नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला तुमचा ब्लॉग चांगला सेटअप करणे गरजेचं असते. फ्री मध्ये ब्लॉग कसा तयार करावा? ब्लॉग पोस्ट कशी तयार करावी आणि ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
मित्रांनो ब्लॉगिंग करणे हे के करिअर च बनलं आहे. कारण ब्लॉगिंग मधून तुम्ही पण पैसे कमवू शकता. जॉब मधून जास्त पैसे मिळत नाही,त्यामुळे अनेकजन जास्तीचा पैसा कमविण्यासाठी धडपड करत असतात. सर्वाना च वाटत असते आपण एक्सट्रा इनकम कशी करू शकतो किंवा आपण एखादा बिजनेस कसा स्टार्ट करू शकतॊ.
तर मित्रांनो ब्लॉगिंग मधून चांगली इनकम करू शकता, तसेच ब्लॉगिंग ला तुम्ही करिअर म्हणून सुध्दा निवडू शकता. खूप लोक ब्लॉगिंग ला बिजनेस म्हणून करत आहेत, कारण जसे वेगवेगळे बिजनेस असतात तसाच ब्लॉगिंग हा एक सुध्दा बिजनेस आहे. तुम्ही जर ब्लॉगिंग ला बिजनेस म्हणून जर केले तर तुम्ही जॉब पेक्षा जास्त पैसे देखील कमवू शकता.
तर हे ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे नक्की काय आहे? आम्ही खालील ब्लॉग मध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून ब्लॉग आणि ब्लॉगिंग बद्दल सर्व माहिती मिळवू शकता.
>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
तरी मी तुम्हाला ब्लॉग आणि ब्लॉगिंग बद्दल थोडक्यात माहिती देतो.
Table of Contents
ब्लॉग म्हणजे काय?
What Is Blog In Marathi?
पहिले लोक त्यांचे विचार, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या कलांबद्दल माहिती ही डायरी मध्ये किंवा वही मध्ये लिहून ठेवत. पण आता इंटरनेट चा काळ आहे. लोक इंटरनेटद्वारे एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट करत आहेत. त्यांचे विचार लोकांसोबत सोबत इंटरनेटद्वारे शेअर करत आहेत.
तर ब्लॉग म्हणजे तुमचे विचार, तुमचे छंद, तुमचे स्किल याबद्दल ची माहिती लिहून इंटरनेट वर प्रकाशित करणे. उदा. जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि तुम्ही तुमचे ते विचार हे लोकांसमोर इंटरनेटद्वारे मांडणे याला ब्लॉग असे म्हणतात.
तुम्ही ब्लॉग कोणत्या पण विषयावर लिहू शकता. फक्त तुम्हाला त्यामधले knowledge असायला हवं. जर तुम्हाला त्या विषयातल चांगल knowledge आहे आणि तुम्हाला लिहायला पण आवडते तर तुम्ही ब्लॉग लिहू शकता आणि एक चांगले ब्लॉगर बनू शकता.
ब्लॉगर म्हणजे काय?
Blogger In Marathi
जर कोणी कथा, नाट्य, लेख, साहित्य, संग्रह हे लिहतअसेल तर आपण त्याला रायटर असे म्हणतो.
तसेच, ब्लॉगर म्हणजे जो व्यक्ती ब्लॉग लिहतो त्याला ब्लॉगर असे म्हणतात.
उदा.जर तुम्हाला खेळाची आवड आहे, कूकिंग ची आवड आहे, ट्रॅव्हल ची आवड आहे किंवा टेक्नॉलॉजी ची आवड आहे तर तुम्ही त्याबद्दल ब्लॉग लिहू शकता.
ब्लॉगिंग म्हणजे काय? What Is Blogging In Marathi?
मित्रांनो तुम्ही हल्लीकडे ब्लॉगिंग हे नाव ऐकलंच असेल. ब्लॉगिंग तर अगोदर पासून च लोक करत होते. पण कोविड-19 ह्या विषाणूमुळे ३-४ महिन्यांचा लॉकडाऊन पडला. सगळे बिजनेस इंटरनेट वर आले.
कोविड-19 या virus मुळे लोकांना ऑनलाईन ची गरज समजली. त्यामुळे पूर्ण जग खूप फास्टली डिजिटल कडे वळत आहे. या डिजिटल च्या काळात लोकांना ऑनलाईन पैसे कमवणे जास्त secure वाटत आहे. त्यामुळे आता लोक ब्लॉगिंग करत आहेत.
ही माहिती तुम्हाला यासाठी सांगितली मी की लोक ब्लॉगिंग का करत आहेत.
वरती आपण ब्लॉग म्हणजे काय हे बघतील. तर ब्लॉगिंग म्हणजे आपण जे ब्लॉग लिहतो . ते ब्लॉग इंटरनेट आपल्याला प्रकाशित करायला लागतात. ब्लॉग लिह्ण्यापासून ते ब्लॉग प्रकशित करेपर्यंत आपल्याला आपल्या वेबसाईट वर आणि त्या ब्लॉग वर काही क्रिया करा लागतात. त्याला च ब्लॉगिंग असे म्हणतात.
ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
जर तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल तर niche निवडणे सर्वात महत्वाचे आहे. तर niche म्हणजे काय ते बघूया. ब्लॉगिंग मध्ये विषय (Niche) निवडणे ही पहिली स्टेप असते. तर चला बघूया niche म्हणजे नक्की काय?
विषय (Niche) म्हणजे काय? What Is Niche In Marathi?
निश (Niche) म्हणजे ज्या टॉपिक वर ब्लॉग लिहले जातात त्या टॉपिक ला niche असे म्हणतात. तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या गोष्टीवर जर तुम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात केली तर त्याला विषयाला niche असे म्हणतात.
मित्रांनो ब्लॉगिंग सुरु करण्याअगोदर तुम्ही तुमची niche सिलेक्ट करणे महत्वाचे असते.
निश (Niche) ची काही उदाहरणे खालीलप्रमाणे:
- ट्रॅव्हल
- फॅशन
- न्यूज
- एंटरटेनमेंट
- कूकिंग
- टेक्नॉलॉजी
- स्पोर्ट्स
- फिटनेस
- एडुकेशन
- हेल्थ
- फिल्म
यांसारखे अनेक विषय आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडणाऱ्या किंवा तुमच्या स्किल नुसार niche सेलेक्ट करू शकता.
तुम्ही तुमच्या आवडीचं niche निवडल्यावर त्यावर किती ट्रॅफिक आहे, म्हणजेच किती लोक त्यावर गूगल वर सर्च करत असतात ते पण समजण गरजेचं आहे. यालाच कीवर्ड रिसर्च असे पण म्हणतात.
जर कारण तुम्ही लिहलेल्या ब्लॉग वर ट्रॅफिक नसेल तर तो ब्लॉग लिहून काही फायदा होत नाही. म्हणजेच तुम्ही त्या ब्लॉग वरून पैसे कमवू शकत नाही.
तर मित्रांनो, तुम्ही निवडलेल्या विषयावर ट्रॅफिक आहे की नाही ते कस बघायचं? असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर आता मी तुम्हाला त्याबद्दल सांगतो.
कीवर्ड म्हणजे काय? कीवर्ड कसे शोधायचे?
कीवर्ड म्हणजे तुम्ही ज्या निश (niche) ब्लॉग लिहता त्यामधला एक टॉपिक. उदा.जर तुमची niche डिजिटल मार्केटिंग संबंधित असेल तर डिजिटल मार्केटिंग जेव्हढे काही टॉपिक येतात ते म्हणजे तुमचे कीवर्ड.
उदा. What is digital marketing? digital marketing strategy? how to do digital marketing? best digital marketing tool.
हे तुमचे कीवर्ड असतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही जे जे गूगल वर सर्च करता, त्याला कीवर्ड असे म्हणतात.
कीवर्ड रिसर्च चे काही टूल्स आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकता.
- Google Keyword Planner
- Ubersuggest
- Shemrush
- Ahref
यामधून कोणते पण टूल वापरून तुम्ही कीवर्ड शोधू शकता. कीवर्ड शोधतांनी काही गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. कीवर्ड असा शोधायचा किंवा घ्यायचा की ज्याचा volume जास्त असेल (१००० च्या वरती) आणि SEO difficulty कमी असेल. जर तुम्ही नवीन असाल तर ३० च्या आत SEO difficulty असणारे कीवर्ड च choose करा.
कारण तुमचा नवीन ब्लॉग कीवर्ड difficulty कमी असल्यामुळे गूगल वर रँक होण्याची शक्यता जास्त असते.
वरील इमेज मध्ये Ubersuggest टूल वापरून कीवर्ड रिसर्च केला आहे. वरील इमेज मध्ये सर्च volume आणि SEO difficulty दाखवली आहे. याप्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लॉग साठी कीवर्ड रिसर्च करू शकता.
ब्लॉग सुरु करण्यासाठी पहिले वरील सर्व गोष्टी करणे महत्वाचे आहे. वरील गोष्टी झाल्यावर आता तुंम्ही ब्लॉग तयार करू शकता. आता आपण बघूया फ्री ब्लॉग कसा तयार करावा?
फ्री ब्लॉग कसा तयार करावा? How To Create Free Blog?
मित्रांनो ब्लॉग तयार दोन पद्धती आहेत. तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग करू शकता आणि वेबसाईट विकत घेऊन त्यावर ब्लॉग बनवू शकता. ब्लॉगिंग चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. ते खालील प्रमाणे.
जर तुम्हाला फ्री मध्ये ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्ही blogger.com वर बनवू शकता. ब्लॉगर हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे फ्री मध्ये वेबसाईट बनवायचं. कारण ब्लॉगर हे प्लॅटफॉर्म स्वतः गूगल provide करते. म्हणजे ब्लॉगर हे गूगल ने बनवलं आहे ज्याला फ्री मध्ये ब्लॉगिंग करायची आहे त्यांच्यासाठी.
ब्लॉगर हा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला डोमेन आणि होस्टिंग मोफत मिळते.
डोमेन म्हणजेआपल्या वेबसाईट च नाव. उदा. digitalvipulk.com, digitalstarx.com.
होस्टिंग म्हणजेआपल्या वेबसाईट ला इंटरनेट वर स्टोर करणारी जागा.
ब्लॉगर वर तुम्हाला वेबसाईट फ्री provide केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमचा ब्लॉग फ्री मध्ये बनवू शकता.
पण ब्लॉगर मध्ये लिमिट्स आहेत. तुम्हाला तुमच्या ब्लॉग चा बरोबर SEO करता येत नाही. तुमची वेबसाईट रँक होण्यासाठी वेळ लागतो. जर तुमच्याकडे डोमेन आणि होस्टिंग घेण्यासाठी थोडेफार पैसे असतील तर तुम्ही bluehost.in वर जाऊन खरेदी करू शकता. आणि त्यामध्ये वर्डप्रेस install करू शकता.
WordPress हे एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला यामध्ये सर्व गोष्टी provide केल्या जातात. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे वेबसाईट डिझाईन करून रँक करू शकता. जर तुम्हाला ब्लॉगिंग मधून लवकर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही wordPress वर वेबसाईट बनवा.
पण जर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये नवीन असणार तर तुम्ही ब्लॉगर वर वेबसाईट बनवा. यामध्ये पैसे कमवायला थोडा वेळ लागेल पण तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. तुम्हाला ब्लॉगिंग बदल सर्व गोष्टी समजतील. तुम्हाला ब्लॉगर वर पण गूगल च ऍडसेन्स मिळते आणि त्यामधून तुम्ही Earning चालू करू शकता.
म्हणून तुम्ही सुरुवातीला ब्लॉगर वर च वेबसाईट बनवून ब्लॉग लिहणे चालू करा.
तर चला मित्रांनो आता आपण बघूया ब्लॉगर वर फ्री ब्लॉग कसा तयार करावा?
फ्री ब्लॉग कसा तयार करावा?
मित्रांनो ब्लॉगर वर फ्री मध्ये वेबसाईट तयार करण्यासाठी खालील स्टेप पूर्ण करा.
स्टेप १) गूगल वर blogger.com सर्च करा.
सर्च केल्यावर खालील window ओपन होईल.
इमेज मध्ये दाखवलेल्या पहिल्या लिंक वर क्लिक करा.
स्टेप २) ब्लॉग create करणे.
खाली इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे create your blog वर क्लिक करा.
स्टेप ३) Login करा.
तुमच्यासमोर खालील window ओपन होईल. त्यांनतर तुम्ही तुमचा ई-मेल id टाकून login करा.
वरील इमेज मध्ये दाखवल्या प्रमाणे ई-मेल id टाकून आणि पासवर्ड टाकून नेक्स्ट बटन वर क्लिक करा. Next बटन वर क्लिक केल्यावर तुमचं successfully लॉगिन होईल आणि खालील विंडो दिसेल.
यानंतर तुम्ही Done या बटन वर क्लिक करा.
स्टेप ४) Birthdate टाका.
तिसरी स्टेप पूर्ण केल्यांनतर तुमच्या समोर खालील window ओपन होईल. त्यामध्ये तुम्ही तुमची birthdate टाकून save बटन वर क्लिक करा.
स्टेप ५) ब्लॉग सेटअप करा.
चौथी स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खालील विंडो दिसेल. त्यामध्ये तुम्हला तुमच्या ब्लॉग च नाव द्यायचं आहे.
- तुम्ही कोणत्या विषयावर ब्लॉग लिहिणार आहात त्यावरून तुम्ही त्या पूर्ण ब्लॉग ला योग्य असेल ते Title दया.
- SEO साठी हे खूप महत्व्याचे असते.
- Title bar मध्ये Title लिहा आणि NEXT या बटनावर click करा.
स्टेप ६) योग्य URL देणे.
NEXT वर click केल्यावर URL ची window open होईल.
तुम्ही तुमच्या niche नुसार URL च नाव द्यायचं आहे. मी एक उदाहरण म्हणून clearskinmarathi असं नाव दिल आहे. तुम्हाला तुमच्या वेबसाईट च नाव काय ठेवायचं आहे त्यानुसार च URL टाका.
जर तुम्हाला Title मध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही Prev हा बटनावर click करून Title page वर जाऊ शकता.
- URL म्हणजे तुमच्या ब्लॉग Address चा असतो.
- शक्यतो URL हा तुमचा ब्लॉग Title असावे कारण ते तुमच्या ब्लॉग संबंधीत असते.
- Address bar मध्ये तुमचा URL टाका. URL च्या शेवटी. blogspot.com हे extension लागत.
स्टेप ७) डिस्प्ले नाव टाकणे.
- NEXT वर click केल्यावर display name ची window open होईल.
- जे तुमचे लेख वाचणार आहेत त्यांना कोणत्या नावाने तुम्ही ओळख करून देणार आहेत ते नाव येथे लिहा.
- FINISH या बटनावर click करा.
स्टेप ) वेबसाईट तयार झाली.
या सर्व स्टेप पूर्ण केल्यावर तुमची वेबसाईट तयार झाली आहे.
आता तुमची वेबसाईट पूर्णपणे तयार झाली आहे. आता तुम्हाला त्या वेबसाईट वर पोस्ट लिहणे चालू करा लागेल. तर चला पोस्ट कशी लिहायची ते बघूया.
ब्लॉग पोस्ट कशी तयार करायची?
स्टेप १) पोस्ट तयार करणे.
- नवीन पोस्ट तयार करण्यासाठी new post वर click करा.
- New post वर click केल्यावर post edit विंडो open होईल.
- फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे Title bar मध्ये तुमचा कीवर्ड/blog title लिहा.
- ब्लॉग/लेख bar मध्ये तुम्ही तुमचा पूर्ण लेख लिहू शकता.
- Tool bar चा उपयोग करून तुम्ही ब्लॉग मधी व्हिडिओ, फोटो, font-size, type, इत्यादी add करू शकता.
- Preview बटनावर click केल्यावर तुम्ही तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.
- Preview बरोबर असेल तर तुम्ही पोस्ट Publish करू शकता. Publish करण्यासाठी Publish ह्या बटनावर click करा.
- Post settings मधी जाऊन तुम्ही location, target keyword, इत्यादी बदल करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पोस्ट Publish करू शकता. आणि ह्याच स्टेप follow करून तुम्ही अजून पोस्ट Publish करू शकता.
स्टेप २) Theme बदलणे.
- Theme बदलण्यासाठी Theme ह्या बटनावर क्लिक करा.
- Theme बटनावर click केल्यावर Theme विंडो open होईल.
- तुमच्या ब्लॉग ला अनुसरून तुम्ही Theme निवडा.
- Apply वर Click करा. Apply बटनावर click केल्यावर Applied successfully च notification येईल.
स्टेप ३) नवीन Page तयार करा.
- मित्रांनो वेबसाईट मध्ये pages तयार करणे खूप महत्वाचे असते. About us, Disclaimer, Privacy Policy, Terms & Condition हे pages आपल्या वेबसाईट मध्ये असल्यावर च गूगल ऍडसेन्स approve करते.
- त्यामुळे जर तुम्हाला ऍडसेन्स पाहिजे असेल तर तुम्हाला हे pages तुमच्या वेबसाईट मध्ये add करणे महत्वाचे आहे.
- नवीन Page तयार करण्यासाठी Pages ह्या बटनावर क्लिक करा.
- New Page ह्या बटनावर क्लिक करा.
- page ची माहिती लिहा आणि publish करा.
स्टेप ४) Settings/ SEO कसा करायचा.
- SEO हा सर्वात main पार्ट आहे. तुम्ही लिहलेल्या पोस्ट चा SEO केल्याने तुमची वेबसाईट गूगल मध्ये रँक होते.
- settings बटनावर क्लिक करा. settings window open होईल.
A ) Title बदलणे
- Title वर क्लिक करा.
- Title bar मध्ये Title द्या.
- Save ह्या बटनावर क्लिक करा.
B) ऍड description
- Description म्हणजे तुमच्या विषयाची थोडक्यात माहिती देणे. जेणे करून users ला कळेल कि तुमचे ब्लॉग मधी कोणती माहिती असणार आहे.
- Description वर क्लिक करा.
- Description बार मध्ये Description लिहा.
- save ह्या बटनावर क्लिक करा.
C) ब्लॉग भाषा बदलणे.
- ब्लॉग भाषा बदलण्यासाठी blog language वर क्लिक करा.
- आपल्या ब्लॉगची भाषा निवडा आणि त्या भाषे-समोरच्या वर्तुळामध्ये क्लिक करा.
- save ह्या बटनावर क्लिक करा
D) Adult कन्टेन्ट
Adult settings बंद (Off) च ठेवा. आणि कोणताही adult कन्टेन्ट वेबसाईट वर पोस्ट करू नका. कारण गूगल adult कन्टेन्ट वर ऍडसेन्स approve करत नाही.
E) Favicon ऍड करणे.
- Favicon म्हणजे तुमच्या वेबसाईट चा लोगो (logo).
- वेबसाईट वर लोगो असल्यावर ती वेबसाईट प्रोफेशनल दिसते.
- म्हणून तुम्ही पण लोगो ऍड करू शकता.
- Favicon ह्या बटनावर क्लिक करा, जर तुम्ही तुमचा Favicon लोगो बनवला असेल तर तो तुम्ही येथे अपलोड करू शकता. लोगो च्या favicon file ची size १००kb पेक्षा कमी असावी.
- अपलोड करण्यासाठी Step1) Upload file ह्या बटनावर क्लिक करा.
- Step2) save ह्या बटनावर क्लिक करा.
F) Privacy setting
Visible to search engines हि settings चालू (On) करा. जेणे करून कोणी तुमचा ब्लॉग गुगल ला search केला तर त्याला तुमचा ब्लॉग दिसेल.
G) HTTPS
HTTP वरून तुमची Website HTTPS होते. HTTPS add होतो म्हणजे security certificate add होते. तुमची Website secure होते.
H) पब्लिश
- Blog address ह्या setting मध्ये तुम्ही तुमच्या website चा URL बदलू शकता.
- Step1) Blog address ह्या बटनावर क्लिक करा.
- Step2) Blog address bar मध्ये तुम्ही तुमचा नवीन URL लिहा.
- Step3) save ह्या बटनावर क्लिक करा.
I) कमेंट Comment
- फोटो मधी दाखविल्याप्रमाणे comment location – Embedded, who can comment? – users with Google Account, setting करून घ्या.
- comment moderation – Always ह्या setting मुळे तुमच्या ब्लॉग वर ज्या comment येतात त्या पहिल्या तुमच्या Email-id वर येतील. तुम्ही approve केल्याशिवाय त्या comment तुमच्या users ला दिसणार नाही.
- Email-id save करण्यासाठी खालील Step करा.
- Step1) Email moderation request to ह्या बटनावर क्लिक करा.
- Step2) तुमचा Email-id add करा.
- Step3) save ह्या बटनावर क्लिक करा.
- Users ने comment केली तर त्यांना welcome SMS जातो. तो SMS लिहिण्यासाठी ह्या setting चा उपयोग करतात.
- Step1) Comment from message ह्या बटनावर क्लिक करा.
- Step2) तुमचा message लिहा.
- Step3) save ह्या बटनावर क्लिक करा.
J) फॉरमॅट (Formatting)
फोटो मधी दाखविल्याप्रमाणे settings करा.
Time Zone – (GMT+5.30) India Standard Time – Kolkata
K) मेटा टॅग (Meta Tag)
- Meta tag चा उपयोग, जर कोणी तुम्ही मेटा टॅग मधी लिहिलेले keyword गुगल वर search केले तर तुमचे ब्लॉग search result मध्ये येतात.
- Meta tag कीवर्ड लिहिताना google keyword planner चा उपयोग करून ब्लॉग related कीवर्ड लिहा.
- Step1) Enable search description ON करा.
- Step2) search description ह्या बटनावर क्लिक करा.
- Step3) search description bar कीवर्ड लिहा
- Step4) save ह्या बटनावर क्लिक करा.
L) इंडेक्सईंग (Crawler and Indexing)
- google च्या crawler ला तुमची website/ब्लॉग दिसण्यासाठी ही settings खूप महत्व्याची आहे.
- जेव्हा तुम्ही तुमचे ४-५ ब्लॉग पब्लिश कराल त्यानंतरच ही settings करा. कारण तेव्हा google च्या crawler ला समजेल कि तुमची website/ब्लॉग कोणत्या niche चे आहेत. indexing साठी ४-५ ब्लॉग असल्यामुळे indexing पण होईल.
- Crawler ला आपली website दाखविण्यासाठी आपल्याला robot.txt file लागते. त्यासाठी खालील step करा.
- Labnol लिंक वर क्लिक करा.
- Step1) bar मध्ये तुम्ही तुमचा पूर्ण URL लिहा.
- Step2) Generate sitemap वर क्लिक करा.
- Copy केलेला code setting मध्ये save करण्यासाठी खालील step करा.
- Step1) Enable custom robots.txt ON करा.
- Step2) Custom robots.txt ह्या बटनावर क्लिक करा.
- Step3) Custom robots.txt bar मध्ये code copy करा.
- Step4) Save ह्या बटनावर क्लिक करा.
- Enable custom robots header tags ON करा.
- Home page tag ह्या बटनावर क्लिक करा आणि all, noindex, noodp हे option ON करा.
- Archive and search page tag ह्या बटनावर क्लिक करा आणि all, noindex, noodp हे option ON करा.
- Post and page tag ह्या बटनावर क्लिक करा आणि all, noindex, noodp हे option ON करा.
- View Blog
- website/ब्लॉग बघण्यासाठी खालील वर बटनावर क्लिक करा.
अशाप्रकारे तुम्ही एक पोस्ट तयार करू शकता.
ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे?
गूगल ऍडसेन्स हे ब्लॉग मधून पैसे कमवायचं सर्वात चांगले माध्यम आहे. तुम्ही तुमची वेबसाईट गूगल ऍडसेन्स ला पाठवून त्यावर ads लावून पैसे कमवू शकता.
तसेच तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवू शकता.
ब्लॉग/ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर आम्ही ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय? सर्व माहिती या ब्लॉग मध्ये दिली आहे. तुम्ही हा ब्लॉग वाचून पूर्ण माहिती मिळवू शकता.
ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
मित्रांनो तुम्ही पण ब्लॉग बनवायला चालू करा आणि पैसे कमवा.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या लेखात फ्री मध्ये ब्लॉग कसा तयार करावा? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल आपल्या मराठी भाषेतून माहिती हवी असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटत राहतील.
तुम्ही पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास आपल्या मित्रांना पण शेअर करा.
छान माहिती सर
ब्लॉग पोस्ट रँक कशी करावी.
Thank you sir for your comment.
Thank you Sir
अपना ऑनलाइन अकाउंट कैसे सुरक्षित रखे ( फेसबुक जीमेल ट्विटर )
sir apane bahot acche se yah blog me samajaya hai very nice blog aur very useful hai yah blog padhane ke badh bahot logoko bahot fayada hone wala hai.
Thank You, Sanket!
ब्लॉग बद्दल छान माहिती मिळाली
Thanks for your comment!
khup chan mahiti
Thank You for your comment!