नसस्कार मित्रानो, जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग या फिल्ड मध्ये असणार तर तुम्हाला Affiliate marketing meaning in Marathi म्हणजेच अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? हे थोडफार माहित असेलच.
तसेच तुम्ही युट्यूब पण करत असणार तर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग बद्दल थोडफार माहित असेलच. पण जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय हे माहित नसेल तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती मिळेल. त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.
मित्रांनो अफिलिएट मार्केटिंग हा एक बिजनेस आहे. जो तुम्ही part time किंवा full time पण करू शकता. अफिलिएट मार्केटिंग एक अशी टर्म आहे ज्यामधून तुम्ही खूप जास्त पैसे कमवू शकता.
मागील काही वर्षांमध्ये लोक part time अफिलिएट मार्केटिंग करत होते. पण २०2१ च्या शतकामध्ये जवळ जवळ सर्व च बिजनेस ऑनलाईन झाले आहेत आणि काही होत आहेत. ग्राहक सुद्धा ऑनलाईन च खरेदी करत आहेत.
ऑनलाईन विक्री आणि खरेदी च प्रमाण खूप वाढल आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी लोक अफिलिएट मार्केटिंग full time करत आहेत.
कारण आताच च युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे तुम्हाला पण तुमचे बिजनेस ऑनलाईन घेऊन जाणे खूप महत्वाचे आहे. आताच्या काळात डिजिटल मार्केटिंग ची डिमांड खूप वाढल्यामुळे लोक अफिलिएट मार्केटिंग ला एक full time बिजनेस म्हणून करत आहेत आणि लाखों मध्ये महिन्याला पैसे कमवत आहेत.
तर चला मित्रांनो अफिलिएट मार्केटिंग म्हणजे नक्की काय? अफिलिएट मार्केटिंग कशी करायची आणि त्यामधून पैसे कसे कमवायचे ते बघूया.
Table of Contents
अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?
Affiliate Marketing Meaning In Marathi.
अफिलिएट मार्केटिंग म्हणजे एखाद्या कंपनीची वस्तू किंवा सेवा आपण लोकांना घेण्यासाठी सांगणे किंवा जाहिरात करून ती वस्तू किंवा सेवा लोकांना विकणे आणि त्या विकलेल्या प्रॉडक्ट मधून किंवा सेवा मधून आपल्याला काही टक्के कमिशन मिळते,यालाच अफिलिएट मार्केटिंग म्हणतात.
अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रॉडक्ट निवडू शकता आणि तसेच तुम्हाला हवे तेवढे प्रॉडक्ट तुम्ही अफिलिएट करू शकता.
अफिलिएट मार्केटिंग साठी तुम्हाला niche (विषय) निवडणे खूप गरजेचं असते. तुम्ही तुमच्या स्किल प्रमाणे किंवा तुमच्या आवडीनुसार niche सिलेक्ट करू शकता. उदा. health, cooking, digital marketing, game, technology इत्यादी यांसारखे विषय तुम्ही निवडू शकता म्हणजे तुम्ही कोणते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस अफिलिएट करणार आहेत ते ठरवणं महत्वाचे असते.
जर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग मध्ये नवीन असणार तर तुम्ही एकच niche (विषय) निवडा आणि त्यामधलेच प्रॉडक्ट अफिलिएट करा.
एक niche निवडल्याने तुमचा पूर्ण focus त्याच niche वर राहतो आणि त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे त्या विषयी चा अभ्यास करून योग्य पद्धतीने त्या प्रॉडक्ट ची अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या कंपनी चे अफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करून त्यांचे प्रॉडक्ट अफिलिएट करू शकता.
तुम्ही वेबसाईट होस्टिंग, गॅजेट, इलेक्ट्रॉनिक्स, फिटनेस फूड यांसारखे प्रॉडक्ट विकणाऱ्या खूप जास्त कंपनी आहेत तर तुम्ही त्या कंपनी चे अफिलिएट प्रोग्रम जॉईन करून त्यांचे अफिलिएट पार्टनर बनू शकता.
अफिलिएट मार्केटिंग च्या काही वेबसाईट.
- Amazon associates
- Flipkart associate
- Bluehost affiliate
- Go-daddy affiliate
- eBay Partners
- Shopify Affiliate Program
- Clickbank
- Email marketing affiliate
- JVZoo
अफिलिएट मार्केटिंग कशी करतात?
मित्रांनो अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याकडे तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग किंवा युट्यूब चॅनेल असणे आवश्यक आहे. तुम्ही या माध्यमातून च अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
तुम्ही Amazon वरचे प्रॉडक्ट अफिलिएट करू शकता. Amazon, Flipkart, Click-bank यांसारख्या मोठ्या कंपनी मधुन तुम्ही खूप जास्त प्रॉडक्ट अफिलिएट करू शकता.
आजकाल Amazon affiliate चे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. खूप लोक Amazon affiliate प्रोग्राम जॉईन करून Amazon चे प्रॉडक्ट विकत आहेत. आणि त्यामधून लाखों मध्ये पैसे कमवत आहेत.
ऍमेझॉन वर चे प्रॉडक्ट अफिलिएट करायचे तर तुम्हाला Amazon चा अफिलिएट प्रोग्राम जॉईन करा लागतो. त्यामधील काही घटक पुढीलप्रमाणे असतात.
१) अफिलिएट प्रोग्राम (Affiliate Program):
तुम्हाला ऍमेझॉन च्या amazon.com या वेबसाईट वर जाऊन ऍमेझॉन चा अफिलिएट प्रोग्राम जॉईन करा लागेल. ऍमेझॉन चा अफिलिएट प्रोग्रॅम जॉईन केल्यावर च तुम्ही ऍमेझॉन चे अफिलिएट मार्केटिंग चे पार्टनर बनू शकता आणि ऍमेझॉन वरचे प्रॉडक्ट विकू शकता.
२) अफिलिएट ID (Affiliate ID):
जेव्हा तुम्ही ऍमेझॉन चा अफिलिएट प्रोग्राम sign up करता. तेव्हा तुम्हाला एक ID दिला जातो. तो ID वापरुन तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट च्या विक्री बद्दल च्या संबंधित सर्व गोष्टी track करू शकता. ID मुळे तुम्ही किती सेल केला, कोणत्या लिंक वर जास्त क्लिक आले यांसारख्या सर्व गोष्टी ट्रॅक करू शकता.
३) अफिलिएट लिंक (Affiliate Link):
तुम्हाला कोणते पण प्रॉडक्ट सेल करायचे असेल तर तुम्हाला ते तुमच्या वेबसाईट वर किंवा ब्लॉग वर किंवा सोशल मीडिया वर शेअर करा लागते. त्यासाठी तुम्हाला ऍमेझॉन प्रोग्राम जॉईन केल्यावर प्रत्येक प्रॉडक्ट ची लिंक दिली जाते.
जेव्हा तुम्ही ती लिंक शेअर करता तेव्हा तुमचे युझर्स त्या लिंक वर क्लिक करून ते डायरेक्ट ऍमेझॉन च्या वेबसाईट वर जातात आणि तिथून ते प्रॉडक्ट खरेदी करतात. तेव्हा त्या खरेदी केलेल्या प्रॉडक्ट मधून तुम्हाला काही टक्के कमिशन दिले जाते.
४) अफिलिएट मॅनेजर (Affiliate Manager):
अफिलिएट मार्केटिंग करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर त्यासाठी अफिलिएट प्रोग्राम चे मॅनेजर च्या मदतीने ते तुम्ही सोडवू शकता. अफिलिएट मॅनेजर हे काही अफिलिएट प्रोग्राम मध्येच असतात.
५) पेमेंट थ्रेशोल्ड (Payment Threshold):
जेव्हा तुम्ही प्रॉडक्ट विकता म्हणजेच तुमच्या लिंक वरून युझर्स ते प्रॉडक्ट खरेदी करतात तेव्हा च तुम्हाला कमिशन दिले जाते. पेमेंट थ्रेशोल्ड ची किंमत तुमच्या अफिलिएट प्रोग्राम वर डिपेंड असते.
६) कमिशन (Commission):
प्रत्येक अफिलिएट प्रोग्रॅम चे कमिशन हे वेगळे असते. तुम्ही जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस अफिलिएट करत असणार त्याचे प्रत्येकाचे वेगळे कमिशन ठरलेले असते.
काही कमिशन रेकरिंग कमिशन पण असतात. म्हणजेच काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस अश्या असतात त्या एकदा घेतल्यावर परत renew करा लागतात आणि जेव्हा जेव्हा ते रिन्यू केले जाते तेव्हा तेव्हा त्याच कमिशन आपल्याला दिले जाते.
हा अफिलिएट मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा आहे. म्हणजे तुम्ही एकदा ते प्रॉडक्ट विकले तर त्याचे पेमेंट तुम्हाला lifetime मिळत राहते.
७) पेमेंट मोड (Payment Mode):
अफिलिएट मार्केटिंग केल्यावर तुम्हाला जे payment दिले जाते आणि ज्या माध्यमातून दिले जाते त्याला पेमेंट मोड असे म्हणतात. वेगवेगळ्या अफिलिएट प्रोग्रॅम नुसार हे पेमेंट मोड वेगवेगळे असू शकतात. हे payment mode Cheque, wire transfer, Paypal, bank transfer या माध्यमातून केले जाते.
तर मित्रांनो आता आपण हे बघू की ऍमेझॉन अफिलिएट प्रोग्राम कसा जॉईन करतात.
अफिलिएट प्रोग्राम कसा जॉईन करायचा? How To Join Affiliate Program In Marathi?
चला तर आपण amazon affiliate partner कसे बनायचं पाहुयात.
स्टेप १):
पहिले तुम्ही गुगल वर जाऊन search bar मध्ये amazon.in लिहून enter वर click करा. Amazon ची website open होईल. Scroll करून खाली footer section ला या. तुम्हाला इमेज मधी दाखवल्याप्रमाणे become an affiliate ह्या option वर क्लिक करा.
स्टेप २):
Become an affiliate ह्या option वर क्लिक केल्यावर इमेज मधी दाखवल्याप्रमाणे tab open होईल. येथे आपल्याला आपले account तयार करायचे आहे. त्यासाठी sign up ह्या option वर क्लिक करा.
स्टेप ३):
Sign up ह्या option वर क्लिक केल्यावर इमेज मधी दाखवल्याप्रमाणे tab open होईल. येथे तुम्हाला create your amazon account ह्या option वर क्लिक करायचा आहे.
स्टेप ४):
त्यांनतर तुम्हाला खालीलप्रमाणे काही माहिती भरा लागेल.
तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल id, पॅनकार्ड नंबर, तुमच्या वेबसाईट ची लिंक किंवा तुमच्या युट्यूब ची लिंक आणि बँक अकॉउंट नंबर.
हि सर्व माहिती भरल्यावर तुम्हाला त्यांचा एक मेल येईल आणि त्यामद्धे सर्व instruction दिलेले असतील. अशाप्रकारे तुम्ही ऍमेझॉन चा अफिलिएट प्रोग्राम जॉईन करता येईल.
तर मित्रानो हे सर्व केल्यानंतर तुम्हाला हे कळणे महत्वाचे आहे की अफिलिएट मार्केटींग चे मार्ग कोणते आहेत.
अफिलिएट मार्केटिंग चे मार्ग कोणते?
१) वेबसाईट/ब्लॉग वेबसाईट:
मित्रांनो अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुमच्याकडे वेबसाईट असणे किंवा तुमचा स्वतःचा ब्लॉग असणे खूप महत्वाचे असते.तुम्हाला वेबसाईट शिवाय अफिलिएट मार्केटिंग करणे खूप अवघड जाईल.
जवळ जवळ सर्व अफिलिएट मार्केटिंग कडे स्वतःची वेबसाईट असते. त्यामधून ते जास्त प्रमाणात अफिलिएट मार्केटिंग करू शकतात. स्वतःची वेबसाईट असल्यामुळे तुम्ही जास्त प्रॉडक्ट अफिलिएट करू शकता.
तसेच तुम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट चे ब्लॉग लिहून त्यामद्धे तुमच्या प्रॉडक्ट ची अफिलिएट लिंक देऊन आणि त्यांचा योग्य प्रकारे SEO करून गूगल च्या पहिल्या पेज वर रँक करू शकता. मग जेव्हा कोणी त्या प्रॉडक्ट बद्दल सर्च करेल तर तुमची वेबसाईट वरती येईल आणि त्यावर जास्त ट्रॅफिक येईल. त्यामधून तुमच्या प्रॉडक्ट चा चांगल्या प्रकारे सेल होईल.
तसेच तुम्हाला कोणता पण अफिलिएट प्रोग्राम जॉईन करायचा तर तुम्हाला वेबसाईट ची लिंक मेंशन करणे बांधकारक असते. म्हणून मित्रांनो तुम्ही एक वेबसाईट पर्चेस करणे आवश्यक असते.
तुम्ही Bluehost वरून domain आणि hosting म्हणजेच वेबसाईट घेऊ शकता. आम्ही जास्त करून Bluehost ला च recommend करतो. कारण Bluehost चांगली होस्टिंग provide करते. आणि त्यांची सर्व्हिस पण चांगली असते. तर खालील लिंक वर जाऊन तुम्ही वेबसाईट पर्चेस करू शकता.
>>>हे पण वाचा – ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
२) युट्यूब चॅनेल (YouTube Channel):
मित्रांनो जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग मध्ये जास्त सेल करायचा असेल किंवा Full time अफिलिएट मार्केटर बनायचं असेल तर तुम्हाला सर्व सोशल मीडिया चा वापर करणे आवश्यक आहे.
आताच्या काळात सोशल मीडिया चा वापर वाढल्यामुळे तुम्ही सोशल मीडिया मधून पण खूप जास्त प्रमाणात अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
युट्यूब एक असं प्लॅटफॉर्म आहे त्यामधून तुम्ही सर्वात जास्त अफिलिएट मार्केटिंग करून प्रॉडक्ट विकू शकता. युट्यूब वर तुम्ही स्वतःचा चॅनेल बनवा. त्यामध्ये तुमच्या प्रॉडक्ट संबंधीचे विडिओ बनवा किंवा त्या प्रॉडक्ट चे review चे विडिओ अपलोड करा.
रेगुलर विडिओ अपलोड केल्याने तुमचे चांगले subscriber वाढतील आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या विडिओ मध्ये अफिलिएट ची लिंक देणार तेव्हा तुमचे युझर्स त्या लिंक वर क्लिक करून ते प्रॉडक्ट खरेदी करतील. अशाप्रकारे तुम्ही युट्यूब वरून अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
>>>हे देखील वाचा – युट्यूब मधून पैसे कसे कमवायचे?
३) इंस्टाग्राम अकाउंट ( Instagram Account):
मित्रांनो तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या भारतामध्ये पण सोशल मीडिया चा वापर खूप वाढत चालला आहे. त्याचा तुम्ही अफिलिएट मार्केटिंग साठी चांगल्या प्रकारे वापर करू शकता.
तुम्ही इंस्टग्राम च्या अकाउंट वरून पण चांगल्या प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम वर अकाउंट ओपन करा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकॉउंट वर रोज एक ते दोन पोस्ट अपलोड करा लागतील. तेव्हा तुमचे फॉलोवर्स वाढतील.
तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट च्या रिलेटेड पोस्ट करू शकता. पण तुम्हाला पहिले तुमच्या फॉलोवर्स ला चांगली value provide करा लागेल. चांगली information द्या लागेल. तेव्हाच तुमचे फॉलोवर्स वाढतील आणि त्यांचा तुमच्यावर ट्रस्ट निर्माण होईल.
तेव्हा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची अफिलिएट लिंक तुमच्या इंस्टाग्राम च्या Bio मध्ये टाकू शकता आणि तुमच्या युझर्स ना तिथून प्रॉडक्ट खरेदी करायला सांगू शकता.
मित्रांनो असे खूप लोक आहेत जे की फक्त इंस्टाग्राम वरून च लाखों मध्ये पैसे कमवत आहेत. तर मित्रानो तुम्ही सुध्दा इंस्टाग्राम वरून चांगल्या प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमावू शकता.
>>> हे देखील वाचा – इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?
४) फेसबूक अकॉउंट (Facebook Account):
मित्रानो Facebook वरून तुम्ही Instagram प्रमाणे च चांगल्या प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला Facebook च एक पेज बनवा लागेल. त्या पेज वर रेगुलर पोस्ट करा लागतील. तसेच तुमची वेबसाईट असेल किंवा तुमचा ब्लॉग असेल तर तो तुम्ही शेअर करू शकता.
ब्लॉग शेअर केल्याने तुमच्या फॉलोवर्स ला नवीन नवीन ब्लॉग वाचायला मिळतील. त्यामुळे तुमची एक चांगली कॉम्युनिटी तयार होईल. तसेच तुम्ही वेबसाईट च ट्रॅफिक तुमच्या ब्लॉग वर नेऊन तिथून अफिलिएट मार्केटिंग करू शकता. तसेच तुमच्या Facebook पेज वर पण अफिलिएट लिंक देऊन तिथून ते प्रॉडक्ट सेल करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही Facebook वरून पण अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
५) ट्विटर अकॉउंट (Tweeter Account):
मित्रांनो ट्विटर पण खूप जास्त active users आहेत. ट्विटर वरून पण तुम्ही चांगल्या प्रकारे अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
ट्विटर वर तुम्हाला अकॉउंट ओपन करा लागेल. तसेच त्यामध्ये Facebook प्रमाणे च पोस्ट किंवा तुमच्या ब्लॉग च्या पोस्ट शेअर करायच्या. ट्विटर वरच ट्रॅफिक तुमच्या ब्लॉग वर घेऊन जायायच आणि तेथून तुमचे अफिलिएट प्रॉडक्ट सेल करायचे.
या प्रकारे तुम्ही ट्विटर वरून सुद्धा अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
६) गूगल ads (Google Ads):
मित्रांनो वरील सर्व मार्ग ऑरगॅनिक होते. म्हणजे तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी काही पैसे खर्च करा लागत नव्हते. तुम्ही organically ट्रॅफिक जनरेट करून अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
पण google ads एक असा मार्ग आहे त्यामध्ये तुम्हाला पैसे खर्च करा लागतात. तुम्ही गूगल ads करून अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
गूगल ads असा मार्ग आहे ज्यामधून तुम्ही खूप लवकर आणि खूप जास्त प्रमाणात अफिलिएट मार्केटिंग करू शकता. यामध्ये असं नाही की तुम्हाला खूप जास्त पैसे खर्च करा लागतील, तुम्ही तुमच्या बजेट नुसार पैसे लावून ads रन करू शकता.
गूगल ads मुळे तुमचा ब्लॉग किंवा तुमच्या वेबसाईट ला तुम्ही promote करू शकता, लीड जेनरेट करू शकता. आणि त्यामधून खूप जास्त प्रमाणात लीड ला convert करून अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
७) फेसबुक ads (Facebook Ads):
मित्रांनो फेसबुक ads हे Facebook वर आणि Instagram वर रन केल्या जातात. अलीकडे फेसबुक ads ची डिमांड खूप वाढली आहे. प्रत्येक बिजनेसमॅन फेसबुक ads रन करून स्वतःचा बिजनेस वाढवत आहेत.
तर तुम्ही पण फेसबुक ads रन करून तुमचा ब्लॉग किंवा तुमची वेबसाईट promote करू शकता. आणि त्यामधून चांगल्या प्रकारे लीड जेनरेट करू शकता.
अशा प्रकारे तुम्ही फेसबुक ads च्या माध्यमातून तुम्ही खूप लवकरात लवकर अफिलिएट मार्केटिंग करू शकता.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्हाला या ब्लॉग मध्ये अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? What is affiliate marketing meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघीतली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या newsletter ला नक्की subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटतील.
पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.
hi
content is excellent is there any possibility of the same content in audio format?
please confirm
Thank You, Vivek! Yes, It’s possible to create in audio form.