नमस्कार मित्रांनो, ई-मेल मार्केटिंग हे नाव तुम्ही नक्की ऐकलं च असेल. पण खूप लोकांना याबद्दल पूर्ण knowledge नाही. तर Email marketing meaning in Marathi म्हणजेच ई-मेल मार्केटिंग बद्दल संपूर्ण माहिती या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
मित्रांनो, ई-मेल मार्केटिंग एक अशी मार्केटिंग आहे, ज्याकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही. ई-मेल मार्केटिंग पहिल्यापासून चालत आलेली मार्केटिंग आहे.
जस जसा आपला भारत देश डिजिटल कडे वळत आहे तसे तसे सर्व बिजनेस digitally होत आहे. आता जर बिजनेस मध्ये टिकायचं असेल किंवा बिजनेस वाढवायचे असतील तर त्यांना डिजिटली आल्याशिवाय पर्याय नाही.
त्यासाठी सर्व बिजनेस ना त्यांच्या कस्टमर सोबत कनेक्ट करायचं काम हे ई-मेल मार्केटिंग करते. त्यामुळे आपल्या बिजनेस मध्ये ई-मेल मार्कटिंग असणे खूप महत्वाचे आहे.
ई-मेल मार्केटिंग ही traditional marketing आणि digital marketing या दोन्ही मार्केटिंग मध्ये मोडते. कारण जेव्हा digital marketing नव्हती तेव्हा पण कंपनी ई-मेल मार्केटिंग मार्केटिंग करत होते.
पण आता digital चा काळ आहे. सर्व काही digitalize होत आहे. म्हणून ई-मेल मार्केटिंग मध्ये पण digitalization झालं आहे. यामध्ये वेगवेळगे टूल्स आले. त्यामुळे ई-मेल मार्केटिंग करणे अजून च सोपे झाले आणि ई-मेल मार्केटिंग च पूर्ण चित्रच बदलून टाकलं.
या digitalization मुळे ई-मेल मार्केटिंग ला एक वेगळंच रूप मिळालं असं म्हणायला हरकत नाही.
आता ई-मेल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग चा एक मुख्य भाग झाला आहे.
तर मित्रांनो, ई-मेल मार्केटिंग म्हणजे नक्की काय? Email marketing meaning in Marathi हे थोडं सविस्तर बघूया.
Table of Contents
ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय?
Email Marketing Meaning In Marathi
मित्रांनो, मार्केटिंग म्हणजे काय? ई-मेल म्हणजे काय? हे तर आपल्या सर्वाना माहीतच आहे. आपले सर्वांचे Email ID पण असतील. म्हणून जर सोप्या भाषेत सांगायचं झालं एखादी कंपनी आपल्याला त्यांच्या प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल चे मेल पाठवते. या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात.
जी मार्केटिंग ई-मेल द्वारे केली जाते, त्या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग असे म्हणतात. एक commercial message ई-मेल द्वारे पूर्ण ग्रुप मध्ये पाठवणे म्हणजेच ई-मेल मार्केटिंग होय.
उदा. तुम्ही एखाद्या ब्लॉग वेबसाईट वर visit करता, ईकॉमर्स वेबसाईट वर visit करता किंवा बिजनेस वेबसाईट वर visit करता, तेव्हा तुम्हाला ई-मेल तिथे email subscribe म्हणून option दिसते. तसेच जरआपल्याला एखादा product किंवा service घ्यायची असेल तरीपण आपल्याला आपला email register करावा लागतो.
याप्रकारे वेबसाईट वर subscription च बटन दिल असते.
यामुळे जेव्हा एखादा कस्टमर एखाद्या कंपनी च्या वेबसाईट वरून किंवा ईकॉमर्स वेबसाईट वरून प्रॉडक्ट किंवा सर्विस खरेदी करतो, तेव्हा त्याच्याकडून त्याचा मेल id घेतला जातो. त्यानंतर त्या कस्टमर चा मेल त्यांच्या डेटा मध्ये save केला जातो. त्याला ई-मेल लिस्ट असे म्हणतात.
त्यानंतर त्या कस्टमर ला ती कंपनी त्यांच्या दुसऱ्या प्रॉडक्ट चे किंवा सर्विस चे मेल पाठवते. मग तो कस्टमर कायमचा त्या कंपनी सोबत जोडला जातो.
याचा फायदा असा होतो की कंपनी त्या कस्टमर ला त्यांचे नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल ची माहिती ई-मेल मधून पाठवू शकते. आणि जर त्या कस्टमर ला तो प्रॉडक्ट आवडला किंवा ती सर्विस आवडली तर तो तिथूनच खरेदी करेल. यामुळे कंपनी ला extra मार्केटिंग करायची गरज पडत नाही.
जे कस्टमर already कंपनी सोबत ई-मेल मधून जोडले गेले आहेत, त्यांना कंपनी ईमेल पाठवूंनच त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्विस विकू शकते. त्यामुळे ई-मेल मार्केटिंग खूप उपयोगाची असते.
ई-मेल मार्केटिंग मुख्यतः कस्टमर सोबत एक चांगले संबंध बनवण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे कस्टमर चा विश्वास बसतो आणि तो त्या कंपणी चे प्रॉडक्ट खरेदी करतो.
ई-मेल मार्केटिंग टूल च्या मदतीने केली जाते. असे काही टूल्स आहेत ज्याच्यामदतीने एक मेल खूप कस्टमर ला at a time पाठवू शकतो. याबद्दल आपण पुढे बघू.
आता ई-मेल मार्केटिंग चे प्रकार कोणते आहेत ते बघूया.
ई-मेल मार्केटिंग चे प्रकार (Types Of Email Marketing In Marathi)
मित्रांनो, जेव्हा आपण कोणत्यापण ब्लॉग वेबसाईट, बिजनेस वेबसाईट, ईकॉमर्स वेबसाईट वर visit करतो, तेव्हा आपण आपला मेल त्यांच्या subscribe mail च्या button वर क्लिक करून त्यांना देतो. याचे कंपनी चे मुख्यतः दोन च कारण असतात.
एक म्हणजे कंपनी च promotion करणे, branding create करणे, कंपनी च्या नवीन update किंवा offer update असतील त्या ई-मेल द्वारे आपल्यापर्यंत पोहचवणे.
दुसरं कारण म्हणजे त्या वेबसाईट वर ट्रॅफिक generate करणे, lead generate करणे, कंपनी च्या update आपल्यापर्यंत पोहचवणे. या दोन कारणासाठी च कंपनी आपले ई-मेल घेते.
त्यामुळे दोन ई-मेल मार्केटिंग चे दोन प्रकार पडतात.
1) Transactional Email:
जेव्हा आपण ब्लॉग वेबसाईट किंवा एखाद्या कोणत्यापण वेबसाईट वर आपला ई-मेल id देतो. तेव्हा त्यांच्या नवीन पोस्ट किंवा नवीन ऑफर्स आपल्याला दिसतात. म्हणजेच आपण स्वतःहून ते मेल id देतो,कारण आपल्याला पण त्या वेबसाईट च्या पोस्ट किंवा ऑफर पाहिजे असतात.
म्हणजेच कस्टमर जेव्हा कंपनी ला मेल id देतो आणि मग ती कॉमपणी किंवा ब्लॉग वेबसाईट कस्टमर ला त्यांचे मेल पाठवते त्याला transactional email म्हणतात.
2) Direct Email:
जेव्हा आपण ईकॉमर्स वेबसाईट वर किंवा एखाद्या कंपनी च्या सर्व्हिस वेबसाईट वर जातो. त्या वेबसाईट वर वरून जर आपल्याला त्यांचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करायची असेल तर आपल्याला त्या वेबसाईट वर आपलं अकाउंट create करा लागते.
त्यामध्ये कंपनी आपलं नाव, contact नंबर, ई-मेल Id घेते. तेव्हा आपलं अकाउंट create होते मग आणि त्यांची सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट खरेदी करू शकतो. यामध्ये आपण आपल्या मर्जी नुसार मेल दिलेला नसतो. कंपनी डायरेक्ट आपला मेल घेते. उदा. amazon.in, bluehost.in
आपला मेल त्यांच्याकडे घेतल्यावर मग ते आपल्याला ई-मेल मधून त्यांचे नवीन प्रॉडक्ट आणि सर्विसेस बद्दल promotional मेल करतात. यालाच direct email असे म्हणतात.
ई-मेल मार्केटिंग कशी करायची? How To Start Email Marketing In Marathi?
मित्रांनो, जर तुम्हाला ई-मेल मार्केटिंग करायची असेल तर तुमच्याकडे तुमच्या कस्टमर ची किंवा तुमच्या users ची ई-मेल ची लिस्ट पाहिजे. तर ही ई-मेल लिस्ट तुम्ही कशी तयार करणार?
1) Add Email Subscribe Button:
जर तुम्ही एखाद्या ब्लॉग वेबसाईट चे owner असाल किंवा एखाद्या ईकॉमर्स वेबसाईट चे owner असाल तर तुम्ही तुमच्या वेबसाईट वर email subscription चे बटण लावून तुमच्या वेबसाईट वर येणाऱ्या users किंवा customers चे ई-मेल घेऊ शकता.
प्रत्येक users चे मेल id collect करून तुम्ही त्याची एक लिस्ट बनवू शकता.
2) Buy Email List:
मार्केट मध्ये अशा खूप कंपनी आहेत, ज्या ई-मेल लिस्ट provide करतात. तुम्ही त्यांच्याकडून ई-मेल लिस्ट खरेदी करू शकता.
3) Select Service Provider:
जेव्हा तुमच्याकडे मेल लिस्ट आली. त्यानंतर ई-मेल मार्केटिंग ला खरी सुरवात होते. ई-मेल लिस्ट तयार झाल्या नंतर तुम्हाला एक ई-मेल सर्विस provider choose करा लागेल. म्हणजेच अशा काही कंपनी आहेत ज्या ई-मेल मार्केटिंग सर्व्हिस provide करतात. उदा Mailchimp.
4) Account Create:
Mailchimp या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट create करा. यावर तुम्ही फ्री मध्ये ई-मेल मार्केटिंग करू शकता. आणि तुम्हाला ई-मेल मार्केटिंग मधून जर चांगला रिस्पॉन्स आला आणि तुमची ई-मेल लिस्ट पण वाढली तर तुम्ही यांचा upgrade प्लॅन घेऊन ई-मेल मार्केटिंग करू शकता.
4) Select Template & Message:
यावर अकाउंट ओपन करणे खूप easy आहे. त्यानंतर तुम्ही एक template सिलेक्ट करा. खूप टेम्प्लेट अगोदर च दिलेले असतात. तुम्ही तुमच्या मतानुसार टेम्प्लेट निवडू शकता. त्यानंतर त्यामध्ये तुमचा message type करा जो तुम्हाला तुमच्या कस्टमर ला पाठवायचा आहे.
5) Run Campaign:
message लिहिल्यानंतर तुम्हाला तुमची ई-मेल लिस्ट तिथे सबमिट करा लागते. आणि ई-मेल मार्केटिंग campaign रन करा लागेल. यामुळे तुमच्या लिस्ट मध्ये जेवढे काही ई-मेल आहेत त्या सर्वाना mail-chimp मधून at a time ई-मेल पाठवले जातात.
ई-मेल मार्केटिंग चा वापर काय? (Use Of Email Marketing In Marathi)
मित्रांनो, एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्यांचं online presence आहे, अशा सर्वांसाठी ई-मेल मार्केटिंग खूप उपयोगी आहे. म्हणेजच जर एखाद्याची ब्लॉगिंग वेबसाईट असेल, एखाद्याची बिजनेस वेबसाईट किंवा एखाद्याची ईकॉमर्स वेबसाईट असेल त्या सर्वांसाठी ई-मेल मार्कटिंग खूप उपयोगाची आहे.
1) Get Customer Relationship:
ई-मेल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही एक चांगलं नातं निर्माण करू शकता. त्यांना festival च्या दिवशी ई-मेल पाठवून relation build करू शकता. त्यामुळे कस्टमर पण तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमचं एक नातं तयार होते.
2) Send Company Updates & Blog Updates:
ई-मेल मर्केटिंग मुळे तुम्ही तुमच्या कस्टमर ला कंपनी बद्दल च्या रेगुलर update देऊ शकता. जर तुम्ही ब्लॉगिंग करत असणार तर तुमच्या नवीन ब्लॉग ची उपडेट त्यांना ई-मेल मधून देऊ शकता.
3) Understand Customer Behaviour:
जेव्हा तुम्ही ई-मेल मार्केटिंग करता म्हणजेच तुमच्या कस्टमर ला message पटवता त्यांमधून त्यांचा response कसा येतो, त्यांना कोणत्या type चे प्रॉडक्ट किंवा सर्विस आवडतात हे ट्रॅक करू शकता. यामुळे तुम्ही त्या कस्टमर ला आवडणारे प्रॉडक्ट विकू शकता.
4) Professional Targeting:
ई-मेल मार्केटिंग ने कमी खर्चात आणि कमी वेळेमध्ये प्रोफेशनल targeting करू शकता.
5) Website Traffic:
ब्लॉगिंग वेबसाईट साठी तसेच सर्व बिजनेस वेबसाईट साठी ट्रॅफिक खूप महत्वाचे असते. त्यामुळे तुम्ही ई-मेलमार्केटिंग करून तुमच्या वेबसाईट वर ट्राफिक generate करू शकता.
बिजनेस साठी ई-मेल मार्केटिंग चे फायदे कोणते? (Benefits Of Email Marketing For Business?)
- मित्रांनो, ई-मेल मार्केटिंग एक असं मार्केटिंग आहे कि ज्यामुळे तुम्ही खूप लोकांपर्यंत at a time पोहचु शकता. ज्या लोंकाना तुम्ही ओळखत पण नाही फक्त त्यांचे ई-मेल तुमच्याकडे असल्यावर त्यांना पण तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस विकू शकता.
- ई-मेल मार्केटिंग कमी वेळेत आणि कमी खर्चात करता येते.
- ई-मेल मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या बिजनेस साठी lead generate करू शकता.
- ई-मेल मार्केटिंग द्वारे तुम्ही तुमच्या कंपनी च प्रमोशन करू शकता.
- ई-मेल मार्केटिंग करू तुम्ही तुमचा sale increase करू शकता.
- ई-मेल मार्केटिंग करून तुम्ही तुमच्या real customer पर्यंत पोहचु शकता,
- वेबसाईट वर ट्रॅफिक आणून वेबसाईट बूस्ट करू शकता.
- ई-मेल मार्केटिंग ने तुम्ही retargeting करू शकता. एखाद्या कस्टमर ने तुमचा मेल ओपन केला पण प्रॉडक्ट घेतलं नाही तर त्या कस्टमर ला ट्रॅक करून परत त्याला मेल पाठवू शकता.
ई-मेल मार्केटिंग साठी बेस्ट टूल्स (Best Tools Of Email Marketing)
1) Mailchimp:
मित्रांनो, आपण वरती Mailchimp बद्दल बघितलंच आहे. Mailchimp ई-मेल मार्केटिंग साठी एक बेस्ट टूल आहे. हे टूल फ्री मध्ये पण उपलब्द आहे. फ्री मध्ये पण तुम्ही ई-मेल मार्केटिंग करू शकता.
2) GetResponse:
जर ई-मेल मार्केटिंग मध्ये तुम्हाला खूप फीचर्स पाहिजे असतील आणि तुमच्या ग्राहकांना attractive ई-मेल पाठवायचे असतील तर हे टूल सर्वात बेस्ट टूल आहे. मोठं मोठ्या कंपनी या टूल चा ई-मेल मार्केटिंग साठी वापर करतात.
यामध्ये तुम्हाला खूप टेम्प्लेट आणि सर्व पोस्ट schedule बद्दल ची सर्व activity करता येते. हे टूल 30 दिवसासाठी फ्री आहे. त्यानंतर तुम्हाला या टूल चा प्लॅन खरेदी करावा लागतो.
3) CovertKit:
जे ब्लॉगिंग करतात ते जास्तकरून हे टूल वापरतात. यामध्ये पण खूप फीचर्स आहेत ज्याने ब्लॉगिंग च्या update आणि त्यांचे प्रॉडक्ट किंवा services ची चांगली मार्केटिंग करता येते.
या टूल 1000 ई-मेल साठी फ्री मध्ये सर्विस provide करते. जेव्हा तुमची ई-मेल लिस्ट 1000 च्या वर जाईल तेव्हा तुम्हाला या टूल चा upgrade plan खरेदी करावा लागतो.
4) Aweber:
हा ई-मेल मार्केटिंग चा जुना प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये पण तुम्ही चांगल्या प्रकारे ई-मेल मार्केटिंग करू शकता. हे टूल तुमच्या वर्डप्रेस ला जोडलं जाऊ शकते. यामध्ये पण चांगले फीचर्स पाहायला मिळतात.
ई-मेल मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Email Marketing?)
1) Product & Services Sell:
जर तुमचा बिजनेस असेल तर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विसेस ई-मेल मार्केटिंग करून तुमच्या कस्टमर ला विकू शकता.
2) Courses Sell:
तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर तुमच्या users ला पण तुम्ही email marketing करून तुमचे कोर्सेस विकू शकता.
3) Email Marketing Service:
मित्रांनो, असे खूप छोटे – मोठे बिजनेस आहेत ज्यांना ई-मेल मार्केटिंग करता येत नाही. जर तुम्ही ई-मेल मार्केटींग शिकली तर तुम्ही त्यांना ई-मेल मार्केटिंग ची सर्विस देऊ शकता.
खूप freelancer आहेत की ते ई-मेल मार्केटिंग ची सर्विस provide करतात आणि महिन्याला लाखो रुपये कमवतात. त्यालामुळे तुम्ही पण ई-मेल मार्केटिंग शिकून महिन्याला लाखो रुपये कमु शकता.
ई-मेल मार्केटिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
- ई-मेल मार्केटिंग करताना तुमचे ई-मेल प्रोफेशनल असायला पाहिजे.
- कोणतेही scam असणारे ई-मेल करू नये ज्यामुळे कस्टमर तुम्हाला unsubscribe करेल.
- आठवड्यातून 2 किंवा 3 मेल च कस्टमर ला पाठवले पाहिजे. Continue ई-मेल पाठवल्याने कस्टमर irritate होऊ शकतो.
- ई-मेल लिहताना त्यामध्ये 75% प्रॉडक्ट किंवा सर्विस बद्दल माहिती असावी आणि 25% प्रोमोशनल माहिती असावी. ज्याने कस्टमर ला लवकर समजण्यास मदत होईल.
- ई-मेल पाठवायचा time फिक्स असावा. जास्तकरून working hour मधेच मेल पाठवावा.
FAQ:
ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय?
ई-मेल मार्केटिंग चे प्रकार कोणते?
Transactional Email आणि Direct Email
ई-मेल मार्केटिंग चे टूल कोणते?
ई-मेल मार्केटिंग मधून पैसे कसे कमवायचे?
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये ई-मेल मार्केटिंग म्हणजे काय? What is email marketing meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.
पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.