नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वाना सोशल मीडिया काय आहे? हे माहित च असेल. पण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? Social media marketing in Marathi, हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा पूर्ण ब्लॉग लक्षपूर्वक वाचा.
मित्रांनो आपण सर्वजण २१ व्या शतकात आहे. आजचा काळ हा डिजिटल काळ आहे. आणि आजच्या काळात सोशल मीडिया चा सर्वात जास्त वापर होत आहे.
सोशल मीडिया चा वापर लोकांना एकमेकांसोबत connect करण्यासाठी होत आहे. सोशल मीडिया मुळे पूर्ण जग जवळ आले आहे. लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशात मधील लोकांसोबत पण चांगले कनेक्ट झाले आहेत. आपण सर्वजण रोज सोशल मीडिया वापरतो.
तर तुम्ही विचार करा पूर्ण जगामध्ये रोज किती लोक सोशल मीडिया use करत असणार. मित्रांनो सोशल मीडिया मुळे लोक जवळ आली आणि याचा सर्व फायदा बिजनेस ला झाला.
तुम्हाला माहित आहे का सोशल मीडिया चा वापर करून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस ची मार्केटिंग करू शकता आणि त्यामधून पैसे पण कमवू शकता!
आजच्या काळात बिजनेस वाढवण्यासाठी सोशल मीडिया ची सर्वात मोठी भूमिका आहे. सोशल मीडिया मुळे बिजनेस ची चांगली होते. त्यामुळे आता सोशल मीडिया बिजनेस च्या मार्केटिंग साठी जास्त use केला जात आहे.
तुम्ही डिजिटल मार्केटिंग हा वर्ड नक्कीच एकला असेल.आजच्या काळात मार्केटिंग करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला आहे. डिजिटल मर्केटिंग चा च एक भाग आहे सोशल मीडिया मार्केटिंग.
तुम्हला डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग मधून बिजनेस कसा वाढवायचा आणि डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर कस करायचं? हे जाणून घ्यायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करून त्याबद्दल सर्व माहिती मिळवू शकता.
>>> डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
आता आपण बघूया सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल सर्व जाणून घेऊ. पहिले आपण सोशल मीडिया म्हणजे काय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
Table of Contents
सोशल मीडिया म्हणजे काय? What Is Social Media In Marathi?
सोशल मीडिया म्हणजे काय हे तुम्हाला माहित च आहे. तरीपण तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सोशल मीडिया म्हणजे एकमेकांसोबत संवाद करण्याचे एक साधन.
सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म हे एकमेकांसोबत संवाद करण्यासाठी, इन्फॉरमेशन शेअर करण्यासाठी,आपले स्किल लोकांसमोर मांडण्यासाठी बनवले गेले आहे.
सोशल मीडिया चा सर्वात मोठा use म्हणजे, आपण आपले विचार लोकांसमोर प्रभावीपणे मांडू शकतो.
सोशल मीडिया चे प्लॅटफॉर्म खालीलप्रमाणे:
- फेसबुक (Facebook)
- इंस्टाग्राम (Instagram)
- ट्विटर (Twitter)
- व्हाट्सअँप (WhatsApp)
- लिंक्डईन (Linkedin)
- युट्यूब (YouTube)
- पिंटरेस्ट (Pinterest)
- स्नॅपचॅट (Snapchat)
- टेलीग्राम (Telegram)
- वी चॅट (WeChat)
वरील सर्व अप्लिकेशन आपण रेगुलर वापरत असतो. खालील चार्ट मध्ये दाखवलं आहे की सोशल मीडिया वापर करणारे किती लोक आहेत.
तसेच तुम्ही खालील वेबसाईट वर क्लिक करून बघू शकता, जगामध्ये सोशल मीडिया वापरकर्ते किती आहेत.
https://www.statista.com/statistics/272014/global-social-networks-ranked-by-number-of-users/
सोशल मीडिया | सोशल मीडिया युझर्स/मिलियन |
फेसबुक | २७९७ |
इंस्टाग्राम | १२८७ |
ट्विटर | ३९६ |
व्हाट्सअँप | २००० |
लिंक्डईन | ७४० |
युट्यूब | २२९१ |
पिंटरेस्ट | ४५९ |
टेलीग्राम | ५५० |
वि चॅट | १२२५ |
मित्रांनो तुम्ही वरील चार्ट मध्ये बघितलं च आहे, जगामध्ये किती शोषलं मीडिया वापरणारे लोक आहेत. आणि हा आकडा दर वर्षी वाढणार च आहे. तुम्ही खालील वेबसाईट वर क्लिक करून ते बघू शकता.
https://backlinko.com/social-media-users
आता तुम्ही सोशल मीडिया बद्दल सर्व माहिती बघितली. तर आता तुम्हाला वाटत असेल की सोशल मीडिया चा कसा use होतो? लोक सोशल मीडिया मधून कसे पैसे कमवत आहेत? आणि सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे नक्की काय?
तर चला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण बघणार आहोत. पहिले आपण सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? हे बघूया.
सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय?
What Is Social Media Marketing In Marathi?
सोशल मीडिया मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा एक भाग आहे. सोशल मीडिया मार्केटिंग ला शॉर्ट मध्ये SMM असे सुध्दा म्हणतात.
सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Facebook, Instagram, Twitter, WhatsApp, YouTube) चा उपयोग करून त्यावर बिजनेस ची जाहिरात करणे होय.
आपण सोशल मीडिया चा वापर करून त्यावर आपल्या बिजनेस ची, आपल्या प्रॉडक्ट ची किंवा सर्व्हिसेस ची जाहिरात प्रभावीपणे करू शकतो.
सोशल मीडियामुळे मार्केटिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला आहे. लोक सहजपणे त्यांच्या प्रॉडक्ट ची जाहिरात पूर्ण जगभर दाखवू लागले. त्यांच्या सर्व्हिसेस वेगवेगळ्या वेगवेगळ्या देशात पोहचवू लागले आहेत. सोशल मीडिया मार्केटिंग मुळे बिजनेस चांगलेच ग्रो झाले आहेत.
आजच्या काळात जगभरात सोशल मीडिया मार्केटिंग केली जात आहे. मित्रांनो तुमचे पण जर बिजनेस असतील तर तुम्ही सोशल मीडिया चा वापर करून ते वाढवू शकता.
आम्ही सुध्दा सोशल मीडिया मार्कटिंग करतो. Digitalstarx.com ही आमची मार्केटिंग ची agency आहे.
चला तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. आपल्या कडील खूप बिजनेस owner ला सोशल मीडिया मार्केटिंग बद्दल माहित नाही. खूप लोक असे आहेत की त्यांचा बिजनेस जसा पहिले चालू होता आतापण ते तसेच चालवत आहेत. ते त्यांच्या बिजनेस ची ट्रॅडिशनल पद्धतीने च मार्केटिंग करत आहेत.
>>>डिजिटल आणि ट्रॅडिशनल मार्केटिंग म्हणजे काय?
तेव्हा आम्ही विचार केला आपल्या काही मराठी बिजनेस ला सोशल मीडिया मार्केटिंग ने वाढवू. तर आम्ही आमच्या भागातील काही बिजनेस owner कडे गेलो आणि त्यांना सोशल मीडिया बद्दल समजवून सांगितलं. त्यामधून काही बिजनेस owner सहमत झाले.
तेव्हा आम्ही त्यांच्या बिजनेस ची जाहिरात ही सोशल मीडिया मार्केटिंग ने करून दिली. आणि त्यांनी आम्हाला ३ महिन्यानंतर त्यांच्या बिजनेस चे रिपोर्ट दिले. तर त्यामध्ये त्यांचे बिजनेस चांगले वाढले होते. त्यांच्या प्रॉडक्ट चे सेल चांगल्या प्रकारे झाले होते. त्यांच्या बिजनेस साठी त्यांना नवीन कस्टमर मिळाले.
तर चला आता सोशल मीडिया मार्केटिंग का केली पाहिजे ते बघूया.
सोशल मीडिया मार्केटिंग चे फायदे (Benefits Of Social Media Marketing In Marathi)
१) कमी खर्चिक:
सोशल मीडिया चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही मार्केटिंग पध्दत ट्रॅडिशनल मार्केटिंग पेक्षा खूप स्वस्त आहे. छोटे बिजनेस owner किंवा ज्यांनी नवीन बिजनेस चालू केला ते सुध्दा SMM ने सहज आणि स्वस्त पद्धतीने जाहिरात करू शकतात.
२) संपूर्ण जगभरात जाहिरात:
तुम्ही SMM ने संपूर्ण जगभरात जाहिरात दाखवू शकता. तसेच तुम्हाला ज्या देशात जाहिरात दाखवायची आहे किंवा ज्या area मध्ये जाहिरात दाखवायची आहे, त्या भागात तुम्ही जाहिरात दाखवू शकता.
३) टार्गेट ऑडियन्स:
सोशल मीडिया मार्केटिंग चे टार्गेट ऑडियन्स हे सर्वात चांगले benefit आहे. जेव्हा आता ट्रॅडिशनल पद्धतीने जाहिरात करतो तेव्हा आपल्याला आपले ग्राहक सिलेक्ट करता येत नाहीत.
उदा. जर तुम्ही TV वर किंवा News पेपर मध्ये जाहिरात दिली तर ती जाहिरात कोणीपण बघू शकतो. म्हणजेच जे तुमचे ग्राहक नाहीत ते पण ती add बघतील पण ते तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेणार नाहीत. यामुळे तुमचे त्या जाहिरातींवरचे एक्सट्रा चे पैसे खर्च होतील. आणि तुमचा वेळ सुद्धा.
पण सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये तुम्ही तुमचे ग्राहक टार्गेट करू शकता. तुम्हाला ज्या वयातील लोकांना, स्पेसिफिक पुरुषाला किंवा स्त्री ला तुमची जाहिरात दाखवू शकता. यामुळे तुमचे ग्राहक वाढतील.
४) ट्रॅक करणे:
सोशल मीडिया मार्केटिंग वर जाहिरात केल्याने तुम्ही तुम्हाला हवी ती माहिती ट्रॅक करू शकता. SMM ने जाहिरात केल्यामुळे तुमचा बिजनेस किती वाढला हे तुम्ही योग्य पध्दतीने ट्रॅक करू शकता आणि त्यामध्ये गरजेनुसार बदल करू शकता.
५) ब्रँड value:
SMM मुले तुम्ही तुमच्या बिजनेस ची ब्रँड value वाढवू शकता. चांगल्या पध्दतीने जाहिरात गेल्यावर तुम्ही तुमच्या ब्रँड ची value वाढवू शकता.
६) जास्त ग्राहक:
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये आपण गूगल वर जाहिरात करून जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. गूगल Ads मध्ये खूप असे टूल्स आहेत त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट संबधीत ग्राहक निवडून त्यांनाच तुम्ही जाहिरात दाखवू शकता.
कमी वेळात आणि कमी पैसामधी आपण जास्त ग्राहक मिळवू शकतो. हे फक्त डिजिटल मार्केटिंग (SMM) मधेच शक्य आहे.
७) विक्री वाढ:
प्रॉडक्ट संबधीत ग्राहक निवडून त्यांनाच तुम्ही जाहिरात दाखवू शकता आणि तुमचा विक्री वाढवु शकता. आपण सोशल मीडिया चा उपयोग करून जास्त ग्राहक मिळवू शकतो परिणामी जास्त ग्राहक म्हणजे जास्त विक्री म्हणजेच जास्त प्रॉफिट.
८) बिझनेस रन २४/७:
Physical दुकान चालू करायचा आणि बंद करायचा एक लिमिटेड time असतो पण सोशल मीडिया वर बिजनेस असल्यामुळे तुम्ही तुमचा बिझनेस २४/७ चालू राहतो. इंटरनेट वर ग्राहक तुमचे प्रॉडक्ट कोणत्या पण time ला पाहू शकतात आणि ऑर्डर करू शकतात.
सोशल मीडिया मार्केटिंग चे प्रकार (Types Of Social Media Marketing):
- वेबसाईट (Website):
वेबसाईट म्हणजे तुमचं इंटरनेट वरील दुकान. वेबसाईट असल्यामुळे तुमचे दुकान इंटरनेट वर २४ तास चालू असते. कधीही, कोणीही तुमचं इंटरनेट वरील दुकान पाहू शकत आणि तुमचे प्रॉडक्ट विकत घेऊ शकतात. तसेच तुम्ही वेबसाईट जाहिरात (Google Ads) केली तर तुम्ही तुमचा सेल वाढवु शकता.
तुम्ही वेबसाईट वर तुमच्या प्रॉडक्ट ची माहिती लिहून share करू शकता ह्याला ब्लॉगिंग असं म्हणतात. सध्या ब्लॉगिंग करून खूप बिजनेस ग्रो केले जात आहेत.
>>>हे पण वाचा: ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
- फेसबुक(Facebook):
फेसबुक हा सोशल मीडिया मार्केटिंग चा एक मुख्य प्रकार आहेत. फेसबुक वर तुम्ही तुमच्या बिजनेस ची जाहिरात करू शकता.
फेसबुक चा वापर जास्त करून लोक मनोरंजनासाठी केला जात होता पण २०१९ च्या लॉकडाऊन पासून फेसबुक चा वापर पण मार्केटिंग साठी केला जात आहे.तुमच्या बिजनेस च फेसबुक पेज तयार करून तुम्ही रोज तुमच्या बिजनेस बद्दल माहिती देऊ शकता.
तसेच तुम्ही Facebook Ads रन करून लोकांपर्यंत तुमच्या बिजनेस ची जाहिरात करू शकता आणि तुमचा सेल वाढू शकता.
- इंस्टाग्राम(Instagram):
आजच्या काळात इंस्टाग्राम हे बेस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनलं आहे. खूप लोक इंस्टाग्राम use करत आहेत. फेसबुक पेक्षा पण जास्त वापर इंस्टाग्राम चा केला जात आहे. इंस्टाग्राम वापर करणारे दिवसेंदिवस वाढत आहेत.
फेसबुक प्रमाणेच इंस्टाग्राम वर लाईक्स ला पर्याय फोल्लोवेर्स हा आहे. तुम्ही तुमचे फोल्लोवेर्स वाढवून बिजनेस ग्रो करू शकता. इंस्टाग्राम वर सोशल मीडिया मार्केटिंग ही फेसबुक वरून केली जाते. Facebook ads मधून च तुम्ही Instagram वर जाहिरात दाखवू शकता.
>>>हे पण वाचा: इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?
- व्हाट्सअँप बिजनेस(WhatsApp business):
प्रेत्येकाच्या मोबाईल मध्ये राज्य करत असलेलं अँप्लिकेशन म्हणजे व्हाट्सअँप. असा एक ही स्मार्टफोन नसेल कि त्या मोबाईल मध्ये व्हाट्सअँपअँप्लिकेशन नाही. व्हाट्सअँप हे पण एक शोषलं मीडिया मार्केटिंग चा प्रकार आहे. तुम्ही व्हॅट्सऍप च्या मदतीने सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता.
व्हाट्सअँप ने व्हाट्सअँप बिजनेस हे नवीन अँप्स तयार केले आहे खास बिजनेससाठी. तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लिस्ट ह्या मध्ये ऍड करू शकता आणि त्याची लिंक तुमच्या मित्रांना share करू शकता.
व्हाट्सअँप बिजनेस वापरणे खूप सोपे आहे. व्हाट्सअँप द्वारे आपण एकमेकांशी बोलू शकतो, फोन करू शकतो, Chatting, Voice Call, Video Call असे पर्याय या अँप्लिकेशन मध्ये आहेत. ह्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बिजनेस साठी करू शकता.
- युट्यूब (YouTube):
युट्यूब हे सोशल मीडिया मार्केटिंग च एक प्रभावी माध्यम आहे. तुम्ही गूगल ads च्या रन करून तुमच्या बिजनेस ची जाहिरात युट्यूब वर करू शकता.
तसेच तुम्ही तुमचा बिजनेस विडिओ च्या माध्यमामधून पण लोकांपर्यंत पोहोचवू शकता. तुम्ही युट्यूब वर अकाउंट तयार करू शकता आणि त्यावर तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहितीचे विडिओ अपलोड करु शकता.
विडिओ मधी तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट माहिती, review ह्या गोष्टी सविस्तर सांगू शकता. अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या चॅनेल चे subscriber वाढवू शकता. युट्युब वर तुम्ही युट्युब Ads रन करून बिजनेस ग्रो करू शकता.
>>>हे पण वाचा: युट्युब मधून पैसे कसे कमवायचे?
- ट्विटर(Twitter):
ट्विटर पण तुम्ही अकाउंट तयार करून तुमच्या बिजनेस ची जाहिरात करू शकता.
ह्या अँप्लिकेशन मध्ये आपण कमी शब्दात आपली माहिती मांडू शकतो आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाते. प्रसिद्ध कलाकार, राजनीतिक लोक, नेते, ॲक्टर्स, अशी सर्व लोक हे सोशल मीडियाचा वापर करतात.
ट्विटर सर्व जगामध्ये use केलं जाते. त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता.
- टेलीग्राम (Telegram):
टेलिग्राम वर तुम्ही तुमच्या बिजनेस च चॅनेल ओपन करू शकता. आणि त्यामध्ये तुच्या कस्टमर्स ला जॉईन करू शकता. टेलिग्राम पण एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट जाहिरात करू शकता आणि सेल वाढवू शकता.
- लिंक्डईन (Linkedin):
लिंक्डईन हे एक प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्यावर तुम्ही तुमचं बिजनेस चर अकॉउंट ओपन करून तुमच्या बिजनेस ची आणि प्रॉडक्ट ची जाहिरात करू शकता.
सोशल मीडिया मार्केटिंग कशी करायची? (How To Do Social Media Marketing In Marathi):
स्टेप १) सेलेक्ट प्लॅटफॉर्म:
सर्वात पहिले तुम्ही सोशल मीडिया मार्कटिंग चा प्लॅटफॉर्म निवडा. तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम किंवा युट्यूब यापैकी कोणतापण सोशल मीडिया मार्केटिंग चा प्लॅटफॉर्म निवडू शकता. तसेच तुम्ही सर्व प्लॅटफॉर्म पण निवडू शकता.
प्लॅटफॉर्म निवडल्यामुळे तुम्हाला त्यावर काम करणे सोपे जाईल.
स्टेप २) टार्गेट ऑडियन्स वाढावा :
जो पण प्लॅटफॉर्म तुम्ही निवडला त्यावर तुमचे फॉलोवर्स वाढावा किंवा subscriber वाढवा. तुमच्या बिजनेस किंवा प्रॉडक्ट च्या संबंधित टार्गेट ऑडियन्स वाढवा.
स्टेप ३) ग्रुप आणि चॅनेल बनवा:
तुमच्या बिजनेस रिलेटेड ग्रुप आणि चॅनेल बनवा. त्यामध्ये तुमच्या ऑडियन्स ला add करा. त्यांना तुमच्या बिजनेस बद्दल किंवा प्रॉडक्ट बद्दल माहित शेअर करा. त्यांना चांगली value provide करा.
स्टेप ४) प्रोमोट प्रॉडक्ट आणि सर्विसेस:
तुमच्या बिजनेस चे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस त्यांच्यासोबत शेअर करा आणि तुमचा सेल वाढवा. तसेच त्यांना वेळोवेळी value provide करा म्हणजे ते तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करतील.
हे सर्व ऑरगॅनिक पध्दत आहे. याप्रकारे तुम्ही ऑरगॅनिक पध्दतीने सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता.
जास्त करून सोशल मीडिया मार्केटिंग ही ads रन करून केली जाते.
५) गूगल ads (Google Ads):
सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये गूगल ads सर्वात जास्त वापरले जाते. तुम्ही गूगल ads रन करून तुमच्या बिजनेस ची reach वाढवू शकता.
Google Adwords मध्ये अकॉउंट ओपन करून तुम्ही तुमच्या बिजनेस च्या रिलेटेड जाहिरात तयार करून campain रन करू शकता. गूगल ads हे वेगवेळ्या वेबसाईट वर, अप्लिकेशन वर आणि युट्यूब विडिओ वर show होतात. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे बिजनेस ची reach वाढवू शकता.
६) फेसबुक ads (Facebook Ads):
फेसबूक हे असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, त्यावर तुम्ही ads तुमच्या बिजनेस चे ads campain रन करू शकता. तसेच फेसबुक वरून च तुम्ही इंस्टाग्राम वर पण ads show करू शकता.
आजकाल खूप जास्त प्रमाणात फेसबुक वर आणि इंस्टाग्राम वर ads केल्या जात आहेत. तुम्ही पण या सोशल मीडिया चा उपयोग करून ads रन करू शकता आणि तुमचा बिजनेस वाढवू शकता.
टीप: जर तुम्हाला ads रन करता येत नसणार तर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग expert ला hire करू शकता.
सोशल मीडिया मार्केटिंग टिप्स (Social Media Marketing Tips In Marathi):
- तुमचे ध्येय निश्चित करा.
सोशल मीडिया मार्केटिंग मधी सर्वात महत्व्याचे म्हणजे आपले ध्येय निश्चित करणे होय. कश्या प्रमाणे आपण मार्केटिंग करायची याचा आराखडा तयार करणे. कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या बिझनेस साठी योग्य आहे हे शोधणे.
- ग्राहकांबद्दल संशोधन करणे.
तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट संबंधीत ग्राहक कोणते आहेत हे सोधायला हवे. सोशल मीडिया मार्केटिंग चा उपयोग करून तुम्ही त्याच ग्राहकांना टार्गेट करा. म्हणजे कमी पैशात जास्त विक्री होईल.
- स्पर्धकांबद्दल संशोधन करणे.
सोशल मीडिया वर आपल्या सारखेच दुसरे बिझनेस सुद्धा असणार आहेत, त्यांची माहिती गोळा करणे. त्यांच्या पोस्ट, व्हिडिओस ह्यांचा अभ्यास करून तुमच्या बिझनेस साठी त्याचा उपयोग करून घेणे.
- Engagement पोस्ट.
अश्या पोस्ट बनवा जेणे करून तुमचे ग्राहक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजेल. पोस्ट मधी उपयोगी कन्टेन्ट असायला हवा. तुमचा कन्टेन्ट तुमच्या स्पर्धकापेक्षा वेगळा असायला हवा.
कन्टेन्ट पोस्ट तयार करताना ग्राहकांचा विचार करून पोस्ट तयार करा. जर तुमची पोस्ट unique असेल तर तुम्हाला ग्राहकापर्यंत जाण्याची गरज नाही ग्राहक तुमच्या पर्यंत येतील.
- पोस्ट ऑप्टिमाइज करा.
पोस्ट ऑप्टिमाइज करणे खूप महत्व्याचे आहे. त्यावरूनच तुम्हाला कळेल कि तुमच्या पोस्ट ची Engagement कशी आहे.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या लेखात सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? What is social media marketing in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल मराठी भाषेतून माहिती हवी असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटत राहतील.
तुम्ही पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास आपल्या मित्रांना पण शेअर करा.
Very helpful and intresting blog.
thank you mam for your comment..!