नमस्कार मित्रांनो, SEO म्हणजे काय काय? What is SEO meaning in Marathi? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.
जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग या फिल्ड मध्ये असणार तर तुम्ही SEO हे नाव नक्कीच ऐकलं असेल. तसेच जर तुमची वेबसाईट असेल किंवा तुम्ही वेबसाईट डिझाईन चे काम करत असाल तर तुम्हाला SEO बद्दल थोडंफार माहित च असेल.
मित्रांनो जर तुम्ही वेबसाईट डिझाईन,ऑनलाईन Earning किंवा डिजिटल मार्केटिंग करत असाल तर तुम्हाला SEO म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे. तर चला SEO म्हणजे नक्की काय हे आपल्या मराठी भाषेतून बघूया.
Table of Contents
SEO म्हणजे काय?
What Is SEO Meaning In Marathi?
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization) हा SEO चा फुल फॉर्म आहे. एस ई ओ म्हणजे एक विशिष्ट keyword वापरून आणि एक विशिष्ट प्रक्रिया करून आपल्या वेबसाईट ला google च्या पहिल्या पेज च्या सर्वात वरती रँक करणे होय.
चला तुम्हाला थोडंस सविस्तर सांगतो. जेव्हा आपण Google वर कोणती पण गोष्ट सर्च करता तेव्हा तिथे आपल्याला काही वेबसाईट दिसतात. आपण त्यांना लिंक्स असेपण म्हणतो. तेव्हा आपण शक्यतो पाहिल्याचं लिंक वर क्लिक करतो. तर कधी कधी खालच्या २-३ लिंक वर क्लिक करून माहिती घेतो.
मित्रांनो गूगल वर तर खुप वेबसाईट असतात. खुप पेज वर वेगवेळ्या वेबसाईट असतात पण तरीपण आपण पहिल्या पेज वरच्या पहिल्या ३ लिंक्स पैकीच एखाद्या लिंक वर क्लिक करतो आणि माहिती घेतो.
तर या सर्व वेबसाईट टॉप Position ला कश्या काय येतात एवढ्या वेबसाईट असून पण आणि बाकीच्या का येत नाहीत? तर याच उत्तर असं आहे की टॉप वरच्या वेबसाईट चा SEO चांगला केलेला असतो म्हणून त्या वेबसाईट गूगल च्या पहिल्या पेज वर आणि सर्वात वरच्या Position वर रँक करत असतात.
- Best SEO Tools:
- Yoast SEO
- Rank-math SEO
मित्रांनो SEO म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पण आपल्या वेबसाईट साठी SEO करणे का गरजेचं आहे हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
SEO करणे का गरजेचं आहे?
मित्रांनो, मार्केटिंग हा बिजनेस चा अमुल्य भाग आहे. पण आताच्या काळात खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे. आताच युग हे डिजिटल युग बनलं आहे. सोशल मीडिया च्या जास्त वापर वाढल्यामुळे लोक ऑनलाईन बिजनेस कडे वळले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त लोक आता डिजिटल मार्केटिंग करत आहेत.
डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाईट असणे आवश्यक असते. वेबसाईट मुळे तुमचा Online Presence चांगला होतो. वेबसाईटमुळे तुमची जास्त विक्री होण्यास मदत होते.
>> हे देखील वाचा – डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
जर वेबसाईट मुळे तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस विकायचे असतील तर तुम्हाला तुमची वेबसाईट गूगल च्या पहिल्या पेज वर रँक करणे महत्वाचे असते.
तुम्हाला जर तुमच्या वेबसाईट वर ट्रॅफिक पाहिजे असेल किंवा तुम्हाला तुमचे प्रॉडक्ट जास्त प्रमाणात विकायचे असतील तर तुम्हाला तुमच्या वेबसाईट चा SEO करणे खूप गरजेचं असते.
SEO कसा करायचा? आपण ते पुढे सविस्तर बघणार आहोत. त्याआधी आपण बेसिक माहिती जाणून घेऊयात म्हणजे आपल्यला SEO समजायला सोपे जाईल.
तुमची वेबसाईट रँक का होत नाही?
कारण
- तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे तुमच्यापेक्षा चांगला CONTENT आहे.
- keyword चा अयोग्य वापर.
- खराब Link building
- तुमची Website लोड होण्याचा वेळ जास्त असणे.
- तुमच्या वेबसाईटवर लोकांचा चांगला अभिप्राय (Feedback) नसणे.
- तुमच्या वेबसाइटवर Indexing केली नसणे.
महत्त्वपूर्ण रँकिंग (Ranking) घटक कोणते?
- संबंधित मजकूर (Relevant Content)
- योग्य शीर्षक (Suitable Title)
- तर्कशुद्ध रचना (Logical Structure)
- योग्य सारांश (Suitable Synopsis)
- व्यवस्थित आणि वाचनीय डिझाईन (Neat & Readable Drawing)
SEO साठी या सर्व घटकांकडे लक्ष देणे आवश्यक असते. तर आपण आता सविस्तर समजून घेऊ की SEO कसा करतात.
SEO चे प्रकार: Types Of SEO In Marathi:
SEO चे मुख्यतः ३ प्रकार आहेत. म्हणजेच वेबसाईट चा SEO ३ प्रकारात केला जातो.
१) ऑन पेज एसईओ (On Page SEO)
२)ऑफ पेज एसईओ (Off Page SEO)
३)टेक्निकल एसीओ (Technical SEO)
ऑन पेज एसईओ म्हणजे काय? What Is On Page SEO?
ऑन पेज एस ई ओ म्हणजे वेबसाईट बनवताना वेबसाईट मधल्या पोस्ट वर काही ऑनलाईन activity कराव्या लागतात. आपली वेबसाईट ही गूगल ला समजेल अशी बनवावी लागते. म्हणजेच गूगल च्या काही नियमानुसार आपल्याला वेबसाईट च्या पोस्ट Create कराव्या लागतात. त्याच प्रोसेस ला ऑन पेज एसईओ म्हणतात.
ऑन पेज एस ईओ हा SEO सर्वात मोठा भाग आहे. ऑन पेज एस ई ओ वर खूप लक्ष देऊन काम करावे लागते. तुम्हाला जर तुमची वेबसाईट गूगल वर रँक करायची असेल तर ऑन पेज एस ईओ करणे सर्वात महत्वाचे असते.
ऑन पेज एस ईओ कसा करतात ते बघूया. म्हणजेच ब्लॉग पोस्ट चा SEO कसा करतात ते बघूया.
ऑन पेज चा SEO कसा करायचा? How To Do On Page SEO?
१) कीवर्ड रिसर्च (Keyword Research):
जेव्हा तुम्ही तुमच्या बिजनेस ची वेबसाईट बनवता तेव्हा तुम्हाला त्या वेबसाईट च्या ब्लॉग पोस्ट लिहाव्या लागतात. तुमचा बिजनेस ज्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस च्या संबंधित आहे त्याबद्दल च तुम्हाला ब्लॉग पोस्ट लिहावी लागते.
तसेच काही ब्लॉगर माहिती देण्यासाठी पण वेबसाईट बनवतात. तेव्हा त्यांना पण ब्लॉग पोस्ट लिहाव्या लागतात. तर त्या ब्लॉग पोस्ट लिहताना लोक कश्या प्रकारे तो प्रॉडक्ट किंवा ती माहिती सर्च करतात त्यालाच कीवर्ड असे म्हणतात.तसेच लोक काही ठराविक शब्द गूगल वर सर्च करून ती माहिती मिळवतात त्या ठराविक शब्दाला कीवर्ड असे म्हणतात.उदा. तुम्ही What is digital marketing in marathi? What is SEO Meaning in Marathi? हे कीवर्ड आहेत.
तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट च्या आधारावर कीवर्ड निवडायचा असतो. जे कीवर्ड वापरून तुम्ही तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग रँक करू शकता. कीवर्ड निवडतानी खालील घटकांचा विचार करावा लागतो.Search volume, competition, relevancy, SEO difficulty, etc.
जास्त search volume असलेला आणि कमी SEO difficulty असलेला कीवर्ड हा योग्य कीवर्ड असतो. कीवर्ड रिसर्च करण्यासाठी तुम्ही खालील टूल्स वापरू शकता.
- Google Keyword Planner
- Ahref
- Ubbersuggest
- Moz
- Semrush
- Keyword Everywhere
- KWfinder
- Keyword Snatcher
- Jaaxy
- Secockpit
२) टायटल टॅग (Title tag):
टायटल म्हणजे जेव्हा आपण एखादा कीवर्ड Google Search Bar मध्ये Search करून जे निकाल येतात त्यांच्या हेडिंग ला टायटल म्हणतात.कीवर्ड चा वापर टायटल मधी पहिल्या २-३ शब्दामधी करायला हवा. तेव्हा ब्लॉग रँक होण्याची शक्यता जास्त असते.
टायटल-Length मध्ये ५०-६० अक्षरांचा वापर केला जातो. टायटल साठी आपण H1 टॅग चा वापर केला जातो.तसेच H2, H3, H4,.. या टायटल टॅग चा वापर पण केला जातो.
खाली टायटल ची fig. दाखवली आहे.
३) मेटा डिस्क्रिपशन (Meta description):
मेटा डिस्क्रिपशन मधे ब्लॉग चा पूर्ण सारांश असावा. तेव्हा वापरकर्ते ला समजायाला सोपे जाईल आणि ब्लॉग मधी काय असेल ह्याची कल्पना सुद्धा येईल. त्यामुळे जास्त वापरकर्ते वेबसाईट वर येतील आणि रँकिंगची शक्यता वाढली जाईल.
खालील fig. मध्ये मेटा डिस्क्रिपशन दर्शविले आहे.
४) यूआरएल (URL):
यूआरएल संरचना करणे सर्वात आवश्यक असते. यूआरएल हा ऑन पेज एसईओ चा सर्वात महत्वाचा भाग आहे. यूआरएल मध्ये कीवर्ड असणे खूप महत्व्याचे आहे. तुमच्या वेबसाईट ला किंवा ब्लॉग ला योग्य यूआरएल दिल्याने तुमची वेबसाईट कशाच्या संबंधित आहे हे गूगलला समजण्यास मदत होते. त्यामुळे वेबसाईट ला यूआरएल देणे आवश्यक असते.
खालील fig. मध्ये यूआरएल दर्शिविले आहे.
५) एच टि एम एल टॅग (HTML tag):
ब्लॉग लिहतांनी Headings चा वापर करावा लागतो. त्याला एच टि एम एल टॅग किंवा हेडिंग असे म्हणतात. Heading साठी आपण H1 टॅग आणि Sub-heading साठी आपण H2 टॅग वापरतो. हेडिंग टॅग H1 ते H6 पर्यंत असतात.
खालील fig. मध्ये heading टॅग दाखविले आहे.
६) पोस्ट ची लांबी (Post Length):
पोस्ट लिहतांनी त्या पोस्ट ची लांबी कमीत कमी १००० शब्दाची असली पहिले. जेवढा जास्त चांगला आणि मोठा ब्लॉग लिहला तर तो लवकर रँक होऊ शकतो.
पण तुम्हाला त्याच ब्लॉग च्या संबंधित सर्व लिहायला हवे.
७) कीवर्ड डेन्सिटी (Keyword Density):
ब्लॉग चा ऑन पेज SEO करताना कीवर्ड डेन्सिटी महत्वाची ठरणे. कीवर्ड डेन्सिटी म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये किती वेळा तुम्ही तुमचा Main Keyword वापरता. पण तुम्ही खूप जास्त कीवर्ड चा उपयोग केला तर गूगल तुमच्या वेबसाईट ची रँकिंग खाली करते. त्यामुळे योग्य तेवढे च कीवर्ड वापरणे गरजेचं असते.
तुम्ही तुमच्या ब्लॉग च्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये कीवर्ड वापरणे आवश्यक असते. कीवर्ड ची डेन्सिटी तुमच्या संपूर्ण ब्लॉग च्या ५% असायला हवी.
८) इमेज (Image):
ब्लॉग मध्ये ऑन पेज एसईओ करताना इमेज वापरणे खूप महत्वाचे असते. इमेज ला योग्य alt tag द्यावा लागतो. गूगल डायरेक्ट इमेज वाचू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला त्या इमेज ला नाव द्यावे लागते. तेव्हा गूगल ला ती इमेज कशाची आहे हे समजते.
इमेज चा पण SEO केला जातो. जर इमेज चा योग्य असा SEO केला तर तुम्हाला इमेज मधून पण ट्रॅफिक तुमच्या ब्लॉग वर घेऊन येऊ शकतो.
९) अंतर्गत दुवा (Internal Link):
ऑन पेज एस ई ओ करताना ब्लॉग पोस्ट मध्ये internal-link देणे महत्वाचे असते. इंटरनल लिंक म्हणजे एक हायपरलिंक आहे जी आपल्या वेबसाइटच्या एका पेजवरून आपल्या स्वतःच्या वेबसाइटच्या दुसर्या पेजवर जाते.
इंटरनल लिंक Highlight करणे आवश्यक असते. त्यामुळे युझर्स ला कळते की या वर्ड ला लिंक दिलेली आहे. त्यामुळे तो तिथे क्लिक करतो आपल्या दुसऱ्या पेज च्या पोस्ट वर डायरेक्ट जाऊन त्या पोस्ट पण read करतो. खाली दिलेल्या फोटो मध्ये इंटरनल लिंक दाखवल्या आहेत.
१०) बाह्य दुवा (External link):
जेव्हा आपण एखादी ब्लॉग पोस्ट लिहत असतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या एखाद्या वेबसाईट ची इन्फॉर्मशन पण देणे आवश्यक असते. त्या दुसऱ्या वेबसाईट ची लिंक जेव्हा आपण आपल्या ब्लॉग पोस्ट मध्ये देतो. त्या लिंक ला External लिंक असे म्हणतात.
उदा. खाली मी एका वेबसाईट ची लिंक देतो. तुम्ही त्या लिंक वर क्लिक केल्यावर दुसऱ्या वेबसाईट च्या पेज वर पोहचता.
Bluehost.in हि वेबसाईट बेस्ट होस्टिंग provide करते तेव्हा तुम्ही या लिंक वर जाऊन होस्टिंग खरेदी करू शकता आणि तुमच्या स्वतःची वेबसाईट बनवून आणि त्यामध्ये ब्लॉग लिहून पैसे कमवू शकता.
ऑफ पेज एस ई ओ (Off Page SEO):
ऑफ पेज एसईओ मध्ये आपल्या वेबसाईट वर बाहेरील गोष्टी use करून ट्रॅफिक आणणे होय. म्हणजेच आपल्या वेबसाईट वर ट्राफिक आण्यासाठी जी बाहेरून प्रोसेस केली जाते त्याला प्रोसेस ला ऑफ पेज एसईओ म्हणतात.
१) बॅकलिंक्स (Backlinks):
ऑफ पेज एसईओ म्हटलं की बॅकलिंक्स चे विचार येतात. आणि हे अगदी बरोबर सुद्धा आहे. ऑफ पेज एसईओ मध्ये बॅकलिंक्स सर्वात महत्वाचा घटक आहे.
बॅकलिंक म्हणजे आपण ज्या निश (niche) वर ब्लॉग पोस्ट लिहत असतो त्याच रिलेटेड दुसऱ्या लोकांच्या वेबसाईट वर आपल्या पोस्ट ची लिंक देणे होय. आपल्या सारखी niche असलेल्या वेबसाईट वरून आपण आपल्या वेबसाईट वर लिंक च्या माध्यमातून वापरकर्ते घेऊन येणे, त्या लिंक ला बॅकलिंक म्हणतात.
२) गेस्ट पोस्ट (Guest Post):
जर तुमच्याकडे तुमचा ब्लॉग पूर्ण तयार असेल तर तो अशा वेबसाईट ला लिंक करत असतात ज्या वेबसाईट ची DA (Domain Authority), PA (Page Authority) आणि RA (Ranking Authority) चांगली असेल. त्या वेबसाईट वर जाऊन गेस्ट पोस्ट केल्याने तुम्हाला बॅकलिंक मिळते आणि तुमच्या वेबसाईट वर ट्राफिक यायला मदत होते.
३) सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing):
ऑफ पेज एसईओ मध्ये सोशल मीडिया मार्केटिंग करणे सर्वात बेस्ट आहे. तुम्हाला तुमची वेबसाईट सोशल मीडिया वर शेअर करून चांगली ट्राफिक मिळवता येते. त्यासाठी तुम्हाला Facebook Page, Instagram Page, Tweeter Handle यांसारखे पेज बनवून त्यावर शेअर करणे. रेगुलर पोस्ट केल्याने त्या पेज वर तुमची एक स्ट्रॉंग कॉम्युनिटी बनते आणि त्यामुळे तुमच्या वेबसाईट वर चांगलं आणि रेगुलर ट्रॅफिक येते.
४) इमेज सबमिशन (Image Submission):
तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये वापरलेल्या इमेजेस ला Pinterest सारख्या प्लॅटफॉर्म वर सबमिट करून तिथून मोठ्या प्रमाणात ट्राफिक मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला Pinterest वर तुमचं अकाउंट ओपन करा लागेल.
५) गूगल ऍड (Google Add):
तुम्ही तुमच्या वेबसाईट ची गूगल ऍड च्या मदतीने Paid Advertising करू शकता. तसेच तुम्ही Ads रन करून फेसबूक आणि इंस्टाग्राम वरून जास्त लोकांपर्यंत तुमची वेबसाईट पोहचवू शकता. त्यामधून तुमच्या वेबसाईट वर डायरेक्ट ट्राफिक येते.
टेक्निकल एसईओ (Technical SEO):
SEO मध्ये टेक्निकल एसईओ करणे खूप महत्वाचे असते. टेक्निकल एसईओ मुळे च गूगल मध्ये तुमची वेबसाईट दिसते. आपल्या वेबसाईट चा user experience म्हजेच टेक्निकल इसीओ होय. टेक्निकल एसईओ मुळे तुम्ही तुमची वेबसाईट चांगल्या प्रकारे optimize करू शकता आणि गूगल मध्ये रँक करू शकता.
१) एचटीटीपीएस (HTTPS):
एचटीटीपीएस म्हणजे (Hypertext Transfer Protocol Secure). हे एक secure नेटवर्क आहे. तुम्हाला तुमच्या वेबसाईट वर SSL certificate लावणे महत्वाचे असते. यामुळे तुमची वेबसाईट secure होते. ज्या वेबसाईट secure असतात त्याच वेबसाईट गूगल वर रँक करतात.
२) साईटमॅप (Sitemap):
तुमच्या वेबसाईट वर जे ब्लॉग किंवा पेजेस असतील ते तुम्हाला साइटमॅप च्या मदतीने google search console मध्ये सबमिट करा लागतो. त्याला indexing असेही म्हणतात. तुम्हाला तुमच्या वेबसाईट चे पेजेस index करणे खूप गरजेचं आहे.
तुमच्या वेबसाईट चे पेजेस Indexing केल्यामुळे गूगल चे bots किंवा गूगल चे crawler sitemap.xml ही file सर्च करतात आणि गूगल ला तुमची वेबसाईट समजली जाते.
३) वेबसाईट स्पीड (Website Speed):
तुमच्या वेबसाईट ची स्पीड जर चांगली असेल तर गूगल ती वेबसाईट वरती promote करते. त्यामुळे वेबसाईट ची स्पीड चांगली असणे म्हणजे वेबसाईट लवकर लोड करणे महत्वाचे असते.
त्यासाठी तुम्ही जास्त heavy images आणि video वेबसाईट मध्ये अपलोड करू नका. जास्त heavy images आणि videos अपलोड केल्यामुळे तुमची वेबसाईट चा loading speed कमी होऊ शकतो.
४) रोबोट्स.txt फाईल (Robots.txt File):
Robots.txt File वापरून तुम्ही तुमच्या पेजेस ची योग्य indexing करू शकता. म्हणजेच तुमच्या वेबसाईट च्या कोणत्या पेज ला index करायचं आणि कोणत्या पेज ला index करायचं नाही हे सर्च इंजिन ला सांगू शकता.
५) मोबाईल फ्रेंडली (Mobile Friendly):
तुमची वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असणे म्हणजे तुमच्या युझर्स ला तुमची वेबसाईट मोबाईल मध्ये पण योग्य रित्या दिसणे होय. तुमची वेबसाईट मोबाईल फ्रेंडली असणे खूप आवश्यक असते.
जास्त करून युझर्स मोबाईल वरच सर्च करत असतात. त्यामुळे गूगल ला पण अशीच वेबसाईट पाहिजे असते कि ती मोबाईल वर पण चांगला response देऊ शकते. तसेच गूगल मोबाईल फ्रेंडली असणाऱ्या वेबसाईटला च वरती रँक करते.
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्हाला या ब्लॉग मध्ये एसईओ म्हणजे काय? What is SEO meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघीतली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा.तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या newsletter ला नक्की subscribe करा. तुम्हाला अशाच नवीन पोस्ट भेटतील.
0 thoughts on “SEO म्हणजे काय? [2022 Full Guide] | What Is SEO Meaning In Marathi:”