पागळतो आणि त्याचा धंदा तेजस चालायला लागतो.

यासाठी कोणताही निर्णय घेताना नाण्याच्या दोन बाजू पाहणं खूप गरजेचे असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

2) असुरक्षित कर्ज (Unsecured Loan):

या प्रकारातील कर्ज देण्यामध्ये सगळ्याच बँकांचा फायदा असतो. त्यामुळे याच प्रकारचे कर्ज एन बी एफ सी नॉन फायनान्शिअल बँक आणि नॉन फायनान्शिअल कंपनी देत असतात. याला असुरक्षित प्रकारातील कर्जे असेही म्हणतात.

एखादी व्यक्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 30 हजार ते एक कोटीपर्यंत अशा प्रकारचे कर्ज घेऊ शकते.

बिझनेस लोन व्यवसाय कर्ज कोणाला मिळू शकते?

  1. कोणताही बेरोजगार, रोजगारी, नोकरदार ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.
  2. कंपनीचे मालक.
  3. ज्या कंपन्या प्रायव्हेट लिमिटेड पी व्ही टी डॉट एलटीडी आहेत.
  4. उद्योग व्यवसाय किंवा सेवा क्षेत्रातील कंपन्यांना.
  5. सेवाभावी संस्था एनजीओ नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन.
  6. सहकारी सेवा संस्था को-ऑपरेटिव्ह सोसायटीज.
  7. अनेकांच्या भागीदारीने सुरू असलेले किंवा तशा पद्धतीने कंपन्या सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकत्र असलेले एकंदरीत भागीदार किंवा उत्सुक अशांना ही कर्ज मिळू शकतात.

>>> हे पण वाचा- ऑनलाईन पैसे कसे कमवायचे? १ लाख/ महिना

कर्ज कोणाला दिले जाते? |

Business Loan In Marathi

business loan information in marathi
image credit – freepik.com

१) कर्ज मिळवण्यासाठी काही पात्रता, अटींची पूर्तता करणं गरजेचं असतं. ठरावीक नियम व अटींची पूर्ण करणे गरजेचे आणि महत्त्वाचे असते. त्याच्या नंतरच कर्जासाठीचा विचार केला जातो. त्याच्यात कागदपत्रांचे महत्त्वही येतच.

२) सिबिल स्कोर किंवा ज्याला स्क्रेडिट क्रेडिट स्कोर म्हणतात तो 750 (साडेसातशे) च्या वर असलाच पाहिजे. तो आपल्या पॅन कार्डवर आजवर झालेले व्यवहार किंवा कर्ज यांची परतफेड असतील सर्वांचा विचार करून तयार होतो. तो आधी स्वतः पहावा. अनेक वेबसाईटवर देखील आपण पाहून उपलब्ध करू शकतो.

३) मागील कर्जाच्या थकबाकीच्या डिफॉल्टर असा कोणताही आपल्याला नावावर लेखाजोखा नसावा.

४) तसेच परतफेड करूनही तो दाखवत असेल तर अशा वेळी त्या जुन्या बँकेकडून किंवा त्याच्याकडून कर्ज गेले आहे. त्याच्या त्याची कर्ज फेडलेल्याची पावती एन ओ सी किंवा लोन क्लियर सर्टिफिकेट यासाठी 3 वर्षाचा व्यवसाय वाढीचे कर्ज हे आत्ताच्या व्यवसाय एक वर्ष किंवा त्याहून किती चालतो आहे किंवा चालत आलेला आहे चालत असेल, या सर्वांचा विचार करून दिले जाते.

५) सध्याच्या व्यवसायाची उलाढाल किमान वार्षिक 12 लाख असावी. याबाबत वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे असे नियम असू शकतात ही कमाल किमान अट आम्ही इथे सांगितलेली आहे.

कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे | Business Loan Documents In Marathi

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • बँकेचे खाते विवरण किंवा त्याची माहिती
  • व्यवसाय नोंदणी पुरावा
  • आय टी आर फाईल
  • जमीन मालकी पुरावा

काही सरकारी कर्ज योजना:

  • मुद्रा कर्ज योजना
  • प्रधानमंत्री रोजगार योजना
  • प्रधानमंत्री रोजगार श्रुजन योजना
  • स्टँड अप इंडिया
  • स्टार्ट अप इंडिया

व्यवसाय कर्जाचे आणखीनही काही प्रकार इथे आम्ही देत आहोत.

त्यातील महत्त्वाचा म्हणजे परतफेडवर अवलंबलेला आहेत.

1) मुदत कर्ज टर्म लोन: हे ठराविक काळासाठी दिलं जातं.

2) वर्किंग कॅपिटल कर्ज: हे या प्रकारचे कर्ज व्यावसायिक गरज पूर्ततेसाठी किंवा व्यवसाय वाढीसाठी दिलं जातं त्यालाही वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या अटी असू शकतात.

आमच्या मते नक्की काय केलं पाहिजे?

कोणताही कर्ज घेण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक आपल्याकडे परिपूर्ण आराखडा असलाच पाहिजे. तो वर्तमान, भूतकाळातील अनुभव आणि परिणामी भविष्यातील सर्व गोष्टी. यांचा एकंदरीत लेखाजोखा मांडणारा असायलाच पाहिजे.

लांबच्या काळाचा विचार करूनच मग ह्या सर्व गोष्टींचा आपण निर्णय घेणे गरजेचे राहतात. कारण नव्या व्यवसायातले चढउतार न लक्षात घेता गडबड केली आणि अचानक कोरोनामध्ये जशी स्थिती निर्माण झाली, तस अजून एखादं जर संकट उभे राहिले, तर कर्जाचा हप्ता कसा भरायचा त्यासाठी दुसरा किंवा आधीच तयार असलेला पर्याय काय? या सर्व गोष्टींचा विचार करणं आजकाल महत्त्वाचं ठरत आहे.

या मागची कारणं ही एकंदरीत प्रत्येकाच्या बाबतीतच महत्वाची ठरत आहेत. आजकल व्यवसाय वाढीसाठी किंवा सुरू करण्यासाठी असलेली चढा ओढ आहे. भारतामध्ये दिसत नसली तरी खूप महत्त्वाचे म्हणजे मोठी छुपी स्पर्धा सुरूच असते.

एकाच लोकेशन मध्ये अनेक दुकान आपण पाहतो. तसेच एकाच शहरामध्ये एकाच ठिकाणी आपण बरीच हॉटेल्स पाहतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्पर्धाही असणारच आहे. त्यासाठी आपण खंबीर मनाने उभ राहणं देखील गरजेचेच राहतं.

या सर्व बाबींचा विचार करून आपला व्यवसाय वाढवणं हे देखील महत्त्वाचा आहे. कर्जाला व्याज असतेच, त्यामुळे वेळेवर परतावा होऊन, आपला व्यवसाय वाढणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं.

दूरदृष्टी ठेवून, आपण बँकेच्या कर्ज विभागाला भेट देऊन खूप सारी सखोल माहिती घेणं महत्वाचं असते. मग नंतरच सर्व पैशांची भविष्यातली गणित आखून कर्ज घेणे योग्य ठरतं. शेवटी ‘डर के आगे जीत है’ म्हणत पाण्यात उडी तर मारलीच पाहिजे.

तरीही “सावध ऐका पुढल्या हाका “असं म्हणत आपण स्वतःला शहाणं करूनच एखाद्या पाण्यात उतरणे गरजेचे राहतं. त्यानंतर हिम्मत आणि कष्टाच्या जीवावर नक्कीच आपण किनाऱ्याला लागतो.

त्यातूनच एक मोठे उद्योजक होऊन पुन्हा आपण भविष्यात उभारी घेतोच. पण त्यासाठीच हे पहिलं पाऊल खूप खंबीर आणि गंभीर विचार करून. तसाच सर्वतोपरी शहाणपणाचे सगळीकडचे सगळे ऐकून आणि मार्गदर्शन घेऊन, स्वतः अभ्यास करून घेणं गरजेचं ठरतं.

FAQ:

1) बिजनेस लोन म्हणजे काय?

उत्तर- बिजनेस करण्यासाठी किंवा बिजनेस वाढवण्यासाठी जे कर्ज घेतलं जाते त्याला बिजनेस लोन असते म्हणतात.

२) कर्जाचे प्रकार कोणते आहेत?

उत्तर- सुरक्षित कर्ज आणि असुरक्षित कर्ज

३) बिझनेस लोन व्यवसाय कर्ज कोणाला मिळू शकते?

उत्तर- कोणताही बेरोजगार, रोजगारी, नोकरदार ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे.

४) लोन घेण्यासाठी सिबिल स्कोर किती पाहिजे?

उत्तर- लोन घेण्यासाठी ७५० प्लस सिबिल स्कोर लागतो.

५) कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते?

उत्तर- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, बँकेचे खाते विवरण किंवा त्याची माहिती, व्यवसाय नोंदणी पुरावा, आय टी आर फाईल, जमीन मालकी पुरावा.
 

लेखक – शिवप्रसाद माजगांवकर…

मार्गदर्शक – ऑथोर विपुल खडसे 

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये बिजनेस लोन कसे घेतात? Business loan information in Marathi याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील. 

Share This Post With Your Friend

Leave a Comment