वर्डप्रेस म्हणजे काय? पैसे कमवणारा ब्लॉग कसा तयार करायचा? [2022 Full Guide] | WordPress Marathi Blogs

नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन पैसे कामवायचे? तर त्यासाठी वेबसाईट हा सर्वात बेस्ट मार्ग आहे. आणि वर्डप्रेस वर आपण easily वेबसाईट बनवू शकतो.

WordPress Marathi Blogs म्हणजेच आपण वर्डप्रेस वर पैसे कमवणारा ब्लॉग कसा तयार करायचा? आणि वर्डप्रेस म्हणजे काय? हे आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

मित्रांनो आजच्या काळात ऑनलाईन पैसे कमावणे काहीच अवघड राहील नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकता. एक Boss free लाईफ जगू शकता. तुम्ही ऑनलाईन तुमचा स्वतःचा बिजनेस सुरु करू शकता.

पण यासाठी तुम्हाला एखाद स्किल यायला च हवे. तुम्ही एखाद्या स्किल वर च ऑनलाईन पैसे कमवू शकता. आणि हा आता ज्यांच्याकडे स्किल नाही ते पण ऑनलाईन स्किल शिकू शकतात. एखाद नवीन स्किल शिकायला 3-6 महिने लागतात.

आपण आपल्या डिग्री ला पण 4 वर्ष देतो तेव्हा कुठेतरी आपल्याला जॉब मिळतो. त्यामुळे तुम्ही 3-6 महिने द्यायला काही हरकत नाही. त्यामधून तुम्हाला एक बेस्ट स्किल सांगतो ते म्हणजे वेबसाईट डिझाईन.

खूप लोक वेबसाईट डिझाईन करून महिन्याचे लाखो रुपये कमवत आहेत. तसेच स्वतःच्या वेबसाईट वर ब्लॉग लिहून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.

तर तुम्हाला आता वाटत असेल की वेबसाईट डिझाईन करायला तर कोडींग नॉलेज ची आवश्यकता आहे. पण असं नाहीये मित्रांनो, आता तुम्ही वर्डप्रेस वर सहजरित्या तुमची स्वतःची वेबसाईट बनवू शकता ते ही कोडिंग नॉलेज नसताना पण.

आता वेबसाईट डिझाईन करायला कोडिंग नॉलेज ची काहीच नाही. जर तुम्हाला तुमची वेबसाईट बनवायची असेल तर तुम्हाला वर्डप्रेस बद्दल माहित असणे खूप आवश्यक आहे कारण तुम्ही वर्डप्रेस वर without coding knowledge ची वेबसाईट बनवू शकता.

तर मित्रांनो आपण वर्डप्रेस म्हणजे काय? WordPress Meaning In Marathi हे जाणून घेऊ आणि नंतर वर्डप्रेस वर वेबसाईट कशी डिझाईन करायची हे बघूया.

वर्डप्रेस म्हणजे काय?

What Is WordPress Meaning In Marathi? 

wordpress marathi blog

वर्डप्रेस पण एक वेबसाईट च आहे. पण ही अशी वेबसाईट आहे की ज्याच्या मदतीने आपण दुसऱ्या वेबसाईट बनवू शकतो. वर्डप्रेस एक असं शक्तिशाली tool आहे ज्याच्या मदतीने मोठं मोठ्या बिजनेस आणि ईकॉमर्स वेबसाईट तसेच ब्लॉगिंग वेबसाईट अगदी सहज पध्दतीने बनवू शकतो.

वर्डप्रेस हे एक CMS आहे. म्हणजेच content manegemnet system आहे. यामध्ये SQL आणि PHP या कोडिंग च मिश्रण आहे. त्यामुळे आपल्याला वेबसाईट डिझाईन करायला extra कोणतं कोडींग नॉलेज ची गरज नसते.

म्हणजेच वर्डप्रेस मध्ये वेबसाईट डिझाईन करायला कोणतीही कोडिंग लागत नाही. त्यामध्ये alredy खूप plugins असतात आणि त्या plugins वापरून आपण आपल्यलाला हवी तशी वेबसाईट डिझाईन करू शकतो.

मित्रांनो वर्डप्रेस हे 2003 साली लाँच झाले होते. आणि वर्डप्रेस ची लोकप्रियता बघत आता संपूर्ण जगभरातील 37% वेबसाईट वर्डप्रेस वर बनल्या आहेत. आणि हा एकदा आता दिवसेंदिवस वाढत च आहे. कारण आता तर डिजिटल च युग आहे. त्यामुळे रोज हजारो वेबसाईट बनत आहेत.

आजकाल तर खूप वेबसाईट या वर्डप्रेस वर बनत आहेत. कारण जर एखाद्याला वेबसाईट बनवायची असेल त्याला कोडिंग नॉलेज येणे आवश्यक आहे नाहीतर एखाद्या वेबसाईट डेव्हलपर कडून डिझाईन करून घ्या लागेल. आणि वेबसाईट डेव्हलपर खूप जास्त प्रमाणात त्यांचे चार्जेस घेतात.

यामुळे याला पर्याय म्हणून वर्डप्रेस हा सर्वात बेस्ट मार्ग आहे. वर्डप्रेस मध्ये पण दोन प्रकार आहेत. ते जाऊन घेणें पण आवश्यक आहे.

वर्डप्रेस चे प्रकार (WordPress Marathi Blogs)

1) WordPress.com

WordPress.com हे असं टूल आहे की ज्यावर तुम्ही फ्री मध्ये वेबसाईट डिझाईन करू शकता. यामध्ये तुम्हाला काहीच खरेदी करा लागत नाही. जस google च्या Blogger.com वर फ्री मध्ये वेबसाईट डिझाईन करता येते तस wordpress.com वर फ्री मध्ये वेबसाईट डिझाईन करता येते.

जर तुम्हाला नवीन ब्लॉगिंग वेबसाईट बनवायची असेल तर wordpress.com हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे वेबसाईट बनवून त्या वेबसाईट वर ब्लॉग लिहू शकता.

पण यामध्ये काही limitation आहेत. तुम्हाला काही ठराविक फीचर्स चा वापर करता येतो. जस ब्लॉगर वर ठराविक फीचर्स च वापरू शकतो.

जर तुम्हाला स्वतःची ब्लॉगिंग वेबसाईट फ्री मध्ये तयार करायची असेल आणि फ्री मध्ये वेबसाईट तयार करून पैसे कमवायचे असतील तर खालील लिंक वर क्लिक करून सर्व माहिती मिळवू शकता.

>>>फ्री ब्लॉग कसा तयार करावा?

2) WordPress.org

मित्रांनो, wordpress.org हा पण फ्री प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या मदतीने आपण फ्री मध्ये वेबसाईट डिझाईन करू शकतो. फक्त यामध्ये तुम्हाला डोमेन आणि वेब होस्टिंग खरेदी करून ती वर्डप्रेस सोबत कनेक्ट करा लागते. हा प्लॅटफॉर्म सर्वात लोकप्रिय आहे.

गूगल पण या प्लॅटफॉर्म वर बनलेल्या वेबसाईट ला जास्त प्राधान्य देते. यामध्ये तुम्हाला खूप फीचर्स दिले जातात. त्याचा वापर करून कोणीपण सहज वेबसाईट बनवू शकतात. यामध्ये खूप themes, plugins, tools दिले जातात. त्यामुळे वेबसाईट डिझाईन करायला खूप easy जाते.

वरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये डोमेन आणि वेब होस्टिंग कनेक्ट करा लागते. तर डोमेन आणि होस्टिंग बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही माहिती मिळवू शकता.

>>>डोमेन नेम म्हणजे काय?

>>>वेब होस्टिंग म्हणजे काय?

आता आपण वर्डप्रेस चे प्रकार बघितले आहेत. पण नक्की वर्डप्रेस एवढं का लोकप्रिय झालं आहे? हे जाणून घेण्यासाठी याचे काही फीचर्स बघूया.

वर्डप्रेस चे वैशिष्ट (WordPress Features In Marathi)

1) No Coding Required:

वर्डप्रेस च सर्वात मोठं फिचर म्हणजे हेच की यामध्ये करायला coding language ची गरज लागत नाही. आणि वर्डप्रेस easily वेबसाईट बनवू शकतो.

2) Multi Website:

तुम्ही वर्डप्रेस वर प्रोफेशनल वेबसाईट बनवू शकता. ज्यामध्ये बिजनेस वेबसाईट, ईकॉमर्स वेबसाईट, पोर्टफोलिओ वेबसाईट आणि ब्लॉगिंग वेबसाईट बनवू शकता. वेबसाईट बद्दल आणि वेबसाईट च्या प्रकारबद्दल अजून जास्त माहित करून घ्यायचं असेल तर खालील लिंक वर क्लिक करा.

>>>वेबसाईट म्हणजे काय?

3) Easy To Create:

PHP सारख्या प्लॅटफॉर्म वर वेबसाईट बनवणे खूप हार्ड काम आहे. PHP कोडींग च पूर्ण नॉलेज असणे आवश्यक आहे. पण वर्डप्रेस वर easy वेबसाईट बनवू शकता. यामध्ये पण फक्त drag & drop करून तुम्हाला हवी तशी वेबसाईट बनवू शकता.

4) SEO Friendly:

कोणत्याही वेबसाईट ला SEO खूप महत्वाचे असते. त्यामुळे वर्डप्रेस वर बनणाऱ्या वेबसाईट या already SEO friendly असतात. आणि त्यामध्ये अजून Yoast, RankMath यासारखे plugin असतात. त्यामुळे आपल्याला वेबसाईट चा SEO एकदम सहजरित्या करता येतो.

मित्रांनो, जर तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तर तर SEO बद्दल महित असणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही हा खालील ब्लॉग नक्की वाचा.

>>>SEO म्हणजे काय?

5) Plugins:

वर्डप्रेस मध्ये खूप plugins असतात. त्या plugins चा वापर करणे पण खूप easy असते. त्या सर्व plugins मुळेच वेबसाईट ला एक बेस्ट डिझाईन देता येते. उदा. Theme, Yoast, Rank math, Elementor यासारखे plugins असतात.

6) Less Cost:

वर्डप्रेस वर वेबसाईट बनवायला खूप कमी खर्च येतो. यामध्ये फक्त तुम्हाला डोमेन आणि वेब होस्टिंग च खरेदी करा लागते.

मित्रांनो, तुम्ही वर्डप्रेस बद्दल सर्व जणून घेतलं. आशा करतो तुमचे वर्डप्रेस चे सर्व doubt clear झाले असतील. तर चला आता पैसे कमवणारी ब्लॉगिंग वेबसाईट कशी बनवली जाते ते बघूया.

वर्डप्रेस वर ब्लॉग कसा तयार करायचा? How To Create Blog On WordPress In Marathi?

मित्रांनो, ब्लॉगिंग वेबसाईट बनवण्याच्या अगोदर सर्वात महत्वाच असते  तुमची निश. तुम्हाला कोणत्या टॉपिक वर ब्लॉग लिहायचे आहेत ते म्हणजेच निश.

तुम्हाला ब्लॉगिंग निश बद्दल संपूर्ण जाणून घ्यायचं असेल आणि तसेच profitable निश कशी निवडायची हे जाणून घ्यायचं असेल तर  खालील ब्लॉग पूर्ण वाचा.

>>> ब्लॉगिंग निश म्हणजे काय? ब्लॉगिंग निश कशी निवडायची?

तुम्ही blogger.com वर फ्री मध्ये वेबसाईट बनवू शकता. पण वरती सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुम्हाला लिमिटेशन असतात.

त्यामुळे मी तुम्हाला recommend करतो की तुम्ही WordPress वर वेबसाईट बनवा. Beginner साठी खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे.

वर्डप्रेस वर तुम्हाला चांगले feature मिळतात. WordPress मध्ये खूप plugin आहेत जे तुम्हाला SEO साठी मदत करतात. तुमचा ब्लॉग रँक करायला मदत करतात. तुम्ही blogger पेक्षा चांगल्या प्रकारे वेबसाईट बनवून शकता.

वेबसाईट तयार करण्यासाठी होस्टिंग आणि डोमेन घ्यावे लागते.

डोमेन- डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईट च नाव. उदा. digitalstarx.com, digitalvipulk.com हे वेबसाईट च नाव आहे.

होस्टिंग – होस्टिंग म्हणजे आपल्या वेबसाईट ला इंटरनेट वर प्रकाशित करावे लागते. म्हणजेच तुमच्या वेबसाईट इंटरनेट वर स्टोर करणारी एक जागा.

मित्रांनो, वेबसाईट खरेदी करण्यासाठी खूप प्लॅटफॉर्म आहेत. उदा. Hostgator, Hostinger, Go-daddy, Bluehost, A2hosting इत्यादी.

पण मी माझ्या सर्व वेबसाईटसाठी Bluehost.in हा प्लॅटफॉर्म वापरतो. म्हणजेच Bluehost ची होस्टिंग वापरतो. याच कारण असं आहे की ही एक बेस्ट hosting provider कंपनी आहे. तुम्ही युट्यूब वर जाऊन किंवा गूगल वर जाऊन सर्च जरी केलं तरी bluehost च नाव त्या लिस्ट मध्ये टॉप वर च असेल.

त्यामध्ये अजून यांची होस्टिंग खूप चांगली आहे. Bluehost च सर्व्हर वेबसाईट वरील heavy ट्रॅफिक आरामशीर हाताळू शकते. वेबसाईट ला सर्व्हर संबंधीचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तसेच यांचा कस्टमर सपोर्ट पण खूप चांगला आहे. हे 24*7 सपोर्ट देतात.

त्यामुळे तुम्ही या bluehost वरून वेबसाईट खरेदी करा. तुम्हाला एक बेस्ट experience येईल.

Bluehost.in या लिंक वरू क्लिक करून तुम्ही होस्टिंग घेऊ शकता.

वेब होस्टिंग आणि वेबसाईट ब्लॉग तयार करण्यासाठी खालील step follow करा.

1) डोमेन आणि वेब होस्टिंग घेण्यासाठी या Bluehost.in या लिंक वर क्लिक करा.

2) क्लिक केल्यावर तुमच्यासमोर Bluehost website ची विंडो ओपन होईल. Get – Started या बटनावर क्लिक करा.

wordpress marathi blogs

3) नवीन विंडो ओपन होईल, view plans ह्या बटनावर क्लिक करा.

wordpress marathi blogs
4) खालील विंडो ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला कोणता प्लॅन हवा आहे तो निवडा. पण तुम्ही नवीन वेबसाईट बनवत असणार तर Basic Plan च निवडा.
wordpress marathi blogs
5)  डोमेन पेज ची विंडो ओपन होईल. या विंडो मध्ये तुम्ही डोमेन नाव विकत घेऊ शकता आणि जर तुम्ही आधीच डोमेन घेतले असेल तर या विंडो मध्ये add  शकता.
आधीच डोमेन घेतले असेल तर
·      Step A) तुम्ही घेतलेले डोमेन लिहा.
·      Step B) Next ह्या बटनावर क्लिक करा.
नवीन डोमेन नाव घेण्यासाठी 
·      Step A) तुमचं डोमेन नाव लिहा.
·      Step B) तुम्हाला जे extension हवं ते .com, .in, .net इत्यादी हे निवडा. शक्यतो extension निवडतानी .com हेच निवडा.
·      Step C) Next ह्या बटनावर क्लिक करा.
wordpress marathi blogs
6) जर तुम्ही निवडेल डोमेन नाव website वर उपलब्ध असेल तर The domain ……. Is available अशी notification दिसेल.
wordpress marathi blogs
·      Step A) तुम्ही ह्या बटनावर क्लिक करून डोमेन विकत घेऊ शकता किंवा
·      Step B) वेब होस्टिंग घेण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची माहिती न चुकता भरा. कारण त्याच नावाने तुमची payment पावती तयार होईल आणि त्याच mail-id वर payment पावती येईल.
·      Step C) वर क्लिक करून तुम्ही १२ महिने, २४ महिने किंवा ३६ महिने ह्या प्लॅन पैकी एक प्लॅन वरती क्लिक करा. नवीन वेबसाईट साठी १२ महिन्याचा प्लॅन बेस्ट राहील. तुम्ही १ वर्षाचा प्लॅन निवडा.
·      Package extras मध्ये जर तुम्ही एखाद Package हवे असेल तर त्या Package समोरील बॉक्स मधी क्लिक करा. तुमच्या Package नुसार तुमचे पैसे सुद्धा वाढेल. पण नवीन वेबसाईट साठी काही आवश्यकता नाही. त्यामुळे ते uncheck च राहूद्या.
wordpress marathi blogs
7)   Payment submit करण्यासाठी खालील स्टेप्स करा.
·     तुमच्याकडे जर मास्टरकार्ड असेल तर तुम्ही Pay by Visa/ Mastercard हा payment पर्याय निवडू शकता. आणि नसेल जर खालील स्टेप follow करा.
wordpress marathi blogs

A) तुम्ही Pay by RuPay यावर क्लिक करा. त्यांनतर खालील submit बटन वर क्लिक करा. तुमच्यासमोर खालील विंडो ओपन होईल.

wordpress marathi blogs

B) सर्व टॅक्स पकडून तुमची amount 4233.84rs एवढी होईल. हि विंडो ओपन झाल्यावर सर्वात खाली scan and pay option येईल त्यावर क्लिक करा. खालील विंडो ओपन होईल.

wordpress marathi blogs

C) Generate QR वर क्लिक करा.QR code ची विंडो ओपन होईल आणि Google pay, Phone pay, Paytm यापैकी एखाद कोणतं पण अँप वापरून QR code scan करून तुम्ही payment पूर्ण करा.

wordpress marathi blogs
  • तुम्ही जो ई-मेल दिला आहे त्या मेल वर तुम्हाला Bluehost कडून Username/email/domain name आणि Password येईल. तुम्ही तुमच्या G-mail account मधू जाऊन बघू शकता.
  • Account login (https://my.bluehost.in/web-hosting/cplogin)
  • Step A) Bluehost कडून तुम्हाला जो ई-मेल आला आहे त्या ई-मेल मधला Username/email/domain name येथे लिहा.
  • Step B) आणि Password येथे लिहा.
  • Step C) Log in ह्या बटनावर क्लिक करा.
wordpress marathi blogs

8) तुमचं ब्लूएहोस्ट अकाउंट ओपन होईल.

तुम्ही Log into WordPress बटनावर क्लिक करा.

wordpress marathi blogs

9) यानंतर तुमच्या वेबसाईट चा dashboard ओपन होईल. ज्यावरून तुम्ही तुमची वेबसाईट डिझाईन करू शकता आणि ब्लॉग लिहू शकता.

wordpress marathi blogs

10) यानंतर सर्वात महत्वाचं असते ते म्हणजे आपल्या वेबसाईट ला एक आकर्षक लुक देणे. आणि ते लुक theme ने मिळते. त्यासाठी सर्वात पहिले theme install करा. नवीन Theme घेण्यासाठी Appearance बटनावर वर क्लिक करा त्यांनतर Theme बटनावर क्लिक करा.

wordpress marathi blogs
wordpress marathi blogs
·      StepA) तुम्हाला जी theme हवी त्या theme च नाव लिहा. तुम्ही जर ब्लॉगिंग वेबसाईट बनवत असणार तर Generate Press ही theme वापर. जर तुम्ही बिजनेस वेबसाईट बनवत असणार तर Astra, WP Ocean अशा theme वापरू शकता.
·      StepB) ती theme कशी दिसते त्यासाठी preview ह्या बटनावर क्लिक करा.
·      StepC) जर ती theme तुम्हाला आवडली तर install ह्या बटनावर क्लिक करा.
wordpress marathi blogs

Activate बटन वर क्लिक करा.

wordpress marathi blogs

11) Theme install केल्यावर plugin install करणे आवश्यक असते. खालील स्टेप follow करून plugin install करा. नवीन plugin add करण्यासाठी तुम्ही plugin या बटन वर क्लिक करून add new वर क्लिक करा.

wordpress marathi blogs
wordpress marathi blogs
तुम्ही plugin च नाव टाकून ती प्लगइन इण्टसल्ल करा. install केल्यानंतर activate चा option येईल त्यावर क्लिक करून activate करा. तुम्ही खालील plugin activate करा.

Rank Math SEO, Site Kit By Google, Ninja Forms, Updraft, Social Icon Widget, One signal Notification, Elementor, Easy Table of Content.

12) आता सर्वात महत्वाचं म्हणजे पोस्ट लिहणे.

  • Step A) Post बटनावर क्लिक करा.
  • Step B) Add New बटनावर क्लिक करा.
wordpress marathi blogs
  • Post Edit करायची विंडो ओपन होईल.
  •  Step A) पोस्ट title मधी तुम्ही ब्लॉगtitle लिहा. तुम्ही तुमचा कीवर्ड येथे लिहा.
  •  Step B) जो तुमचा ब्लॉग आहे तो येथे लिहा. Editing साठी येथे टूल्स फ्री टूल्स आहेत.
  • Step C) पोस्ट publish करण्यासाठी publish ह्या बटनावर क्लिक करा.
wordpress marathi blogs
13) एवढं झाल्यावर तुमची पोस्ट पब्लिश झाली. ती पोस्ट बघण्यासाठी Home (तुमचं डोमेन नेम) वर क्लिक करा.
wordpress marathi blogs
13) तुमची वेबसाईट create झाल्यावर आणि पोस्ट पब्लिश झाल्यावर ती Google submit करणे खूप गरजेचं असते. तुम्ही Google Serach Console वर जाऊन तुमची वेबसाईट submit करा.
wordpress marathi blogs
तुमच्या वेबसाईट च नाव टाकून सबमिट करा.

या प्रकारे आपण बघितलं की वर्डप्रेस म्हणजे काय? वर्डप्रेस वर वेबसाईट कशी बनवायची? आशा करतो तुम्हाला पोस्ट आवडली असेल.

निष्कर्ष:

मित्रांनो तुम्ही या ब्लॉग मध्ये वर्डप्रेस म्हणजे काय? WordPress Marathi Blogs तसेच वर्डप्रेस वर वेबसाईट कशी बनवायची? याबद्दल सर्व माहिती बघितली आहे. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे खाली कंमेंट करून नक्की कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील ते पण कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बद्दल, माहिती तंत्रज्ञानाबद्दल आणि ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहित पाहिजे असेल तर आमच्या Newsletter ला नक्की Subscribe करा. तुम्हाला अशाच नव नवीन पोस्ट मिळतील.

पूर्ण ब्लॉग वाचला त्यासाठी धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

Share This Post With Your Friend

0 thoughts on “वर्डप्रेस म्हणजे काय? पैसे कमवणारा ब्लॉग कसा तयार करायचा? [2022 Full Guide] | WordPress Marathi Blogs”

Leave a Comment