नमस्कार मित्रांनो, ब्लॉगिंग करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किवर्ड. तर किवर्ड म्हणजे काय? Keyword meaning in marathi हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. गूगल काय आहे हे आपल्या सर्वांना माहित च आहे. आता तुम्ही विचार करत असणार की गूगल चा न किवर्ड चा काय संबंध आहे?
गूगल चा आणि किवर्ड चा डायरेक्ट संबंध आहे. हे सर्व आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
जे डिजिटल मार्केटिंग किंवा ब्लॉगर या फिल्ड मध्ये आहेत, त्यांना किवर्ड बद्दल माहित असेल. तसेच तुम्ही काही ब्लॉग मध्ये किवर्ड किंवा किवर्ड रिसर्च असे वर्ड ऐकलेच असतील. तसेच तुम्ही माझ्या वेबसाईट वरील ब्लॉग्स वाचले असतील तर त्यामध्ये पण तुम्हला किवर्ड बद्दल थोडंफार सांगितलं आहे.
पण आता आपण या ब्लॉग मध्ये किवर्ड बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि ज्यांना किवर्ड/ किवर्ड रिसर्च हे माहित नाही हा ब्लॉग तत्यांच्यासाठीच आहे.
मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग वाचत आहेत म्हणजे तुम्हाला ब्लॉगिंग बद्दल जाणून घ्यायच आहे किंवा ब्लॉगिंग करायची आहे. कारण ब्लॉगिंग मध्ये सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे किवर्ड रिसर्च. जर तुम्हाला किवर्ड रिसर्च करणे जमले तर तरच तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.
कारण ब्लॉगिंग हे सर्व किवर्ड रिसर्च वर च डिपेंड करते. त्यामुळे ब्लॉगिंग साठी किवर्ड खूप महत्वाचे असते.
ब्लॉग आणि ब्लॉगिंग बद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचा.
>>>ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
आपण या ब्लॉग मध्ये सविस्तर पणे किवर्ड म्हणजे काय? किवर्ड रिसर्च कसा करायचा? या बद्दल माहितीघेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण वाचा आणि आपला अभिप्राय कळवा.
Table of Contents
किवर्ड म्हणजे काय?
What Is Keyword Meaning In Marathi?
मित्रांनो, मी सर्वात पहिल्या पॅराग्राफ मध्ये गूगल बद्दल बोललो. किवर्ड चा आणि गूगल चा डायरेक्ट संबंध आहे. कारण किवर्ड हे सर्च इंजिन वर शोधले जातात. आणि Google हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.
आपण सर्वजण इंटरनेट काही शोधायचे असेल तर सर्च इंजिन मध्ये म्हणेजच गूगल वर शब्द किंवा वाक्य लिहून शोधतो, तेव्हा त्या शब्द किंवा वाक्य संबंधित माहिती वेब पेज येतात. म्हणजेच जो शब्द किंवा वाक्य आपण गूगल वर असतो त्याला कीवर्ड असे म्हणतात.
किवर्ड हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. ज्याच्या मदतीने आपण गुगल वर रँक शकतो, ब्लॉग लिहिण्यासाठी, SEO साठी, आपल्याला किवर्ड म्हणजे काय हे माहित असणे खूप गरजेचे आहे.
उदा. What is digital marketing in marathi? What is keyword? What is blogging? इत्यादी हे सर्व काही किवर्ड आहेत.
किवर्ड चे प्रकार? Types Of Keyword In Marathi
आपण सर्च इंजिन मध्ये किती शब्द लिहितो त्यावरून त्याचे short tail keyword & long tail keyword असे प्रकार पडले आहेत.
1) लांबीनुसार किवर्ड चे प्रकार
- Short Tail Keyword:
एक किंवा दोन शब्द असेल तर त्या किवर्ड ला short tail keyword असे म्हणतात. नावा प्रमाणेच हा कीवर्ड खूप लहान असतो.
short tail keyword हा सर्च इंजिन मध्ये खूप जास्त प्रमाणात सर्च केला जातो म्हणून हे short tail keyword रँक होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि रँक करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
कारण जुने ब्लॉगर आहेत त्यांनी आधीच short tail keyword वापरून आपले किवर्ड रँक केले आहेत.
नवीन ब्लॉगर ला त्यांना competition करायला अवघड जाते. पण impossible नाही.
Short tail keyword रँक करण्यासाठी तुम्हाला किवर्ड बरोबरच तुम्हाला post length, image, व्हिडिओ, effective content. इत्यादी गोष्टींकडे पण जास्त लक्ष द्यावे लागते.
उदा. Smartphone, digital marketing, shoes इत्यादी.
- Mid Tail Keyword
तीन शब्द असणारे किवर्ड म्हणजे Mid Tail Keyword होय.
ह्या किवर्ड चा search volume हा पेक्षा खूप कमी असतो. पण त्यात SEO Difficulty सुध्दा कमी असते.
उदा. Smartphone under 10000, digital marketing courses, shoes under 2000 इत्यादी.
- Long Tail Keyword
तीन किंवा तीनपेक्षा जास्त शब्द असेल तर त्या किवर्ड ला long tail keyword असे म्हणतात. नावा प्रमाणेच हा किवर्ड खूप मोठा असतो.
Long tail keyword हा सर्च इंजिन मध्ये खूप जास्त प्रमाणात सर्च केला जात नाही म्हणून हे short tail keyword पेक्षा कमी वेळ रँक होण्यासाठी लागतो.
Long tail keyword रँक करण्यासाठी तुम्हाला कीवर्ड बरोबरच तुम्हाला post length, image, व्हिडिओ, effective content. इत्यादी गोष्टींकडे पण लक्ष द्यावे लागते पण जास्त नाही.
उदा. Smartphone under 10000 with the best camera, digital marketing course in Marathi, shoes under 2000 with best quality इत्यादी.
2) ऑन पेज optimization नुसार कीवर्ड चे प्रकार
- प्रायमरी किवर्ड (Primary Keyword)
Primary keyword म्हणजे ज्या किवर्ड मुळे तुमचे पेज रँक होते. त्या किवर्ड ला high search volume असतो त्यामुळे तुमच्या वेबसाइट वर जास्त traffic येते.
Primary keyword हा युसर्स ला टारगेट करणारा असावा. Primary keyword हा permalink, anchor text, headings, आणि पहिल्या किंवा शेवटच्या लाइन मध्ये असावा.
उदा. Buy laptop, best deal, top 10 smartphone इत्यादी.
- सेकंडरी किवर्ड (Secondary Keyword):
Secondary keyword म्हणजे ज्या किवर्ड मुळे primary keyword समजायला अजून सोपे जाते आणि तो किवर्ड primary keyword बद्दल अजून जास्त माहिती देतो.
Secondary keyword किवर्ड ला high search volume नसतो त्यामुळे तुमच्या वेबसाइट वर जास्त traffic येत नाही पण खूप महत्व्याचा असतो. तो LSI किवर्ड असतो.
उदा.The best laptop accessories store near Laptop charger online with the best quality, इत्यादी.
- LSI किवर्ड:
LSI म्हणजे Latent semantic indexing होय. आपल्या किवर्ड चाच समांतर शब्द जो जास्त सर्च केला जातो, आणि त्या किवर्ड ने गूगल ला अधिकाधिक समजला जाते कि तुम्ही काय सर्च करता किंवा तुमचा ब्लॉग कोणत्या विषयावर आहे.
SEO मध्ये LSI किवर्ड खूप महत्वाची भूमिका बजावतात. LSI किवर्ड ने रँक होण्यास खूप मदत होते.
उदा. खालील इमेज मधी दाखविल्याप्रमाणे मी primary keyword हा कीवर्ड शोधात आहे. तर सर्च इंजिन मला त्या किवर्ड रिलेटेड अजून किवर्ड दाखवत आहे. म्हणजे मला primary keyword मधील नक्की काय हवाय हे ह्या LSI किवर्ड च्या मदतीने शोधण्यास मदत होते. आणि योग्य त्या माहिती वर मिळण्यास मदत होते.
किवर्ड रिसर्च म्हणजे काय?
गुगल सर्च इंजिन मध्ये कोणता किवर्ड चा सगळ्यात जास्त वापर केला आहे किंवा तो किवर्ड किती वेळा सर्च (Search Volume) केला आणि त्या किवर्ड वर किती स्पर्धा (SEO Difficulty) आहे हे शोधून काढणे म्हणजे कीवर्ड रिसर्च होय.
जेव्हा आपण ब्लॉग पोस्ट लिहितो तेव्हा किवर्ड रिसर्च करणे खूप महत्त्वाचे आहे. जर त्या किवर्ड वर low search volume किंवा SEO difficulty high असेल तर तो पूर्ण व्यर्थ जाईल आणि रँक होणार नाही.
त्यामुळे किवर्ड रिसर्च करणे खूप गरजेचे आहे. ब्लॉग साठी high traffic असणारा म्हणजेच high search volume & low SEO difficulty असणारा किवर्ड घ्यावा.
किवर्ड रिसर्च कसा करायचा?
आपल्या niche बद्दल खूप सारे किवर्ड खूप आहेत, पण काही ठराविक किवर्ड आहेत की जे किवर्ड जास्तीत जास्त वापरले जात आहेत. म्हणजेच त्यांचा search volume खूप जास्त आहे. तर तो योग्य किवर्ड कसा शोधायचा ते आपण पाहू.
Google, Yahoo, Bing इत्यादी सर्च इंजिन चा वापर सर्च करण्यासाठी केला जातो, पण गुगल या सर्च इंजिन वर सगळ्यात जास्त सर्च केले जाते. त्यामुळे Google keyword planner, Uber suggest यांसारख्या खूप वेबसाइट आहेत त्यावरून आपण किवर्ड रिसर्च करू शकतो.
किवर्ड रिसर्च टूल:
- गूगल कीवर्ड प्लॅनर (Google keyword planner)
- उबेर सजेस्ट (Ubersuggest)
- मोज (MOZ )
- सेमरष SEMrush
- Ahref
गूगल कीवर्ड प्लॅनर (Google keyword planner)
Google keyword planner हे गुगल ने तयार केलेलं टूल आहे. इंटरनेट वर खूप सगळे किवर्ड रिसर्च चे टूल हे paid आहेत,पण Google keyword planner हे फ्री टूल आहे.
Google keyword planner हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे टूल आहे. हे टूल वापरायला सुध्दा खूप सोपे आहे. या टूल मध्ये monthly-yearly किवर्ड डाटा चा सर्च volume पाहू शकतो आणि योग्य तो किवर्ड शोधू शकतो.
- Google keyword planner या लिंक वर क्लिक करा. (https://ads.google.com/aw/keywordplanner/ideas/new?ocid=471617010&euid=401925762&__u=6836381938&uscid=471617010&__c=3210891490&authuser=0)
- फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे तुमचा ब्लॉग किवर्ड type करा आणि get results बटणावर क्लिक करा.
- ज्या देशामधील तुम्हाला search volume शोधायचा आहे तो देश निवडा.
- तुम्ही कोणत्या कालावधी मधील डाटा सर्च करायचा आहे तो कालावधी निवडा.
- त्या किवर्ड संबंधित तुम्हाला त्या कालावधी मध्ये किती वापरकर्तेनी सर्च केलेला तो डाटा भेटेल.
- Keyword ह्या बॉक्स मधी तुमच्या किवर्ड संबंधित दुसरे सर्च केले जाणारे किवर्ड दाखवले आहेत.
- दुसर्या बॉक्स मधी Avg monthly searches म्हणजेच तो किवर्ड महिन्याला किती वेळा सर्च इंजिन मध्ये सर्च केला जातो.
- जेव्हडा जास्त search volume तेवढी जास्त traffic.
- थोडक्यात सांगायचे म्हणजे high search volume आणि low competition असणारा योग्य किवर्ड आहे.
उबेर सजेस्ट (ubersuggest)
ubersuggest ह्या वेबसाइट वरून सुद्धा आपण कीवर्ड रिसर्च करू शकतो. हे टूल नील पटेल बनवलं आहे. ह्या टूल चा उपयोग तुम्ही फ्री आणि paid सुद्धा करू शकता. कीवर्ड रिसर्च आणि competitors च्या वेबसाइट चे कीवर्ड पाहण्यासाठी सुद्धा करू शकता. ह्या टूल मध्ये खूप सारे आहेत त्याचा मदतीने तुम्ही तुमच्या पेज / ब्लॉग चा SEO करू शकता.
- ubersuggest ( https://neilpatel.com/ubersuggest/ ) ह्या लिंक वर क्लिक करा.
- किवर्ड type करा.
- देश आणि भाषा निवडा.
- search बटणावर क्लिक करा.
- search volume आणि SEO Difficulty दाखवली जाईल.
- तसेच खाली स्क्रोल केल्यावर आपल्या कीवर्ड संबंधित कीवर्ड यादी दाखवली जाईल आणि त्याच बरोबर त्या कीवर्ड चा search volume & SEO Difficulty दाखवली जाईल.
- high search volume आणि low competition असणारा योग्य कीवर्ड आहे.
किवर्ड चे महत्व:
आपण वरती किवर्ड म्हणजे काय? आणि किवर्ड रिसर्च कसा करायचा? हे पाहिलं आहे, तर आता आपण बघणार आहोत कि नक्की किवर्ड कशासाठी आणि कुठे वापरले जातात.
- सर्च इंजिन वर माहिती सर्च करण्यासाठी किवर्ड वापरले जातात.
- ब्लॉगर त्यांच्या ब्लॉग ला रिच घेऊन येण्यासाठी SEO मध्ये किवर्ड वापरले जातात..
- ब्लॉग मध्ये title tag, image alt tag मध्ये वापरले जातात.
- Permalink, meta description मध्ये वापरले जातात.
- ब्लॉग च्या पहिल्या paragraph मध्ये किवर्ड ठेवा.
किवर्ड मधील महत्वाच्या गोष्टी(TERM)
किवर्ड density म्हणजे काय?
ब्लॉग मध्ये किवर्ड किती वर्ड मागे किती वेळा वापरला आहे त्याच्या ratio ला किवर्ड density असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर आपण ब्लॉग मध्ये २०० शब्द असेल तर आपण एकदाच किवर्ड वापरावा.
किवर्ड density ब्लॉग रँक करण्यास मदत करते,जर ब्लॉग मध्ये जास्त वेळा किवर्ड वापरले तर किवर्ड stuffing होते. त्यामुळे योग्य त्या ठिकाणी योग्य तेवढेच किवर्ड वापरा.
किवर्ड stuffing म्हणजे काय?
आपला किवर्ड ब्लॉग मध्ये जास्तीत जास्त वेळा येण्यासाठी, त्या किवर्ड गरज नसताना तो ब्लॉग मध्ये विनाकारण टाकला जातो किंवा hide करून टाकला जातो तेव्हा किवर्ड stuffing होतो.
गुगल चे crawler अश्या ब्लॉग ला रँक करत नाहीत उलट ते असे ब्लॉग block करते. त्यामुळे नवीन ब्लॉगर ने ब्लॉग रँक करण्यासाठी योग्य त्याच ठिकाणी किवर्ड ठेवले पाहिजेल.
तुमच्या ब्लॉग साठी best कीवर्ड कसा शोधायचा?
- तुमची सर्व्हिसेस/ प्रॉडक्ट किवर्ड
तुमच्या सर्व्हिसेस/ प्रॉडक्ट कोणता आहे तो किवर्ड घ्यायला हवा, जेणेकरून त्या सर्व्हिसेस/ प्रॉडक्ट चेच traffic तुमच्या ब्लॉग वर येईल.
उदा. जर तुमची सर्व्हिसेस लॅपटॉप विक्री असेल तर तुमचा प्रायमरी किवर्ड लॅपटॉप विक्री बद्दलच असायला हवा. buy laptop, best laptop deal इत्यादी.
- कस्टमर ची गरज
जे कस्टमर सर्व्हिसेस/ प्रॉडक्ट खरेदी करणारे आहेत, त्यांना exactly काय हवाय ते सेकंडरी किवर्ड मध्ये आले पाहिजेल. असा किवर्ड शोधा जो कस्टमर चे problem solve करेल.
उदा. best laptop deal with minimum prices, digital marketing in Marathi language. इत्यादी.
- जास्तीत जास्त किवर्ड शोधा
किवर्ड रिसर्च टूल मध्ये सांगितल्या प्रमाणे तुम्ही फ्री टूल चा उपयोग करून high search volume आणि Low SEO Difficulty असलेले किवर्ड शोधा.
ब्लॉग/आर्टिकल मध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य ते किवर्ड चा वापर करा.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये किवर्ड म्हणजे काय? Keyword meaning in marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.
पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.
Perfect information
thank you, sir!
Thank you, Sir!
Mast
Thank You
मराठी शब्दांचे कीवर्ड कसे रिसर्च करायचे ते सांगा?
You can check keyword on ubersuggest.com