नमस्कार मित्रांनो, सध्याच्या काळात आपल्याला खूप नव नवीन शब्द ऐकायला येत आहेत, त्यातलाच एक शब्द इन्फ्लुएन्सर. तुम्ही पण हे वर्ड नक्कीच ऐकले असतील सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर, डिजिटल इन्फ्लुएन्सर इत्यादी. तर इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? What is influencer meaning in Marathi?
मित्रांनो आपण या ब्लॉग इन्फ्लुएन्सर बद्दल ची सर्व माहिती बघणार आहोत.
इन्फ्लुएन्सर हा शब्द २०१९ पासूनच जास्त ऐकायला येत आहेत. त्याच कारण असं आहे की जेव्हा Covid मुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन झालं आणि त्यामुळे सर्व व्यवसाय इंटरनेट वर यायला सुरुवात झाले. म्हणजेच ते व्यवसाय सोशल मिडिया वर आले. त्यातूनच सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर ला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली.
बघायला झालं तर 2019 च्या आधी ऍक्टर्स, खेळाडू, सुपरस्टार आणि राजकारणी लोक इत्यादी याना सोशल मिडिया वर जास्त प्रसिद्धी होती. पण 2019 नंतर हे सर्व चित्र च बदलून गेलं.
लोकडाऊन मुळे खूप लोक YouTube, Facebook, Instagram यांसारख्या सोशल मीडिया वर आले. आणि त्यांचा कन्टेन्ट सोशल मीडिया वर इतर लोकांसोबत share करू लागले.
>>>सोशल मीडिया म्हणजे काय? सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय?
त्यामुळे सामान्य लोकांना पण सोशल मिडिया वर प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. आणि ते लोक इन्फ्लुएन्सर म्हणून जगासमोर आले.
तर इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? हे तुम्हाला थोडं सविस्तर सांगतो म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल. आणि तसेच तुम्ही कसे इन्फ्लुएन्सर बनून लाखो मध्ये पैसे कमवू शकता? हे पण सांगतो.
Table of Contents
इन्फ्लुएन्सर म्हणजे काय?
What Is Influencer Meaning In Meaning In Marathi?
मित्रांनो, इन्फ्लुएन्स आणि इन्फ्लुएन्सर हे दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. मुख्यत: हे शब्द फ्रेंच भाषेतले आहेत आणि ते इंग्रजी भाषेत सुद्धा आहे तसेच वापरले आहेत.
इन्फ्लुएन्स चा मराठी मध्ये अर्थ होतो प्रभाव आणि इन्फ्लुएन्सर चा अर्थ होतो प्रभाव पाडणारी व्यक्ती. उदा. एखादा व्यक्ती समोरच्या दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या लिखाणातून किंवा बोलण्यातून एखादी गोष्ट पटवून देऊ शकत असेल किंवा त्या व्यक्तीच्या बोलण्याचा वागण्याचा परिणाम तुमच्यावर होत असेल, तर त्याचा प्रभाव (इन्फ्लुएन्स) तुमच्यावर पडला आहे. म्हणजेच त्या व्यक्तीला आपण इन्फ्लुएन्सर असे म्हणू शकतो.
आपण खूप सेलिब्रटी बघतो जे सामाजिक मुद्यावर बोलत असतात आणि आपण ते ऐकत असतो कारण आपल्या आवडत्या हिरो किंवा हिरोईन ने ते सांगितलेलं असते. जेव्हा एखादा सेलेब्रेटी जनजागृती करतो म्हणजेच तो आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतो. आणि त्या सेलिब्रटी ला इन्फ्लुएन्सर असे म्हणतात.
तर इन्फ्लुएन्सर चा अजून काय उपयोग होतो? इन्फ्लुएन्सर का बनायचं?
मित्रांनो, मोठं मोठे brands त्यांच्या वस्तू किंवा सेवा विकण्यासाठी, जाहिरात करण्यासाठी इन्फ्लुएन्सर चा उपयोग करतात. आणि त्या इन्फ्लुएन्सर ला लाखों मध्ये payment देतात.
इन्फ्लुएन्सर चा अर्थच असा की विश्वास! लोकांचा विश्वास इन्फ्लुएन्सर वर असतो.
मोठे बिजनेस वाले लोक अश्या इन्फ्लुएन्सर कडून त्यांच्याम्हणजेच त्यांच्या brands चे प्रोमोशन करून घेतात. आणि त्यामुळे त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्विस जास्त विकल्या जातात. कारण त्या इन्फ्लुएन्सर वर पहिलेच लोकांचा विश्वास असतो आणि त्या इन्फ्लुएन्सर ने त्यांचे प्रॉडक्ट प्रोमोट केल्यावर त्यांच्या प्रॉडक्ट वर लोकांचा विश्वास निर्माण होतो आणि ब्रँड जागरूकता तयार होते.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणजे काय?
Social media Influencer Meaning In Marathi.
गेल्या दशकात सोशल मीडियाचे महत्त्व झपाट्याने वाढत असल्याचे आपण पाहीले आहे. जानेवारी 2019 नंतर, 3.484 अब्ज लोक सक्रियपणे सोशल मीडियाचा वापर करतात. हे जगाच्या लोकसंख्येच्या 45% आहे. अजून लोक सक्रिय होत आहेत.
सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर म्हणजेच Facebook, Instagram, YouTube & Twitter इत्यादी सोशल मिडिया चा वापर करून सेवा किंवा वस्तू ची विक्री करणे किंवा जागरूकता तयार करणे.
सोशल मीडिया वर लोक त्यांच्या आवडत्या टॉपिक वर कंटेन्ट अपलोड करत आहेत. मग ते Facebook वर असो Instagram किंवा मग YouTube वर असो. रेगुलर content टाकून ते followers/subscriber वाढवत आहेत. म्हणजेच त्याच्या followers इंफ्लुएन्स करत आहेत.
सोशल मिडिया वर प्रभावशाली लोक असे आहेत कि ज्यांनी विशिष्ट विषयावरील, ज्ञान आणि कौशल्य यासाठी वेगळी प्रतिष्ठा तयार केली आहे. ते त्यांच्या पसंतीच्या सोशल मिडिया चॅनेलवर त्या विशिष्ट विषयावरील, ज्ञान आणि कौशल्य ह्याची नियमित पोस्ट करतात आणि त्या विशिष्ट विषयावरील लोकांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स तयार करतात. आणि त्यांचे फॉलोअर्स त्यांच्या मतांकडे बारीक लक्ष देतात.
सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर चे प्रकार
(Types of social media Influencers)
1) फॉलोअर्स नंबर-नुसार:
- मेगा इन्फ्लुएन्सर (Mega Influencer):
मेगा इन्फ्लुएन्सर च्या सोशल मिडिया अकाऊंट वर 1 million किंवा त्यापेक्षा जास्त फॉलोअर्स असतात. त्यामध्ये जास्त करून सेलेब्रेटी, खेळाडू इत्यादी चा समावेश होतो.
पण आताच्या खूप लोकांचे 1 million पेक्षा जास्त फॉलोवर्स तयार झाले आहेत. कारण influencer ही growing industry आहे. दिवसेंदिवस या आकड्यामध्ये वाढ होत आहे.
मेगा इन्फ्लुएन्सर त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंट वर खूप ऍक्टिव्ह असतात. जास्तीत जास्त वेळ ते आपल्या फॉलोअर्स सोबत घालवतात आणि फॉलोअर्स सोबत त्यांची Engagement खूप मजबूत बनवतात.
- मॅक्रो इन्फ्लुएन्सर (Macro Influencer):
मॅक्रो इन्फ्लुएन्सर च्या सोशल मिडिया अकाऊंट वर 500k-1million फॉलोअर्स असतात. हे इन्फ्लुएन्सर पण दिवसेंदिवस grow करत आहेत.
- मिड टायर इन्फ्लुएन्सर (Mid-Tier Influencer):
मिड टायर इन्फ्लुएन्सर च्या सोशल मिडिया अकाऊंट वर 50k-500kफॉलोअर्स असतात.
- मायक्रो इन्फ्लुएन्सर (Micro Influencer):
मायक्रो इन्फ्लुएन्सर च्या सोशल मिडिया अकाऊंट वर 10k-50k फॉलोअर्स असतात. यामध्ये ज्यांनी आता चॅनेल ओपन केले आणि ते रेगुलर कंटेन्ट टाकत आहेत. अशा इन्फ्लुएन्सर चा समावेश होतो.
- नॅनो इन्फ्लुएन्सर (Nano Influencer):
नॅनो इन्फ्लुएन्सर च्या सोशल मिडिया अकाऊंट वर 1k-10k फॉलोअर्स असतात. यांच पण नवीन अकॉउंट किंवा नवीन च चॅनेल आहेत आणि ते grow करण्याचा प्रयत्न करत आहेत.
2) कन्टेन्ट नुसार:
- ब्लॉगर (Blogger):
मित्रांनो, लोकांना influence करण्याचे किंवा तुम्हाला influencer बनायचे दोन च मार्ग आहेत. एक म्हणजे Blogger आणि दुसरा म्हणजे Video creator. या दोन माध्यमातून च तुम्ही influencer बनू शकता. तुम्ही यामधून एक मार्ग किंवा दोन्ही मार्ग निवडू शकता.
पण आता च्या काळात competition वाढल्याने तुम्ही दोन्ही कडे कंटेन्ट टाकणे खूप गरजेचं आहे.
ब्लॉगर हा कंटेन्ट लिहत असतो. म्हणजेच ब्लॉगिंग करून लोकांपर्यंत त्याची माहिती पोहचवत असतो. यामध्ये लेख/ब्लॉग च्या स्वरूपात कंटेन्ट असतो. उदा. Techyukti.com
ब्लॉगिंग करून तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहचू शकता. लोकांना तुमच्या ब्लॉग वर घेऊन येऊ शकता आणि त्यांना इन्फ्लुएन्स करू शकता.
ब्लॉगर हे लोकांच्या समोर येत नाहीत पण त्यांनी लिहलेला कंटेन्ट लोकांपर्यंत पोहचत असतो. त्यामुळे जर तुम्हाला लोकांसमोर न येता इन्फ्लुएन्सर बनायचं असेल तर तुम्ही हा मार्ग निवडू शकता.
>>> ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय?
- विडिओ क्रिएटर (Video Creator):
व्हिडीओ क्रिएटर म्हणजे Instagram किंवा Youtube वर विडिओ कंटेन्ट अपलोड करणे. यामध्ये तुम्ही तुमचं YouTube चॅनेल open करून त्यावर content अपलोड करू शकता.
आता विडिओ क्रिएटर ला खूप डिमांड आली आहे. लोक जास्त विडिओ मधला कंटेन्ट बघत आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे. तुम्ही Instagram वर आणि YouTube वर कंटेन्ट टाकून इन्फ्लुएन्सर बनू शकता.
>>> कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय?
इन्फ्लुएन्सर कसे बनायचे?
(How to become a Influencer)
मित्रांनो, आपल्याला काहीही बनायचे असेल तर मेहनत घ्यावी लागते आणि त्याच बरोबर patience पण असावे लागते. इन्फ्लुएन्सर एक अशी growing industry ज्यामध्ये तुम्ही काही वर्षात च एक चांगली income generate करू शकता. तुमचं future पण secure राहील.
एवढंच नव्हे तर तुम्ही महिन्याला लाखों रुपये कमवू शकता. आणि आता असे खूप इन्फ्लुएन्सर जे महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत. तुम्हाला जर खरच इंफ्लून्सर बनायचे असेल तर खालील गोष्टी करा.
1) सोशल मिडिया बिजनेस अकाउंट तयार करा:
इंफ्लून्सर बनण्यासाठी सोशल मिडिया अकाउंट असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही पहिले तुमचे सोशल मिडिया वर अकॉउंट तयार करा. Video Creator बनायचं असले तर तुमचं चॅनेल ओपन करा.
उदा. इंस्टाग्राम / फेसबुक या सोशल मिडिया वर बिजनेस अकाउंट तयार करा.
तुमच्या वैयक्तिक Instagram अकाउंट विपरीत, Instagram व्यवसाय खाते तयार करा. ते व्यवसाय खाते तुम्हाला असे अनेक option open करून देते त्यामुळे तुम्ही तुमचे फॉलोअर बेस वाढविण्यात मदत करू शकतात.
त्यामुळे तुम्ही तुमच्या पोस्ट engagement, likes, views, share, इत्यादी गोष्टी पाहू शकता आणि त्यांचा detail अभ्यास करू शकता.
तुम्ही तुमची कोणती post/reel किती लोकांपर्यंत पोहोचली त्याचा पूर्ण अभ्यास करून तुम्ही तुमची post/reel च्या strategy बदलू शकता आणि follower वाढवू शकता.
2) Niche विषय निवड:
Niche म्हणजे तुम्ही कोणता content लोकांना देणार आहात. तुम्ही कोणत्या प्रकार चे विडिओ बवणार आहात. यालाच niche असे म्हणतात.
तुम्ही इंस्टाग्राम बिझनेस अकाऊंटवर तयार केल्यानंतर, योग्य प्रेक्षक तुम्हाला शोधू शकतील यासाठी तुम्हाला तुमची niche माहित असणे खूप महत्त्वाचे आहे.
सर्व काही जाणून घेणे किंवा विविध प्रकारच्या कौशल्य क्षेत्रासाठी ओळखले जाणे अशक्य आहे. एक (किंवा दोन) niche किंवा तुमची आवड असलेली क्षेत्रे निवडणे आणि तेथून सुरुवात करणे चांगले.
मित्रांनो,तुम्हाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे ते क्षेत्र तुम्ही niche म्हणून निवड करा.
उदा. तुम्हाला लेख लिहायला, विडिओ करायला, फिरायला आवडते. तर तुम्ही त्या बद्दल सगळ्या पोस्ट अकाउंट वर करू शकता.
Niche बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचा.
>>> Niche म्हणजे काय? निश कशी निवडायची?
3) तुमच्या अकाउंट थिम (aesthetic) निवड:
तुमच्या अकॉउंट पेज चे – रंग, लुक आणि फील, लेआउट इत्यादी. तुमच्या सारखी niche असणाऱ्या प्रोफाईलला भेट द्या. त्याच्या थिम बघा. या थिम/लेआऊट घटकांच्या आधारे तुमचे पेज ज्या प्रकारे लोकांना समजले जाते ते एकतर तुम्हाला नवीन follower मिळवून देईल किंवा तुम्हाला एक गमवावे लागेल.
यामुळे तुमच्या अकॉउंट ला एक वेगळी ओळख निर्माण होईल. हे पण तुमचे followers वाढण्यात मदत करते.
पण फक्त ‘सुंदर दिसण्यापेक्षा’, तुमचा content brand ओळख सुधारते आणि तुमचा वैयक्तिक ब्रँड वाढण्यास मदत करू शकते. त्यामुळे जास्त content वर फोकस करा. लोकांना जास्तीत जास्त value देण्याचा प्रयत्न करा.
4) तुमचा ब्रँड आवाज आणि व्यक्तिमत्व स्थापित करा:
इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर कसे व्हावे या प्रश्नाच्या मुख्य उत्तरांपैकी एक विशिष्ट वैयक्तिक ब्रँड आवाज आणि व्यक्तिमत्त्वाने सुरू होते. इन्फ्लुएन्सर च्या समुद्रात तुमची एक वेगळी ओळख करण्यासाठी तुमची ब्रँड व्यक्तिमत्व एक महत्त्वाचा घटक बनतो.
तुम्ही कोण आहात आणि तुम्ही किती प्रभावशाली स्वत:चे कन्टेन्ट देता हे महत्त्वाच आहे. तुमचा संवाद योग्य लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री बाळगा. तुमची स्वत:ची एक audience तयार करून तुम्ही तुमचे ब्रँड आवाज आणि व्यक्तिमत्व स्थापित करू शकता. हे सर्व, एकत्रित केल्यावर, एक यशस्वी इन्फ्लुएन्सर वाढीच्या तुमच्या कथेला सुरुवात होईल.
5) तुम्ही तयार केलेला कन्टेन्ट रेगुलर अपलोड करा:
मित्रांनो, जर तुम्हाला लवकर followers किंवा YouTube वर subscriber वाढवायचे असतील तर तुम्हाला तुमचा content रेगुलर अपलोड करावा लागेल.
इंस्टाग्राम हे मोठ्या प्रमाणात व्हिज्युअल प्लॅटफॉर्म असले तरी, महत्त्वाकांक्षी इन्फ्लुन्सरसाठी , कन्टेन्ट, इमेज इतकीच महत्त्वाची आहे.
तुमचा ब्रँड टोन, तुमच्या follower preference आणि तुमच्या वैयक्तिक ब्रँडच्या सौंदर्यावर आधारित, तुम्ही अर्थपूर्ण कन्टेन्ट मार्गाने लोकांशी संपर्क साधण्याची ताकद असलेला कन्टेन्ट तयार करावा.
तुम्ही पोस्ट करत असलेल्या वारंवारतेचा इंस्टाग्राम प्रभावक म्हणून तुमच्या वाढीवरही मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळा नवीन सामग्री तयार करू शकता, तुमच्या पेजचे विश्लेषण आणि तुमच्या प्रेक्षकांची प्राधान्ये यावर अवलंबून, तुम्ही किती वेळा पोस्ट करायचे हे ठरवू शकता.
6) Hashtag चा वापर:
हॅशटॅग हे के प्रभावी साधन आहे योग्य audience पर्यंत पोहोचण्यासाठी. आपण आपल्या पोस्ट मध्ये niche च्या related हॅशटॅग वापरू शकतो. हॅशटॅग शक्यतो पोस्ट मधी काय दर्शवले आहे या बद्दल असावे.
हॅशटॅग वापरताना कोणत्या हॅशटॅग ला किती पोस्ट कन्टेन्ट आहेत हे बघावं. आणि पोस्ट publish करतानी 3-5 हॅशटॅग वापरावे. योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या पोस्टना अधिक फायदा देण्यासाठी योग्य हॅशटॅग वापरण्याचे लक्षात ठेवा.
इन्फ्लुएन्सर बनून पैसे कसे कमवायचे?
वरती सांगितल्याप्रमाणे इन्फ्लुएन्सर बनून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.
1) Google Adsense:
तुम्ही तर YouTube वर विडिओ बनवून कंटेन्ट लोकांना देत असणार आणि तुमच्या चॅनेल वर चांगले subscriber झाले तर तुम्ही Google ads मधून महिन्याला लाखो रुपये कमवू शकता.
आता असे खूप इन्फ्लुएन्सर आहेत जे महिन्याला ऍडसेन्स मधून खूप पैसे कमवत आहेत.
>>> YouTube मधून पैसे कसे कमवायचे?
2) Affiliate Marketing:
अफिलिएट मार्केटिंग म्हणेज आपण एखाद्या कंपनी च प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस आपल्या फॉलोवर्स ला विकणे. तुम्ही पण youtube वर हे खूप वेळा ऐकलं असेल की खाली description मध्ये लिंक दिली आहे, तुम्ही तिथून खरेदी करू शकता. ती affiliate लिंक असते.
त्या लिंक वरून खरेदी केल्यावर इन्फ्लुएन्सर ला काही टक्के कमिशन मिळते. अफिलिएट मार्केटिंग करून इन्फ्लुएन्सर महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.
अफिलिएट मार्केटिंग बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचा.
>>>अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?
3) Brand Promotion:
ज्या इन्फ्लुएन्सर कडे जास्त फॉलोवर्स असतात आणि त्याने अपलोड केलेल्या ब्लॉग वर किंवा विडिओ वर जास्त views येत असतील तर मग मोठं मोठ्या कंपनी त्यांना त्यांचे प्रॉडक्ट देऊन प्रोमोशन करायला सांगते.
त्या कंपनी अशा इन्फ्लुएन्सर ला खुप जास्त pay करतात.
4) Company Inauguration:
जेव्हा एखाद्या इन्फ्लुएन्सर ला खूप जास्त प्रसिध्दी मिळते तेव्हा शॉप किंवा कंपनी owner त्यांना त्यांच्या inauguration एक गेस्ट म्हणून बोलवतात. आणि त्यांना खूप जास्त pay करतात.
FAQ:
इन्फ्लुएन्सर म्हणजे काय?
इन्फ्लुएन्सर चे प्रकार कोणते?
इन्फ्लुएन्सर बनून किती पैसे कमवू शकतो?
इन्फ्लुएन्सर चे पैसे कमवण्याचे मार्ग कोणते?
निष्कर्ष:
मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? Influencer meaning in Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.
पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.