वेबसाईट म्हणजे काय? [2022 Full Details] | Website Meaning In Marathi

नमस्कार मित्रांनो, आताचा काळ हा डिजिटल काळ आहे. त्यामुळे आजच्या काळात वेबसाईट असणे खूप आवश्यक झालं आहे. तर या ब्लॉग मध्ये आपण वेबसाईट म्हणजे काय? What Is Website meaning In Marathi हे बघणार आहोत.

आपण सर्वजण डिजिटल च्या काळात जगत आहोत. संपूर्ण जग हळू हळू डिजिटल होत आहे आणि आपला भारत देश पण डिजिटली ग्रो करत आहे. या डिजिटल च्या काळाच्या आपण सर्वजण इंटरनेट चा वापर जास्त करत आहोत.

कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवायची असेल तर आपण गूगल वर शोधतो. पण ही माहिती गूगल वर येते कुठून याचा कधी विचार केलाय का? आपल्याला हवी असणारी सर्व माहिती गूगल वर कशी काय मिळते? गूगल वर ही माहिती कोण आणि कशी टाकते?

तर मित्रांनो ही माहिती गूगल वर वेबसाईट च्या स्वरुपात जमा केलेली असते. काही ब्लॉगर ही माहिती वेबसाईट च्या माध्यमातून गूगल वर अपलोड करतात. आणि मग जेव्हा आपण गूगल वर काही सर्च करतो तर गूगल ती माहिती असणाऱ्या वेबसाईट दाखवते आणि आपण त्यावे बसाईट वर क्लिक करून ती माहिती मिळवतो.

तुमच्यापैकी सर्वानाच वेबसाईट बद्दल थोडीफार माहिती असेलच. पण actual मध्ये definition काय आहे वेबसाईट ची आणि आपल्याला वेबसाईट एवढी का गरजेची असते? हे या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

तसेच आपण या ब्लॉग मध्ये वेबसाईट म्हणजे काय? What is website meaning in Marathi? वेबसाईट चे किती प्रकार आहेत? वेबसाईट कशी तयार केली जाते? वेबसाईट मधून तुम्ही पैसे कसे कमवायचे असे सर्व पॉईंट बघणार आहोत.

जर तुम्हाला वेबसाईट बद्दल सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील आणि वेबसाईट बनवून महिन्याला लाखो रुपये कमवयाचे असतील तर हा ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण वाचा.

तर चला आता बघूया वेबसाईट ची नक्की definition काय आहे?

वेबसाईट म्हणजे काय?

What Is Website Meaning In Marathi?

website meaning in marathi

हे डिजिटल युग येण्याअगोदर आपण माहिती मिळवण्यासाठी पुस्तके वाचायचो. पुस्तकामध्ये अनेक पानांवर माहिती दिलेली असते, त्या प्रत्येक पानावर वेगवेगळी माहिती दिलेली असते. तसेच वेबसाईटच आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेबसाईट म्हणजे इंटरनेट वर प्रकाशित होणार एक पुस्तक होय ज्याच्या माध्यमातून कोणत्यापण गोष्टीची माहिती देऊ शकतो आणि तसेच वस्तू किंवा सेवा विकू शकतो.

एक विषय घेऊन त्यावर माहिती लिहून डोमेन आणि होस्टिंग च्या मदतीने इंटरनेट वर प्रकाशित करणे म्हणजे वेबसाईट.

उदा. digitalvipulk.com ही माझी वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात. माझ्या या वेबसाईट वर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईन पैसे कमवणे याबद्दल ची माहिती मिळते.

तसेच amazon.in, flipkart.com, myntra.com, digitalstarx.com अशा वेबसाईट आहे ज्यावरून आपण वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतो.

तुम्हाला आता वेबसाईट च बेसिक कन्सेप्ट समजलीच असेल की वेबसाईट म्हणजे नक्की काय?

मित्रांनो आजच्या काळात वेबसाईट ला खूप डिमांड आलं आहे. वेबसाईट शिवाय कोणताच business grow होऊ शकत नाही. वेबसाईट म्हणजे बिजनेस ला grow करण्याचं सर्वात मोठं साधन आहे.

तसेच पर्सनल वेबसाईट पण चांगल्याच grow करत आहेत. ब्लॉगिंग वेबसाईट ने तर लोकांना करोडपती, लखपती च बनवलं आहे. म्हणजेचऑनलाईन पैसे कमवण्याचं सर्वात मोठा मार्ग म्हणजे वेबसाईट होय.

आपण हे सर्व सविस्तर बघूया म्हणजे तुम्हाला अजून जास्त clear होईल. आणि तुम्ही पण तुमची एक वेबसाईट नक्कीच बनवाल आणि त्यातून चांगले पैसे पण earn करसाल.

तर चला आता बघूया वेबसाईट मधील महत्वाचे घटक. हे तुम्हाला माहित असणे खूप आवश्यक आहे.

वेबसाईट मधील महत्वाचे घटक (Important Website Related Elements)

तुम्हाला जर वेबसाईट बद्दल सर्व जाणून घ्यायचं असेल तर वेबसाईट related सर्व घटक समजून घेणे आवश्यक आहे. वेबसाईट चे महत्वाचे घटक खालीलप्रमाणे:

1) डोमेन नेम आणि वेब होस्टिंग (Domain Name & Web Hosting):

डोमेन नेम आणि होस्टिंग म्हणजेच वेबसाईट. म्हणजेच डोमेन नेम आणि होस्टिंग मिळून च एक वेबसाईट तयार होते.

डोमेन नेम म्हणजे तुमच्या वेबसाईट चा पत्ता किंवा वेबसाईट च नाव. उदा. digitalvipulk.com हे माझ्या वेबसाईट च डोमेन नेम आहे.

डोमेन नेम बद्दल पूर्ण डिटेल मध्ये जाऊन घेण्यासाठी तुम्ही खालील ब्लॉग वाचू शकता. यामध्ये तुम्हाला डोमेन नेम बद्दल सर्व माहिती मिळेल.

>>> डोमेन नेम म्हणजे काय?

वेब होस्टिंग म्हणजे आपल्या वेबसाईट वरील माहिती इंटरनेट वर साठवून ठेवण्याची जागा. एक चांगली होस्टिंग घेणं खूप important असते.

होस्टिंग बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील ब्लॉग वाचू शकता. तुम्ही खालील ब्लॉग वाचला तर तुम्ही सुध्दा एक बेस्ट होस्टिंग निवडू शकता आणि तुमची वेबसाईट तयार करू शकता.

>>> वेब होस्टिंग म्हणजे काय?

2) वेबपेज (Webpage):

मित्रांनो वेबसाईट ही वेबपेज वर तयार होते. म्हणजेच वेबसाईट मधील वेबपेजस आणि पोस्ट हेच असते. आता वेबपेजेस म्हणजे नक्की काय थोडं उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल.

पुस्तकांमध्ये जसे पेजेस असतात आणि वेग वेगळ्या पेजेस वर जशी माहिती असते तसेच वेबसाईट मध्ये वेबपेजेस असतात आणि प्रत्येक पेज वर वेग वेगळी माहिती दिलेली असते. एखाद्या पेज वर जर कॉम्पुटर म्हणजे काय? याची माहिती असेल तर दुसऱ्या एखाद्या पेज वर कॉम्पुटर चे प्रकार ही माहिती असेल.

तसेच तुम्ही प्रत्येक वेबसाईट मध्ये बघत असणार home, about us, contact us, our services हे पण पेजेस आहेत. हे सर्वात main pages असतात. यावरून च लोकांना तुमच्या वेबसाईट बद्दल सजमते की नक्की कशाची वेबसाईट आहे.

वेबपेज चे तीन प्रकार पडतात:

A) Dynamic Web Pages:

डायनॅमिक वेबपेज हे automatically बदलत राहतात. उदा. Facebook ची news feed मध्ये regularly काही ना काही update होत राहते. त्यामुळे अशा पेजेस ला dynamic webpage म्हणतात. हे पेजेस एक specific algorithm वर काम करत असतात त्यामुळे ते automatically change होतात.

B) Static Webpage:

स्टॅटिक वरून च याचा अर्थ कळून येतो की हे पेजेस स्टॅटिक असतात म्हणजेच change होत नाहीत. स्टॅटिक वेबपेज मध्ये कोणतेच बदल होत नाही त्यामुळे त्यांना स्टॅटिक वेबपेज असते म्हणतात. यामध्ये तुमच्या वेबसाईट मधील पोस्ट चा समावेश होतो.

उदा. आता तुम्ही हा ब्लॉग वाचताय तर हे स्टॅटिक पोस्ट आहे. यामध्ये automatic काही changes होत नाहीत.

C) Home Page:

वेबसाईट मधील सर्वात महत्वाचं पेज म्हणजे ते होम पेज. तुम्ही पण ही गोष्ट नोटीस केली असेल जेव्हा कधी आपण एखाद्या वेबसाईट वर क्लिक करतो तर डायरेक्ट त्या वेबसाईट च्या home page वर जातो.

होम पेज वेबसाईट बद्दल सर्व डिटेल्स असतात. त्यामुळे आपल्याला लगेच कळून येते की ही वेबसाईट कशाबद्दल आहे. त्यामुळे आपल्या वेबसाईट च home page चांगलं आणि आकर्षित बनवणे खूप महत्वाचे असते.

3) यू आर एल (URL/Web Address):

तुम्ही URL हा वर्ड खूप वेळा ऐकलंच असेल. जस पुस्तकामध्ये पेज वर नंबर असतात आणि त्या नंबर च्या मदतीने आपण ठराविक पेज वर लगेच जाऊन शकतो आणि त्या पेज ची माहिती मिळवू शकतॊ.

तसेच वेबसाईट मध्ये पण खूप पेजेस असतात आणि तुम्हाला जर एखाद्या ठराविक पेज वरची च माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी प्रत्येक पेज ला URL दिले जातात.

उदा. digitalvipulk.com ही माझी वेबसाईट आहे. तर माझ्या या वेबसाईट मध्ये खूप पेजेस आहेत. पण जर तुम्हाला माझ्या वेबसाईट मधून फक्त ब्लॉगिंग ची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही digitalvipulk.com/blogging meaning in marathi असं गूगल वर टाकलं तर तर तुमच्यासमोर डायरेक्ट ते पेज ओपन होईल आणि तुम्ही तिथून सर्व माहिती मिळवू शकता.

वेबसाईट चे URL किंवा web address हे digitalvipulk.com/blogging-meaning-in-marathi या पध्दतीने दिसतात.

मित्रांनो या मध्ये पण अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे URL बनवायचा किंवा change करायच तर हे फक्त त्या वेबसाईट चा मालक च करू शकतो पण facebook, twitter यांसारख्या मोठ्या वेबसाईट मध्ये user त्यांच्या अकाउंट profile च्या संबंधित URL change करू शकतात.

4) वेब ब्राउझर (Web Browser):

वेब ब्राउझर्स म्हणजे काय आहे आपल्यापैकी सर्वाना च माहित असेल. वेब ब्राउझर म्हणजे एक टूल ज्याच्या मदतीने आपण इंटरनेट चालवू शकतो. म्हणेजच Google वर जाऊन सर्च करू शकतॊ. उदा.Google Chrome, Firefox, Opera Mini, UC Browser, Microsoft Edge, etc.

5) सर्च इंजिन (Search Engine):

यावरून चा याचा अर्थ कळून येतो. सर्च इंजिन म्हणजे त्यावर सर्च करून आपल्याला कोणतीही माहिती मिळवता येते. उदा. Google.com, Yahoo.com, Bing.com हे जास्त use करणारे सर्च इंजिन आहेत.

पण Google.com हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.

6) पोस्ट (Post):

पोस्ट म्हणजे वेबपेज वर जो कंटेन्ट लिहलेला असतो त्याला पोस्ट असे म्हणतात. तुम्ही आता हा ब्लॉग वाचत आहात ही एक पोस्ट आहे.

मित्रांनो प्रत्येक पोस्ट ही एक वेबपेज असू शकते पण प्रत्येक वेबपेज ही पोस्ट नसते.

पोस्ट हे जास्त करून ब्लॉगिंग वेबसाईट मध्ये दिसून येतात.

7) लिंक (Link):

वेबसाईटच्या सर्व पेजेस लिंक ला असते. ती लिंक आपण कोणासोबत पण share करू शकतो आणि त्या लिंक वर कोणीपण क्लिक करून त्या लिंक मध्ये असलेली माहिती access करू शकतो.

8) कंटेन्ट (Content):

मित्रांनो कोणतीही वेबसाईट without कंटेन्ट ची बनत नाही. कंटेन्ट हा वेबसाईट चा अमूल्य भाग आहे. कंटेन्ट शिवाय कोणतीही वेबसाईट अधुरी आहे असं म्हणायला पण हरकत नाही. कारण कंटेन्ट हीच त्या वेबसाईट ची ओळख असते.

तुमच्या वेबसाईट वरील कंटेन्ट जेवढा चांगला तेवढी ती वेबसाईट चांगली असं मानलं जाते. ब्लॉगिंग वेबसाईट मध्ये तर कंटेन्ट ला वेगळंच स्थान आहे. कारण कंटेन्ट वर च ती वेबसाईट चालत असते.

कंटेन्ट हे text, video, audio या फॉरमॅट मध्ये असते. तुम्हाला कंटेन्ट बद्दल अजून जास्त माहिती हवी असेल तर खालील ब्लॉग वाचा.

>>> कंटेन्ट रायटिंग म्हणजे काय? कंटेन्ट रायटिंग करून पैसे कसे कमवायचे?

9) एसईओ (SEO):

SEO लाच Search Engine Optimization असे म्हणतात.

मित्रांनो तुम्ही विचार करा, तुम्ही मस्त वेबसाईट बनवली, त्यावर चांगला कंटेन्ट लिहला, चांगल्या पोस्ट केल्या पण तुमची वेबसाईट लोकांपर्यंत पोहचतच नाही! तर मग एवढं सर्व करून काय उपयोग झाला?

जर तुम्हाला तुमच्या वेबसाईट मधून पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमची वेबसाईट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे खूप आवश्यक असते. मग तुमची बिजनेस वेबसाईट असो किंवा ब्लॉगिंग वेबसाईट.

यासाठी सर्वात मोठी आणि आवश्यक टर्म म्हणजे SEO. मित्रांनो आपण गूगल वर काही सर्च केलं तर जास्तकरून पहिल्या लिंक वरच क्लिक करतो किंवा जास्तीत जास्त खालच्या एक-दोन लिंक वर क्लीक करतो.

तर पहिल्या शेकडो वेबसाईट मधून गूगल च्या पहिल्या पेज वर येण्यासाठी काही आपल्या वेबसाईट मध्ये काही technical गोष्टी करा लागतात,यालाच SEO असे म्हणतात. SEO खूप महत्वाचा असतो. SEO बद्दल संपूर्ण जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

>>>SEO म्हणजे काय?

तर चला मित्रांनो आता वेबसाईट चे किती प्रकार आहेत ते बघूया.

वेबसाईट चे प्रकार (Types Of Website In Marathi)

1) स्टॅटिक वेबसाईट (Static Website):

मित्रांनो स्टॅटिक वेबसाईट ही एक सामान्य वेबसाईट असते. या वेबसाईट वर स्थिर माहिती असते. ती माहिती व्हिसिटर्स नुसार बदलत नाही. प्रत्येक व्हिसिटर्स ला या वेबसाईट मध्ये सारखीच माहिती दिसते. जेव्हा ऍडमिन काही वेबसाईट मध्ये काही बदल करेल तेव्हाच वेबसाईट मध्ये बदल होतो.

व्हिसिटर्स आपली वेबसाईट सर्च केली तर आपण सर्वर जी माहिती साठवली आहे तीच माहिती व्हिसिटर्स ला दिसते, त्यात सर्वर काही बदल करत नाही. Content Management System (CMS) चा वापर केला जात नाही.

स्टॅटिक वेबसाईट बनवायला खूप सोपी असते. वेबसाईट तयार करण्यासाठी जास्त प्रोग्रामिंग भाषा यायची गरज नाही,फक्त HTML ह्या प्रोग्रामिंग भाषेने आपण वेबसाईट तयार करू शकतो. डेटा बेस तयार करण्याची गरज नसते. प्रत्येक पेज साठी कोडिंग ही सारखीच असते.

आता तर वर्डप्रेस मध्ये without coding ची पण वेबसाईट बनवता येते. आणि वर्डप्रेस वर वेबसाईट बनवणे खूप easy आहे.

छोट्या उद्योजकांसाठी स्टॅटिक वेबसाईट योग्य आहे, कारण त्यांना त्या वेबसाईट वर फक्त व्यवसायाची माहिती द्यायची असते. छोटे उद्योजक २-३ पेज बनवून माहिती देऊ शकतात. आणि ही वेबसाईट तयार करून घ्यायला खर्च कमी येतो.

2) डायनॅमिक वेबसाईट (Dynamic website):

डायनॅमिक वेबसाईट बनवायला PHP,SERVLET, JSP, and ASP.NET ह्यांसारख्या प्रोग्रामिंग भाषा यायला हव्या. तसेच Content Management System (CMS) चा वापर केला जातो. प्रत्येक पेज साठी कोडिंग ही सारखी नसते.

तुम्ही कोडींग चा वापर करून पण बनवू शकता. तसेच सर्वात बेस्ट म्हणजे WordPress वर पण तुम्ही dynamic वेबसाईट बनवू शकता. वर्डप्रेस वर वेबसाईट बनवायला कोणत्याच coding language ची गरज नसते.

या वेबसाईट वरील माहिती व्हिसिटर्स च्या डेटा बेस नुसार बदलत राहते. प्रत्येक व्हिसिटर्स ला वेगवेगळी माहिती दाखवली जाते. डेटा लवकर तयार करून लवकर बदलून व्हिसिटर्स ला दिसते.

डायनॅमिक वेबसाईट बनवायला थोडी अवघड असते, म्हणजे थोडा वेळ लागतो. त्यामुळे डायनॅमिक वेबसाईट ही खर्चिक असते.

छोटे-मोठे उद्योजक ही वेबसाईट बनवून घेऊ शकतात. डायनॅमिक वेबसाईट वापरण्याचा फायदा असा की ही हाताळायला सोपी असते.

वेबसाईट चे वापरानुसार अजून प्रकार पडतात.

  • पर्सनल वेबसाईट/ब्लॉग:

ह्या वेबसाईट मध्ये तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती देऊ शकता म्हणजे तुमची रोजची दिनचर्या काय आहे? तुम्ही तुमची कामे कसे करता? ह्या प्रकारची माहिती देतात. सध्या इंटरनेट वर खूप साऱ्या पर्सनल वेबसाईट/ब्लॉग वेबसाईट आहेत.

  • कंपनी वेबसाईट:

या वेबसाईट मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसाय ची माहिती इंटरनेट साठवून ठेऊ शकता. जेणे करून तुमच्या व्यवसायाची सगळी माहिती तुमच्या व्हिसिटर्स भेटू शकते.

  • शाळा / कॉलेज / शैक्षणिक वेबसाईट:

या वेबसाईट मध्ये तुमच्या शाळा / कॉलेज ची माहिती साठवून ठेऊ शकता. जेणे करून तुमच्या शाळेची सगळी माहिती तुमच्या व्हिसिटर्स भेटू शकते.

  • शॉपिंग / ई-कॉमर्स वेबसाईट:

आपल्या वस्तू इंटरनेट वर विकण्यासाठी शॉपिंग / ई-कॉमर्स वेबसाईट या वेबसाईट चा उपयोग होतो.या वेबसाईट वर आपण आपले प्रॉडक्ट ची माहिती व्हिसिटर्स ला देऊ शकतो आणि आपले प्रॉडक्ट ऑनलाईन विक्री करू शकतो.

  • सोशल वेबसाईट:

सोशल वेबसाईट म्हणजे मनोरंजन साठी अश्या वेबसाईट बनवल्या जातात. उदा. फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी वेबसाईट आहेत त्या सोशल नेटवर्क साठी वापरल्या जातात. आपण आपले मत सोशल वेबसाईट वरती टाकून जगाशी संवाद करू शकतो आणि आपले मत प्रभावीपणे मांडू शकतो.

  • प्रश्न – उत्तर वेबसाईट:

या वेबसाईट मध्ये लोक प्रश्न विचारू शकतात आणि ज्यांना त्या प्रश्नाची उत्तरे माहित असतात ते उत्तरे देऊ शकतात. उदा. Quora

  • विडिओ वेबसाईट

या वेबसाईट वर विडिओ मध्ये कंटेन्ट उपलोड केला जातो. उदा. YouTube

वेबसाईट चे काही पार्ट:

मित्रांनो वेबसाईट मध्ये काही पार्ट असतात. म्हणजेच वेबसाईट काही पार्ट एकत्र करून बनते.

1) लोगो (Logo):

जवळ जवळ सर्व च वेबसाईट चे लोगो असतात. तस तुम्ही लोगो लावू शकता किंवा नाही लावला तरी काही प्रॉब्लेम नसतो. पण तुमच्या वेबसाईट ला आकर्षित करण्यासाठी आणि वेबसाईट ची ओळख चांगली बनवण्यासाठी लोगो उपयोगी असतो.

2) बॉडी (Body):

वेबसाईट ची म्हणजेच त्या वेबसाईट चा कंटेन्ट. बॉडी मध्येच कंटेन्ट असतो.

3) हेडर (Header):

वेबसाट च्या हेडर section मध्ये वेबसाईट चे सर्व मेन पेजेस आणि लोगो असतो. यामध्ये about us, contact us, असे पेजेस असतात.

4) फूटर (Footer):

फूटर मध्ये थोडीफार तुमच्या वेबसाईट ची माहिती, कॅटेगरी, न्यूज लेटर हे सर्व ऍड करू शकता. तसेच पोलिसी आणि disclaimer पेजेस ऍड करा.

5) फीड (Feed):

वेबसाईट च्या होमी पेज वर जो कंटेन्ट असतो त्याला फीड असे म्हणतात.

6) साईडबार (Sidebar):

जेव्हा आपण कोंटीपण वेबसाईट ओपन करतो तेव्हा त्या वेबसाईट च्या साईड जी माहिती दिसते त्याला साईडबार असे म्हणतात.

7) मेनू (Menu):

मेनू मध्ये कॅटेगरी बनवल्या जातात आणि त्यामुळे आपण कोणतीपण कॅटेगरी ओपन करून माहिती मिळवू शकतो.

वेबसाईट मधून पैसे कसे कमवायचे? (How To Earn Money From Website In Marathi?)

मित्रांनो वेबसाईट मधून पैसे कमवायचे खूप मार्ग आहेत. एकदा जर तुमच्या वेबसाईट च ट्राफिक वाढलं तर तुम्ही वेबसाईट मधून खूप जास्त पैसे कमवू शकता.

1) गूगल ऍडसेन्स (Google Adsense):

वेबसाईट मधून पैसे कमवायचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे गूगल ऍडसेन्स. तुम्ही तुमच्या वेबसाईट वर गूगल ads लावून पैसे कमावू शकता.

2) अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing):

जेव्हा तुमच्या वेबसाईट वर जास्त visitor येत असतील तेव्हा तुम्ही त्यांना प्रॉडक्ट अफिलिएट करून त्यातून पैसे कमवू शकता. अफिलिएट मार्केटिंग बद्दल अजून जास्त माहिती जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉग वाचा.

>>> अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय?

3) प्रोमोशन (Promotion):

जेव्हा तुमच्या वेबसाईट वर जास्त ट्राफिक येते तेव्हा मोठ्या मोठ्या कंपनी त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुमच्या वेबसाईट वर promote करण्यासाठी देतात. त्यातून खूप जास्त प्रमाणात पैसे कमावू शकता.

4) प्रॉडक्ट किंवा सर्व्हीस विकणे (Sell Product & Service):

जर तुमच्याकडे तुमचे स्वतःचे प्रॉडक्ट किंवा सर्विस असेल तर तुम्ही ते वेबसाईट वरून विकू शकता. आणि त्यामधून जास्त प्रमाणात पैसे कमवू शकता.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये वेबसाईट म्हणजे काय? What Is Website Meaning In Marathi? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट भेटतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend

0 thoughts on “वेबसाईट म्हणजे काय? [2022 Full Details] | Website Meaning In Marathi”

Leave a Comment