नमस्कार मित्रानो, व्हॉट्सऍप हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग च झाला आहे. आपण सर्वजण व्हाट्सऍप चा रेगुलर वापर करत च असतो. जेवढं आपण हे वापरतो तेवढी आपली privacy पण महत्वाची असते. तर या ब्लॉग मध्ये व्हॅट्सऍप चे नवीन privacy फीचर्स म्हणजेच WhatsApp New Privacy Features In Marathi हे बघणार आहोत.
व्हॅट्सऍप चे मालक मार्क जुबरबर्ग हे नेहमीच त्यांच्या applictaion मध्ये प्रायव्हसी मेंटेन ठेवतात. त्यांच्या वापरकर्त्यांच्या प्रायव्हसी ला काही होऊ नये याची काळजी घेतात. त्यामुळे आपण त्यांचे Facebook, Instagram, Whatsapp सारखे aaplication बिंधासपणे वापरतो.
तसेच आता users च्या डिमांड नुसार whatsapp मध्ये नवीन फीचर्स येणार आहेत. आपल्या सर्वांनाच या नवीन फीचर्स चा चांगला च फायदा होणार आहेत.
या फीचर्स सुपूर्ण माहिती खाली दिली आहे. तुम्ही ती पूर्ण वाचा.
Table of Contents
व्हाट्सऍप चे नवीन फीचर्स |
WhatsApp New Privacy Features In Marathi
WhatsApp आणलंय असं नवं काही…
आपण कितीही प्रयत्न केले तरी इंटरनेटवरील सिक्युरिटी सुरक्षा आणि प्रायव्हसी गुप्तता याबद्दलची भीती मनातून जात नाही. कारण कोणतेही ॲप डाऊनलोड केल्यावर, त्यांना पाहिजे ते अलाव (allow) करूनच मग ते इन्स्टॉल होतात. म्हणजे वापरण्याआधीच बऱ्याच गोष्टी ते आपल्याकडून काढून घेतात. असं म्हणायला काही हरकत नाही.
तरीही रोज प्रत्येक क्षणाक्षणाला उपयोगी पडणारे, whatsapp याबद्दलची बरीच सुरक्षितता बाळगून आहे. त्यामुळेच आपण सगळे त्यांचा जास्तीत जास्त वापर करतो. हे असून देखील या काळाच्या ओघात बदलणाऱ्या असंख्य टेक्नॉलॉजीना शह देण्यासाठी आणि मन की बात और भी महफूज अशा पद्धतीने ठेवण्यासाठी, आणखीन काही नवीन गुणवैशिष्ट्यांसह (features) व्हाट्सअँप आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये नव्या रंगात आणि नव्या ढंगात भेटणार आहे.
मेटा Meta ज्या कंपनीने आता व्हाट्सअप विकत घेतले. त्याचे मालक मार्ग झुकरबर्ग यांच्या बद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, जास्तीत जास्त गुप्तता व गोपनीयतेकडे वाटचाल करण्यासाठी, ही फीचर्स आणणे जरुरीचे होतं. यानेच वापरकर्त्यांना आपल्या वैयक्तिक बाबतीत सुरक्षिततेची जास्त हमी प्राप्त होईल. तसेच अजून बिनधास्त मेसेजिंग चॅट करता येणे शक्य होणार आहे.
सायलेंट ग्रुप एक्झिट | Leave Group Silently
Whatapp New Feature
यातील एक नवीन फीचर्स आपल्याला ग्रुप सोडताना कोणालाच काही न कळण्याचं अभय देणार आहे.
यामुळे जिथे आपल्याला ऍड करायला नको तिथे केल्यावर आणि आता सोडताही येत नाही अशी परिस्थिती झाल्यावर, आपण तो ग्रुप चुपचापपणे ताकास तूक खबर न लागता सोडू शकतो. म्हणजे सायलेंट ग्रुप एक्झिट ह्या फीचर्सने आपण कोणालाही न सांगता किंवा आपण जिथे लेफ्ट होऊ शकत नाही, तिथं कोणास न सांगता राम राम ठोकू शकतो.
अशा पद्धतीची परिस्थिती किंवा पंचायत बऱ्याचदा पाहुणे मंडळींच्या ग्रुपमध्ये होते. तसेच नको असलेली माणसं सतत एखाद्या ग्रुप वर मेसेज करून सतवायला लागल्यावर, ग्रुप सोडूनही जाता येत नाही. अशी परिस्थिती उद्भवणार नाही. एक नोकरी सोडून दुसरी पकडल्यावर आधीचे घालवत नाहीत आणि उगाच हाय बाय विचारून डोकं खातात.
अशावेळी फक्त ॲडमिनच्या लक्षात येईल की तुम्ही ग्रुप सोडलाय. बाकीच्यांना काहीच खबर होणार नाही. त्याचबरोबर सोनू, बाबू, स्वीटू, जानू यांनी तयार केलेल्या ग्रुपवर देखील, ब्रेक-अप झाल्यानंतर आधी कुणी ग्रुप सोडायचं किंवा लेफ्ट व्हायचं असा प्रश्न उद्भवणार नाही. कोणास न कळता आपण शांत पद्धतीने तो ग्रुप सोडू शकतो. या कानाचा त्या कानाला न कळता, आपण ग्रुप सोडू शकतो.
एडमिन सोडून बाकीच्यांना तुम्ही ग्रुप सोडल्यावर कळणारच नाही. म्हणजेच बाकीच्यांनी तुमच्या ग्रुप सोडण्यावर उगाच नजरा उंचावणं ह्या फीचर्सने बंद होईल.
ऑनलाईन सीन लपवणे | Hide Online Seen
यापुढे जाऊन आपण ऑनलाइन आहोत की नाही हे कोणाला माहिती पडू द्यायचं हेही आपण ठरवू शकणार आहोत. आपण ज्यांना ऑनलाईन आहोत ही कळावं त्यांनाच निवडून, ते पाहतील अशी आता सोय लावू शकतो. चला यामुळे मेसेज येऊन रिप्लाय दिला नाही. दुर्लक्ष केलं का avoid केलं अशी परिस्थिती किंवा प्रश्न विचारणाऱ्यांची तोंड आपल्याला गप्प करता येतील. अशी तगादा लावणारी मंडळी आपण शांत करू शकू.
आपल्याला ज्यांना आपण ऑनलाईन आहोत हे दिसावं असं वाटतंय, किंवा आपण ज्यांना ठेवून त्यांना आपलं ऑनलाईन येणं जाणं कळेल असं नियोजन ही करता येईल.
सुट्टी घेतलेली दिवशी कोणाला कोणाचा मेसेज आला आणि आपण ऑनलाईन असलो तरी त्याला कळणार नाही की, आपण ऑनलाइन आहोत की नाही ते. म्हणजे बरीच कारण न देता आपण शांत पद्धतीने आपलं व्हाट्सअप जास्त वैयक्तिकरित्या डोक्याला ताप न देता खूप सुरक्षित आणि गुप्त पद्धतीने वापरू शकतो.
स्क्रीनशॉट ब्लॉक | Screenshot Block
यापुढेही जाऊन सगळ्यात भारी म्हणजे आता स्क्रीनशॉट घेण्यापासून एखाद्याला ब्लॉक करू शकणार आहोत.
आपण बऱ्याचदा छोट्या मोठी भांडणं लढाई यामध्ये आपण व्हाट्सअप चाटचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून म्हणून फार काळ घेऊ शकणार नाही.
आपण एखाद्याला पाठवलेले व्हिडिओ मेसेज मिळाल्यानंतर, त्यांनी उघडली की तो एकदाच पाहील आणि ते काही काळाने नाहीसे होतील. अशी व्यवस्था लावू शकतो म्हणजे स्क्रीन शॉट घेण्याची मुभा त्याला होती. हे असलेलं view ones मेसेजेस या फीचर्सचं पुढचं व्हर्जन म्हणता येईल.
कारण एकदा पाहिलेला मेसेज उघडला की तो काही काळानं जाऊ शकत होता. पण तो स्क्रीनशॉट काढून त्याचबरोबर मेसेजेस डॉक्युमेंट हे सगळं पाहिलं जात असायचं आणि काही वेळानं ते पाहिल्यानंतर नाहीसा व्हायचं. पण आता त्याची स्क्रीन शॉट देखील घेण शक्य होणार नाही. कारण स्क्रीनशॉट ब्लॉकिंग ह्या नवीन फीचर्स मुळे आपण एखाद्याला स्क्रीनशॉट घेण्यापासून अडवू शकतो. त्याला ब्लॉक ही करू शकतो. बंद करू शकतो.
म्हणजे गुप्तताही खूपच वाढेल आणि आपणही निश्चिंत म्हणून व्हाट्सअप वापरू शकतो. कोणाचीही भीतीने बाळगता ही सर्व फीचर्स ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला भेटीस येतील. मग हवे त्यांना पाहिजेल ते मेसेजेस करून इतरांना न दुखावता मनमोकळ्या पद्धतीने जास्त सुरक्षेसह आपण व्हाट्सअप ला हाताळू शकतो.
>>> हे पण वाचा – फ्रीलान्सिंग मधून १ लाख/ महिना कसा कमवायचा?
यातून इतकच काय ते म्हणावं लागेल की, वेगाने बदलणाऱ्या ह्या डिजिटल युगात व्हाट्सअप स्वतःला सुरक्षा आणि संरक्षण ह्या बाबतीत सर्वोत्तम करत त्याच्या वापरकर्त्यांच्या जास्तीत जास्त पसंतीला उतरत चाललेला आहे.
यामुळेच की काय जगातील एकमेवाद्वितीय ॲप म्हणून व्हाट्सअप टिकले आहे . यात सर्व त्याच्या ह्या अशा सर्वोत्तम व कमालीच्या वारंवार नवीन सुरक्षीततांसह देण्यात येणाऱ्या सुधारित आवृत्ती मिळत जाण्यानेच. यात काहीच शंका नाही हे WhatsApp आपल्याला पदोपदी दाखवून देत आहे.
शिवप्रसाद माजगांवकर…
FAQ:
1) व्हाट्सऍप ने किती फीचर्स लॉन्च केले आहेत?
2) व्हाट्सऍप च सायलेंट ग्रुप एक्सिट फिचर काय आहे?
3) व्हाट्सऍप च हाईड ऑनलाईन सीन फिचर काय आहे?
निष्कर्ष :
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये व्हाट्सऍप चे नवीन फीचर्स म्हणेजच WhatsApp New Privacy Features In Marathi याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.